Tuesday, 7 April 2020

येशूची कृपा


                     येशूची कृपा 

पैसा गाडी बंगला असले म्हणजेच प्रभु येशुची कृपा आहे असे नव्हे...


तर

आयुष्यात आलेली अनेक संकटे
आपल्या नकळत टळून जातात
ते टळलेले संकट म्हणजे प्रभु कृपा...

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो
ते सावरणे म्हणजे प्रभुची कृपा...

एकवेळचे जेवणाचे वांदे असताना
मिळालेले दोन वेळच पोटभर जेवण म्हणजे प्रभुची कृपा...

कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला
पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, ती ताकत म्हणजे प्रभुची कृपा...

'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते
ती उमेद म्हणजे प्रभुची कृपा...

अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता "तू लढ.. मी तुझ्यासोबत आहे सोबत" हेच शब्द म्हणजे प्रभुची कृपा...

प्रसिद्धी च्या शिखरावर असतांना
तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे प्रभुची कृपा....

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे प्रभु कृपा झाली असे नव्हे

तर

या वर नमुद गोष्टी स्वत:कडे  नसताना आयुष्यात असलेले
'समाधान' म्हणजे * प्रभुची कृपा....

No comments:

Post a Comment