शास्त्रभाग :- योहान 3 :16
विषय :- परमेश्वराचे प्रेम
प्रस्तावना :-
आज जगातील प्रेम हे स्वार्थी , धोका देणारं , सोडणारे , दुःख देणारे ,वेदना देणारे , गरजेपुरते वापरणारे असे आहे .
प्रेम म्हणजे काय ?
प्रेम म्हणजे एक आपुलकी , एक माणुसकी , मदत , सांत्वन , आधार , सुखात दुःखात उभे राहणे होय .
अशा प्रेमात कुठलेही वासना नाही , स्वार्थ नाही , ते प्रेम पवित्र असावं , त्या प्रेमात त्याग असावं आणि असे प्रेम कोठेच सापडत नाही व अशी प्रेम करणारी व्यक्तीही सापडत नाही
मग अशी कोण व्यक्ती आहे की तिने निस्वार्थी प्रेम केले ते प्रेम पवित्र आहे , त्याच्या प्रेमात त्याग आहे , जीवन आहे , एक नातं आहे .
ती व्यक्ती आहे येशु ख्रिस्त ... येशु म्हणजे प्रेम.
येशु या जगाचा निर्माणकरता , तारणकरता सर्व मानवजातीचा परमेश्वर आहे , येशु ख्रिस्ताने निःस्वार्थी या जगावर प्रेम केले . येशूची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये , सर्व मानव जातीला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून येशूने आपला जीव वधस्तंभावर दिला . बायबल सांगते सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवला उणे पडले आहे . आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावला . येशूने सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी आपला अनमोल प्राण दिला . जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला तीतक्यांना त्याने आपल्याला लेकरे म्हणण्याचा अधिकार दिला . येशूने सर्व शापातून , आजारातून ,पापापासून आणि सैतानाच्या बंधनातून मुक्त केले . येशुने जगावर प्रेम केले , हे प्रेम आपल्याला सार्वकालिक जीवन देते , वारसदार बनवते , मुले म्हणण्याचा अधिकार देते . येशूचे प्रेम आपल्याला सोडत नाही , टाकत नाही , लज्जित फज्जीत करीत नाही . कारण देव प्रीती आहे , येशूचा प्रीतीचा स्वभाव आहे . येशूचे प्रेम कधीही रुसत नाही , फुगत नाही , रागवत नाही .येशु नेहमी आपल्या बरोबर राहतो कारण आपण येशूची हस्तीकृती आहोत .
येशूवर प्रेम करणे म्हणजे येशूच्या आज्ञा पाळणे होय .
देवावर प्रेम करणारी व्यक्ती कशी असावी ?
1) नेतृत्व करणारी असावी :-
उदा. मोशे
परमेश्वराने मोशेची निवड इस्राएल लोकांना फारोच्या गुलामीतुन मुक्त करण्यासाठी केली . परंतु मोशे जड जिभेचा व जड ओठाचा होता . मोशे म्हणतो मी बालक आहे , मला करता येणार नाही , मला जमणार नाही . पण परमेश्वराने मोशेच्या मुखात शब्द घातले . मोशे इस्राएल लोकांचा पुढारपण , नेतृत्व करू लागला , मोशे सर्वांसाठी मध्यस्थी , रदबदली , प्रार्थना करू लागला
त्याचप्रमाणे आपल्याला काहीही येत नसेल , कला नसेल , बोलता येत नसेल तरीही येशु आपल्यावर प्रेम करतो . येशु आपल्याला तयार करतो , घडवतो .
2) प्रार्थना करणारी असावी :-
उदा . अलिशा
अलिशाचा सेवक गेहजी सकाळीच उठतो तर पाहतो काय त्या नगरभोवती , गडाभोवती अरामाचा राजाची सैनिक मारण्यासाठी आपल्या हाती तलवार घेऊन आली आहे . अलिशाचा सेवक घाबरतो , आता आपलं काहीच खरं नाही , आपण मरणार , आपला कोणी बचाव करणार नाही , कोणी आपल्याला सोडवणार नाही म्हणून तो सेवक भीतीने आपला स्वामी अलिशा याच्याकडे धावत धावत जातो . सेवक अलिशाला म्हणतो महाराज हाय हाय आता आपण मरणार , परंतु अलिशा घाबरला नाही , तो स्थिर राहिला , डगमगला नाही. अलिशाला माहीत होते की परमेश्वर या समस्यातून सोडवण्यास समर्थ आहे , अलिशा हा देवावर प्रेम करणारा होता , तो प्रार्थना करणारा होता , देवाच्या सानिध्यात बसणारा होता . आलिशाने प्रार्थना केली हे परमेश्वरा या तरुणाचे डोळे उघड . त्या सेवकाचे डोळे उघडते आणि पाहतो काय तर त्या ठिकाणी अग्नीचे रथ व अग्नीचे घोडे दिसले . जे सैनिक मारण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी आलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा यांचे डोळे आंधळे कर , आणि त्यांचे डोळे आंधळे झाले
त्याचप्रमाणे परमेश्वरावर प्रेम करणारी व्यक्ती कुठल्याच समस्याला , अडचणीला भीत नाही . जीवनात किती पण वादळ येवो , तुफान येवो ती भीत नाही . तीला माहीत असते की परमेश्वर या सर्व गोष्टीतून सोडवण्यास समर्थ आहे . समस्या ,अडचणीपेक्षा माझा परमेश्वर मोठा आहे . परमेश्वरावर प्रेम करणारी व्यक्ती देवाच्या सानिध्यात बसणारी , देवाशी बोलणारी , देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारी असते .
3) उपासना करणारी असावी :-
उदा . दाविद
जेव्हा दावीद रानात मेंढरे चारायला जात असे तेव्हा रानात देवाची उपासना करीत असे . उपासनाच्या सामर्थ्याने त्याने सिंहाची जाबडी फाडली , अस्वली मारली , ती ताकत ती शक्ति उपासनेचे द्वारे त्याला प्राप्त झाली होती .तोच दाविद बलाढ्य गल्याथाच्या समोर उभा रहातो . त्याने गल्याथाची बॉडी पहिली नाही , उंची पाहिली नाही , त्याची तलवार पाहिली नाही , त्याचे कपडे पाहिले नाही , दाविदाला परमेश्वराच्या सामर्थ्यावर भरोसा होता .दाविदाने परमेश्वराच्या नावाने चाल करून गल्ल्याथ याला मारले . याचे कारण हे कि तो चांगला उपासक होता , तो देवाला संतुष्ट होता , तो देवाचं मन जाणारा होता , तो देवाच्या मनासारखा होता
त्याचप्रमाणे देवावर प्रेम करणारी व्यक्ती ही देवाची उपासना करणारी असते . उपासनेमध्ये सामर्थ्य असते , उपासनेमध्ये ताकत असते , उपासनेमुळे सैतानाची सर्व बंधने , सर्व आजार सुटतात
उदा .पौल आणि सीला
पौलआणि सीला बंधनात असताना या दोघांनी देवाची भक्ती , आराधना , देवाची स्तुती केली तेव्हा त्यांची बंधने तुटली , बंदी शाळेचे दरवाजे उघडले , भुमिकंप झाला . कारण सामर्थ्य फक्त भक्ती , उपासनेमध्ये आहे .
ब) देवावर प्रेम करणारी व्यक्ती स्वतःचा नाश कसा करून घेता ?
1) मौज , मजा , मस्तीसाठी :-
उदा . उधळ्या पुत्र :-
उधळ्या पुत्र जोपर्यंत बापाच्या घरी होता त्याच्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या , त्याच्या खाण, त्याचे त्याचे कपडे सर्व व्यवस्थित देखभाल होत होती तरीदेखील उधळ्या पुत्र आपल्या बापाला सोडून जातो आणि तो मित्राबरोबर मौज , मजा ,मस्ती करतो . सर्व पैसे उधळून टाकतो . मित्र त्याला सोडून जातात . त्याच्याकडे पैसे नसल्याकारणाने तो डुकरे चारायला थांबतो. तो तिथे डुकराचे उष्ट अन्न खातो . त्याने आपला स्वतःचा नाश करून घेतला , त्याने सर्व काही गमावले .त्याच्याजवळ काहीच झाले नाही .
त्याचप्रमाणे तरुण मुलांना अधिन राहायला आवडत नाही . मनाचे कारभार आवडतात. आज्ञा पाळायला नको , मला माझा जीवन जगू द्या ते स्वतःचा नाश करून घेतात ते देवाची साहित्य , समिक्षतता , सामर्थ्य सोडून जातात आणि मनाचे कार्य चालू करतात पण ते लोक कधीच यशस्वी होत नाही . ते स्वतःचे जीवन जगतात ते देवाचा अभिषेक गमावता .
2) आकर्षक , मोहक गोष्टीसाठी :-
शमशोन या व्यक्तीला परमेश्वराने इस्राएल लोकांच्या सुरक्षितेसाठी , बचावासाठी त्याची निवड केली होती. शमशोन अधिक शक्तिशाली होता . तो सिंहाला मारणार होता , त्याने 300 कोल्ही मारली होती , त्याच्या समोर कुणी टिकू शकत नव्हते , तो बलाढ्य होता , त्याच्याशी युद्ध करण्यासाठी कुणीही येत नव्हते . शमशोन या व्यक्तीला एका सुंदर मुलीवर प्रेम होतं , त्या मुलीसाठी तो वेडा होतो कारण ती मुलगी सुंदर होती तिच्या तो प्रेमात पडतो त्याचे आईबाप त्याला सांगायचे की ती मुलगी करू नको परंतु शमशोन ऐकत नव्हता. त्याने न ऐकल्या कारणाने त्याने आपला अभिषेक , आपले सामर्थ्य गमावलं , सर्व शक्ती गमवून बसला . सुंदर , आकर्षक गोष्टीसाठी त्याने आपला सर्व आशीर्वाद गमवून बसला .
त्याचप्रमाणे आज जगामध्ये अनेक सुंदर सुंदर गोष्टी आकर्षक गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे पाहून तरुण ओढवला जातो आणि त्यामध्ये गुंतून बसतात . आजची तरुण पिढी चुकीच्या पद्धतीने प्रेम करतात आणि त्या प्रेमामध्ये आपल्या सर्व अभिषेक , सर्व सामर्थ्य गमावून बसतात . देवाच्या सहभागीते पासून ते दुर जातात , देवाच्या प्रार्थने पासून दूर जातात , देवाच्या आज्ञा न मानता ते जगाच्या गोष्टीत गुंतून जातो . त्यांचा मनाचा ओढा जगाच्या गोष्टीत लागलेली असतात . म्हणून आकर्षक मोहक गोष्टी कारणाने आपल्या जीवनातील सर्व सामर्थ्य ,अभिषेक आणि आशीर्वाद गमावून बसतात .
3) आपल्या सुरक्षतेसाठी :-
शलमोन राजाने नीतिसूत्रे लिहिली , गीते रचली शाल्मवसारखा पृथ्वीवर राजा झाला नाही . त्याच्या सारखे ज्ञान कोणाकडेही नव्हते . शलमोन या व्यक्तीला परमेश्वराने तीनदा दर्शन दिले होते आणि या शलमोनाने आपल्या सुरक्षतेसाठी देशातील अन्य जातीच्या धर्माच्या मुली यांच्याशी विवाह केला त्यांच्या त्या देशाच्या मुली त्याने बायका करून घेतल्या . तो बायकांचे नादी लागून तो त्यांच्या दैवतांची उपदाना , आराधना करू लागला . तो परमेश्वरापासून बहकला , परमेश्वरापासून दूर झाला , तो अन्य देवतांची पूजा करू लागला . त्याला असं वाटलं की मी देशातील बायका केल्या तर ते देश माझ्यावर आक्रमण करणार नाही . त्याने स्वतःच्या सुरक्षितेसाठी या चुकीच्या पाऊल उचलून परमेश्वराला गमावले.
त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या जीवनामध्ये आजारे , संकटे , समस्या येतात तेव्हा आपण लोकांचे जास्त ऐकतो . लोक जे आपल्या सांगतात तेच आपण करतो . कुणी सांगितलं की मांत्त्रिकाकडे जा, बाबाकडे जा , धागेदोरे कर आणि त्याप्रमाणे आपण करतो आणि अशा गोष्टीने आपण परमेश्वर संबंध मन दुखवतो , परमेश्वराविरुद्ध वागतो त्याच्या आज्ञा मोडतो . या चुकीच्या गोष्टीने आपण परमेश्वराला गमावून बसतो .
2) आकर्षक , मोहक गोष्टीसाठी :-
उदा . शमशोन
शमशोन या व्यक्तीला परमेश्वराने इस्राएल लोकांच्या सुरक्षितेसाठी , बचावासाठी त्याची निवड केली होती. शमशोन अधिक शक्तिशाली होता . तो सिंहाला मारणार होता , त्याने 300 कोल्ही मारली होती , त्याच्या समोर कुणी टिकू शकत नव्हते , तो बलाढ्य होता , त्याच्याशी युद्ध करण्यासाठी कुणीही येत नव्हते . शमशोन या व्यक्तीला एका सुंदर मुलीवर प्रेम होतं , त्या मुलीसाठी तो वेडा होतो कारण ती मुलगी सुंदर होती तिच्या तो प्रेमात पडतो त्याचे आईबाप त्याला सांगायचे की ती मुलगी करू नको परंतु शमशोन ऐकत नव्हता. त्याने न ऐकल्या कारणाने त्याने आपला अभिषेक , आपले सामर्थ्य गमावलं , सर्व शक्ती गमवून बसला . सुंदर , आकर्षक गोष्टीसाठी त्याने आपला सर्व आशीर्वाद गमवून बसला .त्याचप्रमाणे आज जगामध्ये अनेक सुंदर सुंदर गोष्टी आकर्षक गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे पाहून तरुण ओढवला जातो आणि त्यामध्ये गुंतून बसतात . आजची तरुण पिढी चुकीच्या पद्धतीने प्रेम करतात आणि त्या प्रेमामध्ये आपल्या सर्व अभिषेक , सर्व सामर्थ्य गमावून बसतात . देवाच्या सहभागीते पासून ते दुर जातात , देवाच्या प्रार्थने पासून दूर जातात , देवाच्या आज्ञा न मानता ते जगाच्या गोष्टीत गुंतून जातो . त्यांचा मनाचा ओढा जगाच्या गोष्टीत लागलेली असतात . म्हणून आकर्षक मोहक गोष्टी कारणाने आपल्या जीवनातील सर्व सामर्थ्य ,अभिषेक आणि आशीर्वाद गमावून बसतात .
3) आपल्या सुरक्षतेसाठी :-
उदा . शलमोन
शलमोन राजाने नीतिसूत्रे लिहिली , गीते रचली शाल्मवसारखा पृथ्वीवर राजा झाला नाही . त्याच्या सारखे ज्ञान कोणाकडेही नव्हते . शलमोन या व्यक्तीला परमेश्वराने तीनदा दर्शन दिले होते आणि या शलमोनाने आपल्या सुरक्षतेसाठी देशातील अन्य जातीच्या धर्माच्या मुली यांच्याशी विवाह केला त्यांच्या त्या देशाच्या मुली त्याने बायका करून घेतल्या . तो बायकांचे नादी लागून तो त्यांच्या दैवतांची उपदाना , आराधना करू लागला . तो परमेश्वरापासून बहकला , परमेश्वरापासून दूर झाला , तो अन्य देवतांची पूजा करू लागला . त्याला असं वाटलं की मी देशातील बायका केल्या तर ते देश माझ्यावर आक्रमण करणार नाही . त्याने स्वतःच्या सुरक्षितेसाठी या चुकीच्या पाऊल उचलून परमेश्वराला गमावले.त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या जीवनामध्ये आजारे , संकटे , समस्या येतात तेव्हा आपण लोकांचे जास्त ऐकतो . लोक जे आपल्या सांगतात तेच आपण करतो . कुणी सांगितलं की मांत्त्रिकाकडे जा, बाबाकडे जा , धागेदोरे कर आणि त्याप्रमाणे आपण करतो आणि अशा गोष्टीने आपण परमेश्वर संबंध मन दुखवतो , परमेश्वराविरुद्ध वागतो त्याच्या आज्ञा मोडतो . या चुकीच्या गोष्टीने आपण परमेश्वराला गमावून बसतो .
क) देवावर प्रेम करणारी व्यक्ती कशी वागते ?
1) नकाब (duplicate ) :-
आज मनुष्य मंदिरांमध्ये धार्मिक जीवन जगतो, प्रार्थनेत जीवन जगतो , देवाच्या आज्ञा मानतो परंतु तीच व्यक्ति जेव्हा मंदिराच्या बाहेर येते तेव्हा ते हाणामार्या करते शिव्याशाप देते उचापती , निंदा करते , नावे ठेवते. दुपलिकेट जीवन जगतात बाहेर एक आणि आत एक जीवन जगतात.
मी जो आहे तो आहे. मी घरी जसा आहे तसा मी माझ्या कामात आहे . मी जसं मंदिरात आहे तसा मी समाजात आहे . माझ्यामध्ये कुठलेही बदल नाही जो मी आहे तो मी आहे .
2) खोटी उपासना :-
परमेश्वर म्हणतो मी आत्मा आहे आणि माझ्या उपासकांनी खरेपणाने व आत्मने उपासना करावी परंतु आज मनुष्य खोटी उपासना करतो . आज मनुष्य लबाड्या करतो , चोऱ्या करतो , खोटे बोलतो , शिव्याशाप देतो . या सर्व गोष्टी करून परमेश्वराला म्हणतो , हे परमेश्वरा मी तुझ्यावर प्रेम करतो , परमेश्वर पण म्हणतो हो तू माझ्यावर प्रेम करतो पण तुझं प्रेम हे सध्याचं मोबाईल झाला आहे , तुझं प्रेम हे इंटरनेट झाला आहे , तुझं प्रेम हे व्हाट्सअप झाला आहे , तुझं प्रेम हे फेसबुक झाला आहे . या गोष्टीवर जास्त वेळ देतो . तासन्तास या वर चॅटिंग करतो , त्यामुळे तो प्रार्थना करण्यास वेळ देत नाही , वचन वाचत नाही . या सर्व गोष्टी करून मनुष्य आपला नाश करून घेतो . म्हणून आपण सांभाळले पाहिजे गरजेपुरते आपण वापर केला पाहिजे आणि आपण वचनामध्ये , प्रार्थनेमध्ये , देवाच्या सभागीतेमध्ये वाढलो पाहिजे .
No comments:
Post a Comment