विषय : आध्यात्मिक सामर्थ्य
प्रस्तवना : देव त्याच्या स्वकीयांना टाकून देत नाही
उत्पत्ती ३९:१३-२३
योसेफाविषयी पोटीफराच्या बायकोने किती खोटारडेपणा केला! पापात सहभागी होण्याच्या तिच्या आमंत्रणाला त्याने नकार दिला. कारण त्याला देवाला अपमानित करायचे नव्हते, आणि आता तिच्या खोटारडेपणामुळे काहीही झाले तरी देवाची अपकीर्ती झाली होती.
जेव्हा पोटीफराने त्याच्या बायकोची हकिकत ऐकली, तेव्हा तो फारच रागावला. त्याने योसेफास धरले, ‘‘आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदिशाळेत त्याला टाकले; तो त्या बंदीशाळेत राहिला’’ (उत्पत्ती ३९:२०). देवाशी विश्वासू राहण्याचे हेच का प्रतिफळ योसेफास मिळणार होते?
तथापि सर्वकाही त्याच्याविरुद्ध जात आहे असे दिसू लागले, तरी पवित्र शास्त्र यावर जोर देते की, ‘‘तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिकार्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले’’ (व.२१). जरी योसेफाची स्थिती निराशाजनक होती, तरी देवाने त्याला क्षणभरही सोडले नाही.
आपल्यालासुद्धा देवाच्या वचनातून आश्वासन आहे : ‘‘मी तुला सोडून जाणार नाही, व तुला टाकणार नाही’’ (इब्री.१३:५). मूळ भाषेत हा वाक्प्रचार फारच परिणामकारक आहे ‘‘मी तुला कोणत्याही कारणाने सोडून जाणार नाही किंवा कोणत्याही कारणास्तव तुला टाकणारही नाही.’’ देव आम्हांला कधीही असहाय असे सोडणार नाही अथवा टाकून देणार नाही. म्हणून, ‘‘आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?’’ (व.६). तुम्हांला अशी खातरी आहे का? तुमची परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्यात त्याने काही फरक पडत नाही, ख्रिस्ती म्हणून देव कधीही तुम्हांला त्यागणार नाही.
_मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातांतून कोणी हिसकून घेणार नाही (योहान.१०:२८)._
No comments:
Post a Comment