Wednesday, 4 March 2020

उपास व प्रार्थना


शास्त्रभाग : -               मत्तय ६ : १६-१८.

 विषय      : -              उपास व प्रार्थना*

 प्रतिक     : -               प्रभूची आज्ञा


       तुम्ही उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका कारण आपण उपास करीत अहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड  विरुप करतात , मी तुम्हाला खचित राहतो ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. 

                 ( मत्तय ६ : १६)

प्रस्तावना :- 

     उपास जेव्हा आपण करतो तेव्हा आम्ही जगापासून वेगळे होत देवाशी जोडले जातो. ज्याप्रमाणे प्रार्थनेमुळे आपण देवाशी बोलतो जडून राहतो तसच जग आणि जगातील मोह यांपासून उपास आम्हाला दूर करून देवाच्या समीप नेतो आणि देवाशी जोडून ठेवतो.
    वरील वचनात प्रभू येशू म्हणतो , जेव्हा तुम्ही उपास करता. या वाक्याचा अर्थ म्हणजे तुम्ही उपास केलाच पाहिजे , जर उपास करता तर असे देवबाप म्हणत नाही तर जेव्हा तुम्ही उपास करता म्हणजे उपास करा ही आज्ञा प्रभू येशू करीत आहे. कारण उपास व प्रार्थना जेव्हा करतो आपण तेव्हा  प्रभू  पूर्णपणे आम्ही तुझ्यावरच अवलंबून आहोत हे सांगत असतो. उपास समय हा फार विशेष समय आहे. ह्या चाळीस दिवसांचा उपास समय असे मी म्हणत नाही तर ज्या दिवशी आपण उपास करतो तो समय .
   बायबलमध्ये चाळीस दिवस उपास करा असा उल्लेख नक्कीच नाही , काही चर्चेस मध्ये एकवीस दिवस उपास करतात काही चर्चेस मध्ये दर महिन्याचा पहिला किंवा शेवटचा आठवडा उपास समय म्हणून पाळला जातो. कारण का तर उपास समय हा देवाच्या सानिध्यात घेऊन जातो आणि आम्ही आशीर्वादीत होतो.
   पण जर उपास करतो म्हणजे फक्त अन्न सेवन करायचं नाही आणि देवाच्या सानिध्यात सुद्धा जायचं नाही, नित्याची जी आमची जीवनशैली आहे म्हणजे निरर्थक गप्पा , किंवा उपास म्हणून म्लानमुख करीत आळसात दिवस वाया घालवणं मात्र चूकिच आहेच.   देवाच्या सानिध्याचे आशीर्वाद मिळत नाहीत.
    जर तुम्ही उपास करता , प्रार्थना करता , प्रभुसाठी भुकेले आहात तर प्रभू येशूची स्तुती केली पाहिजे. कारण प्रभू येशू हाच जिवंत पाणी आणि जिवंत भाकर आहे तीच भाकर आम्हाला आनंद, शांती , समाधान , आरोग्य , आशीर्वाद देण्यास समर्थ आहे.जेव्हा आपण उपास समयात असतो तेव्हा प्रभू येशू ह्या भाकरीचे सेवन करीत असतो. उपास व प्रार्थना करा ही स्वतः प्रभू येशूने केलेली आज्ञा आहे

  एल्मर टाऊन्स हे बायबल स्कॉलर म्हणतात, उपास प्रार्थनेमुळे देवाची समक्षता तुमच्या जीवनात सदैव असते.*  *आणि प्रभूची समक्षता आमचं जीवनच बदलून टाकते.* 

   प्रार्थनेमुळे आम्ही देवाशी जडले जातो आणि उपासामुळे जगापासून दूर व प्रभूच्या समीप जातो.
    सर्वसमर्थ ईश्वरा तुझी समीपता , आणि तुझ्याशी जडून राहण्यासाठी आम्ही आत्म्याने व तुझ्या आज्ञेप्रमाणे खरेपणाने उपास , प्रार्थना करीत तुझ्या स्तुति रमून जावं असे कर.आमेन..
     

No comments:

Post a Comment