Sunday, 8 September 2019

परमेश्वरापासून प्रार्थनेचे उत्तर मिळवण्याचा मार्ग

शास्त्रभाग :- 2 राजे 6 : 15 , 23

विषय :- परमेश्वरापासून प्रार्थनेचे उत्तर मिळवण्याचा मार्ग 

प्रस्तावना :-

   परमेश्वर हा प्रार्थना ऐकणारा देव आहे , तो कठीण हृदयाचा नाही ,  तो भग्नअनुतप्त हृदय तुच्छ मानीत नाही , आमच्या हृदयाचा भाव त्याला माहित आहेत . देवाकडे जात असताना आपल्या सर्व प्रकाराच्या प्रश्नातून सुटका व्हावी ,  जगात असा कोणता व्यक्ती नाही की प्रश्न वारंवार त्याच्याकडे यावं , 100% आमचा प्रश्न सुटावा परत या प्रश्नाने आपल्याकडे येऊ नये , तो नाहीसा व्हावा म्हणून त्याच्या काही मार्ग आहे  त्याच मार्गाने जावे लागेल आणि त्याच मार्गाने गेलास तर आपल्या जीवनातील प्रश्न 100% सुटणार आहे .

कोणता मार्ग आहे तो आपण पाहू :-

2 राजे 6 :15-23
वचन 23:-

त्या टोळ्या परत आल्या नाही ,  त्या टोळ्या परत येणारच नाही . प्रत्येक परिवारावर , प्रत्येक व्यक्तीवर चाल करून जात आहे . आमच्या संपत्तीवर , आमच्या आरोग्यावर चालू करून जात आहेत ,आमच्या कुटुंबाचे व्यक्तीवर चाल करून जात आहे , आपले जे आहे ते लुटून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु यातून आम्हाला शंभर टक्के सुटकेची गरज आहे , वारंवार त्याच समस्या , वारंवार तेच प्रश्न , वारंवार त्याच अडचणी , त्याच प्रार्थना , त्याच त्याच गोष्टी साठी रथबदली करण्यात काय अर्थ आहे .
       बायबल सांगतं परमेश्वर चमत्कार करतो ना त्या चमत्काराच्या सामर्थ्याने अरामाच्या टोळ्या परत कधी आल्या  नाही . तिथे असे लिहिले आहे की या अरामाच्या टोळ्यांना अलिशाने खाऊ पिऊ घातले आणि त्यांना नगराबाहेर पाठवलं .
     आपल्याकडे आजार येतो खातो पितो आणि जातो आणि परत येतच नाही . प्रश्न आमच्याकडे येऊ द्या पण त्या प्रश्नाला थांबवण्याची ताकत आमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी जे मार्ग पवित्र शास्त्रात सांगितले ते केले पाहिजे . म्हणजे शंभर टक्के सुटका . परत आमच्याकडे येऊ नये ,  परत ती समस्या वारंवार उभी राहू नये म्हणून मग काय केले पाहिजे तर ,,,,

 पहिला मार्ग:-

1) 2 राजे 6 :16 भिऊ नको

        पहिली तर भीती दूर केली पाहिजे काही लोक प्रार्थना पण करतात , भीती पण त्यांच्यामध्ये आहे , तीच भीती पण काही होत आहे काय ,  काहीतरी होणार आहे ,काहीतरी होणार आहे , काहीतरी होणार आहे ही तुमची भीती आहे . ते होणारच कोण अडवणार आहे होणाऱ्या गोष्टीला . देवाच्या लोकांमध्ये भीतीचा आत्मा नसतो  हे देवाच्या लोकांची वैशिष्ट्य आहे . किती  डोंगरावर सारखे प्रश्न आले , समुद्राच्या लाटांचासारखे प्रश्न त्यांच्याकडे आले , परंतु त्या प्रश्नाकडे पाहत नाही तर उत्तर देणाऱ्या देवाकडे पाहतात . जर आमच्यामध्ये भीती असेल तर ती आमच्या जीवनातून काढून टाकली पाहिजे . का भीतीला काढायचं तर ही भीती आपला नाश करणार आहे , ही भीती आपल्याला कमजोर करणार , आहे ही भीती आपले प्रश्न वाढणार आहे , ही भीती आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार आहे जर आम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर पहिल्यांदा आमच्या भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे .

       आपण पहातो येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस देवदूताने येऊन सुवार्ता सांगितली की भिऊ नका ,,, 

भेयचं नाही ,  प्रश्न पेक्षा देव मोठा आहे , आजारपणात देखील देव मोठा आहे , आर्थिक अडचणीत देखील आमचा देव मोठा आहे तर आपण आपण देवाला कमजोर का करतो ? जी व्यक्ती घाबरते ना ते देवाची टाकत कमी करते . जर आमचं जिवंत देवावर विश्वास आहे ना तर भीतीला घालवता आले पाहिजे . भीतीला घालवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे नेहमी प्रश्नाकडे बघताना तुच्छतेने बघा . जीवन देण्याची ताकद परमेश्वरामध्ये आहे . आजाराची भीती काढून टाका , आमची परिस्थिती भयावह असेल तीच परिस्थिती चमत्काराला पूरक आहे .भीतीदायक वातावरणातच देव चमत्कार करतो . आपले पैसे संपलेले असतील , आपले डॉक्टरचे रिपोर्ट निगेटिव्ह असतील , आपल्याला मदत करायला कोणी नसेल , कुटुंबातील प्रश्न आत्तापर्यंत सुटलेले नसतील , आपले सर्व मार्ग बंद झाले असतील तर आता मी सांगतो चमत्काराला सुरुवात झाली आहे त्यासाठी भीती काढायचे . ज्या व्यक्तीची भीती जाते ती व्यक्ती देवाची आनंदाने भक्ती करते . एखाद्या मनुष्याच्या मनात भीती नसते ती गाणे गात जात असते आणि एखाद्याच्या मनात भीती असते ती व्यक्ती इकडे तिकडे पाहत जाते आणि निर्भीड व्यक्तीकडे पाहिले तर ती गुणगुणत जाते त्याला पाहून आपण म्हणतो बापरे किती स्वच्छंदी माणूस याला कोणती चिंता नाही , काळजी नाही . देवाच्या लोकांचे वैशिष्ट्य हेच आहे की परमेश्वराच्या घरात आल्यावर आनंद करतात . त्यांच्या मध्ये कुठल्याच प्रकारची भीती नसते . भीतीपासून मोकळे व्हा .  जर भीती आपल्या मध्ये असेल ती आज काढून टाका . का काढायची ? कारण आमच्यासाठी स्वर्गात मदतगार आहे ,  आमची मदत करण्यासाठी ,  आमची सुटका करण्यासाठी परमेश्वर स्वर्गात उभा आहे . तिथून तो मार्गदर्शन करणार आहे ,  तिथून तो मदत करणार आहे 100% सुटका मिळण्यासाठी घाबरायचे नाही . जे  घाबरतात त्यांच्याकडे वारंवार आजार येतात . सकाळी उठल्यावर स्वतःला लोक चेक करतात , चक्कर येत नसले तरी कसं वाटतंय थोड गेल्यासारखं वाटतं , मला वाटतं bp वाढला वाटतो  जे घाबरतात ते मरून जातात पण जे घाबरत नाही ते जिवंत राहतात . कुठल्याच प्रकारची भीती दडपण आपल्या मनावर ठेवू नका म्हणून भीती आमच्या जीवनातून काढून टाकली पाहिजे .

दुसरा मार्ग :-

2) 2 राजे 6 :16 त्यांच्या पक्षाचे जे आहेत त्यांच्या पेक्षा आमच्या पक्षाचे अधिक आहेत

      नेहमी म्हटले पाहिजे त्यांच्या पक्षाचे त्याहून अधिक आमच्या पक्षाचे आहे. कधीकधी आपल्याला भीती दाखवली जाते डॉक्टर सांगतात तुमच्या पांढरे पेशी कमी झाले आहेत पण आपण म्हणायचं की मेडिकलच्या पेशी पेक्षा माझ्या येशुचे रक्तातील पेशी आम्हाला विजय देणार आहे . आमच्या पक्षाचे अधिक आहेत . ज्याला देवाच्या शक्तीवर अधिक विश्वास आहे ना ती व्यक्ती कधी घाबरत नाही . आपण प्रार्थना करायची की देवा तुझ्या पक्षाचे लोक मला दाखव , तुझं सामर्थ्य मला दाखव . ज्याला देवाच्या ताकतीवर भरोसा आहे ,  ज्याला देवाच्या सामर्थ्यावर भरोसा आहे ती व्यक्ती प्रश्नाला पळवून लावू शकते . जर आपण आपली ताकत आपले सामर्थ्य सैतानाला दाखवून शैतान आपल्याकडे कधीच येणार नाही . शैतान का आपल्याजवळ येतो ? कारण आपलं संरक्षण करायला कोणी नाही .

   उदा. अलिशा चा सेवक जो आहे ना तो सकाळी उठतो आणि पहातो काय  अरामाच्या राजा मोठे सैन्य घेऊन आपल्याकडे आला आणि तो पळून जाऊन अलिशाला सांगतो महाराज हाय हाय,,,,

कारण त्याने अरामाचे सैनिक पाहिले . अलिशा प्रार्थना करताना काय म्हणतो हे देवा याचे डोळे उघड , याला त्याचे सैनिक दिसण्याऐवजी जे अदृश्य सैन्य ते दाखवा . देवाच्या अलौकिक सामर्थ्य याकडे लक्ष लावा . देवाच्या पुरवठा कडे लक्ष ठेवा किती कर्ज आहे याचा विचार करू नका ,  किती पुरवठा आहे याकडे लक्ष ठेवा . पुरवठा करणाऱ्या परमेश्वराकडे लक्ष लावा . आमच्या शरीरात किती आजर आहेत हे पाहू नका तर एवढ्या आजार बरे करणाऱ्या देवावर विश्वास ठेवा . परमेश्वर आपल्याला कधी मरू देणार नाही कधी आणि हानी होऊ देणार नाही , कधी कमजोर पडू देणार नाही , आपल्या कुठल्या अवयवाला इजा होऊ देणार नाही . कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे . त्याने आपल्याला संरक्षण दिले आहे . म्हणून बचाव करणार्‍या कडे लक्ष असू द्या. आक्रमण करणार्‍याकडे नव्हे . आक्रमण करणारा पूर्ण ताकतीने आक्रमण करील त्याला करू द्या .

उदा. दावीद व गल्ल्याथ

दावीद म्हणतो परमेश्वराच्या नावाने मी चाल करून जातो . त्याने गल्ल्याथाची शरीरयष्टी पाहिली नाही . त्याने घातलेले कपडे पाहिले नाही . या सर्व पेक्षा देव मोठा आहे . आजाराला मोठं  करू नका , आर्थिक प्रश्नाला मोठं करू नका . आज आपण बिजनेस मध्ये यशस्वी नाही त्याकडे पाहू नका तर देऊ माझा बिजनेस कसा वाढवत आहे याकडे लक्ष लावा . आपली गरज पूर्ण करणाऱ्या परमेश्वराकडे लक्ष लावा .


तिसरा मार्ग :- 

2 राजे 6 :17 देवाकडे डोळे उघडण्यासाठी प्रार्थना करावी 

    काही माणसाचे डोळे उघडत नाही . एखादा फटका बसल्याने नंतरच डोळे उघडतात . जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवणार नाही त्याला फटका बसणार आहे . जर आमच्या डोळ्यांना विश्वास नसेल , आमचे डोळे कमजोर झाली असेल , डोळ्यानी सामर्थ्य दिसत नसेल , आमच्या डोळ्यांना देवाचा मदतीचा हात दिसत नसेल तर आपले डोळे उघडणे गरजेचे आहे .

   प्रकटीकरण या पुस्तकात असे लिहिले आहे की तुमचे डोळे उघडण्यासाठी अंजन विकत घे,,,,

हे परमेश्वराचे वचन आहे . ते आमचे डोळे उघडण्याचे काम करतं आणि ते वचन सांगत देव आहे , तो चमत्कार करणारा , सर्व परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे . म्हणून आमचे डोळे उघडणे गरजेचे आहे . डोळे उघडा . डोळे उघडने म्हणजे देवाला पाहणे आहे .

उदा . नवीन करारातील पौल,, तीन दिवस त्याचे डोळे आंधळे होते .

डोळे ऊघडणे म्हणजे देव दिसणे . ज्याला देव दिसत नाही तो आंधळा आहे .  आपण प्रार्थना केली पाहिजे कि ,  माझे डोळे उघड , मला दिसू दे  . सगळे दिसतं आपल्याला नोकरी दिसतं , कुटुंब दिसते  पैसा दिसते पण देव दिसत नाही . देव दिसतो का ? देव दिसणे गरजेचे आहे . ज्याला देव दिसला त्याचे डोळे उघडले आणि ज्याला देव दिसला आहे त्याला जगातल्या कोणत्या गोष्टी दिसत नाही . देव दिसला की माणूस वेडा होतो  देवासाठी .  ज्याला देव दिसतो  त्याला देव आपल्याबरोबर घेऊन चालतो . ज्याचे प्रेम पैसे वर असते ,  त्याचा रात्रभर पैशाचा हिशोब चालू असतो  . आणि ज्याचे प्रेम देवावर असते , तो रात्री उठून प्रार्थना करतो , सकाळी उठल्यावर प्रार्थना करतो , सारख देवाचं मंदिर , सारख देवाच सानिध्य , जोपर्यंत देव दिसत नाही , तोपर्यंत प्रश्न  सुटत नाही . त्यासाठी डोळे उघडले पाहिजेत .

चौथा मार्ग :-

2 राजे 6 : 18 आपल्याला देवाचं सामर्थ्य अनुभवाचं आहे

         परमेश्वराचे सामर्थ्य अनुभवाचा आहे आता . आपल्या घराला , आपल्या लेकराला , आपल्या पतीला , आपल्या कामाला देवाचे सामर्थ्य अनुभवाचा आहे . देवाच्या सामर्थ्य साठी आपण मंदिरात आलो पाहिजे आणि मंदिरातून जाताना म्हणायचे आहे की देव माझ्याबरोबर आहे . कर्ज असणाऱ्या व्यक्तीने म्हटले पाहिजे की देवाने मला तिजोरी दिली आहे .

उदा . अब्राहम व इसहाक

अब्राहामाने सामर्थ अनुभव . त्याने परमेश्वर विश्वास ठेवला . कधीकधी परमेश्वर प्रतिकूल परिस्थितीत आपले मार्गाची दोर कापून  टाकतो . तेव्हा काहीच करता येत नाही . यासाठी आपल्याला देवाचे सामर्थ्य अनुभवच आहे . अब्राहम म्हणाला देव पाहून देईल , मग आपण का म्हणत नाही देव पाहून देईल ?  देवा याचे डोळे उघड त्याने काय पाहिले तर अग्नि रथ अग्नी घोडे . ते काय स्वर्गातून पडले होते का नाही ते तिथे होते , पण दिसत नव्हते . जे दिसतं ना त्याच्यावर विचार करत नाही तर जे अदृश्य आहे ना त्याचा आपण विचार करतो . जे अदृश्य आहे ते आमचा आहे . अदृश्य काय आहे ,अग्नीचे रथ अग्नीचे घोडे . आपल्याला आपला आजारपण दिसतो पण आजाराला प्रतिरोध करणारा सामर्थ्य दिसत नाही . परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव घ्यायचा आहे . ज्या गोष्टी तुम्हाला दिसते ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका , भरोसा ठेवू नका तर कसावर ठेवायचा तर ते आपल्या नजरेला दिसत नाही ते आपण पाहू शकत नाही त्याच्यावर विश्वास ठेवत आहे .

पाचवा मार्ग :-

2 राजे 6 : 19  प्रार्थनेने शत्रूचे सामर्थ्य कमजोर करा

आपले शत्रू दिसत आहे , आपल्या शत्रूची संख्या मजबूत आहे आणि आपले शत्रु आपल्यावर चाल करणार आहे हे सत्य आहे , पण एक गोष्ट अदृश्य आहे . आपल्या प्रार्थनेने आपल्या शत्रूचे डोळे आंधळे होणार आहे . शत्रु जितक्या शक्तीने आपल्याकडे येणार आहे तितक्या शक्तीने तो मागे फिरणार आहे  . का ? कारण आपली प्रार्थना आपल्या शत्रूला कमजोर करते . अलिशाने प्रार्थना केली यांचे डोळे आंधळे कर . म्हणून आपणही प्रार्थना करायची की माझ्या शत्रूचे डोळे आंधळे कर .  त्या शत्रूला माझं कुटुंब , माझे काम , माझे लेकरे दिसू नको . त्याला आंधळे कर . जर शत्रू आंधळा झाला तर तो घरात येणार कसा . शत्रूला करण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे . काही लोक प्रार्थना करीत नाही म्हणून त्यांच्या घरात शत्रू नेहमी घुसतो . म्हणून आपण प्रार्थना करायची , देवा माझे  शत्रूचे डोळे  आंधळे कर . तो चाचपडत चाचपडत माझ्या घरात येऊ देऊ नको . प्रार्थनेच्या शक्तीने आपल्या शत्रूच्या डोळे आंधळे करा . प्रार्थनेच्या सामर्थ्याने आपल्या घरात आजारपण , दारिद्र्य , अडचणी येणारच नाही . ते चाचपडत चाचपडत निघून जातील .  ते दुसऱ्या शहरात निघून जातील . प्रार्थनेने आपले काम ,आपले कुटुंब , आपले लेकरे सुरक्षित केले पाहिजेत .

1 comment: