Monday, 16 May 2022

तारण जक्कय पूर्ण समर्पण DT 1 (मराठी )

 DT दुसरा विषय

Christian lifestyle

( ख्रिस्ती जीवन शैली )



★ परमेश्वराला पूर्ण समजून घेतल्यानंतर आपले ख्रिस्ती जीवन बदलले पाहिजे


            गलतीकरांस पत्र 4:9   


पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे; तर मग दुर्बळ व निःसत्त्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता?




 ★ ख्रिस्ती जीवन चालू होते एकाच गोष्टी नंतर , ते आहे तारण (Salvation )



1) याचा अर्थ असा आहे परमेश्वराला पूर्ण जाणून घेतल्यानंतर , आपले ख्रिस्ती जीवन चालू होते , एका गोष्टी नंतर


2) आपण परमेश्वराला ओळखले आहे , परंतु तारण झाले नाही , तर परमेश्वराला जाणून फायदा काय ?


3) कसे चालू होते ख्रिस्ती जीवन ? एकाच गोष्टी नंतर , त्याला म्हणतात तारण


4) हा असा विषय आहे , मी असा समजतो की , याच्याशिवाय आम्हाला येशू भेटत नाही , त्याच्याशिवाय तुम्ही अलौकिक दुनिया मध्ये प्रवेश करू शकत नाही , याच्याशिवाय परमेश्वराला पिता म्हणण्याचा आणि परमेश्वराने आपल्याला मुले-मुली म्हणण्याचा अधिकार भेटत नाही


5) आणि याच्याशिवाय पवित्र आत्मा आमच्या जीवनात येत नाही , या तारणा शिवाय आम्हाला येशू मिळत नाही आणि पिताचा अधिकार भेटत नाही


6) पवित्र आत्मा भेटत नाही , काहीच भेटत नाही , काय अद्भुत गोष्ट आहे , याचा अर्थ हा आहे , परमेश्वराला जाणून घेतले , परंतु तारणाशिवाय आपण स्वर्गा मध्ये जाऊ शकत नाही


◆  ख्रिस्ती जीवन शैली मध्ये पहिला विषय आहे तारण ( Salvation )



★ तारणाचा विषय :-

चार Subject मध्ये चालणार



1) खरे तारण ( पूर्ण समर्पण )

2) तारणाने काय-काय प्राप्त होते

3) काय आपण तारण गमवू शकतो का ?

4) आपल्या तारणाचा उद्देश समजने



★ परमेश्वराने या पृथ्वीला दिलेले खूबसूरत दान म्हणजे तारण (Salvation ) - - (2)



1) पूर्ण पृथ्वीच्या चित्रामध्ये, जाती-जाती चे लोक आहे ,त्यामध्ये आफ्रिकन ,चायनीज , इंडियन असे करता करता , पूर्ण कंट्रीची , आपल्या सगळ्यांना , राष्ट्रला , जातीला , भाषाला , ज्याला 

प्रकटीकरण 7:9  , मत्तय 28:18,20 यीशूचे , परमेश्वराचे, पूर्ण जाती आणि पूर्ण जगाच्या लोकांना तारण द्यायचे आहे ,


2) त्याकारणाने मी ठेवले आहे या पृथ्वीला दिलेले खूबसुरत दान म्हणजे तारण ( उद्धार) - - (2)



             इफिसकरांस पत्र 2:8 


कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे;




हे परमेश्वराचे खूबसूरत दान आहे ,



★ खरे तारण ( उद्धार )- (पूर्ण समर्पण) :-



1) एक व्यक्ती आहे  , जो आपल्याला खरे तारण समजावुन देऊ शकतो , ती कोण व्यक्ती आहे ? गेस करा , कोणी सांगू शकता ?


2) या व्यक्तीचा परिचय आपल्या समोर ठेवत आहे , या व्यक्तीने मला खूप इम्प्रेस केले आहे , असे-असे गुण मिळाले आहे , आपल्या समोर ठेवत आहे , आणि ती व्यक्ती आहे जक्कय - - (2)


3) एक असा व्यक्ती त्याचे नाव आहे जक्कय , या व्यक्तीला एकाच व्यक्तीने नोट केले आहे , आणि तो आहे लुक , जो हुद्द्याने ने डॉक्टर आहे


4) जक्कय याचा अर्थ आहे , खरे तारण दुसरा पूर्ण समर्पण , ज्याने आपले पूर्ण जीवन एकाच झटक्या मध्ये , येशूला देऊन टाकले



★  या व्यक्तीची पूर्ण डिटेल (Information) नाही बायबलमध्ये :-



1) दुसर्‍या शब्दांमध्ये हा कुठला आहे ? याचे गाव कोणते आहे ? याची पार्श्वभूमी काय आहे ? हे काहीच नाही


2) हे लिहिले आहे कि , हा टॅक्स कलेक्टर आहे , (जकातदार ) आपल्या जमान्यात तो श्रीमंत (रिच) व्यक्ती आहे



3) जक्कय या व्यक्तीपासून आज आपण शिकणार आहोत आणि ते आहे , पूर्ण समर्पण - - (2)


4) Salvation स्वतः पण या शब्दा समोर झुकणार कारण आपण पूर्ण समर्पण केले आहे , तर आपले पूर्ण साल्वेशन आहे


5) या व्यक्ती पासून आपण शिकणार आहोत , खरे समर्पण काय आहे ? हे आज आपण शिकणार आहोत


6) त्या व्यक्तीची पूर्ण डिटेल नाही बायबलमध्ये , परंतु जेवढे ही लिहिले आहे , तेवढे काफी आहे समजण्यासाठी , कि खरे तारण काय आहे ?



                   लूक 19:1‭-‬2 


त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता.



★ या व्यक्ती जवळ कोणतीही समस्या नव्हती , आपल्या जीवना बाबत



★ तो आजारी नव्हता , तो गरीब नव्हता , कोणतीही समस्या रेकॉर्ड केलेली नव्हती , कि तो येशूच्या मागे पळू शकतो



1) येशूच्या 3.1/2 वर्षाच्या मिनिष्ट्री मध्ये , नेहमी हे पाहिले जाते कि येशूच्या मागे पळणारे एकतर आजारी , एक तर कुष्ठ रोगी , एक तर अपंग , एक तर आंधळे , लंगडे , लुळे , मुलगा मेला आहे  , मुलगी मेली आहे


2) अन्न नाही , अन्न खायला द्या , जंगल आहे , पाण्यामध्ये डूबत आहे , पाण्यामधून वाचवा , दुष्ट आत्मा लागला आहे , दुष्ट आत्मा काढा


3) हे येशूच्या 3.1/2 वर्षाच्या मिनिष्ट्रीत 4 पुस्तकात रेकॉर्ड केले आहे 


4) परंतु एक कॅरेक्टर , ज्याचे नाव आहे जक्कय , येशूच्या मागे का धावत आहेत ?



                    लूक 19:3 


येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता.




★ त्याच्या मनात एक गोष्ट आली होती  , येशूला पाहण्याची

★ आणि अलौकिक योजना होती परमेश्वरा कडून



1) पाहण्याची गोष्ट कोण टाकतो ? परमेश्वर .हे कन्व्हेक्ट कोण करतो ? परमेश्वर , मी येशूला जाणू शकेल , खऱ्या परमेश्वराला जाणू शकेल , कोण कन्व्हेक्ट करतो ? परमेश्वर


2) परमेश्वर म्हणतो , मी जगावर प्रेम केले आहे , तुम्ही नाही , योहान 15:16 सांगते , तुम्ही नाही निवडले तर मी तुम्हाला निवडले आहे , परमेश्वर आपल्या डोळ्याने स्पॉट करतो , अच्छा ही व्यक्ती आहे , अच्छा ती व्यक्ती आहे , याप्रमाणे परमेश्वराने जक्कय ला स्पॉट केले


3) मी परत सांगतो , या व्यक्तीला आजार नव्हता , गरीब नव्हता , कोणत्याही प्रकारची समस्या  नव्हती , परंतु फक्त त्याच्या मनात एक आले , मला येशूला पहायचे आहे , आणि परमेश्वराने त्याला पकडले


4) वर बसलेल्या परमेश्वराने तुमच्यासाठी, माझ्यासाठी , आपल्या सर्वांसाठी एक अद्भुत योजना बनवली आहे आणि ते आहे (साल्वेशन) तारण


5) ज्याला परमेश्वर पहात असतो , ज्याला  आपल्या मनामध्ये , हृदया मध्ये परमेश्वराला जाणून घेण्याची इच्छा , तडफ आली , जरा सी पण परमेश्वराला जाणून घेण्याची इच्छा प्रकट झाली , तर परमेश्वर त्याला कॅच करतो , परमेश्वर त्याला पकडतो 


6) आपण पाहू शकता , जक्कय उंबराच्या झाडावर बसला आहे , येशू ख्रिस्ताचे तिथे जाणे , अलौकिक आहे , येशूने त्याला पहाणे अलौकिक आहे , येशुचे तिथेच थांबणे अलौकिक आहे , येशु तिथेच का थांबला , ते पण अलौकिक आहे


7) हे कोण लीड करत आहे येशूला ? हे कोण लीड करत आहे जक्कय ला ? परत सांगतो वर बसलेला परमेश्वर


8) त्याला येशुला पाहयायचे होते , येशु म्हटला , मी तिथे येणार जिथे तुला परमेश्वराने बोलवले आहे



★ तो ठेंगा (बुटका) होता :-


1) आपली जी कमजोरी आहे ना , ती परमेश्वराच्या आड कधीच आली नाही पाहिजे , जर परमेश्वराने तुम्हाला निवडले आहे , तर हे सारे गोष्टी दुःख दूर होतील जर परमेश्वराने आपल्याला वाचवले ,


 2) काही लोक म्हणतात माझे शिक्षण नाही , का पाहिजेन शिक्षण तुम्हाला ? काही लोक म्हणतात की , मी स्मार्ट नाही , का पाहिजेन परमेश्वराला तुमचे स्मार्ट दिसणे ? काही लोक म्हणतात की , माझी हाईट नाही , का पाहिजेन परमेश्वराला तुमची हाईट ?


3) त्याने काय केले जो स्मार्ट आहे , त्याने काय केले ज्याने , चांगले शिक्षण घेतले आहे , त्याने काय केले , जो दिसायला सुंदर आहे  , परमेश्वर म्हणतो , मला तू पाहीजेन माझ्या मुला , माझी मुली - -(2)


4) त्याला येशूला पाहण्याची अलौकिक योजना होती , जो वर बसलेला परमेश्वराची , परमेश्वराकडून , परमेश्वराने त्याच्या मनात टाकले होते


5) आज लाखो लोक आहे , अरब कंट्री विषयी बोलू  , तर तिथले मुस्लिम म्हणतात की , आम्ही येशूला नहीं मानणार ? वर बसलेला परमेश्वर म्हणतो , बेटा एक स्वप्न दाखवीन ना , तर तुझे गुडघा येशु समोर टेकला जाईल


6) असे लाखो व्हिडिओ युट्युब वर पडले आहे , त्यांना पाहयायचे होते दर्शन , मोहम्मद चे , त्यांना पाहायायचे जे होते दर्शन अल्लाहचे , परंतु त्यांना दर्शन मिळाले येशूचे , तर हे कोणी केले वर बसलेल्या परमेश्वराने


7) किती मौलाना जे नमाज पडण्याच्या वेळी , त्यांना दर्शन मिळाले , येशूचे . ते आपल्या कुराणमध्ये शोधतात , कुराण मधून तोरा वाचतात , तोरा तून इंजिल वाचचात , इंजिल चा अर्थ आहे 4 गोस्पेल बूक


8) त्याला वाचतात , त्यातून कळते , अरे असली वाला तो इसा मसीह आहे , इसा आली सलाम आहे , ज्याला कुरान रेकॉर्ड करती रुह अल्लाह , याचा अर्थ हा आहे , जो रुह सें जन्मला आहे , तो खुदा चा बेटा (परमेश्वराचा पुत्र) आहे


9) किती हिंदू असें आहेत , ज्यांना परमेश्वराने दर्शन दिले पंडित आहे , मौलाना आहे , साधू सुंदर सिंग आहे , गरीब आहे , श्रीमंत आहे , करोडपती , रोडपती आहे , ज्यांना परमेश्वर अलौकिक पद्धतीने स्पॉट करतो



                    लूक 19:4 


तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला; कारण येशूला त्या वाटेने जायचे होते.



 या व्यक्तीला येशूला पाहायचे होते ,



1) या व्यक्तीने आपली तडफ दाखवली - येशूला पाहण्याच्या तडफ ने

2) याला गर्दीतून (जमाव) दूर केले

3) कशाचा तरी सहारा घेतला ( उंबराचे झाड)

4) आणि वाट पाहत राहिला



1) तेव्हापासून त्याच्यामध्ये तडप आहे , वरून तो ठेंगा आहे , बुटका आहे ,ओके  , परंतु माझी तडफ मी नाही सोडणार काहीपण हो 

2) आणि अशा गोष्टी वर तो अनुभव घेत होता येशू ख्रिस्त 100% मनुष्य आहे आणि तो परमेश्वर पण आहे



 ★ याला गर्दीमधून , जमाव मधून दूर केले , का ?



1) कारण की जो पर्यंत जमाव मध्ये , गर्दीमध्ये रहाल ना , आम्हाला 50 आवाज येतील , जोपर्यंत गर्दीमध्ये राहील ना , आम्हाला योग्य आयडेंटी नाही भेटणार , खूप जास्त आम्ही गर्दी जमा करून घेतली आहे


2) मत्तय 5:23 मध्ये तुम्ही दोन स्वामी ची सेवा करू शकत नाही , एक तर परमेश्वराची , नाही तर पैशाची , परमेश्वराची सेवा कराल तर , पैशाची करू शकणार नाही ,  जर पैशाची सेवा कराल , तर परमेश्वराची सेवा करू शकणार नाही , परमेश्वराने खचित खचित सांगितले आहे की , एक व्यक्ती एक सोबत काम करू शकत नाही , एका नाव (होडी) मध्ये प्रवास करू शकत नाही


3) तुम्हाला पण गर्दी तुन वेगळे झालेच पाहीजेन , - -(2)


4) लुक 24:25 येशू काय म्हटला माहीत आहे , त्याने पाहिले गर्दी जमाव माझ्या मागे येत आहे , येशूने मागे वळून म्हटला , ज्याने आपल्या बापाला , आईला , भावाला , बहिणीला , बायकोला , मुलाला , स्वतःला आपला स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येता येत नाही , त्याला माझा शिष्य होता येणार नाही


5) आज अडचण काय आहे , माहित आहे ? जेव्हा आम्ही अविश्वासी होतो ना , आम्ही इतकी गर्दी जमा नाही केली , जितकी विश्वासी बनल्या नंतर , स्वतःवर समस्या म्हणजे आम्ही गर्दी जमा करून घेतली , पैशाची गर्दी , लालची गर्दी , पापाची गर्दी , संसाराची गर्दी , मनोरंजनची गर्दी , आणि कोण-कोणती गर्दी जमा करून घेतली , त्या कारणाने येशु दिसत नाही


6) याला पक्के माहित झाले होते की , जोपर्यंत मी गर्दीमध्ये राहील , तोपर्यंत येशु मला दिसणार नाही , माझी अडचण ही आहे की , माझी हाईट नाही , परंतु त्याला कमजोरी नाही बनू देणार , मी कारणे नाही देणार


7) असे काही करील , मी पुढे जाईल , जिथे येशू येणार होता



★ कोणाचा सहारा घेतला ? (उंबराचे झाड )


1) याने अशा व्यक्तीचा सहारा घेतला , अशा वस्तू सहारा घेतला , अशा गोष्टीचा सहारा घेतला , जिथे थांबून , तिथे चढून त्याला येशू दिसला पाहिजे


2) आज आपण कोणाचा साहरा घेतला आहे ? येशूला पाहण्यासाठी ? जर ते चर्च चांगले आहे , जरूर सहारा घ्या , जर तो युट्युब चा प्रचारक चांगला आहे , जरूर सहारा घ्या


3) या व्यक्तीने सहारा घेतला , या व्यक्तीने उंबर झाडाचा सहारा घेतला


4)  हे झाड , या झाडाला किती लोकांनी कापण्यासाठी प्रयत्न केला असेल , झाडाला हटवा , हे रस्त्याच्या मध्ये आहे , परंतु वर बसलेला परमेश्वर म्हटला या झाडाचा एक दिवस पूर्ण पूर्ण वापर होणार  , पुर्ण पूर्ण उपयोगात आणले जाईल


5) तुम्हाला , मला , आपल्या सर्वांना परमेश्वराने एका उद्देशाने झाड करून ठेवले आहे , कारण की जक्कय सारखा तुमच्यावर येईल आणि तुमच्या द्वारे येशूला पाहणार


6) काय अद्भुत या झाडाला परमेश्वराने ठेवले होते


7) या व्यक्तीला या झाडाने सहारा दिला  , कारण की आम्हा सर्वांना साहरा पाहिजे , आम्हा सर्वांना मार्गदर्शन पाहिजे , परंतु ज्या दिवसापासून येशु भेटला , तुम्हाला कोणाचीही गरज नाही , ज्या दिवशी येशू भेटला आहे , त्याच दिवसापासून येशु तुमच्या जवळ आहे


8) तुम्हाला कोणालाही प्रार्थना निवेदन देण्यासाठी भीक मागण्याची गरज नाही , माझ्यासाठी प्रार्थना करा , प्रेयर फॉर मी , तुम्हाला फक्त फक्त येशु कडे प्रार्थना करायची आहे , तुम्हाला येशू जवळ मागायचे आहे , नाही तेल , नाही रुमाल , नाही पाणी , नाही कपडा , नाही कोणत्याही प्रकारची वस्तू , तुम्हाला येशू नंतर नाही पाहिजे


★ कारण ही व्यक्ती झाडावर का चढली , कारण त्याच्याजवळ येशु नव्हता



                 1 इतिहास 28:9 


हे माझ्या पुत्रा, शलमोना, तू आपल्या पित्याच्या देवाला ओळख आणि सात्त्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर सर्वांची मने पारखतो आणि त्यांत जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्याला समजतात. तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करील.




★ जर कोणाच्याही मनात खऱ्या परमेश्वराला जाणून घेण्यासाठी तडफ जागी झाली वर बसलेला परमेश्वर त्याला पकडतो



                         लूक 19:5 


मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.”




★ परमेश्वराच्या आत्म्याने येशूला बरोबर तेथेच आणले ,

 येशूला बरोबर तेथेच आणले  , जेथे जक्कय होता



         2 इतिहास 16:9 


परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. 


1) हे लीड कोण करत आहे ? परमेश्वराचा आत्मा , मत्तय 4:4 , लुक 4:4 , परमेश्वराचा आत्मा येशू ला कुठे घेऊन गेला ? जंगल मध्ये


2) तर जक्कय बसला , त्या झाडावर ,  येशू ला कोण घेऊन गेले ? एक व्यक्तीचा आत्मा तडपत होता , एक व्यक्ती परमेश्वराला शोधत आहे , आणि येशू त्याला भेटला आणि तो येशूला भेटला


★ उतरायचे आहे :- 



1) तर जक्कय कसा होता ?  तो  सरदार होता , तो रिच होता , त्याला कोणत्याच प्रकारची अडचण , समस्या नव्हती , परंतु त्याच्या मनामध्ये असे होते कि तो परमेश्वराच्या स्पॉट मध्ये आला ,  तर येशु म्हटला , मला आज तुझ्या घरी उतरायचे आहे


2) उतरायचे आहे , असे का ? मी आणि तुम्ही काहीच करू शकत नाही , उतरायचे आहे याचा अर्थ हा आहे तू जक्कय जोपर्यंत तू आत मध्ये घेणार नाही ते होते फिजिकल (हृदय हाऊस) हे घर ,


3) तर येशु म्हणतो , मुला तू झाडावर चढला , व्हेरी गुड ,  गर्दीतून वेगळा झाला , वेरी गुड , तू स्वतःला जगापासून वेगळे केले , वेरी गुड , इथले पैशांचा मोह सोडून दिला , वेरी गुड , तुझ्यामध्ये तडप आहे , व्हेरी गुड , 



4) परंतु हे सर्व काही ठेवून मला , तुझ्या हृदया मध्ये नाही घेणार ,  फायदा काय , या तडफ चा ?  फायदा काय , त्या वेगळे होण्याचा ? फायदा काय ,  जगापासून वेगळे होण्याचा ? जर मी नाही आलो तर सर्व काही व्यर्थ (2)



5) तुम्ही त्याग चे जीवन जगत आहात चांगली गोष्ट आहे , तुम्ही पवित्र जीवन जगत आहे चांगली गोष्ट आहे , तुम्ही चोरी करत नाही चांगली गोष्ट आहे , तुम्ही कोणत्याही प्रकारचे पापामध्ये नाही चांगली गोष्ट आहे 



6) परंतु घरात येशूला आपल्या हृदया मधे नाही आणले, तर फायदा काय ? या चांगले पणाचा ,  फायदा काय , या पवित्रतेताचा ? फायदा काय , आपल्या चांगुलपणाचा ? फायदा काय , त्या तडप चा ? फायदा काय , तुम्हाला गर्दीतून वेगळे करण्याचा 



★  परमेश्वर आपली ताकद तेथे दाखवितो , जिथे ज्यांचे हृदय निष्कपट आहे



              लूक 19:6 


तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.



★ आता येथून जक्कयला समजले होते कि , परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली होती



★ येशू चा स्वीकार करणे म्हणजे , खरा पश्चाताप , येशूला हृदयात घेणे म्हणजे , पूर्ण समर्पण



1) पहा येथे येशूने परवानगी मागितली , मला तुझ्या मध्ये घरी यायचे आहे , मला तुझ्या घरी उतरायचे आहे


2) येशू चोर नाही , क्षमा करा या शब्दाचा वापर करत आहे , माहित आहे का ? कारण की चोर येतो चोरी च्या हेतूने , चोर येतो  जबरदस्ती ने , चोर येतो खिडकी मधून , चोर येतो तोडुन , 


3) परंतु येशू असा नाही , येशू सज्जन आहे , त्याला माहित आहे की , मला जर आत मध्ये यायचे आहे , कसे यायचे आहे ? तर विचारून यायचे , परवानगी घेऊन यायचे आहे



            प्रकटी 3:20 


पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील.


1) येशु म्हणतो तुझ्या मध्ये येणे जरुरीचे आहे सर्व-सर्व योजना वर बसलेल्या परमेश्वराची आहे , खरा परमेश्वर ओळखणे हे मनुष्यच्या हातचे गोष्ट नाही


2) परमेश्वर जोपर्यंत आमचे डोळे उघडत नाही तोपर्यंत समजत नाही , आपले हृदय तोडत नाही तो पर्यंत समजत नाही , त्याची कृपा त्याने आमच्यावर प्रकट केली


3) जक्कयमुळे आपण शिकत आहोत , त्यामध्ये त्वरित लिहिले आहे , आनंदाने आगातस्वागत करून घरी नेले


4) आता इथून जक्कयला समजले होते , परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्या मध्ये काम करायला सुरुवात केली होती



               लूक 19:7 


हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.”




★ या ठिकाणी दोन गोष्टी ठेवत आहे , सर्वात प्रथम बाहेरच्या लोकांचे ,  दुसरा परमेश्वराच्या दृष्टिने



1) बाहेरचे लोक म्हणत आहे , स्वतः ख्रिस्त म्हणणारा एक पापी त्याच्या घरी कसा जाऊ शकतो ?


2) परमेश्वर म्हणतो , मी जगामध्ये पाप्यांसाठी आलो , मी या सृष्टी मध्ये पाप्यांसाठी आलो -- (2)



★ सृष्टीला परमेश्वराने आपला पुत्र पवित्र लोकांसाठी दिला नाही , सृष्टीला आपला पुत्र परमेश्वराने पाप्यांसाठी दिला आहे


 आणि पौल म्हणतो , यामध्ये सर्वात मोठा पापी मी आहे


1) आपल्याला सर्वांना माहीत आहे , इतिहास साक्षी आहे , तेव्हा पण आणि आज पण , देश-विदेश मध्ये , आपल्या सर्व साक्षी मध्ये भेटेल की ,


2) मी एका काळी चोर होतो , मी एका काळी नक्षलवादी होतो , मी दारू पिणारा होतो , मी लबाडी करणारा होतो , मी जगाच्या पापामध्ये होतो


3) अशा व्यक्तींना परमेश्वर स्पॉट करतो , निवडतो आणि त्याला आपला प्रचारक बनवतो



★ येशू जगामध्ये आला आहे पाप्यांसाठी

★ खरे तर येशू आपल्या सही घरामध्ये गेला आहे - - (2)



★  खरे घर कुठे आहे ? आपले हृदय , असली घर कुठे आहे ? एका पाप्याचं हृदय



             लूक 19:8 


तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”


1),जक्कय उभा राहून प्रभुला म्हणाला , हे प्रभू पहा मी माझी अर्धी संपत्ती दरीद्रास देतो आणि कोणाचे अन्याय करून घेतले असेल तर त्यांना चौपटीने वापस करतो


2) तर अर्धी प्रॉपर्टी गरिबाला देणार आणि अर्धी प्रॉपर्टी ज्याचे एक घेतले असेल त्याला चार देतो तर त्याच्याजवळ राहिले किती ? झिरो


3) याला म्हणतात खरे समर्पण , येशूच्या मागे वेडा-दिवाना होऊन , आपला पैसा , आपली अर्धी प्रॉपर्टी गरिबांना देणार



★ आता इथून जक्कय बदलत आहे , येशूच्या येण्यानेच बदलाव येतो


1) जाने पूर्ण सृष्टी निर्माण केली तो जक्कयच्या घरी आहे , ज्याचा गौरवाचा दबदबा असा आहे , स्वर्गामध्ये स्वर्गदूत रात्रंदिवस पवित्र पवित्र म्हणतात , तो व्यक्ती याच्या घरी आहे , ज्याच्या सिंहासना वर ढग वीज चमकते ना , तो याच्या घरी आहे


2) जिथे प्रकाश चारी दिशेने आहे ना तो याच्या घरी आहे , ज्याने स्वर्गदूत , गॅलेक्सी , जितका पेस आहे ना , सर्व काही निर्माण करणारा , तो याच्या घरी आहे


3) विचार करून पहा घरामध्ये गौरव कसा झाला असेल ? , त्या जक्कय चे जीवन कसे झाले असेल ? आत्मिक गोष्टी आत्मिक लोक समजू शकतात


4) ही पृथ्वी ज्याचे पदासन आहे तो स्वतः बसून त्याच्या घरामध्ये बोलत आहे



★  येशुच्या येण्यानेच बदल होतो



              लूक 19:9 


येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.



1) अब्राहामाचा पुत्र हे कनेक्शन का ? लाजर मेला अब्राहमाच्या उराशी , जे येशू मध्ये आहे अब्राहामाच्या आशीर्वादाचे हक्कदार आहे , कारण की व्यवस्था पाहणारे यहुदींना एकच भाषा समजत होती


         गलतीकरांस पत्र 3:28‭-‬29 


यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात; आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात.



2) Blessing चा अर्थ आहे , अब्राहम , आशीर्वादाचा अर्थ आहे आब्रहम , परमेश्वर चा अर्थ आहे अब्राहम  , कारण की परमेश्वराने स्वतःला कोणाशी जोडले ? अब्राहाम , इसहाक व याकोब , तर ज्याचे तारण होते  , त्याची गणती अब्राहमाशी  , आज अन्य जाती ला पण अब्राहामाला जोडण्याची गरज नाही , कारण आम्ही सरळ येशू ला जोडले गेलो आहोत - - (2)



★ जक्कय ला खरे तारण मिळाले , केव्हा ? जेव्हा पूर्ण प्रकारे येशूवर निर्भय झाला  , अब्राहाम प्रमाणे ,  म्हणून त्याला अब्राहामाचा पुत्र म्हणण्यात आले


1) अब्राहम काय होता ? मी परमेश्वरावर अवलंबून आहे , आपल्या घराला सोडले , प्रॉपर्टी ला पण सोडले , आपल्या बापाचा पैशा घेतला नाही , एटीएम कार्ड घेतले नाही ,  तोटल झिरो झाला


2) एका अशा जमिनीवर चालला , ना तिथे कॉपी , ना रेस्टॉरंट , ना मॉल , ना कोणत्याही प्रकारची सुविधा , तोटल डिपेंडन , हे जक्कय ला म्हटले आहे , हा अब्रह्माचा पुत्र आहे


3) का ? जो सर्व काही त्याग करून परमेश्वराचा मागे चालायला सुरुवात करतो , त्याला म्हणतात अब्राहमचा पुत्र म्हणजे अब्राहामा सारखा



★ तेव्हा येशू म्हणतो , आता याचे तारण झाले आहे



                    लूक 19:10 


कारण मनुष्याचा पुत्र ‘हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे.”’




★ जक्कय प्रमाणे परमेश्वर आज पण शोधत आहे , येशूला रास्ते वाले नाही पाहिजे


1) कोणते ख्रिस्ती पाहिजे ? येशू ला घरी घेऊन जाणारे , रास्तेवाले नाही पाहिजेन , जे कधी पण बदलू शकतात  , कधी पण धोका देऊ शकतात , जे कधी पण येशू पासून वेगळे होऊ शकतात , असे ख्रिस्ती नाही पाहिजे



का ?



              लूक 13:23‭-‬24 


तेव्हा कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?” तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा; कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही.




1) हा कोणता मार्ग आहे ? तारणाचा , हा कोणता मार्ग आहे ? तोटल सरेंडर चा  , हा कोणता मार्ग आहे ? पूर्ण समर्पण चा , जोपर्यंत परमेश्वराला पूर्ण समर्पण भेटणार नाही , तुमचे तारण होणार नाही


2) एका समयी जक्कय तेथे होता , तर तोच जक्कय गर्दीतुन वेगळा झाला , तोच जक्कय झाडावर चढला , तो हाच जक्कय आहे , ज्याने येशूला आपल्या घरी नेले , दुसरा जक्कय

 

★ आज आपण कोठे आहोत ?



★  येशूच्या मार्गामध्ये येशूच्या कारणाने



★ आपण जोपर्यंत येशूला घरी आणणार नाही , आपल्याला येशुचा मार्ग सापडणार नाही


1) जक्कय जोपर्यंत झाडावर आहे , तो पर्यन्त हा मार्गावर येऊ शकत नाही , जोपर्यंत जक्कय बाहेर आहे , हा मार्गावर येऊ शकत नाही , जेव्हा त्याने येशूला घरी आणले , तेव्हा त्याला मार्ग मिळाला


            मार्क 13:13 


आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल.



           मत्तय 13:22 


काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.



              

       स्तोत्रसंहिता 138:2 


तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन, तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकारस्मरण करीन; कारण तू आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.




 ★ परमेश्वरापेक्षा मोठे कोण आहे ? वचन



1) वचन ला पण दाबू शकतो तुमचा पैसा , वचन ला दाबू  शकतो , तुमचे लालच ,  वचन ला दाबू टाकू शकतो , संसाराची चिंता , वचन ला दाबू शकतो संसार चे ,जगाचे पाप


             

                  1 तीमथ्य 6:10 


कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वत:स पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.




★ एकीकडे जक्कय , दुसरीकडे तरुण



           मत्तय 19:21 


येशू त्याला म्हणाला, “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”




★ स्वर्गामध्ये तारण ला घेऊन दोन गोष्टी होतील



एक आहे आनंद 

दुसरा आहे राग (क्रोध)



राग का ?



          लूक 15:10 


त्याप्रमाणे, पश्‍चात्ताप करणार्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”


★  एक पश्चाताप करणाऱ्या माणसाबद्दल आनंद



                इब्री 10:29 


तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते ‘कराराचे रक्त’ ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांला वाटते?




★ तारण चा अर्थ आहे - खरे समर्पण


★  आज परमेश्वराला आपल्याकडे पाहून राग (क्रोध) येत आहे , का आनंद होत नाही


★ पूर्ण समर्पण नाही तर परमेश्वर तुम्हाला क्रोधाने पाहत आहे - - (2)


1) म्हणतो तारण न होण्याचे नाटक करत आहे  , चर्चला जाण्याचा नाटक करत आहे , बायबल वाचण्याचे नाटक करत आहे  , दारू पीत आहे , सिगारेट पीत आहे  , शिव्या देता आहे , भांडणे करत आहे , धोका देत आहे , खोटे बोलत आहे , उलटी सुलटे व्हिडिओ पाहत आहे , पत्नी बरोबर  ठीक नाही


2) जगाबरोबर ठीक नाही , पास्टर च्या पदवी मध्ये आहे , परंतु चर्च बरोबर ठीक नाही , तुम्ही चर्च मेंबर आहे , परंतु पास्टर सोबत ठीक नाही


3) साऱ्या गोष्टीला पाहून परमेश्वर म्हणतो ,  मुला तुझे तारण झाले होते ना , मी आनंद केला होता , परंतु तुझी हरकते पाहून , मला क्रोध येत आहे


4) तुमचे पूर्ण समर्पण नाही , तर प्लीज , तुम्ही येशूला सोडून द्या , परत जगात जा , एक तर इकडे नाही तर तीकडे ,  मधले येशूला पण आवडत नाही



★ तुम्हाला तारण होण्याचा आनंद घ्यायचा आहे

No comments:

Post a Comment