आजचा विषय :-
येशूचे खरे रूप
_____________________________________________
1) यशया संदेष्टाने येशुचे खरे रूप पाहिले , या व्यक्तीने 66 अध्यायाचे पुस्तक लिहिले .
2) त्या पुस्तकात सर्वात जास्त उल्लेख येशूचे होते , जेव्हा हा पुस्तक लिहित होता , तेव्हा परमेश्वराने त्याला येशुचे खरे रूप दाखवले .
तर मग , तुम्हाला पाहियचे आहे का ? येशूचे खरे रूप कसे आहे ?
ते रूप , यशया 53:1.12 या अध्यायामध्ये दाखवले आहे
_____________________________________________
यशया 52:14
ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप होता),
1) त्याला स्वरूप नव्हते , असे यशया संदेष्टा का लिहितो ? कारण तो मनुष्य सारखा नव्हता आणि त्याची सुंदरता माणसासारखी नव्हती
2) ज्या येशूला आपण म्हणतो माझा विजा लावून दे ,ज्या येशूला आपण म्हणतो माझा बिझनेस वाढू दे ,
3) मला गाडी दे , मला बंगला दे , माझे हे कर , माझे ते कर , त्या येशूला कधी बाबा , कधी जेवण देणारा ,
4) कधी डॉक्टर बरा करणारा , पैसे देणारा , कधी नौकर , कधी शांती देणारा , हे कर , ते कर
5) त्या येशूला यशया म्हणतो , त्याचे स्वरूप भयानक होते , त्याला सुंदरता नव्हती , तो विद्रुप होता , तो माणसाप्रमाणे नव्हता हे त्याने पाहिले
येशूचे खरे रूप , अनेक शतकापासून लपवुन ठेवण्यात आले आहे -- (2)
आज येशूचे खरे रूप देश , विदेशांमध्ये कसे दाखवत आहेत ?
1) खाली पाडणे , फुंक मारणे , झाडाप्रमाणे झाडाझुड करने , खाली पटकने आणि वरून हे म्हणायचे की येशु तुमच्यावर प्रेम करतो , यात काही शंका नाही
2) हे 100℅ खरे आहे येशू तुमच्यावर प्रेम करतो परंतु फक्त हेच का ? सँटाक्लॉज प्रमाणे तो तुम्हाला गिफ्ट देईन , लिप्स देईन , तुम्हाला ते देईन , तुम्हाला हे देईन , असे का ?
जर आज तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकाल , तर तुमचे नाचणे , उड्या मारणे , तुमचे Time pass करणे बंद होईल आणि तुम्हाला येशूवर खरे प्रेम होईल
लूक 22:42
“हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
परमेश्वराला येशू म्हणतो ,
1) तुझी इच्छा आहे की मानव जातीसाठी मरू , तुझी इच्छा असेल तर हिंदू भावांसाठी मरू , तुझी इच्छा असेल प्रत्येक मुस्लिम भावासाठी मरु ,
2) तुझी इच्छा असेल की बुद्धिष्ट भावांसाठी मरू , तुझी इच्छा असेल की मी सर्व जगासाठी ,
3) जगातल्या धर्मासाठी , त्या मनुष्यासाठी मरू , या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मरू , तर तुझी इच्छा पूर्ण हो
या ठिकाणी यशया संदेष्टा हा येशुचे खरे रूप दाखवत आहे
_____________________________________________
चला पाहू या , येशूचे खरे रूप
यशया 53:1
आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?
येशूच्या जन्माअगोदर ही सुवार्ता सांगण्यात आली ,
1) भूज (ताकत , शक्ती ) ही परमेश्वराने कोणावर दाखविली ? मनुष्याला वाचवण्यासाठी परमेश्वराने कोणावर शक्ती दाखविली , जी अशी व्यक्ती जो मनुष्य म्हणून आला , त्याचे नाव येशू ख्रिस्त
2) भूज कोणावर प्रकट झाला ? त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला ? हे तेव्हा पण विश्वास करत नव्हते आणि आज पण विश्वास करत नाही
3) व्यवस्थित येशुचे खरे रूप दाखवले गेले नाही , तर विश्वास कोण करणार ?
_____________________________________________
यशया 53:2
कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते.
रुक्ष याचा अर्थ माहित आहे का ?
1) जिथे पाणी नाही , अशी एक जमीन ज्याच्यावर काहीच येऊ शकत नाही , ती लहान आणि सुकलेली असते ,
2) कोणत्याच प्रकारचा आनंद नाही , कोणत्याच प्रकारचे चांगले घर नाही , चांगले अन्न नाही , चांगले कपडे नाही , हे सर्व येशुला नाही मिळाले .
3) चार ही शुभवर्तमान सांगते की , जेव्हा येशूचा जन्म झाला , त्याला चांगले घर नव्हते आणि चांगले कपडे नव्हते , हे वचन याला कनेक्ट करते .
4) आज आपल्या लेकरांसाठी चांगले कपडे , चांगले खेळणी , शॉपिंग करू शकतो , आपले लेकरे सर्व काही करू शकतात , परंतु येशूच्या आई-वडिलांकडे , येशू साठी कपडे , शॉपिंग करण्यासाठी काहीच नव्हते
5) म्हणून वचन सांगते तो वृक्ष भूमीतील अंकुर सारखा वाढला
6) लक्षपूर्वक ऐका येशूचा जन्म राजमहालमध्ये होऊ शकत होता , राजाच्या महालामध्ये जन्म होऊ शकत होता
7) परंतु परमेश्वराने ठरवले की तो अशाच जागेवर जन्म घेईल , त्याला कुठलेच सौंदर्य नव्हते , लोकांनी तुच्छ मानलेला , टाकलेला तो असा होता
मत्तय 2:23
आणि नासेरथ नावाच्या गावी जाऊन राहिला; अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
(नासोरीचा अर्थ ग्रीकमध्ये कचर्याचा ढीग )
योहान 1:46
नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?”
1) ज्याला कचरा म्हटले जाते , ज्याला वृक्ष जमीन म्हटले जाते , अशी एक जागा कि तेथे घर नाही , कुठल्या सुख सुविधा नाही
2) आणि त्याला नासोरी म्हणतील याचा अर्थ काय आहे ? नासोरी मधून चांगले काही निघू शकते का ? नाही .
3) ती चांगली जमीन होती का ? नाही , तिथे फॅसिलिटी होती का ? नाही . काय तिथे शांती होती का ? नाही .
_____________________________________________
यशया 53:3
तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही.
1) हा येशू जिथे जायचा तिथे त्याला नाकारले जायचे , कोणी त्याला पसंत करत नव्हते , असा होता येशू मित्रांनो , तर कोणी पाहिला यशयाने संदेष्ट्याने .
2) आज आपण गाणे गातो , सागर से गहरा , असमा के नीचे , कधी हा विचार केला का ? येशू आपल्याला वाचवण्यासाठी ह्या टोकांपर्यंत गेला , मनुष्याने टाकलेला , तुच्छ मानलेला , तो दुःखी पुरुष होता .
दुःखी पुरुष याचा अर्थ काय आहे ?
1) टाईमा वर अन्न नाही , टाईमा वर कपडे नाही , एकदा येशू म्हटला की पक्षी , प्राणी यांना घर आहे
2) पण मनुष्याच्या पुत्राला माथा टेकण्यासाठी जागा नाही , या रीतीने पाहिले दुःखी पुरुष
3) तुम्हाला घर आहे , परंतु येशुला नव्हते
अशी हाल का ? अशी परिस्थिती का ?
1) येशू हा रोगाशी परिचित होता , लोक त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवून घेत होते ,
2) कोणालाही येशूचा चेहरा पसंत नव्हता , येशूचे रूप कोणालाही पसंत नव्हते
3) विचार करा या व्यक्तीने कसे Adjust केले , या व्यक्तीचे नाव आहे येशू ख्रिस्त - - (2)
4) या एक व्यक्तीने अशी जागा निवडली , असा जीवन जगला मनुष्याने तुच्छ मानलेला , रोगाशी परिचित , लोक आपले तोंड फिरवून घेत होते , येशूला कोणी मित्र बनवत नव्हते , मित्रांनो ..
आणि आपल्याला त्याची किंमत समजली नाही, असे का ?
1) कारण आपल्याला समजले नाही की परमेश्वराचा पुत्र , स्वतः परमेश्वर म्हणून खाली आला आणि असे जीवन जगला
2) परंतु आपल्याला त्याची किंमत समजली नाही , त्याची किंमत समजली नाही , का ? कारण येशुचे खरे रुप दाखवले नाही , येशूचे खरा चेहरा दाखवला नाही , येशूचे खरे जीवन सादर केले नाही
3) तर त्याची किंमत कशी समजणार ? खरे रुप , खरे चेहरा , खरे जीवन , कधी दाखविले गेले नाही
4) परंतु यशया संदेष्ट्याने येशूचे खरा चेहरा , खरे रूप , खरे जीवन दाखविले
तो रोगांशी परिचित होता
मत्तय 9:12
हे ऐकून तो म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे.
1) येशूने कुष्टी रोग्याला बरे केले , रक्तस्रावी स्त्रीला बरे केले , तर कुपी अस्त्र स्त्री तिचे पाप माफ केले , पाप्याबरोबर येशु होता , उद्धार , तारण करत होता ,असा येशू आपल्याला समजला का ?
2) असा येशू जो सर्व ठीक करणार , माझी गाडी , नोकरी , माझा बंगला , या सर्व गोष्टी तुम्हाला देत आहे
3) कारण येशूला आपण बाबा करून टाकले
_____________________________________________
यशया 53:4
खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले; तरी त्याला ताडन केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले.
मत्तय 8:17
“त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
1) कोठे रोग वाहिले ? त्या वधस्तंभावर , 39 फटके खाल्ले कोणी ? येशूच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला कोणी ?
2) किंमत दिली कॅन्सर साठी , कोणी ? येशुने , किंमत दिली कोरोनाव्हायरस साठी , कोणी ? येशूने , किंमत दिली तुमच्या आजारासाठी .कोणी ? येशूने
3) हे सर्व येशूचा रक्ताद्वारे आरोग्य मिळाले आहे
1 पेत्र 2:24
‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’
1) कोणी 10 हजार दिले म्हणून आरोग्य नाही मिळाले , माझ्या बहिणीनो भावांनो , येशुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले आहे
2) परंतु का देतात पैसे काळ्या कोटवाल्यांना , सफेद कोटवाल्यांना ? कधी इकडे , कधी तिकडे वर बसलेला परमेश्वर म्हणतो , माझ्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे आरोग्य मिळाले आहे
3) हे खरे रूप दाखवले जात नाही ? या कारणामुळे चर्च मध्ये लोकांची गर्दी जमते . कारण तिथे चमत्कार करणारा बाबा आणतात ,
4) आज येशूचे खरे रूप दाखवत नाही
_____________________________________________
यशया 53:5
खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.
रोमकरांस पत्र 4:25
तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरवयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.
1) कोणाची हिंमत आहे , जो येशूला मारू शकतो ? परंतु परमेश्वर पिता बोलला की त्याला ठेचा , त्याला कृसावर चढवा
2) येशू जर नाही चढला , येशू जर नाही ठेचला गेला , येशू जर मारला नाही गला , तर मी कसा वाचणार , हिंदू भाऊ कसा वाचणार , माझा मुस्लिम भाऊ कसा वाचणार ,
3) तुम्हाला दहा हजार रुपयांमध्ये शांती नाहीं मिळाली , शांती डोक्यावर हात ठेवल्याने शांती नाही मिळत , तर येशूच्या कडे आल्याने शांती मिळते .
4) रोम 4:25 येशूला कोणी धरून दिले ? आणि का धरले ?
5) यहूदा इस्कोर्योत नाही धरून दिले , येथे असे लिहिले आहे की आमच्या अपराधामूळे येशूला धरून देण्यात आले ,
6) येशूला 30 चांदीच्या शिक्या मध्ये , गालावर चुंबन घेऊन धरून दिले नाही ,
7) परंतु हे लिहिले आहे की माझ्या अपराधासाठी येशूला धरून दिले , मानव जातीच्या पापामुळे , येशूला धरून दिले ,
8) असा चेहरा , असे रूप कधी पाहिले होते का ? ही सत्यता माहीत होती का ?
_____________________________________________
यशया 53:6
आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.
1) एदेन बागेत आदमाच्या हातातून झालेल्या चुकीमुळे आणि येशू ख्रिस्ता पासून आणि आज पर्यंत सर्व भटकले आहे , सर्वजण भटकले आहे
2) परमेश्वराला ओळखणारा कोणी नाही , खऱ्या परमेश्वराला ओळखणारा कोणीही नाही
3) तुम्ही अल्लाह म्हणता ना , खुदा म्हणता ना तोच परमेश्वर म्हणतो , सर्वजण भटकले आहे
4) तुम्ही म्हणता ना सर्व मार्ग एक आहे , ते सर्वजण भटकले आहे
5) येशु जो कृस घेऊन चालला होता ना ती शिक्षा रोम कडून नव्हती , पिलात पकडून शिक्षा नव्हती , हेरोद राजाकडून शिक्षा नव्हती , महायाजक हनन्या , कयफा यांच्याकडून शिक्षा नव्हती
6) परंतु येशूवर जो कृस लादला होता ना तो सर्व मानव जातीचे पाप आणि अधर्माने चालणारे , ते सर्व भटकले होते .
7) का चीड येते मूर्तीला परमेश्वर म्हणणाऱ्यांची ? का चीड येते प्लास्टिक आणि लाकडाला परमेश्वर म्हणणाऱ्याची ? का चीड अशा लोकांची झाडाच्यावर , झाडाच्याखाली ,
8) पाण्याच्या वर पाण्याच्या खाली , डोंगराच्या वर , डोंगराच्या खाली परमेश्वराला शोधतात , तुम्हाला नाही माहित तुम्ही भटकले आहात
9) तर खरा मार्ग दाखवण्यासाठी कोणावर तरी कृस देण्यात आला , हा चेहरा दाखवला जात नाही . आणि म्हणतात की येशू सर्वांवर प्रेम करतो ,
10) जसे आहे तसे या , तुम्ही जे काही करीत असेल ते पण या , तुम्ही रविवारी चर्चमध्ये हालेलुया करा , परमेश्वराची स्तुती करा
11) परंतु त्याच्या नंतर सोमवारपासून तर शनिवार पर्यंत पिक्चर थेटरला , जा दारू प्या , नशा करा , चुकीचे काम करा , तरी परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो .
12) नाही करणार प्रेम , जेव्हा भटकले होते तेव्हाच मार्ग काढला होता , प्रभू मध्ये येऊन ही जर भटकले असाल , तर कोणता नवीन मार्ग काढायचा ?
प्रेषितांची कृत्ये 10:43
त्याच्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.”
असे का ?
1 पेत्र 2:25
कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.
1) येशूने कृस घेतला हिंदूं भावांसाठी , येशूने कृस घेतला मुस्लिम भावांसाठी , येशूने कृस घेतला बुद्दिष्ट भावांसाठी, येशूने क्रूस घेतला यहुदी भावांसाठी ,
2) येशूने क्रूस घेतला आमच्यासाठी , सर्व मानव जातीसाठी , हा खरा चेहरा दाखवला जात नाही ? हे खरे रूप दाखवले जात नाही ?
_____________________________________________
यशया 53:7
त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्यांपुढे गप्प राहणार्या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही.
1) येशूच्या तोंडावर थुंकण्यात आले , येशूच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली , चापट मारण्यात आली ,
2) येशूला मागून मारण्यात आले , कोणाची एवढी हिम्मत की , परमेश्वराला मारू शकेल , फटके मारू शकेल , त्या येशूला छळण्यात आले
मत्तय 27:12-14
मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?” परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले.
1) येशू तू शांत का आहे , जेव्हा तुला मारले जात होते , येशू तू शांत का आहे , जेव्हा तुझ्या वर आरोप केले जात होते ,
2) तू शांत आहे , तू वेश्याबरोबर संगत ठेवायचा , पापी लोकांबरोबर संगत ठेवायचा , तू मूर्ती पूजक आहे ,
3) तू चुकीच्या माणसाबरोबर रहातो , तुझ्यामध्ये दुष्ट आत्मा आहे , तू जबुलून च्या साह्याने काम करतो ,
4 ) हे सर्व ऐकून येशू तू शांत का आहे
का शांत राहिला येशु ,,तर,,,
1) जेव्हा आपण चूक करीत होतो , पाप करीत होतो वर बसलेला परमेश्वराने , आपला चुटकीमध्ये नाश केला असता , पण येशूमुळे तो शांत आहे
2) आतंकवादी , मर्डर करणारे , चोरी करणारे , हे सर्व पापी यांचा संसार आहे , त्यांच्यासाठी शांत आहे कारण यांच्यासाठी किंमत दिली परमेश्वराने
4) नाही तर येशूने , चुटकी मध्ये सर्व नष्ट करून टाकले असते , सर्व संपूण टाकले असते , परंतु येशु शांत राहिला
प्रेषितांची कृत्ये 8:32
तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा: “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणार्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही.
यशयचा 53 अध्याय च काय ?
9) हफषी षंडाला 53 अध्याय कोण आहे ? हे त्याला पाहियचे होते येशूची खरे रूप , येशूचा खरा चेहरा कोण सांगेल ? त्याची तळमळ पवित्र आत्म्याने पाहिली आणि फिलिप्प्याला सांगितले , जा त्याला 53 चा व्यक्ती कोण आहे ? तो सांग ?
10) आज भारताला 53 चा व्यक्ती कोण आहे ? हे सांगितले पाहिजे , अमेरिका 53 चा व्यक्ती सांगितले पाहिजे , आफ्रिकाला 53 चा व्यक्ती सांगितले पाहिजे , आपले शहर , आपले नगर , आपले गाव , आपले नातेवाईक येशु सांगितले पाहिजे
11) आज या 53 च्या व्यक्तीला लोकांनी आज बाबा , कधी डॉक्टर मध्ये बदलून टाकले
12) येशूची खरी ओळख करून देण्यासाठी फिलीप्पा सारखी व्यक्ती परमेश्वर आपल्यासाठी तयार करीत आहे
13) जेव्हा त्याला , येशूचे खरे रूप समजले , तर फिलिप तेथून गायब झाला , निघून गेला . हेच खरे रूप दाखवून दिल्यानंतर संपले आणि दुसऱ्या लोकांना सांगण्यास सुरुवात करा
1 करिंथ 15:3
कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला;
1) आज असे काही ग्रुप्स आहे , काही लोक आहे ते म्हणतात की ही इसाई (ख्रिशन) लोक धर्मांतर करणारी लोक आहे , हे (ख्रिशन धर्माचे ) इसाईचे प्रसार करणारे आहे ,
2) नाही , आम्ही (ख्रिश्चन धर्माचे) इसाईचे प्रसार करत नाही , आम्ही ख्रिस्ताचे प्रसार करत नाही , आम्ही तर येशू ख्रिस्ताचे प्रसारक , सुवार्तिक आहोत
3) येशू ख्रिस्त मानव जातीच्या पापांसाठी मरण पावला , हे खरे रूप .
1 योहान 3:5
तुम्हांला माहीत आहे की, आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
1) येशू ख्रिस्ताने कधीच कोणावर तलवार नाही चालवली , कोणाचा गळा कापण्यासाठी , येशू ख्रिस्ताने कोणत्या प्रकारचा त्रिशूल नाही चालवले ,
2) येशू ख्रिस्ताने कोणत्या प्रकारचा बांण नाही चालवला , येशू ख्रिस्ताने कोणत्याही प्रकारचा गद्दा नाही उचलला ,
3) येशू ख्रिस्ताने कोणत्याही प्रकारचे मर्डर नाही केले , येशू ख्रिस्ताने अनेक लग्न नाही केले , आत्ताचे राजे , नबी त्यांनी भरपूर लग्न केले , तसे येशू ख्रिस्ताने काहीच केले नाही
4) कुठून होणार पाप , कारण तो परमेश्वर होता आणि तो मानव म्हणून आला
_____________________________________________
यशया 53:10
त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.
1) मला , तुम्हाला , मानव जातीला मारायचे होते पण येशूला मारले
2) तुम्हाला आम्हाला मरायचे होते , परंतु येशूला मारले गेले , परमेश्वराने त्याला मनुष्य म्हणून पाठवले
येशूला रोगी बनवण्यात आले , रोगी चा अर्थ समजतो का ?
यशाया पहात आहे , येशू ख्रिस्ताला आणि विचारतो की ,
1) तू असा दिसत आहे की , जसे तुला रोग झाला आहे , तुम्ही परिस्थिती अशी झाली आहे , की जसा तुला आजार झाला आहे ,
2) तुझ्या चेहऱ्यावर काहीच चमक नाही , तुझे गाल एकदम सुकून गेले आहे , तू असा दिसत आहे की , तुझे डोळे एकदम खाली गेले आहे ,
3) तुझ्या डोळ्या खाली काळे वर्तुळे आली आहे , तुझ्या हडड्या सुकून गेल्या आहे , तू तंदुरुस्त नाही , परमेश्वराने त्याला रोगी केले
4) असा चेहरा का पाहत नाही आपण , अशा येशूला का समजून घेत नाही , आपण लोक ?
5) आज हे दाखवले जात आहे की , येशु तूम्हाला गाडी देईल , बंगला देईल , हे सत्य आहे , तो देईल ,
परंतु हे का दाखवत नाही की , त्याने तुमच्या साठी काय केले ? - - (2)
त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील
1) येशूची वंशावळ बायबलमध्ये नाही , अब्राहमची आहे , इसहाकाची आहे , याकोबाची आहे , दाविदाची आहे
2) परंतु येशूची वंशावळ बायबलमध्ये नाही , पण येशूची वंशावळ आम्ही आणि तुम्ही आहोत .
____________________________________
यशया 53:12
ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल; कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.
इब्री 7:25
ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.
गेथशेम बागेत काय होणार होते ?
1) हा येशू आहे ज्याला ठेचला जाणार होता , त्याला बेदाम मारणार होते , बेदर्द पिटणार होते
2) येथे काय होणार होते , ही गोष्ट अगोदरच येशूला माहिती होती
3) हा स्वतः परमेश्वर आहे , स्वतः खुदा आहे त्याला माहीत होते की , माझ्या बरोबर काय होणार आहे
गेथशेम बागेत थोड्या वेळानंतर काय होणार होते ?
1) येथे परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला , रागाचा प्याला तो पिणार होता
2) या कारणावरून हा प्याला माझ्यापासून दूर कर , हे व्हायच्या अगोदर येशूने शिष्याला सांगितले होते की ,
लूक 22:37
मी तुम्हांला सांगतो ‘तो अपराध्यांत गणलेला होता’ असा जो शास्त्रलेख आहे तो माझ्या ठायी पूर्ण झाला पाहिजे कारण माझ्याविषयीच्या गोष्टी पूर्ण होत आहेत.”
मला मारले जाईल पेत्रा , ते रात्री गेले सर्व शिष्य पळून गेले शास्त्रात लिहिले होते ते माझ्याबरोबर करणार आहे
गेथशेम - येथे येशु परपेक्त मानव होता -
1) येशूच्या तोंडातून हे निघाले की , हा प्याला माझ्यापासून दूर कर , पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्य सांगू शकत नाही की येशूबरोबर काय होणार होते
2) येशूला प्रार्थना सहाय्याची गरज होती , परंतु हे तिघे झोपून गेले होते , काय थोडा वेळ जाऊ शकत नाही ,
3) तुम्हाला माहित नाही , माझ्याबरोबर काय होणार आहे
फिलिप्पैकरांस पत्र 2:6-7
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले.
1) येथे परफेक्ट मनुष्य होता , अंश भर मनुष्याचा भाग येथे दिसत नव्हता , त्याला शून्य करून टाकले , येथे येशूने परमेश्वराचा शक्तीचा वापर केला नाही ,
2) पेत्रा तू जो पाण्यामध्ये डुबत होता , तुला वर काढले , योहान तुला माझी आई सोपवण्यात येणार आहे , तुम्ही माझ्यासाठी जागे राहिले नाही ,
3) येथे येशू मनुष्य होता , जरा पण त्याने मदत घेतली नाही , तो मनुष्य होता , म्हणून तो बोलला की शक्य असेल हा प्याला माझ्या पासून दूर कर
4) जगाचे सर्व पाप येशूवर , याचा विचार करून येशू बोलला की थोडा वेळ जागे राहा , प्रार्थनेचा सपोर्ट मिळावा पण नाही मिळाला
1 तीमथ्य 3:16
सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.
प्रेषितांची कृत्ये 2:22
अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका; नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हांला दाखवली त्यांवरून देवाने तुमच्याकरता पाठवलेला असा तो मनुष्य होता, ह्याची तुम्हांला माहिती आहे.
1) गेथशेम बागेत येशू परफेक्ट मनुष्य होता , पूर्ण मानव होता , त्याच्यामध्ये परमेश्वराची शक्ती अंश भर नाही दिसली , माझे रक्त घामाप्रमाणे पडणार होते , मला अस्वस्थ होणार आहे मला कसे मारणार हे सर्व सांगितले होते
2) माझे मांसचे तुकडे पडणार होते , चाबकाने मारणार होते , हातापायाला खिळे खुपसणार होते , त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातलेला होता , हा येशू पूर्ण मानव होता
3) असा येशु आपण पाहिला आहे का ? हा येशु कशामध्ये बदलला ? तर सँटाक्लॉज मध्ये , कशामध्ये बदलला ? तर ख्रिसमस ट्री मध्ये , कशामध्ये बदलला ? तर मनोरंजन मध्ये
4) येथे कोण होता ? शक्य असेल हा प्याला दुर कर येथे येशू होता
5) सैतान म्हणतो काहीच गरज नाही , परंतु परमेश्वर म्हणतो फक्त तूच आहे , मी सर्व राजे पाहिले , सर्व संदेष्टांना पाठवले , हे धार्मिकता आणीन , परंतु हे सर्व फेल झाले
6) तुझ्या जवळच फक्त ते पवित्र रक्त आहे , कोणत्याही प्रकारचे पाप तुझ्या मध्ये नाही , माझी इच्छा आहे की तू मरावे आणि येशू म्हणतो शक्य असेल तर हा प्याला दुर कर आणि सैतान म्हणतो क्रुसावर नको मरू
फिलिप्पैकरांस पत्र 2:8
आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
1) येथे येशू परीक्षा पास झाला , परमेश्वराची इच्छा पूर्ण झाली , येशू चर्चची घंटा नाही ,
2) की रविवारी चांगले कपडे घालून चर्चमध्ये नाचायचे आणि बाहेर यायचं , ही येशूचे खरे रूप नाही
सैतान ची इच्छा अशी होती की येशूने क्रुसावर मरु नये , का ?
1) येशु जर मेला तर सर्व मानव जात वाचली जाईल , हिंदू भाऊ वाचला जाइल , मुस्लिम भाऊ वाचला जाईल ,
2) बुद्धीष्ट भाऊ वाचला जाईल , शीख , पारशी , जैन , आदिवासी भाऊ , यहुदी भाऊ वाचला जाईल , मनुष्य वाचला जाईल
सैतानाने पूर्ण ताकद लावली की येशूने क्रुसावर मरू नये ?
1) जर येशू क्रुसावर मेला नसता तर देवाचे लोक रस्त्यावर वचन सांगतांना , सुवार्ता करताना दिसले नसते , तुम्ही मला वचन सांगताना ऐकले नसते
2) येशु क्रूसवर मेला त्याने सांगितले की , जा सुवार्ता सांगा म्हणून आम्ही सुवार्ता सांगतो . येशूचा घाम रक्ता प्रमाणे वाहत होता ,
3) परमेश्वर म्हणतो , तुलाच मरावे लागेल , कारण तू जर नाही मेला , तर हे मनुष्य कसे वाचणार ?
4) मी पाप सहन नाही करू शकत , जे बलात्कारी , चोरी , खून नशा , भ्रष्टाचार , आतंगवादी हे कसे वाचणार ? येशू म्हणतो असे असेल तर तुझी इच्छा पूर्ण हो
5) 25 डिसेंबर ला कोणता संदेश गेला पाहिजे ? गुड फ्रायडेला कोणता संदेश गेला पाहिजे ? ईस्टर संडेला कोणता संदेश गेला पाहिजे ?
6) परंतु आज काय होत आहे , प्रत्येक संडेला काय प्रचार , संदेश दिला जात आहे की ? येशूकडे या , नोकरी मिळेल , बिजनेस वाढेल , आशीर्वाद मिळेल , आरोग्य मिळेल , बरकत मिळेल असा संदेश दिला जात आहे ,
परंतु खरा येशु कुठे आहे ? - - - (2)
परमेश्वराचा क्रोध मनुष्यावर न लादता एका मनुष्यावर तो प्याला लादण्यात आला -
1) जेव्हा येशूला मारण्यात येत होते तेव्हा त्या बापाचा जीव काय म्हणत असेल ? त्याच्या जीवावर काय बितत असेल ?
2) जो परमेश्वर आहे , तो सर्व नष्ट करू शकतो , त्याने ठरवले की असेच मरण यावे , असेच मारावे त्याला , तो प्याला पाजण्यात आला ,
3) येशूला क्रुसावर मारले गेले . का ? कारण माझे , तुमचे , पाप माफ होईल , हे हिंदू भाऊ त्याचे पापक्षमा होईल , मुस्लिम भाऊ त्याचे पाप क्षमा होईल ,
येशू कृसावर मेला , कारण पापांची क्षमा व्हावी - - (2)
जन्मापासून तर कृसापर्यंत येशू बरोबर काहीच चांगले झाले नाही -
1) चांगले घर भेटले नाही , आईवडीलांची साथ नहीं भेटली , घरच्या लोकांनी त्याला वेडे म्हटले , शिष्य त्याला सोडून गेले
2) एक व्यक्ती येऊन त्याला 30 चांदीच्या शिक्या मध्ये विकून देते , येशू बरोबर काहीच चांगले झाले नाही
3) म्हणून यशया म्हणतो , ना त्याला सुंदरता होती , ना त्याला चमक होती , ना त्याला रूप होते , नाही त्याला खरी ओळख होती , तो मनुष्याने टाकलेला होता
4) असा येशू क्रुसावर आपल्या पापांसाठी मरण पावला
येशूला क्रुसावर सैतानाने नाही मारले तर परमेश्वराची इच्छा होती की तो मरावे -
फिलिप्पैकरांस पत्र 2:9-11
ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
1) जो पुर्ण मनुष्य होता , असे मरण त्या परमेश्वराने दिले की , क्रुसावर तूच मरणार ,
2) त्याच परमेश्वराने , त्या येशूला मोठ्या , श्रेष्ठ , शानदार , मोठ्या शक्तीने , मोठ्या सन्मानाने त्याला आपल्या डाव्या हाताला जवळ बसवले
No comments:
Post a Comment