Tuesday, 8 March 2022

रक्तस्रावी स्त्री (मराठी )

 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री

 

 1) सर्व प्रथम येशूसाठी टाळी. अद्भुत घटना 12 वर्षा पासून रक्तस्रावाचा आजार एका महिला साठी. 

2) आणि रक्त कोणत्याही मनूष्यासाठी तो पुरुष असेल , या स्त्री त्यांच्या साठी ताकत आहे . जर शरीरात रक्त नसेल तर मनुष्य मरतो .

3) परंतु या स्त्रीला 12 वर्षा पासून रक्तस्रावाचा आजार होता .

4)  तिन्ही ही पुस्तकात असे लिहिले नहीं आणि वाचायला मिळत नाही आणि भेटणार पण नाही , मी पण वाचले नहीं आणि तुम्हाला पण मिळणार नाही की  ,

5) ती दुष्ट आत्म्याची शिकार होती , कोणत्या तरी जादूटोणा ची शिकार होती , श्राप ची शिकार होती , पापाची शिकार होती , असे काही वाचायला भेटत नाही .

6) परंतु ती आपल्या आजारापासून लपून राहिली . परंतु जेव्हा आपण वाचतो या स्त्रीच्या आजाराचे कारण काय आहे ? 


कारण लिहिले नाही .


              याकोब 1:13‭-‬15 


कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहात घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही; तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्‍व झाल्यावर मरणास उपजवते.


1) पापा चे वेतन मरण आहे , दुसऱ्या शब्दांमध्ये मनुष्य आजारी पडतो , पापामुळे . त्यामुळे तीच्या बाबतीत हे घडले .

2) आणि येशू पासून दूर आहे ही स्त्री . ही स्त्री यहुदी असू शकते

3) त्या कारणाने कोणा जवळ , आसपास दिसत नव्हती ,  कारण तिला परवानगी नव्हती .


 1) तिला स्वतःला पण माहित होते , त्या कारणाने तिने कोणालाही शिवली नाही . 

 2) परंतु तीने येशूच्या कपड्याला शिवणे , हे तिने पसंत केले . 

 3) तिला भीती होती की , मी कोणालाही शिवले  तर लोकांना माझा आजार कळेल ,

 4) ते लोक मला दगडांनी मारतील , मला वाईट बोलतील म्हणून तिने , फक्त येशूच्या कपड्याला शिवली .

 5) अशा परिस्थिती ती येशु जवळ येते . काय काय घडले आणि आपण यातून काय शिकलो , मी तुला सांगतो . 

6) परंतु जितके प्रिचर आहे त्यांना मी सांगू इच्छितो की , त्या स्त्री ने स्पर्श केला म्हणून तुम्ही पण स्पर्श करा . 

7) तुम्ही प्रिच करा , परंतु सिद्धांत करू नका की , त्या स्त्रीने स्पर्श केला म्हणून , तुम्ही पण स्पर्श करा 

 8) त्या स्त्रीची मजबुरी होती , तशी तुमची मजबुरी नाही .


 तुम्हाला कोणाच्या कपड्याला शिवण्याची गरज नाही , तुम्हाला सरळ परमेश्वराला कडे यायचे आहे .

का ? 

ज्या दिवसापासून आपण येशुवर विश्वास ठेवतो त्या दिवसापासून आपण येशूचे मुले व मुली बनतो .


                    योहान 1:12 


परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्‍यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला;


                रोमकरांस पत्र 8:14‭-‬15 


कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.



1) या स्त्रीने कपड्याला शिवली , म्हणून तुम्ही पण तसे करा. मी प्रभूचा दास आहे , मी कपडा ठेवतो , त्याला शिवले पाहिजे

2) हे सिद्धांत बनवू नका आणि अशा गोष्टी पवित्र आत्मा काम करत नाही , विशेष ख्रिस्ती लोकांमध्ये .

3) ही गोष्ट वेगळी आहे की अविश्वासणाऱ्याना आरोग्य देणे आणि पुन्हा जगात सोडणे ,

 4) परमेश्वराला तेव्हा पण मर्जी नव्हती , आज पण नाही आणि उद्या पण राहणार नाही .

5) तर त्यांचे मन बदलणे , पापापासून परावृत्त करणे , त्याचे जीवन वाचवणे . हा परमेश्वराचा उद्देश आहे

6) तर आजचे प्रिचर म्हणतात की महा सभा , आशीर्वाद सभा , मिरॅकल सभा , आरोग्य सभा , यामध्ये म्हणतात कि येशु तुम्हाला बरे करित आहे , ऑफकोर्स तो बरा करीतो .

7) परंतु बरे झाल्यानंतर पुन्हा दारू पिणे , पुन्हा गुटका खाणे ,  पुन्हा सिगरेट ओढणे , पुन्हा पापाचे जीवन जगणे , पुन्हा लिला , शीला मुन्नी बदनामचे हे जीवन ,

8) हे काम परमेश्वर करत नाही . येशूची इच्छा आहे की तुमचे जीवन बदलले पाहिजे , सर्वात प्रथम पापापासून परावृत्त झाले पाहिजे , नंतर पहा चमत्काराची लाईन लागते .

 


 येथे दोन गोष्टी झाल्या :-


                         मत्तय 9:21 

कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन.”


                    मार्क 5:27 

   येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली.


              रोमकरांस पत्र 10:17 

ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते.


                     


 1) येशू सारखा या येशू सारखा चमत्कार करणारा त्या काळात , आज पण आणि पुढे पण होणार नाही आणि कधी होणार पण नाही

2) येशूने मिराकल केला , येशू स्वतः म्हणाचा शांत रहा

3) आंधळा पाहू लागला , शांत रहा

4) मेलेला उठला , शांत रहा

5) कुष्ठ रोगी बरा झाला , शांत रहा

6) असे शांत करावे लागत होते



 येशू त्या काळात इतका फेमस झाला होता की ,


 1)  रस्त्यावर चालत असताना , येशूची चर्चा

 2) झाडाखाली बसले असताना , येशूची चर्च

 3) रुद्ध लोक आपस मध्ये बोलत असताना , येशुची चर्चा

 4) मेंढपाळा मध्ये , येशूची चर्चा

 5) ज्यांचे 2000 डुक्कर मेले त्यांना विचारले , तर येशू की चर्चा 

6) मंदिरामध्ये याजक , परुशी यांच्यात कोणाची चर्चा , तर येशूची चर्चा

 7) राजा हिरोदोस कोणाची चर्चा तर , यीशू ची चर्चा ,

 8) पिलोत कोणाची चर्चा , येशू ची चर्चा ऐकली - - (2)


 जी अशी चर्चा अशक्य गोष्ट शक्य झाली - - -(2)


 1) या स्त्रीने आपल्या मनात म्हटले की , या येशु जवळ जाईल 

 2) त्याच्या कपड्याला शिवण्याची संधी मला भेटली पाहिजे

 3) ती सरपटत  , रगडत , घासत , अशी-तशी फक्त कपड्याला शिवली तरी मी बरी होईल


अ) चर्चा तिने येशूची ऐकली , ती पेत्रा जवळ गेली नाही

 ब) चर्चा येशूची ऐकली तर ती , योहान जवळ गेली नाही

 क) याकोब जवळ गेली नाही

 ड) फिलिप जवळ गेली नाही

 इ) कोणत्याही सेवकाजवळ ती गेली नाही


 ती डायरेक्ट येशु जवळ गेली .


 जेव्हा आपल्याला प्रिचर कोणाच्या बाबतीत काही सांगतो


1)  तर आपल्या मनात हे का म्हणतो की , मी पास्टर जवळ जाणार

2) पास्टरचा हात , आपल्या डोक्यावर ठेवणार

3) पास्टरच्या कपड्याला शिवणार

4) पास्टर जी प्रार्थना करतो , तेल-पाणी त्याच्यावर विश्वास ठेवणार


 येशूवर विश्वास का करत नाही ?


 1) विश्वास ख्रिस्ताच्या वचनाने येतो , प्रिचर कडून नाही

 2) तर या स्त्रीने स्वतः च्या मनात , स्वतः म्हणते की

 3) मला येशूच्या कपड्याला शिवायचे आहे

 4) त्या कारणाने तिच्या जीवनात हा चमत्कार झाला


प्रश्न हा आहे, 


 आपण कोणाकडे जातो ?


 1) आम्ही चर्चा ऐकली येशूची आणि जातो सेवकाकडे

 2)  आम्ही चर्चा ऐकली येशूची , चमत्काराची तुम्हाला असे वाटते की पास्टर चमत्कार करेल

 3) पास्टर कधीच चमत्कार करू शकत नाही

 4) कोणता ही मायके लाल , कोणत्याही शहराचा , अमेरिका , आफ्रिका , भारत , कोणताही पास्टर कधीच चमत्कार करू शकत नाही

 5) हा येशू आहे , येशू शिवाय काहीच करू शकत नाही

       

                       योहान 15:5 

मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.



अ) आमचा विश्वास सेवकांवर का आहे ?

 ब) आमचा विश्वास पास्टरच्या हातावर का आहे ?

क) आमचा विश्वास पास्टरच्या सफेद कोटावर का आहे ?

ड) आमचा विश्वास त्या लोकांवर का आहे , जे तेल पाणी विकतात ?


 येशूची चर्चा ऐकली , येशूकडे या - - (2)


 या स्त्रीने येशूची चर्चा ऐकली आणि ती येशूकडे गेली , दुसऱ्या कोणाकडे गेली नाही


 तर आम्ही आज कोणाकडे जात आहोत ?


1) काही लोक म्हणतात या जागेवर चमत्कार आहे

2) ही मुर्खता आहे , हे नॉनसेन्स आहे जागा पाहून चमत्कार होत नाही 

3) तर चमत्कार परमेश्वर करतो , जागा कोणती ही असू द्या - - (2)

4) जागा कोणती ही असु द्या , चमत्कार प्रभू करतो - -- (2)


  चमत्कार परमेश्वर तेव्हा करतो , जेव्हा आपला विश्वास येशू वर असतो


1) काही लोक म्हणतात की , या स्त्रीने आपल्या मनात म्हटले , तुम्ही पण आपल्या मनात म्हणा

2) रिपीट रिपीट म्हणा ,  चमत्कार झाला आहे ,  चमत्कार झाला आहे , बोलत रहा , बोलत रहा , असे नही


                

                  1 योहान 5:13‭-‬15 

देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणार्‍या तुम्हांला सार्वकालिक जीवन लाभले आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी हे तुम्हांला लिहिले आहे. (आणि तुम्ही देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवीत राहावे). त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल; आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.




 काही वचन उचलून , सिद्धांत करतात


  म्हणतात की ,

1) बोलत रहा , बोलत रहा , बोलत रहा  , 

2) नोकरी भेटणार , नोकरी भेटणार  

3) ही मुर्खता आहे  , परमेश्वराचे काम करा , नोकरी मिळणार

   

                 मार्क 11:24 

म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल.



1) परंतु रिपीट , रिपीट बोलायला सांगितले नाही

2) म्हणून येशू म्हटला की अन्य जाती सारखे बडबड करू नका



अ) येशूची चर्चा ऐकली ,  तर येशूच्या मागे चला

ब) येशूचा संदेश ऐकला , तर येशूच्या मागे चला

क) येशू वर विश्वास केला , येशू कडूनच आशीर्वाद मिळण्याची आणि चमत्कार होण्याची अपेक्षा ठेवा

 ड) हड्डी मांस , माणसां कडून नाही







No comments:

Post a Comment