Monday, 23 September 2019

भीती दूर करण्याचे मार्ग

  • शास्त्रभाग  :- स्तोत्र 56 : 3
  • विषय.       :- भीती दूर करण्याचे मार्ग

  • प्रस्तावना   :-

         परमेश्वरावर भाव ठेवणारा कधी लज्जित फजीत होत नाही . आमच्या आनंदाचे कारण आमच्या जीवनामध्ये जयघोष करण्याचे कारण आमच्या पक्षाचा देव आहे .  एकच ठिकाण जगामध्ये आहे जिथे आल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणातील सर्व भीती नाहीशी केली जाते , नष्ट केली जाते . या जगामध्ये दुसरे कोणतेच माध्यम किंवा सापडणार नाही परंतु ज्या दिवशी देवाकडे याल त्या दिवसापासून आमच्या जीवनातल्या समस्या , पीडा , दुःख त्या ठिकाणी नष्ट केले जातात  . जर देव आम्हाला सापडला तर जगातील सर्वात मौल्यवान वस्तू आपल्याला सापडली आहे आमच्याकडे देव नाही तर आपण फार मोठ्या संकटात अडकलेले लोक आहात .
        ज्यावेळेस आमच्या अंतःकरणा मध्ये भीती निर्माण होते ,  ही भीती दूर करण्याचे माध्यम पवित्र शास्त्रामध्ये सांगितले आहे . आमच्या जीवनामध्ये भीती आहे म्हणून आपण या मंदिरामध्ये आलो आहोत .  कोणाला शरीरांमध्ये होणाऱ्या रोगाची भीती आहे , कोणाला आर्थिक प्रश्नांची भीती आहे . पवित्र शास्त्रामध्ये या भीतीपासून , या चिंतेपासून पासून सुटका मिळवण्याचा उत्तम मार्ग सांगितले आहे .

  • भीती दूर करण्याचे उत्तम मार्ग कोणते ?


1) परमेश्वरावर भरवसा ठेवणे :- 

स्तोत्र 56 : 3 मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकिंन....

         जर भीती वाटेल तर देवावर भरवसा टाका . जगामध्ये असा कोणताच मनुष्य नाही की त्याला भीती नाही , श्रीमंत जो आहे त्याला ही भीती आहे , प्रबळ राष्ट्र अमेरिका याला  कोरिया देशाची भीती आहे , कोरियाला अमेरिकाची भिती वाटते . जगामध्ये कोणती व्यक्ती आपल्याला वाचू शकत नाही .  कोणत्या समस्या , कुठल्याही अडचणीतून सोडवू शकत नाही . ज्यावेळेस आपण लोकांकडे समस्यांसाठी  जाऊ ना तेव्हा तेच लोक आपल्या मनात भीती निर्माण करील . आपली भीती दूर करण्यासाठी नाना प्रकारच्या गोष्टी करत आहोत . एखादा ने सांगितले कि भीती दूर करण्यासाठी तर हातात काळा धागा घाल ,आपण घालतो . आपल्याला कळतच नाही.
त्यांनी भीती दूर होते का हो  ? आणखी भीती वाढते . भीती  नष्ट होण्यासाठी मनुष्य अतुकाट प्रयत्न करीत आहे . बायबल सांगत , भीती वाटते देवावर भरोसा ठेवा  . भीती दूर करण्याचे  सामर्थ्य येशूमध्ये आहे . सर्व पीडा ,  सर्व दुःख दूर करण्याचे सामर्थ्य येशुकडे आहे . देवाने मनुष्य निर्माण केला , पशुपक्षी त्यांने निर्माण केले .  मग आम्हाला भीती कशाची ?शरीरातील रोगाची ! बायबल सांगतो मनुष्य मातीपासून निर्माण केला , त्या मातीत प्राण फुंकला , तो जिवंत झाला म्हणजे श्वास पुरवण्याचे काम परमेश्‍वर करतो , जर आमचा श्वास बंद पडला तर आपला श्वास चालू करणार नाही का ?जेव्हा आपण डॉक्टर कडे जातो तो सांगतो एक्सरे काढा mri काढा , blood तपासणी  करा . पण फरक नाही पडला तर डॉक्टर सांगतो की तुम्ही दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्या . का घ्यायचा सल्ला आपण ? ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली ,  ज्याने आम्हाला सर्व आजारापासून मुक्त केले आहे , ज्याने सर्व बंधनातून आपल्याला सोडविले आहे , तो परमेश्वर आपल्या बरोबर आहे ,  आपण सुटका पावलेले लोक आहोत . परमेश्वर म्हणतो भिऊ नका , घाबरू नका तुमचं शरीर हे परमेश्वराने घडविलेले आहे . 

  • उदा . एक आंधळा

का घाबरायचं नाही आपल्याला तर पवित्र शास्त्रात उदाहरण दिले आहे एक आंधळा येशुकडे आला मला दृष्टी यावी म्हणून प्रार्थना करा . येशु जमिनीवर थुंकला , त्याचा चिखल केला त्याच्या डोळ्याला लावला आणि म्हणाला जा शिलोह म्हटलेला तळ्यात जाऊन धु .


     याठिकाणी येशूने जमिनींवर थुंकुन चिखल केला ,  त्याच्या डोळ्याला लावला . परमेश्वराला हे म्हणायचे आहे की तुमचे शरीराचे प्रत्येक अवयव हे मातीचे बनलेले आहेत . कुंभार भांडी घडवतो तसं परमेश्वरी घडवतो .आपल्या शरीरात काही बिघाड झाला असेल ते रिपेरिंग करण्याचे काम परमेश्वर करतो .  त्याचे नाव  याव्हे राफा आहे , तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे , तो आरोग्य देणारा देव आहे आहे , तो सुटका देणारा देव आहे , त्याच्यावर भरवसा ठेवा , स्वतःवर विश्वास ठेवू नका . मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टास मी भिणार नाही , स्वतःवर विश्वास ठेवू नका तर परमेश्वरावर विश्वास ठेवा  . माझा येशूने लाजराला जिवंत केले ,  तिरडी वरून मुलाला जिवंत केले . रोग कितीही येऊ द्या पण त्याच्यावर उपाय फक्त येशु आहे .

2) देवाकडे आलो पाहिजे :-

अ ) स्तोत्र 56:8 माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहे

            आम्ही कोठे कोठे गेलो हे परमेश्वराला ठाऊक आहे . आपली भीती घालवण्यासाठी आपण कोठे कोठे गेलो हे परमेश्वराला माहित आहे . कोणत्या दवाखान्यात गेलो , कोणत्या मांत्रिकाकडे गेलो , कोणत्या माणसाकडे गेलो हे त्याला माहीत आहे . सर्व ठिकाणी हिंडून आलो तर ते येशूकडेच .

  • उदा. रक्तस्त्रावी स्त्री

       रक्तस्त्रावी स्त्री आपला आजार बरा होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन आली . प्रत्येक नगरात , प्रत्येक घरात , प्रत्येक शहरात , प्रत्येक गावी सर्व ठिकाणी हिंडून आली   तिने सर्व डॉक्टर पाहिले , पण तीचा आजार बरा झाला नाही .  रक्ताचा जरा सुखावा म्हणून तिने प्रत्येक वैद्य , प्रत्येक हकीम जे तिला उपचार सांगितले ते तीने केले .


         आम्ही देखील अनेक उपचार केले आहे . अनेक ठिकाणच्या लोकांकडे गेलो आहोत . डॉक्टरांकडे गेलो , बँकांकडे कडे गेलो , लोकांकडे गेलो , सर्व ठिकाणी गेलो पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला निराशा आली आहे . ज्या दिवशी आपण येशूकडे येऊ ना तेव्हा त्याला सांगण्याची गरज नाही . येशु सर्व जाणतो तो म्हणतो भिऊ नका . याठिकाणी येशुकडे आटोमॅटिक प्रश्न सुटले जातात . कारण येशूने आपली सर्व ठिकाणे पाहिली आहेत . येशूकडे 100% उपचार आहे , 100% सुटका आहे . येशू जो  सांगतो ते ऐका . जे सांगतो ते करा . पुन्हा जुन्या गोष्टी करू नका . आपला रोग फार मोठा आहे याचा विचार करू नका . आपल्या रोगापेक्षा येशू मोठा आहे . आपल्या प्रश्नापेक्षा येशू मोठा आहे . आपण येशूकडे पाहिले पाहिजे . येशूकडे पाहतो तर आपली भीती नष्ट होते .

ब ) स्तोत्र 56 : 8 माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेवली आहेत

     रडणारे खूप आहेत पण अश्रू पुसणारे कोणीच नाही . पण देव आपली अश्रू पुसतो . आपले अश्रू मोल्यवान आहे . परमेश्वरासमोर प्रत्येक अश्रू व्यर्थ जाणार नाही . परमेश्वर प्रत्येक अश्रूची किंमत करतो .

उदा . हागरा

    रानामध्ये इस्माईल रडत असताना , अब्राहामाने त्यांना घराबाहेर हाकलून दिले , साराने देखील त्यांना हाकलून दिले . हागराने इस्माईला झाडाखाली ठेवून लांबुन रडत पाहत होती . आणि इस्माईल हा स्वतःसाठी रडत होता आणि बायबल सांगतो परमेश्वराने त्याची वाणी ऐकली , त्याचं रडणं पाहिले आणि स्वर्गातून हागरेला देवाने हाक मारली ,देवाने खडकातून पाणी काढले आणि ते पाणी हागरेने इस्माईला पाजले तिला म्हणाला याच्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन .
        इस्माईलचं मरण अटळ होतं , त्याला कोणी वाचू शकत नव्हतं , त्याला कोणी सोडू शकत नव्हतं ,. पण परमेश्वराने त्याचे अश्रू पाहिले . ते अश्रू आपल्या बुदलीत भरून ठेवले . आपले अश्रू देवाच्या मंदिरात कधी व्यर्थ जात नाही. देवाच्या मंदिरात रडा . घरी रडू नका . कारण घरी अश्रू पुसणारे कोणी नाही.  हागार रडली इस्माईलसाठी आणि इस्माईल रडला स्वतःसाठी पण देवाच्या मंदिरात अश्रू पुसणारे स्वतः परमेश्वर आहे  .


  • उदा . हन्ना

     हन्ना परमेश्वराच्या मंदिरात रडली आणि इतकी इतकी रडली की परमेश्वराला तिच्या अश्रूची दखल घ्यावी लागली . असे रडा की देवाने तुमच्या अश्रूची दखल घेतली पाहिजे . मला सांगा की रडलेली व्यक्तीची प्रार्थना देवाने ऐकली नाही अशी एक तरी व्यक्ती दाखवा , आपल्या अश्रुची किंमत त्याने पुरेपूर चुकली आहे .  याठिकाणी  मंदिरात अश्रू गाळलेले कधीही व्यर्थ जात नाही . हन्ना रडली आणि तिला गौरवशाली पुत्र तिला दिला . पण माणसासमोर रडू नका तर देवासमोर रडा . माणसासमोर रडला तर ते तुमच्या उपहास करतील . कधीकधी देव आपल्या सभोवती परिस्थिती निर्माण करतो , यासाठी की आपण जास्त रडावं . जास्त रडाल तर जास्त आशीर्वाद प्राप्त होतील . आपले अश्रू बुधलीत भरून ठेवले आहे की , त्याला वाचवले . परमेश्वर आपल्याला वाचवण्याची , जीवन देण्याचे आश्वासन  देतो .
आपल्या दुःखाचे रूपांतर परमेश्वर आनंदामध्ये करतो . आपले दारिद्र्याचे रूपांतर भरपुरीमध्ये करतो . आपले जीवन आशीर्वादित परमेश्वर करतो .



क ) परमेश्वराचा धावा करणे :- 

स्तोत्र 56 : 8  तुझ्या वहीत ही नमूद झाली नाहीत काय ?

       परमेश्वर आपले अश्रू वहीत नमूद करतो . कसला हा देव आहे जो आपले अश्रू वहीत नमूद करतो ? का नमूद करतो ? तर परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो म्हणून तो आपल्या अश्रूची नोंद ठेवतो . लोक तुमची अश्रूंची थट्टा  करतील , नावे ठेवतील पण माझा परमेश्वर नोंद करणारा आहे , किती अद्भुत तो देव आहे . प्रत्येक अश्रुंचे थेंब परमेश्वर नोंद करतो . ज्यांना आरोग्य नाही त्यांनी  आरोग्यासाठी रडा व ज्यांना आरोग्य आहे त्यांनी देवाच्या समक्षेसाठी  आणि त्यांनी  देवाच्या सनिध्यासाठी रडा .

  • उदा . शमशोन

         शमशोन  हा व्यक्ती बंदी शाळेत असताना तो रडला . का रडला ? तर त्याच्या बट्टा कापून टाकल्या होत्या .  ते सामर्थ्य मिळवण्यासाठी तो देवाजवळ रडला .  देवाच्या  समीक्षेत सानिध्यासाठी तो रडला आणि त्याला अभिषेकला पुन्हा प्राप्त झाला .


ड) स्तोत्र 56 : 9 मी तुझा धावा करीन त्या दिवशी माझे वैरी मागे फिरतील .

    लोक धावा करीत नाहीत  म्हणून आपले  वैरी चिटकुन बसतात . जेव्हा ते परमेश्वराचा धावा करायला सुरुवात करतात तेव्हा आपले वैरी म्हणतात बापरे जगातील सर्वात ताकतवान व्यक्तीला हात मारत आहे . तो आल्यावर आपला पराभव आहे , तो आल्यावर आपली सत्ता निघून जाणार आहे , तो आल्यावर आपल्याला पाळावे लागणार आहे , येशूने धमकावण्याचे अगोदर याला  सोडावे लागणार आहे . जेव्हा आपण येशूचा धावा करणार , तेव्हा आपले वैरी आपल्या घराला , आपल्या शरीराला , आपल्या व्यवसायाला , आपल्या नोकरीला , आपल्या लेकराला सोडून पळून जाणार आहे .  येशूच्या नावात  ते सामर्थ्य आहे .

  • उदा . लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे 

     जेव्हा पेत्र आणि योहान सकाळी मंदिरात असताना ,  सुंदर नावाच्या दारावर भिकारी होता . त्याने  त्यांना भीक मागितली , त्याला वाटलं की मला काहीतरी मिळेल . आणि ते त्याला म्हणाले आमच्याजवळ काही नाही सोने रूपे काही नाही ,  तर येशूच्या समर्थ्यशाली  नावात चालू लाग आणि तो चालू लागला , तो उड्या मारत मंदिरात गेला



  • भीती दूर करण्याचे मार्ग. :-

1) परमेश्वरावर भरोसा टाकणे
2) परमेश्वराकडे येणे
3) परमेश्वराचा धावा करणे

               येशु आपल्यामध्ये महतकृत्ये  करणारा देव आहे . तो सुटका केल्याशिवाय राहणार नाही . परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे , आपल्या विरोधात कुठलेच हत्या चाल करणार नाही ,  कारण तो परमेश्वर आपल्या सोबती आहे .

No comments:

Post a Comment