Monday, 16 March 2020

आपल्या जीवनातील अध्यात्मिक सामर्थ्य

विषय : - आपल्या जीवनातील सामर्थ्य

प्रस्तवना : - देव अंतःकरण जाणतो

उत्पत्ती ३१:१-७


जेव्हा देवाने याकोबास हे स्पष्ट केले की त्याने हारान सोडून कनानात जावे अशी देवाची इच्छा आहे, तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाशी बोलणी केली. देवाचे वचन असे म्हणते की, ‘‘तेव्हा याकोबाने राहेल आणि लेआ ह्यांना निरोप पाठवून शेतात आपल्या कळपाकडे बोलावले’’ (उत्पत्ती ३१:४). त्याने त्यांना अशा जागी बोलावले की त्यांचे बोलणे कोणी ऐकू नये. कारण त्याच्याजवळ एक योजना होती.

लाबानाद्वारे फसवले गेल्यामुळे याकोब स्वत: कशा प्रकारचा मनुष्य होता आणि त्याच्या वागण्याने इतरांवर काय परिणाम झाला असेल हे तो अनुभवाने शिकला. देव आपल्यालाही शिकवण्याकरता अशा प्रकारच्या धड्यांचा उपयोग करतो. कदाचित एखाद्या बाबतीत आपण अपराधी असू आणि कदाचित आपण त्या व्यक्तीला दुखावले आहे याची आपल्याला कल्पनाही नसेल. मग कोणी आपल्याविरुद्ध बोलते तेव्हा चटकन आपल्या लक्षात येते की किती खोलवर त्या शब्दांनी ती व्यक्ती दुखावली जाते आणि मग आपण जे केले त्या बाबतीत आपण संवेदनशील होतो. जर तुमच्याशी गैरवागणूक झाली असेल, तुम्ही फसवले गेला असाल किंवा तुम्हांला धोका दिला असेल आणि तुमचे हृदय त्या सर्व बाबतीत सरळ असेल, तर देवाला ते ठाऊक आहे याची खातरी बाळगा. सरतेशेवटी देव तुमचे समर्थन करील. परंतु मधल्या काळात तुमच्यासोबत जे घडले आहे त्यातील खरेपणा देवाला ठाऊक आहे याची खातरी बाळगा. जर तुमचे हृदय सरळ असेल तर त्याला ते ठाऊक आहे.

_हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण (स्तोत्र.१३९:२३)._


No comments:

Post a Comment