Thursday, 5 May 2022

येशूला आपले जीवन दिल्याने 10 फायदे ( मराठी )

 ★ येशूला आपले जीवन दिल्याने 10 फायदे



आज या विषया वर मी बोलणार आहे ,



मित्रांनो , कधी या विषयावर विचार केला होता का , की


1) ज्या येशूला मी स्वीकारले , मला 10 फायदे आहे , होय तुम्हाला 10 फायदे आहे 11 , 12, 15, 50 फायदे ते वेगळे आहे , परंतु मी तुमच्यासमोर 10 फायदे ठेवत आहे , ते काळजीपूर्वक ऐका


2) पूर्ण जगात ज्याला मनुष्याचा कॅटेगिरीत आणू शकतो , तुम्ही हिंदू आहात , परंतु मनुष्य आहात , तुम्ही मुस्लिम आहात , परंतु मनुष्य आहात, ईसाई आहात , परंतु मनुष्य आहात , यहुदी आहात ,  परंतु मनुष्य आहात , पारसी , जैन , आदिवासी आहात , परंतु मनुष्य आहात


तुम्ही कुठे राहतात ?



1) डोंगरावर , पहाडावर परंतु मनुष्य आहात , तुम्ही कुठे राहतात ? पाण्यामध्ये , परंतु मनुष्य आहात , तुम्ही कुठे राहतात ? शहरांमध्ये , जंगलांमध्ये , गावामध्ये , मोठ्या मोठ्या इमारती मध्ये , छोट्या झोपडी मध्ये , परंतु तुम्ही मनुष्य आहात

2) तर तुम्ही मनुष्य आहात तर आजचे वचन तुमच्यासाठी आहे



 काय तुम्ही लोक तयार आहात  ? - -(2)


1) तुम्ही कोणत्या धर्माचे आहात ?  याचे त्याच्याशी काही संबंध नाही आणि तुम्हाला असायला नाही पाहिजे , परंतु एक व्यक्ती या प्लॅनेट वर या ग्रहावर ज्याचे नाव आहे येशू आणि त्याचे 10 फायदे तुम्हाला देत आहे


2) आणि या पवित्र शास्त्र मधून , याला म्हणतात बायबल , याला म्हणतात वर्ड ऑफ गॉड , याला परमेश्वराकडून मानवजातीसाठी जे वचन पाठवले होते ना 2022 वर्षा पूर्वी येशूच्या द्वारा , ती वचने मी आज तुमच्या मध्ये ठेवत आहे



★ तुम्ही तयार आहात , चला मग सुरुवात करूया


1) आजचा SMS विश्वाणाऱ्यांसाठी आहेच आहे परंतु सर्वात जास्त अविश्वासणाऱ्यांसाठी , विधर्म्यासाठी , गैरमसीह साठी आहे

2) त्यात हिंदू , मुस्लिम , सिख , ईसाई , पारसी , यहुदी , जैन , आदिवासी या सर्वांसाठी आहे


★ येशूला आपले जीवन दिल्याने 10 फायदे :


फायदा नं - 1


1) तो (येशू ) आपल्यासाठी मध्यस्थ बनतो :-


जर आपण आपले जीवन येशूला दिले तर तो आपल्यासाठी मध्यस्थ बनतो , मध्यस्थ याचा इंग्लिश शब्द आहे मिडीतर


                 1 तीमथ्य 2:5 


कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.



1) परमेश्वर एकच आहे - -(2) सर्व मार्ग एकच मार्ग होऊ शकत नाही , सर्व मार्ग एकाच ठिकाणी जातात , हे टोटल चुकीचे आहे , हे सैताना कडून आहे


2) हे एवढे चुकीचे आहे की बापाच्या जागेवर काकाला बाप करून पाहा , नाही होऊ शकत


3) एकच मध्यस्थ आहे 2-4-6 नाही , एकच मध्यस्थ आहे , येशु मनुष्य बनून या पृथ्वीवर आला , का ?


4) कारण परमेश्वराकडे माझ्यासाठी आणि तुमचा साठी वकीली कोण करेल ? मध्यस्त कोण करेल ? माझ्यासाठी तुमच्यासाठी , आमच्या पापा साठी , त्यासाठी एक मध्यस्थ पाहिजे


5) जो परमेश्वर उभा राहील , तो म्हणेल कि तू पाप केले होते , परंतु त्याच्या बदल्यात मी मनुष्य झालो


6) माझ्या जागेवर मनुष्य झाला आणि मावव जातीसाठी मध्यस्थी झाला



उदा .

वकील और आरोपी


1) न्यायधीश त्याला सोडून देईल अथवा त्याला शिक्षा देईल , मध्यस्थी करण्यासाठी वकील पाहिजे


 2) न्यायाधीश (जज) कोण आहे ? सृष्टी निर्माता परमेश्वर आहे , 

वकील कोण आहे ? येशु , मानवजातीसाठी परमेश्वर आहे

आरोपी कोण आहे ?  मी आणि तुम्ही


3) परंतु तुम्ही गुन्हेगार होते , आपण गुन्हेगार होतो , मी होतो , तुम्ही आहात , नाहीतर दुसरे कोणीतरी होतो


4) परंतु मधे आत्मा आहे, ईसा मसीह ज्याला मुस्लिम ईसा अली सलाम म्हणतात , ज्याला हिंदू ईसा मसीह म्हणतात , ज्याला यहूदी यस्तुस म्हणतात किंवा येशूआ , ज्याला अमेरिका जीजस क्राईस्ट म्हणतात आणि हिंदी वाले त्याला यीशु मशीहा म्हणतात


5) येशू मानव जातीसाठी मनुष्य बनला आणि मानव जातीसाठी मनुष्य बनून आला या पृथ्वी वर मध्यस्थी करण्यासाठी


6) हा आहे आमचा फायदा नंबर -1 जर आम्ही येशूला स्वीकारतो तर तो आमच्यासाठी मध्यस्थ बनतो


फायदा नं -2



2) तो (येशु) आमचा महायाजक बनतो :-



का ? कारण ,


1) ती किंमत तुम्ही देऊ शकत नाही , परमेश्वराला जी किंमत पाहिजे ना , ती अमेरिकेचा डॉलर ने तुमचे पापक्षमा होणार नाही , भारताची 2000 ची नोट त्याने तुमची पापक्षमा होणार नाही , कोरांना व्हायरस , व्हाक्सीन आली , त्याने तुमची पापक्षमा होणार नाही


2) तर कोणतेही केमिकल , कोणतीही ऍसिड , कोणत्याही प्रकारचे टॅबलेट , कॅप्सूल , इंजेक्शन ने आमच्या पापांची क्षमा होणार नाही


3) तो एक व्यक्ती पाहिजे होता , महायाजकाच्या रूपामध्ये त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात हाय-प्रीस्ट , पुजारी , तुमच्या लोकांच्या भाषेमध्ये , पंडित , तुमच्या लोकांच्या भाषेमध्ये , मौलाना , तुमच्या लोकांच्या भाषेमध्ये


4) मानव जातीकडून परमेश्वराकडे , त्या ईश्वराकडे , त्या खुदा कडे ,ज्याला हिंदू लोक भगवान म्हणतात , त्याला आम्ही परमेश्वर म्हणतो , ऍलोहिम , आलमटी गॉड , याच्याकडे आम्ही इशारा करत होतो


5) तर मध्यथी करण्यासाठी मानव जाती साठी आम्ही  पुजारीला , मौलानाला , पंडितला , फादरी ला , पास्टरला यांना मध्यस्थ करत होतो , याप्रकारे तुम्हाला समजून सांगण्यासाठी या शब्दाचा मी वापर करत आहे


6)  यासाठी महायाजक झाला , याला म्हणतात हाय प्रीस्ट , याला म्हणतात महायाजक


कसे ? आणि का ?



                     इब्री 9:12 


आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली.



                   इब्री 10:21 


आणि आपल्याकरता ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे;

                 इब्रानियों 10:21 

और इसलिये कि हमारा ऐसा महान याजक है, जो परमेश्वर के घर का अधिकारी है।



 तुम्हाला , मला याची गरज आहे -  (2)


1) येशूला जीवन दिल्याने , आम्हाला असा महायाजक मिळतो  ,ज्यादिवशी येशूला आम्ही स्वीकारतो


2) आम्ही फक्त येशुला स्वीकारले आहे ,धर्म कोणताही असू द्या , त्याच्याशी काही संबंध नाही


3) तुमचे नाव संतोष आहे , रेश्मा आहे , सलीम आहे , किंवा सुनिता आहे , त्याने काही फरक पडत नाही , तुम्ही सर्व मनुष्य आहात


4) हा महायाजक अधिकारी आहे , जर परमेश्वराच्या घराचा अधिकारी येशू आहे , तर तो आमच्यासाठी काही करू शकत नाही का ?


5) आमच्या साठी मध्यस्ती बनवून , महायाजक बनून आमच्या साठी उभा राहील आणि म्हणतो की , हा माझा मुलगा आहे , ही माझी मुलगी आहे



फायदा नं 3



3) तो (येशु) आमच्या पापांची क्षमा करतो :-



 आमच्या पापांची क्षमा यासाठी करील की त्याने किंमत दिली आहे



 का ?


                   कलस्सै 2:13 


जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;




 येशू आमच्या पापांची क्षमा करतो


का ? कारण त्याला आम्ही स्वीकारले आहे



1) कधी कोणी म्हटले का , तुम्ही माझ्याकडे या , मी तुमच्या पापांची क्षमा करीन ,येशू ला सोडून , काढून दाखवा


2)  कोणता  ईश्वर , कोणता देवता , किंवा कोणता पक्षी, प्राणी, चंद्र , सूर्य , गॅलक्सी , पृथ्वी वरील कोणतीही वस्तू , कधी मनुष्याला म्हटली ,  की माझ्यावर विश्वास करा , मी तुमच्या पापांची क्षमा करीन ?


3) येशू म्हणतो माझावर विश्वास करा , मी तुमच्या पापांची क्षमा करीन , हा फायदा मी तुम्हाला का , नही सांगू ?


4) तुम्हाला अशा अपराधाची क्षमा मिळेल , तुम्हाला आशा पापापासून सुटकारा मिळेल , ज्याला या पृथ्वीवर कोणीच करू शकत नाही 



                कलस्सै 2:14‭-‬15


आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.


1) आमच्यावर जे श्राप होते , जे बंधन होते , येशु म्हणतो , ते मी मुक्त केले आहे , त्याने आमच्या पापांची क्षमा केली आहे .


2) असा फायदा कोण देऊ शकतो ? कोण करू शकतो ? जर मी तुम्हाला क्षमा केली आहे , तर दुसरा -तिसरा-चौथा तुमच्यावर आरोप करू शकत नाही


3) मी ख्रिश्चन ची गोष्ट बोलत नाही , तुम्ही सफेद कपडे घाला , मी ती गोष्ट बोलत नाही , बहिणीनी कानात सोने घालू नका , मी ती गोष्ट बोलत नाही


4) तुम्ही तुमचे कल्चर चेंज करा , मी ती गोष्ट बोलत नाही , तुम्ही तुमचे खाणे पिणे चेंज करा ,  मी ती गोष्ट बोलत नाही


5) मी बोलत आहे , आपल्या जीवन परिवर्तन संबंधी , येशू धर्म परिवर्तन करण्यासाठी आला नाही , तर जीवन परिवर्तन करण्यासाठी आला आहे



फायदा नं - 4



4) तो (येशु) आमच्या मध्ये वास करतो :-



1) कधी कोणी असे म्हटले ? या पृथ्वीवर कोणत्या ईश्वर ने  , कोणत्या देवताने म्हटले , पृथ्वीवरील कोणती वस्तूने म्हटले कि , मी तुमच्या मध्ये वास करेल , मी तुमच्यामध्ये राहील ?


 2) परंतु या राजांचा राजा प्रभूने म्हटले आहे , मी तुमच्या मध्ये वास करील , तुमच्या मध्ये राहील , हे रहस्य आहे , हे खूप मोठे रहस्य आहे , हे मनुष्य समजू शकणार नाही


 3) कारण मनुष्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट टाकून ठेवले आहेत , जोपर्यंत तपस्या करणार नाही , जोपर्यंत नारळ, फुल, अगरबत्ती, उदबत्ती असे काही करणार नाही , तुमच्याकडून काही करणार नाही , वर बसलेला ईश्वर , खुदा तुम्ही  म्हणतात ना , तो पर्यंत तो खूश होणार नाही


 4) परंतु हे रहस्य आहे , एवढे मोठे की येशू म्हणतो , हे काही करण्याची गरज नाही


5) कारण की आमची लायकी , पात्रता नव्हती , आम्ही पापामध्ये होतो , तर आम्ही पाप केले आहे , आमच्यामध्ये कोणी वकील नव्हता , येशू म्हणतो , मी झालो ऍडव्होकेट तुमचा , आमच्या साठी कोणी हाय प्रीस्ट नव्हता , येशु म्हणतो , मी झालो तुमच्यासाठी हाय प्रीस्ट , आणि म्हणतो मी तुमच्या मध्ये वास करेल , तुमच्या राहील , हे रहस्य आहे



                       कलस्सै 1:27 


ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे.


1) याचा अर्थ आहे , हे रहस्य होते , हे परमेश्वराने ठेवले होते , त्याची किंमत आम्ही ओळखले नाही , की गौरवाचे मूल्य काय आहे ? आम्हाला समजले नाही


2) काही लोक ख्रिस्ती तर बनले , बायबल वाचत आहे , चर्चला पण जात आहे , परंतु त्यांना हे समजत नाही कि , परमेश्वर चार विटाच्या भिंती मध्ये राहत नाही , तो लाकडाचा घरात राहत नाही , तो कोणत्या फादरीच्या घरी राहत नाही , जिथे बायबल ठेवले जाते , तिथे तो राहत नाही , परंतु तो तुमच्या मध्ये राहतो


3) यासाठी लिहिले आहे की , तो तुमचा मध्ये राहतो , असा फायदा कोण देऊ शकतो ? कोण सांगू शकतो ?


4) सकाळी उठून त्या मूर्ती समोर तूम्ही झुकतात ,  हातामध्ये ताट सजवून , त्याच्या जवळ जातात ,आणि लाकडे , दगड , प्लास्टिक च्या समोर तुम्ही झुकतात , तो तिथे नाही , तर तो आमच्या-तुमच्या मध्ये आहे , आणि त्याचे नाव आहे येशू


5) आपण कोठे शोधत आहोत ? ज्याला शोधले गल्ली गल्ली मध्ये , आम्ही कोठे शोधत आहोत ? हे डोंगर ते डोंगर , हा पहाड तो पहाड , आपण कोठे शोधत आहोत ? ही नदी ती नदी ,  आपण कोठे शोधत आहोत ? हे झाड , ते झाड , त्यासाठी काय काय केले , परंतु परमेश्वर म्हणतो , मी तुझा मध्ये आहे


 6) हे लिहिले आहे ना हे रहस्य आहे , हे भेद आहे , हे मनुष्य समजू शकत नाही , जे बायबलवाले लोक आहेत , त्यांना पण समजत नाही


 7) यांना पण समजत नाही , जे संडे तू संडे चर्च जातात ,  म्हणतात तेथे आम्हाला चर्च मध्ये परमेश्वर भेटेल , स्वतः येशू म्हणतो मी तुमच्या मध्ये आहे , माझ्या मुला- मुली



 ★ याचा अर्थ काय आहे ? चर्च ला जायचे नाही का ? जरूर जायचे आहे , परंतु परमेश्वराला शोधायला जाऊ नका , कारण परमेश्वर तुमच्या मध्ये आहे


1) कोणत्या दिवसापासून आला ? त्याच दिवशी आला ज्या दिवशी तुम्ही प्रभूला आपले जीवन दिले , तो तुमच्या मध्ये आला


2) मला हे प्रूफ करून दाखवा की , येशु चर्च मध्ये राहतो ,  तुमच्या मध्ये नाही राहत


 3) अनेक लोकांनी आपल्याला मूर्ख बनवले की , येथे भेटेल खुदा , येथे भेटेल ईश्वर , येथे भेटेल अल्लाह , येथे भेटेल देवता/ देवती , येशू म्हणतो , मी तुमच्या मध्ये राहतो


  4) आम्ही डोंगरावर , पहाडावर चढतो वर्षातून एकदा , आम्ही तीर्थयात्रा करतो वर्षातून एकदा , मोठ्या आनंदाने जातो , खूप पैसे खर्च करतो


5) काय-काय प्राप्त करण्यासाठी ? आमचे घर चांगले रहावे , आमचे मुले चांगले रहावे ,  पती - पत्नी , आमचा बिजनेस , आमची नोकरी , आमचे हे, आमचे ते , आमचे अलाना , आमचे फलाना , याच उद्देशाने आम्ही जाता ना


 6) जिथे आम्ही पहाडावर , डोंगरावर चढता ना  , वर्षातून एकदा , येशू म्हणतो , मी जो परमेश्वर आहे , सर्व काही निर्माण केले , मी तुमच्या मध्ये राहण्याची इच्छा करतो 


7) एवढि साधारण गोष्ट समजू शकत नाही , तर आमच्यापेक्षा मोठे मूर्ख कोण असू शकतो ?



परमेश्वर जेरुसलेम मध्ये नाही , जे लोक होली ट्रिप काढतात ना



उदा .

मेरी मथलिन - स्वर्गदूत 

जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करतात ?



1) आम्ही जातो तीर्थयात्रा , येरुशलेम मध्ये , वर्षातून एकदा , लाखो पैसे खर्च करून


2) आपल्या फॅमिली आणि चर्च बरोबर जाऊन बोलतात , मला येथे वेगळा अनुभव येत आहे , मला अद्भुत अनुभव होत आहे


3) माझा प्रश्न आहे ? तुम्ही महाराष्ट्रामध्ये होता ,  तेव्हा तुम्हाला कोणाचा अनुभव येत होता ? दुष्ट आत्म्याचा 


 4) परमेश्वर यरुशलेममध्ये त्यांच्यासाठी आहे , आपण महाराष्ट्र मध्ये आहोत , तर तो आपल्यासाठी येथे आहे



★  प्रभू येशू ख्रिस्त सर्वांमध्ये आहे का ?



उत्तर आहे ,  होय  



1) लहान मुलांमध्ये आहे , उत्तर आहे , होय , 80 वर्षाचा वृद्धा मध्ये आहे ? 8 वर्षाच्या मुलांमध्ये सर्वांमध्ये आहे ? उत्तर आहे , होय , पुरुषांमध्ये आहे ? होय , महिलांमध्ये आहे ? होय ,


 2) काही लोक म्हणतात , की येशू ख्रिस्त पास्टर मध्ये जास्त असतो , कोणी सांगितले ? मूर्ख बनवले , बिशप मध्ये जास्त राहतो , कोणी सांगितले ? मूर्ख बनवले आम्हाला , रेव्हरंट , अपोस्टल , प्रॉफिट मध्ये सर्व जास्त राहतो , कोणी सांगितले ? मूर्ख बनवण्यात आले आम्हाला


 3) येशू ख्रिस्त पक्षपात करत नाही , आम्ही कसें मुर्ख बनतो , छोट्या छोट्या गोष्टी मध्ये ? येशू सर्वांमध्ये आहे , जी ताकत त्यांच्यामध्ये आहे , तीच ताकत तुमच्या मध्ये पण आहे , जीतका येशु तेथे आहे , तितकाच येशु आमच्या मध्ये आहे


 4) फक्त फरक एवढा आहे की , त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे आणि तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी आहे , हे का म्हणतात की , त्याच्यामध्ये जास्त आहे , आमच्यामध्ये कमी आहे , तुम्हाला कोणी सांगितले ?



फायदा नं -5



5) तो आपल्याला त्याचा राजदूत बनवतो :-



 या पृथ्वीवर आम्ही येशूचे राजदूत आहोत , आम्ही त्याचे अंबेस्टर आहात , कुठे लिहिले आहे ?



                   2 कुरिन्थियों 5:20


सो हम मसीह के राजदूत हैं; मानो परमेश्वर हमारे द्वारा समझाता है: हम मसीह की ओर से निवेदन करते हैं, कि परमेश्वर के साथ मेल मिलाप कर लो।


                   2 करिंथ 5:20 


म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.



1)आम्ही- असे नाही लिहिले की बिशप राजदूत आहे , असे नाही लिहिले की , अपोस्टल राजदुत आहे , प्रॉफिट राजदूत आहे , पास्टर राजदूत आहे , नाही , आम्ही सर्व राजदूत आहोत


2) आम्ही येशूचे राजदूत बनू शकतो



★ राजदूत चे काम काय आहे ? - -(2)


 1) जो सुप्रीम आहेत , जो प्रेसिडेंट आहे , हाय प्रीस्ट आहे , जो महान आहे , त्याचा हुकूम , संदेश , आदेश लोकांपर्यंत पोहोचवणे , त्याच्या बदल्यात त्याला जे काही काम करायचे आहे , ते काम आम्हाला करायचे आहे


2) फक्त तो आमचा मध्यस्त नाही बनला ,  तो फक्त महायाजक नाही बनला , त्याने फक्त पापक्षमा नाही केली , तो आमच्या मध्ये फक्त आला नाही , परंतु तो तुम्हाला एक नोकरी देत आहे , या पृथ्वीवर


3) तो म्हणतो , जसे मी काम करू इच्छितो , तसे तुम्ही पण काम करा , पुरुष असो या महिला असो , 8 वर्षाचा मुलगा , 80 वर्षाचा रुद्ध , आम्ही सर्व जण येशूचे काम करू शकतो

 

4) आणि यासाठी लिहिले आहे की तुम्ही राजदूत आहात , काय ताकत , काय सामर्थ्याच्या जोरावर या पृथ्वीवर आम्हाला राजदूत बनून ठेवले आहे


फायदा नं 6



6) तो आम्हाला सैतानावर अधिकार देतो :-



1) का ? आम्ही राजदूत आहे ना , का ? परमेश्वर आमच्या मध्ये राहतो , का ? आमच्या पापांची क्षमा झाली आहे


2)  का ? तो आमचा हाय प्रिस्ट झाला आहे , का ? कारण , तो आमचा मध्यस्त झाला आहे


3) तो म्हणतो , मी तुम्हाला पृथ्वीवर ठेवले आहे , सैतानावर अधिकार देऊन



                       लूका 10:19 


देखो, मैने तुम्हे सांपों और बिच्छुओं को रौंदने का, और शत्रु की सारी सामर्थ पर अधिकार दिया है; और किसी वस्तु से तुम्हें कुछ हानि न होगी।


                  लूक 10:19 


पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही.





येशूला स्वीकारल्याने तुम्हाला काय मिळाले आहे ?


 फायदा नं 6 ,


 1) फायदा नंबर 6 ख्रिश्चन बनवून नाही , फायदा नंबर 6 आमचे नाव ख्रिशन ठेवल्याने नाही , फायदा नंबर 6 घरामध्ये बायबल आणल्याने नाही


 2) फायदा नंबर 6 आमचे नाव चर्चमध्ये रजिस्टर केल्याने नाही , फायदा नंबर 6 आम्ही ऑफरिंग दिल्याने नाही , फायदा नंबर 6 आपले जीवन येशूला दिल्याने , हा आहे फायदा नंबर 6



 याचा अर्थ काय आहे ? मला सैतानाची भीती वाटणार नाही ? नाही


1) मी रात्री कब्रस्तान च्या जवळून जात असताना माझ्यावर कोणती देवी किंवा भूत हे  माझ्यावर हल्ला करणार नाही का ? उत्तर आहे , नाही करणार


2) का ? कारण आत्ताच वाचले ना , सैतानावर अधिकार दिला आहे


3) तर दुष्ट आत्म्याला पण माहीत आहे हा माणूस कोण आहे ? दुष्ट आत्म्याला पण माहित आहे की , ही व्यक्ती ती आहे , ज्याने आपले जीवन येशूला दिले आहे


4) याचे प्रूप काय आहे ? आणि ते आहे परमेश्वराचे वचन , त्याच्यावर तुम्हाला विश्वास करायचा आहे , ही खरी सत्यता आहे , हेच आहे परमेश्वराचे वचन



★ या वस्तू (बाधणार ) काय आहे ?


तुमच्या मधले भरपूर लोक,  खास करून या दिवसात घाबरलेले आहेत


1) तूमची भीती काय आहे ? माहित आहे , वास्तुशास्त्र . तूमची भीती काय आहे ? माहित आहे , सुपरस्टिशन गोष्टी . तूमची भीती काय आहे ? माहित आहे , काळी मांजर . तूमची भीती काय आहे ? काळा कावळा . तूमची भीती काय आहे ? माहित आहे , रात्री कुत्र्यांचे भुंकणे .


 2) तुम्हाला माहित आहे , जर कोणी मला नजर लावली , तर मला पण नजर लागेल , जर मला कोणी विचारले की , मी माझा पाय डावा ठेऊ का उजवा , जर मी जर विचारले की लग्न कोणत्या तारखेला व किती वाजता आहे , या भीती मध्ये आम्ही जगत आहात


3) आणि या पृथ्वीवर येशू म्हणतो , मी तुम्हाला अधिकार दिला आहे ,  कोणत्याही प्रकारच्या वस्तू पासून हानी होणार नाही


काही लोक म्हणतात की ,


1) गाडी नवीन विकत घेतली आहे , तर तिच्याखाली लिंबू, काळी , लाल , मिरची आणि काळा कोळसा लावा


 2) हे लावल्याने अपघात का झाले ? जर लिंबू वाचू शकतो तर सर्व जगामध्ये लिंबाचे झाड लावले पाहिजे , जर मिरची वाचू शकते , तर तुमच्या घराच्या चारही दिशेने मिरचीचे झाडे लावली पाहिजे


3) जर आम्हाला एवढी भीती वाटते , तर तुमचे घर कोळशाचे घर केले पाहिजे


4) रात्री घाबरतो , तूमच्या शरीरावर दुनियाचे सर्व तावीज , आमच्या गळ्यामध्ये दुनियाचे सर्व दोरे , धागे , तर कुणी हा सल्ला दिला , तर कोणी तो सल्ला दिला


 5) हे घाला म्हणजे चांगले होईल , ही अंगठी घाला हे चांगले होईल , निळ्या रंगाचा पत्ता आमच्यासाठी शुभ आहे , तर सर्व निळे , निळे , निळे


 6) कदाचित आम्हाला हे माहीत नाही , येशू ख्रिस्त प्रत्येक रंगाचा दगडाचा , खडकांचा प्रतीक आहे , येशू स्वतः दगडाचा , खडकाचा प्रतीक आहे


 7) जर तुमच्या जवळ येशु आहे तर , कोणत्याही वस्तू पासून तुम्हाला काही हानी होणार नाही , काळ्या मांजराची काय औकात आहे ? जर येशू तुमच्यामध्ये आहे , तर काळ्या मांजराची काय औकात आहे ?



 काही लोक म्हणतात की ,


 1) कलकत्त्याची जादू , आफ्रिकाचे जादू खूप जास्त स्ट्रॉंग असते , माझ्यावर हबी होईल


 2) कलकत्ता , आफ्रिका ची काय गोष्ट बोलतात ? येशु पूर्ण जगाचा बाप आहे


3) जर आमच्यामध्ये येशु आहे , तर आम्हाला कोणत्या गोष्टीची भीती कशाला ? जेव्हा येशु आमच्यामध्ये असतो , तेव्हा आम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटण्याची गरज नाही


4) हा फायदा आपल्याला पाहिजे असेल , तर येशूचा स्वीकार करा



फायदा नं 7



7) तो (येशू) तुम्हाला सर्व आशीर्वाद देतो :-



               इफिसकरांस पत्र 1:3


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;




 ऑलरेडी सर्व आशीर्वाद दिले आहे



1) माफ करा या शब्दाचा वापर करत आहे , हात घेऊन भीक मागण्याची गरज नाही ,चर्चच्या फादरी समोर उभा राहण्याची , नाही ,  गरज नाही


 2) तुमचा माथा घेऊन फादरी साहेब प्रार्थना करा , पास्टर साहेब प्रार्थना करा , जर येशू आमच्या मध्ये आहे , तर खबरदार आपला माथा घेऊन कोणत्याही सेवकाकडे जाऊ नये , माझ्यासाठी प्रार्थना करा , त्यांना आम्ही अफ़ाईज बनवत आहे

 

3) आम्हाला स्वतःला माहित नाही आमच्यामध्ये ताकद काय आहे ? आम्हाला स्वतःला माहित नाही , यांच्या कडून प्रार्थना का करून घेतात , जे रात्री येतात ऑनलाइन तुमच्यासाठी प्रार्थना करेल , तुम्ही आपले निवेदन विनंती प्रार्थना आम्हाला पाठवा


4) मी तुम्हाला सांगू , यामागे त्यांचा  उद्देश असतो , यांचे दुकान चालले  पाहिजे - - (2) यांना पैसे कुठून येणार ? यांना फॉलो कोण करणार ?


 तुम्ही ज्या बहिणी आहेत ना , त्या  फार लवकर भाऊक होतात


 1) तुमचे पती फार त्रास मध्ये आहे , तुम्ही भाऊक होतात , तुमची मुले त्रासांमध्ये आहे , तुम्ही भाऊक होतात , तुमच्या घराचे कर्ज वाढले आहे , तुम्ही भावूक होतात


2) अशा भावनेचा , इमोशन चा असे लोक फायदा उचलतात , आणि हे सांगत नाही की वर बसलेला एक परमेश्वर आहे , तुम्ही त्याच्या जवळ प्रार्थना करा , तुमच्या मध्ये असणारा परमेश्वर , त्याच्या जवळ प्रार्थना करा


3) हे का सांगत नाही ? सर्व आशीर्वाद आलरेडी तुम्हाला दिले आहे , आम्हाला काय पाहिजे ? सर्व दिले आहे



 तर पास्टर मला का भेटत नाही ?


 1) हा तुम्हाला विचार करायचा आहे , तुमचे जीवन कसे आहे ? तुम्हाला माहिती करायची आहे , तुम्हाला शेपूट नाही , तर मस्तक केले आहे , येशूने सर्व आशीर्वाद दिले आहे


2) तुम्ही आशीर्वादाच्या लाईन मध्ये का उभा आहात ? तुम्ही चर्चाच्या दुकानाच्या लाईन मध्ये का उभा आहात ? खरे तर सर्व आशीर्वाद तुमच्या मध्ये आहे


 3) तुम्हाला फक्त म्हणायचे आहे प्रभु तुझी मर्जी सांग , मी तुझी मर्जी पूर्ण करेल , तु माझी मर्जी पूर्ण कर


4) नीती 11:25  जो दुसऱ्याच्या शेतात पाणी टाकतो , मी तुझ्या शेतामध्ये पाणी टाकेल


5)  दुसऱ्या शब्दांमध्ये , तू माझे काम कर , मी तुझे काम करीन , तू माझे घर बनव , मी तुझं काम करील , तू माझं काम कर , मी तुझं काम करील



अविश्वासी यांना मी सांगू इच्छितो की ,


1) तुम्ही कर्जामध्ये आहात ? मला माहित आहे , तुमचा आजार लास्ट स्टेज कॅन्सर आहे,  मला माहित आहे , तुमचे मुले त्रासामध्ये आहे , तुमच्यावर खूप मोठे प्रॉब्लेम आहे ,पैशाचे , मला माहित आहे 


2) तुम्हाला घर नाही , भाड्याच्या घरात राहतात , हे पण मला माहित आहे , अशावेळी काय केले पाहिजे ? आशीर्वाद  का भेटत नाही ?


 3) एकच गोष्ट आहे , येशुला स्वीकारा , येशू म्हणतो , तुम्ही माझा स्वीकार करा , मी आशीर्वाद देईल



उदा . लुक 5:1

 पेत्र

1) जेव्हा तुमच्या जवळ येशु नाही , तर तुम्ही संकटात आहात , येशू मध्ये या , जाळी टाका , म्हणजे प्रयत्न करा


2) बिजनेस चालणार , तुम्ही प्रयत्न करा , आता मी आलो आहे , तुमच्यामध्ये



फायदा नं 8



8) तो तुमच्यासाठी प्रार्थना करतो :-



1) येशू आमच्यासाठी प्रार्थना करतो , कधी विचार केला आहे का ? की माझ्यासाठी कोण प्रार्थना करणार ?

 

2) येशू म्हणतो , मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार , ज्याच्याजवळ आहे येशू , त्याच्याजवळ आहे एक मध्यथ करणारा



              


                    इब्री 7:25 


ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.




 तर येशू स्वतः आमच्यासाठी प्रार्थना  करतो


1) आपण हा विचार करत होता की , कोणता मौलाना ? कोणता फादरी ? कोणता पास्टर ? कोणता पंडित ? कोणता गुरु ? माझ्यासाठी प्रार्थना करणार , परमेश्वराकडे ? कोणता मौलाना माझ्यासाठी प्रार्थना करणार अल्लाहकडे ? परंतु येशू म्हणतो , मी तुझ्यासाठी प्रार्थना करीत आहे


  2) येशू स्वतः आमच्या साठी प्रार्थना करीत आहे , लोक शोधत आहे ,पास्टर लोकांना , परंतु येशू स्वतः प्रार्थना करत आहे , किती अदभुत गोष्ट आहे मित्रांनो  - -( 2) येशू जिवंत आहे , तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी


 3) का आम्ही दुसऱ्याला सहाय्य , मदत मागतो ? का म्हणतो माझ्या साठी प्रार्थना करा ? का म्हणतो की , पास्टर साहेब मला विचारत पण नाही


 4) का म्हणतो ? की चर्च मध्ये माझ्या साठी प्रार्थना करत नाही , आमची प्रार्थना , निवेदन , विनंती , चिठी , प्रेयर टॉवर , नाईट प्रेअर मध्ये का विनंती म्हणून पाठवतात ? कृपया करून हे बंद करा



आम्हाला काय पाहिजे ?


 1) हे डोंगर , ते डोंगर , झाडे , पाने , प्लास्टिक , लाकडे , पाणी आम्हाला का पाहिजे ? कारण येशु आमच्यासाठी प्रार्थना करत आहे


2) आम्ही डोंगर-डोंगर , पहाड-पहाड , झाड-झाड या त्रास-त्रासामध्ये का भटकत आहोत ? आम्ही का प्लास्टिक , लाकडाच्या मागे का भटकत आहोत ? इशारा समजत असेल तुम्हाला


 3) आम्ही वर्षातून तीर्थयात्रा करतो , कधी इकडे ,कधी तिकडे जातो , खूप पैसे खर्च करतो , आम्हाला मूर्ख बनविण्यात आले सैतानाकडून , ते हे की , पहा येथे आहे ईश्वर , तिथे आहे परमेश्वर , नाही


  4) येशु आमच्यामध्ये आहे , परमेश्वर आमचा मध्ये आहे , आणि प्रभु म्हणतो , मी तुझ्यासाठी प्रार्थना करीत आहे


 आम्ही का प्रार्थना निवेदन देत आहोत ? बंद करा , दुसऱ्याला प्रार्थना विनंती देणे बंद करा



 प्रार्थना करायची आहे ना ,


 1) दुसऱ्यांसाठी , तर मिनिष्ट्री साठी प्रार्थना करा , सेवाकार्या साठी प्रार्थना करा , गाव-शहरा साठी प्रार्थना करा , प्रभुच्या कामा साठी प्रार्थना करा , पास्टर सेवा कार्यासाठी प्रार्थना करा 


  2) विनंती नेहमी असते की , माझा डोके दुखत आहे , मला सर्दी झाली आहे , माझे कंबर दुखत आहे , मला मुंग्या येत आहे , शरीरामध्ये , बॉडी मध्ये - -(2) ही तर गंमत झाली , अरे वा शरीरामध्ये ,बॉडी मध्ये मुंग्या येत आहे , ही तर गंमत झाली


3) मी डावा जाऊ , मी उजवा जाऊ , मी लेफ्ट जाऊ,  इकडे जाऊ  तिकडे जाऊ , मला घाबरण्याची गरज नाही , कारण एक बसला आहे , माझ्यासाठी प्रार्थना करत आहे , ही सत्यता सांगत नाही लोक 



फायदा नं 9



9) तो आमच्यासाठी घर तयार करत आहे :-



 हे ऐकून तुमचे 90℅ टक्के टेन्शन दूर होणार


                  योहान 14:1‭-‬2 


“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो.




1) या पृथ्वीवर देश-विदेश तुमचा जो पण इलाका आहे , एक-एक व्यक्तीला विचारा , तरुणांना विचारा


2) यार तुझे सर्वात मोठे टेन्शन काय आहे ? यार भविष्याचा विचार करत आहे , यार घराचा विचार करत आहे , यार नोकरीचा विचार करत आहे 



 काही लोक मरण्या अगोदर खूप काही दान करतात ,


 1) कोणी खुर्ची दान करतात , कोणी चर्च मध्ये पंखा दान करता , कोणी चप्पल दान करतात , कोणी अन्न दान करतात ,  या अशा हेतूने  की , मरण्या नंतर काय माहीत ? घर प्राप्त होते की नाही ?

 

2) जर मी काही करतो , कमीत कमी मला बसायला जागा मिळाली पाहिजे , खुर्ची दान केली , बँच दान केली , यासाठी बसण्यासाठी बेंच , कंबल दान केले , तर मरणानंतर आत्म्याला कंबल मिळावे , चप्पल मिळेल , अन्न मिळेल त्या चक्कर मध्ये आम्ही काय काय करत असतो ?


3) मी परत सांगतो की , आमचे 90 ℅ टेन्शन दूर होणार , वर बसलेला बाप  , आपल्या मुलांसाठी घर तयार करत आहे


4) येथले विटांचे घर , येथले लाकडे , प्लास्टिक चे घर , येथले अंबानी चे घर , टाटा चे घर , बिर्ला चे घर , लंडन चा प्रिन्स चे घर आणि जगातील करोडो लोकांचे घर , ते काहीच कामाचे नाही


5) एक दिवस ही पृथ्वी , पृथ्वी उलथून फेकून टाकील , परंतु ज्याचे घर नेहमी टिकून राहील , ज्याच्या जवळ येशु आहे , येशु आमच्या साठी घर तयार करत आहे


6) मला येथे झोपडी मध्ये , मला येथे बंगल्या मध्ये , मला येथे व्हिला मध्ये ठेवा , मला त्याच्याशी काही अर्थ नाही परंतु माझ्या डोक्यात एकच गोष्ट आहे ती म्हणजे माझा बाप माझ्यासाठी घर तयार करत आहे 


7) तुम्ही भाड्याच्या खोलीत राहतात , तुम्ही झोपडीच्या खोलीत राहतात , येथे बंगल्यात राहतात , तुमच्या जवळ घर नाही , फुटपुथावर राहतात , कारण एवढे तुम्हाला सांगतो , फायदा नं 9 सांगते की मी तुझ्यासाठी घर तयार करत आहे 

 

 8) हा फायदा कोणाला आहे ? ज्याच्या जवळ येशू आहे , हा फायदा त्याला आहे , ज्याने आपले जीवन येशूला दिले आहे


9) येशूला सोडून कोणी स्वर्गात घर तयार करणार नाही , येशू आमच्या साठी घर तयार करत आहे


10) मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आहे , तो आमचा मध्यस्थ आहे , तो आमचा महायाजक आहे , त्याने आमच्या पापांची क्षमा केली आहे , तो आमच्या मध्ये राहतो , त्याने आम्हाला राजदूत केले आहे , त्याने आम्हाला सैतानवर शक्ती दिली आहे , अधिकार दिला आहे


11) आणि तो आम्हाला म्हणतो की , मी तूमच्यासाठी घर तयार करत आहे , फक्त येशूच करू शकतो , दुसरा कोणी नाही


12) येशू म्हणतो , मार्ग मी आहे , सत्य मी आहे , आणि जीवन मी आहे , योहान 14:6 म्हटला की नाही येशू आपल्यासाठी घर तयार करत आहे आणि तोच करू शकतो , दुसरा कोणी करू शकत नाही



फायदा नं 10



10) तो आम्हाला न्यायापासून वाचवतो :-



 जेव्हा संपूर्ण जगाचा न्याय होईल ना , तेव्हा त्या न्याया पासून तो आम्हाला वाचवणार



                     प्रेषितांची कृत्ये 10:42


त्याने आम्हांला अशी आज्ञा केली की, ‘लोकांना उपदेश करा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.’




1) येशूला याप्रकारे  सिहासना वर बसवले जाणार आणि याप्रकारे पूर्ण पूर्ण मानवजाती आणि वर पाहू शकता लाखो करोडो स्वर्गदूत , सिहासना वर परमेश्वर आणि अग्नीची दरी जळत वाहत आहे


2) त्यामध्ये परमेश्वर लाखो-लाखो लोकांचा ,  करोडो-करडो लोकांचा , न्याय करणार आहे , ज्या दिवसा पासून आदम घडवला , ज्या दिवशी ही दुनिया नष्ट होईल , तेव्हा पासून ची  गोष्ट बोलत आहे ,एकेकाला विचारीन , एक प्रश्न विचारीन ,जसे भारतात विचारतात ना की तू भारताचा नागरिक आहे का , होय , प्रूफ द्या , साबीत करा , आणि ते काय आहे तर आधार कार्ड


 3) तसे येशु विचारीन तुम्हाला स्वर्गात जायचे आहे का ? मला स्वर्गात जायचे आहे , सबुत काय देणार ? उद्धार कार्ड (तारण कार्ड)  , जसे याठिकाणी आधार कार्ड , तसेच स्वर्गात जाण्यासाठी उद्धार कार्ड आणि तोच विचारीन


4) येशु आहे तर न्याया पासून वाचवणार जर येशु नाही , अनंत काळा पर्यंत नरकात टाकले जाईल



 मी सर्वांशी बोलत आहे


 1) हिंदू , मुस्लिम , सिख , ईसाई , बुद्धिष्ट , पारसी , आदिवासी , यहुदी कोणी पण असो , रोडपती , करोडपती कोणी पण  तुम्हा सर्वांना , जर येशु नाही , तर 100% लाख % टाका नरका मध्ये जाणार 


 2) ज्याच्या जवळ येशु आहे , त्याला न्याया पासून वाचवणार , जेव्हा येशु तुम्हाला पाहणार , तेव्हा येशु बोलणार welcome to my Home , येथून तेथे पाहणार , याचे काय होणार ? त्याचे काय होणार ?



माझा हा संदेश प्रत्येक मनुष्यासाठी आहे  , येशु ने सांगितले , सर्वांना संदेश सागा - -(2)



1) कोणती देवी देवता नाही मेला क्रूस वर , फक्त येशू कृसा वर मेला 


2) का ? कारण येशु म्हणतो , न्याय करण्याचा अधिकार मला दिला आहे



कोणतेही ग्रंथ वाचून पहा , तुम्हाला हेच मिळणार


 1) ते कुराण असेल , ऋग्वेद असेल , हिंदू चे श्लोक असेल , इसाई चे बायबल वाचून पहा , तुम्हाला हेच मिळणार की येशु न्याय करणार


 2)  सांगितले नाही ना कधी , लाडू खूप खाण्यास दिले , कधी सत्य सांगितले नाही ना , म्हणून तुम्हाला सवय नाही ना , सवय लावून घ्या , हीच तर सत्यता आहे



                     प्रार्थना



1) येशु मी माझे जीवन तुला समर्पित करतो , मी विश्वास करतो , माझ्या पापा साठी 2000 हजार वर्षापूर्वी क्रुसावर मेला


 2) माझ्या पापासाठी तु हे बलिदान दिले , मी विश्वास करतो मी पापी आहे , माझ्या पापा साठी तू किंमत दिली


 3) आता मी घोषणा करतो , येशु माझा प्रभू आहे , मी कबूल करतो आपल्या जीभेने , विश्वास करतो पूर्ण मनाने ,बोलतो


 4) आतापासून येशु माझा प्रभू आहे , मी त्याच्या मागे चालणार , येशूच्या नावात


                     आमेन ।

No comments:

Post a Comment