विषय : जीवनप्रवासासाठी आध्यात्मिक सामर्थ्य
प्रस्तवना : स्वइच्छेने व विश्वासूपणे सेवा करणे
उत्पत्ती ४०:१-८
देव योसेफाच्या जीवनात जी उल्लेखनीय प्रसंगांची मालिका आणणार होता त्या साखळीमधील सेवा हा मुख्य दुवा होता. आता योसेफास राजाचा आचारी व प्यालेबरदार यांची जबाबदारी दिली होती, कारण ‘‘त्याने त्यांची सेवा केली’’ (उत्पत्ती ४०:४). त्याच्या देवभीरू चारित्र्यामुळे जे अधिकारी होते त्यांची मने त्याने जिंकली. योसेफाकडे त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आणि योसेफ कोणत्याही प्रकारे सेवा करण्यास आनंदाने तयार झाला.
इतरांची सेवा विश्वासूपणे करून योसेफाने देवाची सेवा केली, तेव्हा आचारी आणि प्यालेबरदार यांच्याबरोबरच्या संबंधाचा देव त्याचा संकल्प अमलात आणण्याकरता वापर करणार होता याविषयी त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. देव त्यात सहभागी होता म्हणून इब्री गुलाम आणि फारोचे दोन चाकर यांच्यामधील संबंधाने दूरवरचे परिणाम घडवून आणले.
देव त्याच्या गौरवासाठी एखाद्या छोट्याशा गोष्टीचा कसा उपयोग करणार आहे हे आम्ही समजू शकलो नाही, तरी देव मोठ्या गोष्टींचा तसेच लहान गोष्टींचाही वापर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी करत असतो हे आम्ही समजून घेतले पाहिजे. रोम.८:२८ मधील ‘सर्व गोष्टी’ हे शब्द फार महत्त्वाचे आहेत ‘‘देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.’’
विषेशेकरून लक्षात ठेवा की योसेफाचा धार्मिक दृढ विश्वास त्याच्या जगिक पदोन्नतीच्या आड आला नाही. एखाद्या व्यक्तीतील चारित्र्याची गुणवत्ता जगातील माणसे लगेचच ओळखतात. पदोन्नती मिळवण्यासाठी योसेफाने तडजोड केली नाही; त्याला पदोन्नती मिळाली कारण तो तडजोड न करणार्या चारित्र्याचा मुलगा होता.
_मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जिवेभावे त्याची सेवा करा; त्याने तुमच्यासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत ह्याचा विचार करा (१शमु.१२:२४)._
No comments:
Post a Comment