आज मी येशूचे खरे रूप , खरा चेहरा काय आहे ? हे थोडक्यात सांगणार आहे
येशुला कोणी धरून दिले ? का धरुन दिले ?
रोमकरांस पत्र 4:25
तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.
1) येशुला 30 चांदीच्या सिक्यात विकले , म्हणून नाही
2) येशुच्या गालावर चुंबन घेऊन यहूदा इस्कॉर्योत ने धरून दिले नाही
3) यहुदा इसकोर्योतने नाही तर , आमच्या अपराधाने येशुला धरून दिले
तर लिहीले आहे ,,
1) माझ्या अपराधाने ,
2) तुमच्या अपराधाने ,
3) मानवजातीच्या अपराधाने
येशुला धरून दिले ...
ही सत्यता कधी माहीत होती का ?
1) येशुला कोणी धरून दिले ? यहूदा इस्कॉर्योतने नाही
2) तर माझ्या पापामुळे , मानव जातीच्या पापामुळे येशुला धरून देण्यात आले
यशया 53 : 6
आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.
1) आदमाच्या चुकीमुळे , येशु ख्रिस्ता पासुन तर आत्तापर्यंत सर्वजण भटकले आहे
2) परमेश्वराचा शोध करणारा कोणी ही नाही
3) खऱ्या परमेश्वराला ओळखणारा कोणी ही नाही
4) आपण लोक अल्लाह म्हणतो , आपण लोक खुदा म्हणतो , आपण लोक भगवंत म्हणतो ,
5) आपण लोक भगवान म्हणतो , आपण लोक ईश्वर म्हणतो , आपण लोक देव म्हणतो
6) तोच परमेश्वर , यहोवा , एलोहिम , तो त्रेक्य देव परमेश्वर म्हणतो सर्व जण भटकले आहात
7) आपण लोक म्हणतो ना , सर्व मार्ग एक आहे
8 ) तर वर बसलेला परमेश्वर म्हणतो , सर्व भटकले आहात
यशाया 53:6
आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.
1) वधस्तंभ (कृस) खांद्यावर घेऊन येशु चालत होता
2) तर त्याला रोमी सरकार कडून मिळालेली शिक्षा नव्हती
3) ती पिलाता कडून मिळालेली शिक्षा नव्हती
4) त्याला हेरोद राजा कडून मिळालेली शिक्षा नव्हती
येशू वर जो वधस्तंभ लादण्यात आला होता तो सर्व मानव जातीच्या पापांसाठी वधस्तंभ लादण्यात आला होता , जे सर्व भटकलेले होते -- (2)
मुर्तीला परमेश्वर म्हणणाऱ्याची का चीड येते ,
1) का चीड येते प्लास्टिक आणि लाकडाला परमेश्वर म्हणणाऱ्या ची ?
2) का चीड येते अशा लोकांची झाडावरती , झाडाखाली ,
3) पाण्यावरती , पाण्याखाली , डोंगरावर , डोंगराखाली , सूर्य , चंद्र
4) अशा गोष्टीची परमेश्वराला का चीड येते ? कारण आपण तेव्हा भटकले होतो
5) तर आम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी येशुवर वधस्तंभ लादण्यात आला होता
प्रेषितांची कृत्ये 10:43
त्याच्यावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला त्याच्या नावाने (येशूच्या नावाने ) पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.”
असे का ? कारण
1) येशुने वधस्तंभ घेतला हिंदू भावांसाठी
2) येशुने वधस्तंभ घेतला मुस्लिम भावांसाठी
3) येशुने वधस्तंभ घेतला बुद्धिष्ट भावांसाठी
4) येशुने वधस्तंभ घेतला यहूदी भावांसाठी
5) येशुने वधस्तंभ घेतला जैन , शीख , आदिवासी भावांसाठी
6) येशुने वधस्तंभ घेतला तुमच्या साठी आणि माझ्या साठी
7) येशूने वधस्तंभ घेतला संपूर्ण जगासाठी
तर येशु आमच्या पापांची क्षमा करतो ?
अ) कारण येशूच , आमच्या पापांची क्षमा करतो
1) अमेरिकेचा डॉलर ने तुमचे पापक्षमा होणार नाही , भारताची 2000 ची नोट त्याने तुमची पापक्षमा होणार नाही , कोरांना व्हायरस , व्हाक्सीन आली , त्याने तुमची पापक्षमा होणार नाही
2) तर कोणतेही केमिकल , कोणतीही ऍसिड , कोणत्याही प्रकारचे टॅबलेट , कॅप्सूल , इंजेक्शन ने आमच्या पापांची क्षमा होणार नाही
कलस्सै 2:13
जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;
1) कधी कोणी म्हटले का माझ्याजवळ या , मी तुमच्या पापांची क्षमा करीन , येशूला सोडून , काढून दाखवा
2) कधी कोणता ईश्वर , कधी कोणता देवता , कधी कोणता पक्षी , प्राणी , सूर्य , चंद्र , गॅलक्सी , पृथ्वीवरील वस्तू कधी मनुष्याला म्हटली का माझ्यावर विश्वास करा , मी तुमच्या पापांची क्षमा करीन ?
3) येशू म्हणतो माझ्यावर विश्वास करा , मी तुमच्या पापांची क्षमा करीन , तुम्हाला पापांची क्षमा मिळेल , ज्याची पृथ्वीवर कोणी क्षमा करू शकत नाही
4) कोणताही ग्रंथ वाचून पहा , तुम्हाला भेटणार नाही , ते कुराण असेल , ऋग्वेद असेल , हिंदुचा श्लोक असेल , गीता असेल , कधी कोणी म्हटले का ? मी तुमच्या पापांची क्षमा करीन ?
5) तुम्हाला नाही भेटणार , फक्त येशू म्हटला , मी तुमच्या पापांची क्षमा करीन
आपण किती पण ---
1) बकऱ्याचे रक्त , कोंबड्याचे रक्त , वासराचे रक्त
2) याचे रक्त , त्याचे रक्त , सफेद कपडे , लाल कपडे
3) डोक्यावरील केस काढून टाका , अंगावर राख ओढून घ्या
4) आपण कधीच - कधीच पवित्र होऊ शकत नाही
5) धार्मिक बनू शकत नाही
6)आपण कधीच कधीच शुद्ध होऊ शकत नाही
*परंतु असा एक व्यक्ती आहे , एक मसीहा असा आला , त्याच्या पवित्र रक्ताने सर्वांना शुद्ध केले*
अ) येशूच्या पवित्र रक्ताने
ब) येशूच्या सांडलेल्या रक्ताने
क) येशूने पापांची क्षमा केली
★ कारण येशूचे रक्त , सर्व पापांपासून शुद्ध करते
1) आपल्यावर जेवढे पण श्राप होते , बंधन होते , येशु म्हणतो , मी सर्व दूर केले , सर्व श्राप मिटून टाकले , आपल्या पापांची क्षमा केली
2) असा फायदा कोण देऊ शकतो ? कोण करू शकतो ? जर येशूने क्षमा केली तर दुसरा , तिसरा , चौथा आरोप करू शकत नाही
3) तुम्हाला अशा अपराधाची क्षमा मिळेल , तुम्हाला आशा पापापासून सुटकारा मिळेल , ज्याला या पृथ्वीवर कोणीच करू शकत नाही
3) मी ख्रिशनविषयी बोलत नाही , तुम्ही सफेद कपडे घाला , मी त्या विषयी बोलत नाही , बहिणींनी कानात सोने घालू नये , मी त्याविषयी बोलत नाही
4) तुम्ही तुमचा कल्चर चेंज करा , मी त्याविषयी बोलत नाही , तुम्ही तुमचे खाणे पिणे चेंज करा , मी त्याविषयी बोलत नाही
5) मी बोलत आहे आपल्या जीवन परिवर्तना विषयी , येशु धर्म परिवर्तन करण्यासाठी नाही आला तर , येशु जीवन परिवर्तन करण्यास आला आहे
6) आम्ही फक्त येशुला स्वीकारले आहे ,धर्म कोणताही असू द्या , त्याच्याशी काही संबंध नाही
7) तुमचे नाव संतोष आहे , रेश्मा आहे , सलीम आहे , किंवा सुनिता आहे , त्याने काही फरक पडत नाही , तुम्ही सर्व मनुष्य आहात , तुम्ही फक्त येशूला स्वीकारले आहे
पापांची क्षमा झाल्याशिवाय कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही
1) काही लोक म्हणतात की , आम्ही कधी मच्छर नाही मारला , माशी नाही मारली , आम्ही कधी पाप केले नाही , खोटे बोललो नाहीं , खून केला नाही , तर आम्ही पापी कसो झालो ?
2) लक्षात ठेवा , पाप केल्यावरच पापी होत नाही , आपला जन्मच पापात झाला आहे
3) बायबल सांगते नीतिमान कोणीही नाही , धार्मिक कोणीही नाही , एकही नाही , सर्व बहकले आहे
4) म्हणून आम्ही पापी आहोत
रोमकरांस पत्र 3:23
कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;
तर सर्वांमध्ये पाप आले ,
1) हिंदू , मुस्लिम , सिख , बुद्धिष्ट , ईसाई , पारसी आपण कुठलेही असो नॅशनल , इंटरनॅशनल असेल , सर्व मनुष्य पापी आहे , वचन सांगते
2) तर आम्ही सर्व पापी आहोत आणि आम्हाला तारणकर्त्या येशूची गरज आहे
स्वर्गाचे द्वार येशू आहे
योहान 14:6
येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही
2) याच येशूने बागेत रडून प्रार्थना केली आणि त्याने म्हटले शक्य असेल हा प्याला माझ्यापासून दूर कर , तुझी इच्छा असेल मरू तर मरेल , मी मरायला तयार आहे
3) या व्यक्तीला मनुष्य म्हटले गेले , ज्याला परमेश्वराचा सेवक म्हटले गेले ही व्यक्ती म्हणते , मला हा प्याला सहन होत नाही
4) परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला ज्या माणसांना प्यायचा होता , तो परमेश्वराचा पुत्र म्हणतो हा प्याला माझ्यापासून दूर कर
5) परंतु वर बसलेला परमेश्वर म्हणतो , नाही तूच पिणार , (राम नाही पिणार , मोहम्मद नाही पिणार , कृष्णा नाही पिणार ,) कोणत्याही प्रकारची व्यक्ती , जे तुम्ही देवता मानतात ते नाही पिणार , परंतु येशू ख्रिस्ताला हा प्याला घ्यावा लागला
6) तुम्ही म्हणता की सगळे मार्ग एक आहे , आपण सगळे एक आहोत , सर्व धर्म एक आहे , हे सर्व एक नाही , सर्व एक असते तर सर्वांनी हा प्याला का नाही पिले
7) एक कारण होते की हा प्याला येशू ख्रिस्ताला प्यावा लागला , सगळ्यांनी विचार करा की येशूला का प्यावा लागला ? फार बारकाईने विचार करा की येशूच का ? जीजस का ? येशू मसीह का ?
लूक 22:42
“हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
परमेश्वराला येशू म्हणतो ,
1) तुझी इच्छा आहे की मानव जातीसाठी मरू , तुझी इच्छा असेल तर हिंदू भावांसाठी मरू , तुझी इच्छा असेल प्रत्येक मुस्लिम भावासाठी मरु ,
2) तुझी इच्छा असेल की बुद्धिष्ट लोकांसाठी मरू , तुझी इच्छा असेल की मी सर्व जगासाठी ,
3) जगातल्या धर्मासाठी त्या मनुष्यासाठी मरू , या पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मरू तर तुझी इच्छा पूर्ण हो
4) जर तुम्ही येशूला एकदा स्वीकारले , तर तुमच्या पापांची क्षमा होते
5) परंतु येशूला जर स्वीकारले नाही , तर तुम्ही कितीही डुबकी घ्या , तुम्ही कोणत्याही डोंगरावर जा , किती ही दानधर्म करा , तुमच्या पापांची क्षमा होणार नाही
6) जेव्हा पुस्तक उघडले जाईल ना , तेव्हा आपण वाचू शकत नाही , जर वाचायचे असेल , तर येशूचा स्वीकार करा , कारण आत्ताच संधी आहे
का ?
संपूर्ण जगाचा , सृष्टीचा न्याय येशुच करणार आहे
कोणा कोणा चा करणार आहे ? तर ,
प्रकटी 7:9
ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.
1) न्यायाच्या दिवशी हर एक जातीचा व्यक्ती त्या येशू समोर उभा राहील
2) तर ज्याने आपले जीवन येशुला दिले तो वाचेल
3) आणि ज्यांने आपले जीवन येशुला दिले नाही
4) तर त्याची परिस्थिती फार भयानक असेल
5) त्याचे जीवन नरकात टाकले जाईल
परमेश्वराचा क्रोध मनुष्यावर न लादता एका मनुष्यावर तो प्याला लादण्यात आला
येशू कृसावर मेला , कारण पापांची क्षमा व्हावी - - (2)
जर मी स्वर्गात असावे असें वाटते तर आजच संधी आहे
1) आजच येशूचा स्वीकार करा
2) आजच येशूवर विश्वास ठेवा
3) आजच येशूला कबूल करा
4) आजच येशूला आपले जीवन द्या
कारण या येशूने मनुष्य जाती साठी ,
1) येशूला 39 फटके मारण्यात आले
2) येशूचा छळ करण्यात आला
3) येशूच्या तोंडावर थुंकण्यात आले
4) येशूच्या तोंडात मारण्यात आले
5) येशूचे शरीर छिन्न छिन्न करण्यात आले
6) येशूच्या पोटात भाला खुपसण्यात आला
7) येशूच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घालण्यात आला
8) येशूच्या हातापायात खिळे खुपसण्यात आले
9) येशूच्या शरीराच्या मांसाचे तुकडे पाडण्यात आले
10) येशूला रक्त भांभाळ करण्यात आले
11) येशूचा चेहरा मनुष्या सारखा नव्हता , तो विद्रुप करण्यात आला
12) येशूला कृसावर मारण्यात आले
या सर्व गोष्टी येशु बरोबर होत असताना तो चुपचाप राहिला
का ? कारण येशूच्या मरणाने ,
1) माझा हिंदू भाऊ वाचला जाईल
2) माझा मुस्लिम भाऊ वाचला जाईल
3) माझा बुद्धिष्ट भाऊ वाचला जाईल
4) माझा शीख , जैन , यहुदी , आदिवासी भाऊ वाचला जाईल
जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्ती चे पाप येशूला घावे लागले
मर्डर करणारे , चोऱ्या करणारे , लबाडी करणारे , नक्षलवादी , आतंकवादी , या सर्वांचे पाप येशूवर लादण्यात आले
का ? कारण
कोणाचाही नरका च्या अग्नीमध्ये नाश होऊ नये तर त्याला स्वर्गाचे राज्य प्राप्त व्हावे , सार्वकालीन जीवन प्राप्त व्हावे
फिलिप्पैकरांस पत्र 2:9-11
ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
No comments:
Post a Comment