Sunday, 29 September 2019

बायबलमधील नाव व त्याचे अर्थ

               बायबलमधील नाव व त्याचे अर्थ :-

    नाव                              अर्थ


1) शौल                           : -    मागितलेला 
2) स्तेफन                         : -    मुकुट
3) हनोख                         : -     समर्पित 
4) हन्ना                            :-      कृपा प्रसन्नता
 5) होसांना                       :-      आता तारण कर
6) ख्रिस्त                         :-       देवाचा अभिषिक्त
7) तिमथ्य                        :-      देवाचा आदर करणारा
8) थियफिल                     :-      देवाचा मित्र
9) दिना                              :-      न्याय
10) नथनेल                         :-     देवाने दिले आहे




11) नेहम्या।                        :-     यहोवा सांत्वन करतो
12) नामान                        :-     मनोहर
13) नाहोर                     :-     झोपेत घोरणारा
14) नोहा                          :-     विसावा
15) पनिंना                       :-      प्रवाळ
15) पेरेस                         :-      खिंड
16) पौल                         :-     लहान
17) फिलिप प्रेषित             :-     अश्वप्रेमी
18) बराका                       :-     आशीर्वाद
19) बर्णवा                     :-      बोधपुत्र
20) बेथलेम                     :-      भाकरीचे घर



21) बेथेल।                      :-      परमेश्वराचे घर
22) बेथेसदा                    :-        कृपेचे घर
23) बोआनेर्गेस                 :-      गर्जनेनेचे पुत्र
24) मारानाथा                  :-      आमचा प्रभू येत आहे
25) मीखल                      :-      देवासमान कोण आहे
26) मिखा                       :-       देवासमान
27) यरीहो                       :-      सुगंधाचे ठिकाणी
28) यशया                     :-       यहोवा वाचवतो
 29) यहूदा                    :-       देवाची स्तुती असो हालेलुया
30) यहेज्केल                :-       देव समर्थ करील




31) यहोवा सिदकेनु          :-       यहोवा माझा धार्मिकता
32) यहोशवा                :-         यहोवा तारण आहे
33) याकोब                    :-       युक्तीबाज
34) यिर्मया                     :-       यहोवा उचलून घेईल
35) योएल                      :-       यहोवा देव आहे
36) योना                         :-       कबूतर
37) योहान                      :-     यहोवा कृपाळू आहे
38) आई आई विना हवा      :-.    जीवधारी जनांची माता
39) अब्राम                        :-    श्रेष्ठ पिता
40) अब्राहम                     :-  राष्ट्र समूहाचा जनक
 41) सारा                         :-   राणी
42) इसहाक                      :-.   हास्य उपहास
43) याकोब       :-      टाच धरणारा , युक्तीने हिरावून घेणारा
44)  एसाव                   :-   आदोम तांबडा
 45) बेनओनी               :-    माझ्या दुखाचा पुत्र
46) बन्यामीन               :-     माझ्या उजव्या हाताचा पुत्र
 47) योसेफ                  :-    वाढ
48) मनश्शे.                :-   विसर पाडणारा , विस्मृतीकारक
49) एफ्राईम                 :-    फलद्रूप
50) मोशे                     :-   पाण्यातून बाहेर काढलेला




51) शमुवेल.                  :-   परमेश्वराकडून मागून घेतलेला
 52) एखाबोद                 :-   वैभव नाहीसे झाले
53) दावीद                      :-   आवडता
54) शलमोन                  :-   शांती , शांतताप्रिय
 55) मेशेख                     :-   उंच
 56) पेत्र                         :-   खडक
57) शारोन                      :-   सरळ
58) प्रेषित                        :-   पाठविलेला , निरोप्या
59) एदेन                          :-   आनंददायी
60) दानियल                      :-   देव माझा न्याय
 61)यरुशलेम                    :-   शांतीची नगरी , शहर
 62) इस्रायल                    :-      परमेश्वराची योद्धे

Monday, 23 September 2019

भीती दूर करण्याचे मार्ग

  • शास्त्रभाग  :- स्तोत्र 56 : 3
  • विषय.       :- भीती दूर करण्याचे मार्ग

  • प्रस्तावना   :-

         परमेश्वरावर भाव ठेवणारा कधी लज्जित फजीत होत नाही . आमच्या आनंदाचे कारण आमच्या जीवनामध्ये जयघोष करण्याचे कारण आमच्या पक्षाचा देव आहे .  एकच ठिकाण जगामध्ये आहे जिथे आल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणातील सर्व भीती नाहीशी केली जाते , नष्ट केली जाते . या जगामध्ये दुसरे कोणतेच माध्यम किंवा सापडणार नाही परंतु ज्या दिवशी देवाकडे याल त्या दिवसापासून आमच्या जीवनातल्या समस्या , पीडा , दुःख त्या ठिकाणी नष्ट केले जातात  . जर देव आम्हाला सापडला तर जगातील सर्वात मौल्यवान वस्तू आपल्याला सापडली आहे आमच्याकडे देव नाही तर आपण फार मोठ्या संकटात अडकलेले लोक आहात .
        ज्यावेळेस आमच्या अंतःकरणा मध्ये भीती निर्माण होते ,  ही भीती दूर करण्याचे माध्यम पवित्र शास्त्रामध्ये सांगितले आहे . आमच्या जीवनामध्ये भीती आहे म्हणून आपण या मंदिरामध्ये आलो आहोत .  कोणाला शरीरांमध्ये होणाऱ्या रोगाची भीती आहे , कोणाला आर्थिक प्रश्नांची भीती आहे . पवित्र शास्त्रामध्ये या भीतीपासून , या चिंतेपासून पासून सुटका मिळवण्याचा उत्तम मार्ग सांगितले आहे .

  • भीती दूर करण्याचे उत्तम मार्ग कोणते ?


1) परमेश्वरावर भरवसा ठेवणे :- 

स्तोत्र 56 : 3 मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकिंन....

         जर भीती वाटेल तर देवावर भरवसा टाका . जगामध्ये असा कोणताच मनुष्य नाही की त्याला भीती नाही , श्रीमंत जो आहे त्याला ही भीती आहे , प्रबळ राष्ट्र अमेरिका याला  कोरिया देशाची भीती आहे , कोरियाला अमेरिकाची भिती वाटते . जगामध्ये कोणती व्यक्ती आपल्याला वाचू शकत नाही .  कोणत्या समस्या , कुठल्याही अडचणीतून सोडवू शकत नाही . ज्यावेळेस आपण लोकांकडे समस्यांसाठी  जाऊ ना तेव्हा तेच लोक आपल्या मनात भीती निर्माण करील . आपली भीती दूर करण्यासाठी नाना प्रकारच्या गोष्टी करत आहोत . एखादा ने सांगितले कि भीती दूर करण्यासाठी तर हातात काळा धागा घाल ,आपण घालतो . आपल्याला कळतच नाही.
त्यांनी भीती दूर होते का हो  ? आणखी भीती वाढते . भीती  नष्ट होण्यासाठी मनुष्य अतुकाट प्रयत्न करीत आहे . बायबल सांगत , भीती वाटते देवावर भरोसा ठेवा  . भीती दूर करण्याचे  सामर्थ्य येशूमध्ये आहे . सर्व पीडा ,  सर्व दुःख दूर करण्याचे सामर्थ्य येशुकडे आहे . देवाने मनुष्य निर्माण केला , पशुपक्षी त्यांने निर्माण केले .  मग आम्हाला भीती कशाची ?शरीरातील रोगाची ! बायबल सांगतो मनुष्य मातीपासून निर्माण केला , त्या मातीत प्राण फुंकला , तो जिवंत झाला म्हणजे श्वास पुरवण्याचे काम परमेश्‍वर करतो , जर आमचा श्वास बंद पडला तर आपला श्वास चालू करणार नाही का ?जेव्हा आपण डॉक्टर कडे जातो तो सांगतो एक्सरे काढा mri काढा , blood तपासणी  करा . पण फरक नाही पडला तर डॉक्टर सांगतो की तुम्ही दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्या . का घ्यायचा सल्ला आपण ? ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली ,  ज्याने आम्हाला सर्व आजारापासून मुक्त केले आहे , ज्याने सर्व बंधनातून आपल्याला सोडविले आहे , तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे ,  आपण सुटका पावलेले लोक आहोत . परमेश्वर म्हणतो भिऊ नका , घाबरू नका तुमचं शरीर हे परमेश्वराने घडविलेले आहे . 

  • उदा . एक आंधळा

का घाबरायचं नाही आपल्याला तर पवित्र शास्त्रात उदाहरण दिले आहे एक आंधळा येशुकडे आला मला दृष्टी यावी म्हणून प्रार्थना करा . येशु जमिनीवर थुंकला , त्याचा चिखल केला त्याच्या डोळ्याला लावला आणि म्हणाला जा शिलोह म्हटलेला तळ्यात जाऊन धु .


     याठिकाणी येशूने जमिनींवर थुंकुन चिखल केला ,  त्याच्या डोळ्याला लावला . परमेश्वराला हे म्हणायचे आहे की तुमचे शरीराचे प्रत्येक अवयव हे मातीचे बनलेले आहेत . कुंभार भांडी घडवतो तसं परमेश्वरी घडवतो .आपल्या शरीरात काही बिघाड झाला असेल ते रिपेरिंग करण्याचे काम परमेश्वर करतो .  त्याचे नाव  याव्हे राफा आहे , तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे , तो आरोग्य देणारा देव आहे आहे , तो सुटका देणारा देव आहे , त्याच्यावर भरवसा ठेवा , स्वतःवर विश्वास ठेवू नका . मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टास मी भिणार नाही , स्वतःवर विश्वास ठेवू नका तर परमेश्वरावर विश्वास ठेवा  . माझा येशूने लाजराला जिवंत केले ,  तिरडी वरून मुलाला जिवंत केले . रोग कितीही येऊ द्या पण त्याच्यावर उपाय फक्त येशु आहे .

2) देवाकडे आलो पाहिजे :-

अ ) स्तोत्र 56:8 माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहे

            आम्ही कोठे कोठे गेलो हे परमेश्वराला ठाऊक आहे . आपली भीती घालवण्यासाठी आपण कोठे कोठे गेलो हे परमेश्वराला माहित आहे . कोणत्या दवाखान्यात गेलो , कोणत्या मांत्रिकाकडे गेलो , कोणत्या माणसाकडे गेलो हे त्याला माहीत आहे . सर्व ठिकाणी हिंडून आलो तर ते येशूकडेच .

  • उदा. रक्तस्त्रावी स्त्री

       रक्तस्त्रावी स्त्री आपला आजार बरा होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन आली . प्रत्येक नगरात , प्रत्येक घरात , प्रत्येक शहरात , प्रत्येक गावी सर्व ठिकाणी हिंडून आली   तिने सर्व डॉक्टर पाहिले , पण तीचा आजार बरा झाला नाही .  रक्ताचा जरा सुखावा म्हणून तिने प्रत्येक वैद्य , प्रत्येक हकीम जे तिला उपचार सांगितले ते तीने केले .


         आम्ही देखील अनेक उपचार केले आहे . अनेक ठिकाणच्या लोकांकडे गेलो आहोत . डॉक्टरांकडे गेलो , बँकांकडे कडे गेलो , लोकांकडे गेलो , सर्व ठिकाणी गेलो पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला निराशा आली आहे . ज्या दिवशी आपण येशूकडे येऊ ना तेव्हा त्याला सांगण्याची गरज नाही . येशु सर्व जाणतो तो म्हणतो भिऊ नका . याठिकाणी येशुकडे आटोमॅटिक प्रश्न सुटले जातात . कारण येशूने आपली सर्व ठिकाणे पाहिली आहेत . येशूकडे 100% उपचार आहे , 100% सुटका आहे . येशू जो  सांगतो ते ऐका . जे सांगतो ते करा . पुन्हा जुन्या गोष्टी करू नका . आपला रोग फार मोठा आहे याचा विचार करू नका . आपल्या रोगापेक्षा येशू मोठा आहे . आपल्या प्रश्नापेक्षा येशू मोठा आहे . आपण येशूकडे पाहिले पाहिजे . येशूकडे पाहतो तर आपली भीती नष्ट होते .

ब ) स्तोत्र 56 : 8 माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत

     रडणारे खूप आहेत पण अश्रू पुसणारे कोणीच नाही . पण देव आपली अश्रू पुसतो . आपले अश्रू मोल्यवान आहे . परमेश्वरासमोर प्रत्येक अश्रू व्यर्थ जाणार नाही . परमेश्वर प्रत्येक अश्रूची किंमत करतो .

उदा . हागरा

    रानामध्ये इस्माईल रडत असताना , अब्राहामाने त्यांना घराबाहेर हाकलून दिले , साराने देखील त्यांना हाकलून दिले . हागराने इस्माईला झाडाखाली ठेवून लांबुन रडत पाहत होती . आणि इस्माईल हा स्वतःसाठी रडत होता आणि बायबल सांगतो परमेश्वराने त्याची वाणी ऐकली , त्याचं रडणं पाहिले आणि स्वर्गातून हागरेला देवाने हाक मारली ,देवाने खडकातून पाणी काढले आणि ते पाणी हागरेने इस्माईला पाजले तिला म्हणाला याच्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन .
        इस्माईलचं मरण अटळ होतं , त्याला कोणी वाचू शकत नव्हतं , त्याला कोणी सोडू शकत नव्हतं ,. पण परमेश्वराने त्याचे अश्रू पाहिले . ते अश्रू आपल्या बुदलीत भरून ठेवले . आपले अश्रू देवाच्या मंदिरात कधी व्यर्थ जात नाही. देवाच्या मंदिरात रडा . घरी रडू नका . कारण घरी अश्रू पुसणारे कोणी नाही.  हागार रडली इस्माईलसाठी आणि इस्माईल रडला स्वतःसाठी पण देवाच्या मंदिरात अश्रू पुसणारे स्वतः परमेश्वर आहे  .


  • उदा . हन्ना

     हन्ना परमेश्वराच्या मंदिरात रडली आणि इतकी इतकी रडली की परमेश्वराला तिच्या अश्रूची दखल घ्यावी लागली . असे रडा की देवाने तुमच्या अश्रूची दखल घेतली पाहिजे . मला सांगा की रडलेली व्यक्तीची प्रार्थना देवाने ऐकली नाही अशी एक तरी व्यक्ती दाखवा , आपल्या अश्रुची किंमत त्याने पुरेपूर चुकली आहे .  याठिकाणी  मंदिरात अश्रू गाळलेले कधीही व्यर्थ जात नाही . हन्ना रडली आणि तिला गौरवशाली पुत्र तिला दिला . पण माणसासमोर रडू नका तर देवासमोर रडा . माणसासमोर रडला तर ते तुमच्या उपहास करतील . कधीकधी देव आपल्या सभोवती परिस्थिती निर्माण करतो , यासाठी की आपण जास्त रडावं . जास्त रडाल तर जास्त आशीर्वाद प्राप्त होतील . आपले अश्रू बुधलीत भरून ठेवले आहे की , त्याला वाचवले . परमेश्वर आपल्याला वाचवण्याची , जीवन देण्याचे आश्वासन  देतो .
आपल्या दुःखाचे रूपांतर परमेश्वर आनंदामध्ये करतो . आपले दारिद्र्याचे रूपांतर भरपुरीमध्ये करतो . आपले जीवन आशीर्वादित परमेश्वर करतो .



क ) परमेश्वराचा धावा करणे :- 

स्तोत्र 56 : 8  तुझ्या वहीत ही नमूद झाली नाहीत काय ?

       परमेश्वर आपले अश्रू वहीत नमूद करतो . कसला हा देव आहे जो आपले अश्रू वहीत नमूद करतो ? का नमूद करतो ? तर परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो म्हणून तो आपल्या अश्रूची नोंद ठेवतो . लोक तुमची अश्रूंची थट्टा  करतील , नावे ठेवतील पण माझा परमेश्वर नोंद करणारा आहे , किती अद्भुत तो देव आहे . प्रत्येक अश्रुंचे थेंब परमेश्वर नोंद करतो . ज्यांना आरोग्य नाही त्यांनी  आरोग्यासाठी रडा व ज्यांना आरोग्य आहे त्यांनी देवाच्या समक्षेसाठी  आणि त्यांनी  देवाच्या सनिध्यासाठी रडा .

  • उदा . शमशोन

         शमशोन  हा व्यक्ती बंदी शाळेत असताना तो रडला . का रडला ? तर त्याच्या बट्टा कापून टाकल्या होत्या .  ते सामर्थ्य मिळवण्यासाठी तो देवाजवळ रडला .  देवाच्या  समीक्षेत सानिध्यासाठी तो रडला आणि त्याला अभिषेकला पुन्हा प्राप्त झाला .


ड) स्तोत्र 56 : 9 मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील .

    लोक धावा करीत नाहीत  म्हणून आपले  वैरी चिटकुन बसतात . जेव्हा ते परमेश्वराचा धावा करायला सुरुवात करतात तेव्हा आपले वैरी म्हणतात बापरे जगातील सर्वात ताकतवान व्यक्तीला हात मारत आहे . तो आल्यावर आपला पराभव आहे , तो आल्यावर आपली सत्ता निघून जाणार आहे , तो आल्यावर आपल्याला पाळावे लागणार आहे , येशूने धमकावण्याचे अगोदर याला  सोडावे लागणार आहे . जेव्हा आपण येशूचा धावा करणार , तेव्हा आपले वैरी आपल्या घराला , आपल्या शरीराला , आपल्या व्यवसायाला , आपल्या नोकरीला , आपल्या लेकराला सोडून पळून जाणार आहे .  येशूच्या नावात  ते सामर्थ्य आहे .

  • उदा . लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे 

     जेव्हा पेत्र आणि योहान सकाळी मंदिरात असताना ,  सुंदर नावाच्या दारावर भिकारी होता . त्याने  त्यांना भीक मागितली , त्याला वाटलं की मला काहीतरी मिळेल . आणि ते त्याला म्हणाले आमच्याजवळ काही नाही सोने रूपे काही नाही ,  तर येशूच्या समर्थ्यशाली  नावात चालू लाग आणि तो चालू लागला , तो उड्या मारत मंदिरात गेला



  • भीती दूर करण्याचे मार्ग. :-

1) परमेश्वरावर भरोसा टाकणे
2) परमेश्वराकडे येणे
3) परमेश्वराचा धावा करणे

               येशु आपल्यामध्ये महतकृत्ये  करणारा देव आहे . तो सुटका केल्याशिवाय राहणार नाही . परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे , आपल्या विरोधात कुठलेच हत्या चाल करणार नाही ,  कारण तो परमेश्वर आपल्या सोबती आहे .

Saturday, 14 September 2019

Jesus Shayari

                            Jesus Shayari

   
1) तुम पुछ लेना सुबह से
    ना यकीन तो शाम से
    ये दिल सजदा करता है
     सिर्फ येशू के नाम से....




                2) रिश्तो से बडी जरूरत क्या होगी
                    दोस्ती से बडी इबादत क्या होगी ,
                    जिसे दोस्त मिले जाये  येशू जैसा अनमोल ,
                    जिंदगी से उसे और शिकायत क्या होगी...

3) दर्द था दिल में पर जताया  कभी नही
   आसू थे आखो मे पर दिखाया कभी नही ,
    यही फर्क  है येशू के प्यार में ,
    येशू ने छोडा कभी नही ,
    और येशू ने रुलाया कभी नही....

                  4) येशु का प्यार ही मेरी जान है
                      शायद इस हाकिकत से तो अंजान है ,
                      मुझे खुद नही पता मै कौन हो ?
                      क्यू की येशू का प्यार ही मेरी पहचान है.....

5) सुना है आज समंदर को
    बडा गुमान आया है ,
    उधर ही ले चलो येशू की कष्ती मे ,
    जहा येशू का सामर्थ्य आया है.....

                       6) हमे कहा मालूम था
                           कि येशु होता क्‍या है ,
                           बस एक येशू मिले ,
                         और जिंदगी पुरी तरह बदल गई.....

7) जब खयाल आया तो
    खयाल भी येशु आया ,
    जब आखे बंद की
    खाब भी येशू का आया ,
    सोचा याद कर लो किसी और को
    मगर होठ खुले तो नाम भी येशू का आया ....

                        8) किसी के पास Ego है
                            किसी के पास Attitude है ,
                            मेरे पास तो मेरा येशू है ,
                            वो भी बडा Cute हैं....

9) काटो पर चलकर फुल खिलते है
    विश्वास पर चलकर येशू मिलते है
    एक बात सदा याद रखना दोस्त
    सुख मे सब मिलते है ,
    लेकिन दुःख में सिर्फ येशू ही मिलते है....

                      10) किसी की सुरत बदल गई
                             किसी कि नियत बदल गई
                            जबसे येशूने पकडा मेरा हाथ ,
                           तबसे मेरी किस्मत पूरी तरह बदल गई....




11) ऐ सैतान अपनी औकात मे रहना
       हम तेरे मोहताज नही ,
       हम येशू मसी के चरणो मे रहते है
       वहा तेरी भी कोई औकात नही....

              12) हम येशू के प्यार में पागल हो जाते है
                     हर संकटो  मे भी आनंद बनाते है ,
                     सैतान कितनी भी चाल चले हमे गिराने की ,
                     गिरने से बचाने हमे फरिश्ते तक आ जाते है...

13) अंधोको आखे दी कोडी को दि चंगाई
       येशु के लहू से मिली पापो की रीहाई ,
       कोई नाप ना सका उसके प्यार की ऐसी गहराई
        मुर्दो में से जिंदा हो गया मेरा येशू ,
        मौत भी उसे कब्र रख ना पाई....

               14) कृस पर अपनी जान देकर
                      मेरे येशू ने किया मुझ पापियों पर
                     अपने मोहब्बत को यदा ,
                     देखकर तेरी इस मोहब्बत को ए मसीह ,
                     सब कुछ छोड कर मैं तुझ पे हो गया फिदा.....

14) पानी ना हो तो
      नदिया किस काम की
      आसू ना हो तो
      आखे किस काम की ,
       दिल ना हो तो
      धडकन किस काम की ,
      अगर येशू ना हो तो
       ये जिंदगी किस काम की ....

                15) सुबह की प्यारी किरण बोली मुझसे
                      उठकर बहार देखो , कितना हसीन नजारा है
                      मैने कहा रूक पहिले येशू को शुक्रिया कर लु
                      जो इस सुबह से भी प्यारा हैं ........


Sunday, 8 September 2019

परमेश्वरापासून प्रार्थनेचे उत्तर मिळवण्याचा मार्ग

शास्त्रभाग :- 2 राजे 6 : 15 , 23

विषय :- परमेश्वरापासून प्रार्थनेचे उत्तर मिळवण्याचा मार्ग 

प्रस्तावना :-

   परमेश्वर हा प्रार्थना ऐकणारा देव आहे , तो कठीण हृदयाचा नाही ,  तो भग्नअनुतप्त हृदय तुच्छ मानीत नाही , आमच्या हृदयाचा भाव त्याला माहित आहेत . देवाकडे जात असताना आपल्या सर्व प्रकाराच्या प्रश्नातून सुटका व्हावी ,  जगात असा कोणता व्यक्ती नाही की प्रश्न वारंवार त्याच्याकडे यावं , 100% आमचा प्रश्न सुटावा परत या प्रश्नाने आपल्याकडे येऊ नये , तो नाहीसा व्हावा म्हणून त्याच्या काही मार्ग आहे  त्याच मार्गाने जावे लागेल आणि त्याच मार्गाने गेलास तर आपल्या जीवनातील प्रश्न 100% सुटणार आहे .

कोणता मार्ग आहे तो आपण पाहू :-

2 राजे 6 :15-23
वचन 23:-

त्या टोळ्या परत आल्या नाही ,  त्या टोळ्या परत येणारच नाही . प्रत्येक परिवारावर , प्रत्येक व्यक्तीवर चाल करून जात आहे . आमच्या संपत्तीवर , आमच्या आरोग्यावर चालू करून जात आहेत ,आमच्या कुटुंबाचे व्यक्तीवर चाल करून जात आहे , आपले जे आहे ते लुटून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु यातून आम्हाला शंभर टक्के सुटकेची गरज आहे , वारंवार त्याच समस्या , वारंवार तेच प्रश्न , वारंवार त्याच अडचणी , त्याच प्रार्थना , त्याच त्याच गोष्टी साठी रथबदली करण्यात काय अर्थ आहे .
       बायबल सांगतं परमेश्वर चमत्कार करतो ना त्या चमत्काराच्या सामर्थ्याने अरामाच्या टोळ्या परत कधी आल्या  नाही . तिथे असे लिहिले आहे की या अरामाच्या टोळ्यांना अलिशाने खाऊ पिऊ घातले आणि त्यांना नगराबाहेर पाठवलं .
     आपल्याकडे आजार येतो खातो पितो आणि जातो आणि परत येतच नाही . प्रश्न आमच्याकडे येऊ द्या पण त्या प्रश्नाला थांबवण्याची ताकत आमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी जे मार्ग पवित्र शास्त्रात सांगितले ते केले पाहिजे . म्हणजे शंभर टक्के सुटका . परत आमच्याकडे येऊ नये ,  परत ती समस्या वारंवार उभी राहू नये म्हणून मग काय केले पाहिजे तर ,,,,

 पहिला मार्ग:-

1) 2 राजे 6 :16 भिऊ नको

        पहिली तर भीती दूर केली पाहिजे काही लोक प्रार्थना पण करतात , भीती पण त्यांच्यामध्ये आहे , तीच भीती पण काही होत आहे काय ,  काहीतरी होणार आहे ,काहीतरी होणार आहे , काहीतरी होणार आहे ही तुमची भीती आहे . ते होणारच कोण अडवणार आहे होणाऱ्या गोष्टीला . देवाच्या लोकांमध्ये भीतीचा आत्मा नसतो  हे देवाच्या लोकांची वैशिष्ट्य आहे . किती  डोंगरावर सारखे प्रश्न आले , समुद्राच्या लाटांचासारखे प्रश्न त्यांच्याकडे आले , परंतु त्या प्रश्नाकडे पाहत नाही तर उत्तर देणाऱ्या देवाकडे पाहतात . जर आमच्यामध्ये भीती असेल तर ती आमच्या जीवनातून काढून टाकली पाहिजे . का भीतीला काढायचं तर ही भीती आपला नाश करणार आहे , ही भीती आपल्याला कमजोर करणार , आहे ही भीती आपले प्रश्न वाढणार आहे , ही भीती आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आहे जर आम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर पहिल्यांदा आमच्या भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे .

       आपण पहातो येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस देवदूताने येऊन सुवार्ता सांगितली की भिऊ नका ,,, 

भेयचं नाही ,  प्रश्न पेक्षा देव मोठा आहे , आजारपणात देखील देव मोठा आहे , आर्थिक अडचणीत देखील आमचा देव मोठा आहे तर आपण आपण देवाला कमजोर का करतो ? जी व्यक्ती घाबरते ना ते देवाची टाकत कमी करते . जर आमचं जिवंत देवावर विश्वास आहे ना तर भीतीला घालवता आले पाहिजे . भीतीला घालवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे नेहमी प्रश्नाकडे बघताना तुच्छतेने बघा . जीवन देण्याची ताकद परमेश्वरामध्ये आहे . आजाराची भीती काढून टाका , आमची परिस्थिती भयावह असेल तीच परिस्थिती चमत्काराला पूरक आहे .भीतीदायक वातावरणातच देव चमत्कार करतो . आपले पैसे संपलेले असतील , आपले डॉक्टरचे रिपोर्ट निगेटिव्ह असतील , आपल्याला मदत करायला कोणी नसेल , कुटुंबातील प्रश्न आत्तापर्यंत सुटलेले नसतील , आपले सर्व मार्ग बंद झाले असतील तर आता मी सांगतो चमत्काराला सुरुवात झाली आहे त्यासाठी भीती काढायचे . ज्या व्यक्तीची भीती जाते ती व्यक्ती देवाची आनंदाने भक्ती करते . एखाद्या मनुष्याच्या मनात भीती नसते ती गाणे गात जात असते आणि एखाद्याच्या मनात भीती असते ती व्यक्ती इकडे तिकडे पाहत जाते आणि निर्भीड व्यक्तीकडे पाहिले तर ती गुणगुणत जाते त्याला पाहून आपण म्हणतो बापरे किती स्वच्छंदी माणूस याला कोणती चिंता नाही , काळजी नाही . देवाच्या लोकांचे वैशिष्ट्य हेच आहे की परमेश्वराच्या घरात आल्यावर आनंद करतात . त्यांच्या मध्ये कुठल्याच प्रकारची भीती नसते . भीतीपासून मोकळे व्हा .  जर भीती आपल्या मध्ये असेल ती आज काढून टाका . का काढायची ? कारण आमच्यासाठी स्वर्गात मदतगार आहे ,  आमची मदत करण्यासाठी ,  आमची सुटका करण्यासाठी परमेश्वर स्वर्गात उभा आहे . तिथून तो मार्गदर्शन करणार आहे ,  तिथून तो मदत करणार आहे 100% सुटका मिळण्यासाठी घाबरायचे नाही . जे  घाबरतात त्यांच्याकडे वारंवार आजार येतात . सकाळी उठल्यावर स्वतःला लोक चेक करतात , चक्कर येत नसले तरी कसं वाटतंय थोड गेल्यासारखं वाटतं , मला वाटतं bp वाढला वाटतो  जे घाबरतात ते मरून जातात पण जे घाबरत नाही ते जिवंत राहतात . कुठल्याच प्रकारची भीती दडपण आपल्या मनावर ठेवू नका म्हणून भीती आमच्या जीवनातून काढून टाकली पाहिजे .

दुसरा मार्ग :-

2) 2 राजे 6 :16 त्यांच्या पक्षाचे जे आहेत त्यांच्या पेक्षा आमच्या पक्षाचे अधिक आहेत

      नेहमी म्हटले पाहिजे त्यांच्या पक्षाचे त्याहून अधिक आमच्या पक्षाचे आहे. कधीकधी आपल्याला भीती दाखवली जाते डॉक्टर सांगतात तुमच्या पांढरे पेशी कमी झाले आहेत पण आपण म्हणायचं की मेडिकलच्या पेशी पेक्षा माझ्या येशुचे रक्तातील पेशी आम्हाला विजय देणार आहे . आमच्या पक्षाचे अधिक आहेत . ज्याला देवाच्या शक्तीवर अधिक विश्वास आहे ना ती व्यक्ती कधी घाबरत नाही . आपण प्रार्थना करायची की देवा तुझ्या पक्षाचे लोक मला दाखव , तुझं सामर्थ्य मला दाखव . ज्याला देवाच्या ताकतीवर भरोसा आहे ,  ज्याला देवाच्या सामर्थ्यावर भरोसा आहे ती व्यक्ती प्रश्नाला पळवून लावू शकते . जर आपण आपली ताकत आपले सामर्थ्य सैतानाला दाखवून शैतान आपल्याकडे कधीच येणार नाही . शैतान का आपल्याजवळ येतो ? कारण आपलं संरक्षण करायला कोणी नाही .

   उदा. अलिशा चा सेवक जो आहे ना तो सकाळी उठतो आणि पहातो काय  अरामाच्या राजा मोठे सैन्य घेऊन आपल्याकडे आला आणि तो पळून जाऊन अलिशाला सांगतो महाराज हाय हाय,,,,

कारण त्याने अरामाचे सैनिक पाहिले . अलिशा प्रार्थना करताना काय म्हणतो हे देवा याचे डोळे उघड , याला त्याचे सैनिक दिसण्याऐवजी जे अदृश्य सैन्य ते दाखवा . देवाच्या अलौकिक सामर्थ्य याकडे लक्ष लावा . देवाच्या पुरवठा कडे लक्ष ठेवा किती कर्ज आहे याचा विचार करू नका ,  किती पुरवठा आहे याकडे लक्ष ठेवा . पुरवठा करणाऱ्या परमेश्वराकडे लक्ष लावा . आमच्या शरीरात किती आजर आहेत हे पाहू नका तर एवढ्या आजार बरे करणाऱ्या देवावर विश्वास ठेवा . परमेश्वर आपल्याला कधी मरू देणार नाही कधी आणि हानी होऊ देणार नाही , कधी कमजोर पडू देणार नाही , आपल्या कुठल्या अवयवाला इजा होऊ देणार नाही . कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे . त्याने आपल्याला संरक्षण दिले आहे . म्हणून बचाव करणार्‍या कडे लक्ष असू द्या. आक्रमण करणार्‍याकडे नव्हे . आक्रमण करणारा पूर्ण ताकतीने आक्रमण करील त्याला करू द्या .

उदा. दावीद व गल्ल्याथ

दावीद म्हणतो परमेश्वराच्या नावाने मी चाल करून जातो . त्याने गल्ल्याथाची शरीरयष्टी पाहिली नाही . त्याने घातलेले कपडे पाहिले नाही . या सर्व पेक्षा देव मोठा आहे . आजाराला मोठं  करू नका , आर्थिक प्रश्नाला मोठं करू नका . आज आपण बिजनेस मध्ये यशस्वी नाही त्याकडे पाहू नका तर देऊ माझा बिजनेस कसा वाढवत आहे याकडे लक्ष लावा . आपली गरज पूर्ण करणाऱ्या परमेश्वराकडे लक्ष लावा .


तिसरा मार्ग :- 

2 राजे 6 :17 देवाकडे डोळे उघडण्यासाठी प्रार्थना करावी 

    काही माणसाचे डोळे उघडत नाही . एखादा फटका बसल्याने नंतरच डोळे उघडतात . जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवणार नाही त्याला फटका बसणार आहे . जर आमच्या डोळ्यांना विश्वास नसेल , आमचे डोळे कमजोर झाली असेल , डोळ्यानी सामर्थ्य दिसत नसेल , आमच्या डोळ्यांना देवाचा मदतीचा हात दिसत नसेल तर आपले डोळे उघडणे गरजेचे आहे .

   प्रकटीकरण या पुस्तकात असे लिहिले आहे की तुमचे डोळे उघडण्यासाठी अंजन विकत घे,,,,

हे परमेश्वराचे वचन आहे . ते आमचे डोळे उघडण्याचे काम करतं आणि ते वचन सांगत देव आहे , तो चमत्कार करणारा , सर्व परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे . म्हणून आमचे डोळे उघडणे गरजेचे आहे . डोळे उघडा . डोळे उघडने म्हणजे देवाला पाहणे आहे .

उदा . नवीन करारातील पौल,, तीन दिवस त्याचे डोळे आंधळे होते .

डोळे ऊघडणे म्हणजे देव दिसणे . ज्याला देव दिसत नाही तो आंधळा आहे .  आपण प्रार्थना केली पाहिजे कि ,  माझे डोळे उघड , मला दिसू दे  . सगळे दिसतं आपल्याला नोकरी दिसतं , कुटुंब दिसते  पैसा दिसते पण देव दिसत नाही . देव दिसतो का ? देव दिसणे गरजेचे आहे . ज्याला देव दिसला त्याचे डोळे उघडले आणि ज्याला देव दिसला आहे त्याला जगातल्या कोणत्या गोष्टी दिसत नाही . देव दिसला की माणूस वेडा होतो  देवासाठी .  ज्याला देव दिसतो  त्याला देव आपल्याबरोबर घेऊन चालतो . ज्याचे प्रेम पैसे वर असते ,  त्याचा रात्रभर पैशाचा हिशोब चालू असतो  . आणि ज्याचे प्रेम देवावर असते , तो रात्री उठून प्रार्थना करतो , सकाळी उठल्यावर प्रार्थना करतो , सारख देवाचं मंदिर , सारख देवाच सानिध्य , जोपर्यंत देव दिसत नाही , तोपर्यंत प्रश्न  सुटत नाही . त्यासाठी डोळे उघडले पाहिजेत .

चौथा मार्ग :-

2 राजे 6 : 18 आपल्याला देवाचं सामर्थ्य अनुभवाचं आहे

         परमेश्वराचे सामर्थ्य अनुभवाचा आहे आता . आपल्या घराला , आपल्या लेकराला , आपल्या पतीला , आपल्या कामाला देवाचे सामर्थ्य अनुभवाचा आहे . देवाच्या सामर्थ्य साठी आपण मंदिरात आलो पाहिजे आणि मंदिरातून जाताना म्हणायचे आहे की देव माझ्याबरोबर आहे . कर्ज असणाऱ्या व्यक्तीने म्हटले पाहिजे की देवाने मला तिजोरी दिली आहे .

उदा . अब्राहम व इसहाक

अब्राहामाने सामर्थ अनुभव . त्याने परमेश्वर विश्वास ठेवला . कधीकधी परमेश्वर प्रतिकूल परिस्थितीत आपले मार्गाची दोर कापून  टाकतो . तेव्हा काहीच करता येत नाही . यासाठी आपल्याला देवाचे सामर्थ्य अनुभवच आहे . अब्राहम म्हणाला देव पाहून देईल , मग आपण का म्हणत नाही देव पाहून देईल ?  देवा याचे डोळे उघड त्याने काय पाहिले तर अग्नि रथ अग्नी घोडे . ते काय स्वर्गातून पडले होते का नाही ते तिथे होते , पण दिसत नव्हते . जे दिसतं ना त्याच्यावर विचार करत नाही तर जे अदृश्य आहे ना त्याचा आपण विचार करतो . जे अदृश्य आहे ते आमचा आहे . अदृश्य काय आहे ,अग्नीचे रथ अग्नीचे घोडे . आपल्याला आपला आजारपण दिसतो पण आजाराला प्रतिरोध करणारा सामर्थ्य दिसत नाही . परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायचा आहे . ज्या गोष्टी तुम्हाला दिसते ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका , भरोसा ठेवू नका तर कसावर ठेवायचा तर ते आपल्या नजरेला दिसत नाही ते आपण पाहू शकत नाही त्याच्यावर विश्वास ठेवत आहे .

पाचवा मार्ग :-

2 राजे 6 : 19  प्रार्थनेने शत्रूचे सामर्थ्य कमजोर करा

आपले शत्रू दिसत आहे , आपल्या शत्रूची संख्या मजबूत आहे आणि आपले शत्रु आपल्यावर चाल करणार आहे हे सत्य आहे , पण एक गोष्ट अदृश्य आहे . आपल्या प्रार्थनेने आपल्या शत्रूचे डोळे आंधळे होणार आहे . शत्रु जितक्या शक्तीने आपल्याकडे येणार आहे तितक्या शक्तीने तो मागे फिरणार आहे  . का ? कारण आपली प्रार्थना आपल्या शत्रूला कमजोर करते . अलिशाने प्रार्थना केली यांचे डोळे आंधळे कर . म्हणून आपणही प्रार्थना करायची की माझ्या शत्रूचे डोळे आंधळे कर .  त्या शत्रूला माझं कुटुंब , माझे काम , माझे लेकरे दिसू नको . त्याला आंधळे कर . जर शत्रू आंधळा झाला तर तो घरात येणार कसा . शत्रूला करण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे . काही लोक प्रार्थना करीत नाही म्हणून त्यांच्या घरात शत्रू नेहमी घुसतो . म्हणून आपण प्रार्थना करायची , देवा माझे  शत्रूचे डोळे  आंधळे कर . तो चाचपडत चाचपडत माझ्या घरात येऊ देऊ नको . प्रार्थनेच्या शक्तीने आपल्या शत्रूच्या डोळे आंधळे करा . प्रार्थनेच्या सामर्थ्याने आपल्या घरात आजारपण , दारिद्र्य , अडचणी येणारच नाही . ते चाचपडत चाचपडत निघून जातील .  ते दुसऱ्या शहरात निघून जातील . प्रार्थनेने आपले काम ,आपले कुटुंब , आपले लेकरे सुरक्षित केले पाहिजेत .

Thursday, 5 September 2019

परमेश्वराचे प्रेम

शास्त्रभाग :- योहान 3 :16

विषय       :- परमेश्वराचे प्रेम

प्रस्तावना :-

          आज जगातील प्रेम हे स्वार्थी  , धोका देणारं , सोडणारे ,  दुःख देणारे ,वेदना देणारे , गरजेपुरते वापरणारे असे आहे . 

प्रेम म्हणजे काय ?

      प्रेम म्हणजे एक आपुलकी , एक माणुसकी , मदत , सांत्वन , आधार , सुखात दुःखात उभे राहणे होय .
अशा प्रेमात कुठलेही वासना नाही , स्वार्थ नाही , ते प्रेम पवित्र असावं , त्या प्रेमात त्याग असावं आणि असे प्रेम कोठेच सापडत नाही व अशी प्रेम करणारी व्यक्तीही सापडत नाही

        मग अशी कोण व्यक्ती आहे की तिने निस्वार्थी प्रेम केले ते प्रेम पवित्र आहे , त्याच्या प्रेमात त्याग आहे , जीवन आहे , एक नातं आहे .

ती व्यक्ती आहे येशु ख्रिस्त ... येशु म्हणजे प्रेम.

येशु या जगाचा निर्माणकरता , तारणकरता सर्व मानवजातीचा परमेश्वर आहे , येशु ख्रिस्ताने निःस्वार्थी या जगावर प्रेम केले . येशूची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये , सर्व मानव जातीला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून येशूने आपला जीव वधस्तंभावर दिला . बायबल सांगते सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवला उणे पडले आहे . आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावला . येशूने सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी आपला अनमोल प्राण दिला . जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला तीतक्यांना त्याने आपल्याला लेकरे म्हणण्याचा अधिकार दिला . येशूने सर्व शापातून , आजारातून ,पापापासून आणि सैतानाच्या बंधनातून मुक्त केले . येशुने जगावर प्रेम केले , हे प्रेम आपल्याला सार्वकालिक जीवन देते , वारसदार बनवते , मुले म्हणण्याचा अधिकार देते . येशूचे प्रेम आपल्याला सोडत नाही , टाकत नाही , लज्जित फज्जीत करीत नाही . कारण देव प्रीती आहे , येशूचा प्रीतीचा स्वभाव आहे . येशूचे प्रेम कधीही रुसत नाही , फुगत नाही , रागवत नाही .येशु नेहमी आपल्या बरोबर राहतो कारण आपण येशूची हस्तीकृती आहोत .
                येशूवर प्रेम करणे म्हणजे येशूच्या आज्ञा पाळणे होय . 

देवावर प्रेम करणारी व्यक्ती कशी असावी ?

1) नेतृत्व करणारी असावी  :-

उदा. मोशे


     परमेश्वराने मोशेची निवड इस्राएल लोकांना फारोच्या गुलामीतुन मुक्त करण्यासाठी केली .  परंतु मोशे जड जिभेचा व जड ओठाचा होता . मोशे म्हणतो मी बालक आहे , मला करता येणार नाही , मला जमणार नाही . पण परमेश्वराने मोशेच्या मुखात शब्द घातले . मोशे इस्राएल लोकांचा पुढारपण , नेतृत्व करू लागला , मोशे सर्वांसाठी मध्यस्थी , रदबदली , प्रार्थना करू लागला 
           त्याचप्रमाणे आपल्याला काहीही येत नसेल , कला नसेल , बोलता येत नसेल तरीही येशु आपल्यावर प्रेम करतो . येशु आपल्याला तयार करतो , घडवतो .

2) प्रार्थना करणारी असावी :-

उदा . अलिशा 

    अलिशाचा सेवक गेहजी सकाळीच उठतो तर पाहतो काय त्या नगरभोवती , गडाभोवती अरामाचा राजाची सैनिक मारण्यासाठी आपल्या हाती तलवार घेऊन आली आहे . अलिशाचा सेवक घाबरतो , आता आपलं काहीच खरं नाही , आपण मरणार , आपला कोणी बचाव करणार नाही , कोणी आपल्याला सोडवणार नाही म्हणून तो सेवक भीतीने आपला स्वामी अलिशा याच्याकडे धावत धावत जातो .  सेवक अलिशाला म्हणतो महाराज हाय हाय आता आपण मरणार , परंतु अलिशा घाबरला नाही , तो स्थिर राहिला  , डगमगला नाही.  अलिशाला माहीत होते की परमेश्वर या समस्यातून सोडवण्यास समर्थ आहे , अलिशा हा देवावर प्रेम करणारा होता , तो प्रार्थना करणारा होता , देवाच्या सानिध्यात बसणारा होता . आलिशाने प्रार्थना केली हे परमेश्वरा या तरुणाचे डोळे उघड . त्या सेवकाचे डोळे उघडते आणि पाहतो काय तर त्या ठिकाणी अग्नीचे रथ व अग्नीचे घोडे दिसले . जे सैनिक मारण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी आलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा यांचे डोळे आंधळे कर , आणि त्यांचे डोळे आंधळे झाले  
          त्याचप्रमाणे परमेश्वरावर प्रेम करणारी व्यक्ती कुठल्याच समस्याला , अडचणीला भीत नाही . जीवनात किती पण वादळ येवो , तुफान येवो ती भीत नाही . तीला माहीत असते की परमेश्वर या सर्व गोष्टीतून सोडवण्यास समर्थ आहे .  समस्या ,अडचणीपेक्षा माझा परमेश्वर मोठा आहे . परमेश्वरावर प्रेम करणारी व्यक्ती देवाच्या सानिध्यात बसणारी , देवाशी बोलणारी , देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारी असते  .


3) उपासना करणारी असावी :-

उदा . दाविद 

      जेव्हा दावीद रानात मेंढरे चारायला जात असे तेव्हा रानात देवाची उपासना करीत असे . उपासनाच्या सामर्थ्याने त्याने सिंहाची जाबडी फाडली , अस्वली मारली , ती ताकत ती शक्ति उपासनेचे द्वारे त्याला प्राप्त झाली होती .तोच दाविद बलाढ्य गल्याथाच्या  समोर उभा रहातो . त्याने गल्याथाची बॉडी पहिली नाही ,  उंची पाहिली नाही , त्याची तलवार पाहिली नाही , त्याचे कपडे पाहिले नाही ,  दाविदाला परमेश्वराच्या सामर्थ्यावर भरोसा होता .दाविदाने परमेश्वराच्या नावाने चाल करून गल्ल्याथ याला मारले . याचे कारण हे कि तो चांगला उपासक होता , तो देवाला संतुष्ट होता , तो देवाचं मन जाणारा होता , तो देवाच्या  मनासारखा होता
         त्याचप्रमाणे देवावर प्रेम करणारी व्यक्ती ही देवाची उपासना करणारी असते . उपासनेमध्ये सामर्थ्य असते , उपासनेमध्ये ताकत असते , उपासनेमुळे सैतानाची सर्व बंधने , सर्व आजार सुटतात
उदा .पौल आणि सीला
       पौलआणि सीला बंधनात असताना या दोघांनी देवाची भक्ती , आराधना , देवाची स्तुती केली तेव्हा त्यांची बंधने तुटली , बंदी शाळेचे दरवाजे उघडले ,  भुमिकंप झाला . कारण सामर्थ्य फक्त भक्ती , उपासनेमध्ये आहे .

         ब) देवावर प्रेम करणारी व्यक्ती स्वतःचा नाश कसा करून घेता ?

1) मौज , मजा , मस्तीसाठी :-
उदा . उधळ्या पुत्र :-

           
उधळ्या पुत्र जोपर्यंत बापाच्या घरी होता त्याच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या , त्याच्या खाण,  त्याचे त्याचे कपडे सर्व व्यवस्थित देखभाल होत होती तरीदेखील उधळ्या पुत्र आपल्या बापाला सोडून जातो आणि तो मित्राबरोबर मौज , मजा ,मस्ती करतो . सर्व पैसे उधळून टाकतो . मित्र त्याला सोडून जातात . त्याच्याकडे पैसे नसल्याकारणाने तो डुकरे चारायला थांबतो. तो तिथे डुकराचे उष्ट अन्न खातो . त्याने आपला स्वतःचा नाश करून घेतला ,  त्याने सर्व काही गमावले .त्याच्याजवळ  काहीच झाले नाही .
        त्याचप्रमाणे तरुण मुलांना अधिन राहायला आवडत नाही . मनाचे कारभार आवडतात. आज्ञा पाळायला नको ,  मला माझा जीवन जगू द्या ते स्वतःचा नाश करून घेतात ते देवाची साहित्य , समिक्षतता , सामर्थ्य सोडून जातात आणि मनाचे कार्य चालू करतात पण ते लोक कधीच यशस्वी होत नाही .  ते स्वतःचे  जीवन जगतात ते  देवाचा अभिषेक गमावता .

2) आकर्षक , मोहक गोष्टीसाठी :-
उदा . शमशोन

      शमशोन या व्यक्तीला परमेश्वराने इस्राएल लोकांच्या सुरक्षितेसाठी , बचावासाठी त्याची निवड केली होती. शमशोन अधिक शक्तिशाली होता . तो सिंहाला मारणार होता , त्याने 300 कोल्ही मारली होती ,  त्याच्या समोर कुणी टिकू शकत नव्हते , तो बलाढ्य होता ,  त्याच्याशी युद्ध करण्यासाठी कुणीही येत नव्हते . शमशोन या व्यक्तीला एका सुंदर मुलीवर प्रेम होतं , त्या मुलीसाठी तो वेडा होतो कारण ती मुलगी सुंदर होती तिच्या तो प्रेमात पडतो त्याचे आईबाप त्याला सांगायचे की ती मुलगी करू नको परंतु शमशोन ऐकत नव्हता.  त्याने न  ऐकल्या कारणाने त्याने आपला अभिषेक ,  आपले सामर्थ्य गमावलं , सर्व शक्ती गमवून बसला . सुंदर , आकर्षक गोष्टीसाठी त्याने आपला सर्व आशीर्वाद गमवून बसला .
           त्याचप्रमाणे आज जगामध्ये अनेक सुंदर सुंदर गोष्टी आकर्षक गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे पाहून तरुण ओढवला जातो आणि त्यामध्ये गुंतून बसतात . आजची तरुण पिढी चुकीच्या पद्धतीने प्रेम करतात आणि त्या प्रेमामध्ये आपल्या सर्व अभिषेक , सर्व सामर्थ्य गमावून बसतात . देवाच्या सहभागीते पासून ते दुर जातात , देवाच्या प्रार्थने पासून दूर जातात ,  देवाच्या आज्ञा न मानता ते जगाच्या गोष्टीत गुंतून जातो . त्यांचा मनाचा ओढा जगाच्या गोष्टीत लागलेली असतात . म्हणून आकर्षक मोहक गोष्टी कारणाने आपल्या जीवनातील सर्व सामर्थ्य ,अभिषेक आणि आशीर्वाद गमावून बसतात .

3) आपल्या सुरक्षतेसाठी :-
        उदा . शलमोन

           शलमोन राजाने नीतिसूत्रे लिहिली , गीते रचली शाल्मवसारखा पृथ्वीवर राजा झाला नाही . त्याच्या सारखे ज्ञान कोणाकडेही नव्हते . शलमोन या व्यक्तीला परमेश्वराने तीनदा दर्शन दिले होते आणि या शलमोनाने आपल्या सुरक्षतेसाठी देशातील अन्य जातीच्या धर्माच्या मुली यांच्याशी विवाह केला त्यांच्या त्या देशाच्या मुली त्याने बायका करून घेतल्या . तो  बायकांचे नादी लागून तो त्यांच्या दैवतांची उपदाना , आराधना करू लागला . तो परमेश्वरापासून बहकला ,  परमेश्वरापासून दूर झाला , तो अन्य देवतांची पूजा करू लागला . त्याला असं वाटलं की मी देशातील बायका केल्या तर ते देश माझ्यावर आक्रमण करणार नाही . त्याने  स्वतःच्या सुरक्षितेसाठी या चुकीच्या पाऊल उचलून परमेश्वराला गमावले.
        त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या जीवनामध्ये आजारे , संकटे , समस्या येतात तेव्हा आपण लोकांचे जास्त ऐकतो . लोक जे आपल्या सांगतात तेच आपण करतो . कुणी सांगितलं  की मांत्त्रिकाकडे जा,  बाबाकडे जा , धागेदोरे कर आणि त्याप्रमाणे आपण करतो आणि अशा गोष्टीने आपण परमेश्वर संबंध मन दुखवतो ,  परमेश्वराविरुद्ध  वागतो त्याच्या आज्ञा मोडतो . या चुकीच्या गोष्टीने आपण परमेश्वराला गमावून बसतो .

क) देवावर प्रेम करणारी व्यक्ती कशी वागते ?

1) नकाब (duplicate ) :-

      आज मनुष्य मंदिरांमध्ये धार्मिक जीवन जगतो, प्रार्थनेत जीवन जगतो , देवाच्या आज्ञा मानतो परंतु तीच व्यक्ति जेव्हा मंदिराच्या बाहेर येते तेव्हा ते हाणामार्‍या करते शिव्याशाप देते उचापती , निंदा करते , नावे ठेवते. दुपलिकेट जीवन जगतात बाहेर एक आणि आत एक जीवन जगतात.
     मी जो आहे तो आहे. मी घरी जसा आहे तसा मी माझ्या कामात आहे . मी जसं मंदिरात आहे तसा मी समाजात आहे . माझ्यामध्ये कुठलेही बदल नाही जो मी आहे तो मी आहे .

2) खोटी उपासना :-

   परमेश्वर म्हणतो मी आत्मा आहे आणि माझ्या उपासकांनी खरेपणाने व आत्मने उपासना करावी परंतु आज मनुष्य खोटी उपासना करतो . आज मनुष्य लबाड्या करतो , चोऱ्या करतो , खोटे बोलतो , शिव्याशाप देतो . या सर्व गोष्टी करून परमेश्वराला म्हणतो , हे परमेश्वरा मी तुझ्यावर प्रेम करतो , परमेश्वर पण म्हणतो हो तू माझ्यावर  प्रेम करतो पण तुझं प्रेम हे सध्याचं मोबाईल झाला आहे , तुझं प्रेम हे इंटरनेट झाला आहे , तुझं प्रेम हे व्हाट्सअप झाला आहे , तुझं प्रेम हे फेसबुक झाला आहे .  या गोष्टीवर जास्त वेळ देतो . तासन्तास या वर चॅटिंग करतो ,  त्यामुळे तो प्रार्थना करण्यास वेळ देत नाही , वचन वाचत नाही .  या सर्व गोष्टी करून मनुष्य आपला नाश करून घेतो . म्हणून आपण सांभाळले पाहिजे गरजेपुरते आपण वापर केला पाहिजे आणि आपण वचनामध्ये ,  प्रार्थनेमध्ये , देवाच्या सभागीतेमध्ये वाढलो पाहिजे .