Sunday, 27 October 2019

पापक्षमा येशूची वचने

पापक्षमा येशूची वचने :-

1) मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’
            1 पेत्राचे 4:8

2) पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’
             1 पेत्राचे 2:9 

3) तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता;
              इफिसकरांस पत्र 2:1 

4) कारण बैलांचे व बकर्‍यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.
                 इब्री लोकांस पत्र 10:4 

5) परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.
                    यशया 1:18 

6) जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.  आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही.
                   1 योहानाचे 1:9‭-‬10 


7) पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.  आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही.
                     1 योहानाचे 1:7‭-‬8 

8 ) तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.
                    यशया 44:22 

9) हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.  मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.
                   स्तोत्रसंहिता 51:1‭-‬2 

10) तो आपण केलेली सर्व पातके लक्षात आणून वळेल तर तो खातरीने वाचेल, मरायचा नाही.
                   यहेज्केल 18:28 

11) प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, ह्यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हांला अडथळा होणार नाही.
                   यहेज्केल 18:30 

12) कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.”
                 इब्री लोकांस पत्र 8:12 



13) ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य!  ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!
                   स्तोत्रसंहिता 32:1‭-‬2 

14) मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; “मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन” असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. (सेला)
                    स्तोत्रसंहिता 32:5 

15) जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
                     1 योहानाचे 1:9 

16) कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणार्‍याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही; तर मागे फिरा व जिवंत राहा.
                 यहेज्केल 18:32 

17) खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.
                     यशया 53:5 


18) आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.
                  यशया 53:6 

19) त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्‍यांपुढे गप्प राहणार्‍या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही.
                   यशया 53:7 

20) पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.
                    स्तोत्रसंहिता 103:12 



21) नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली.
                    स्तोत्रसंहिता 40:2 


22) तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’
                    1 पेत्राचे 1:19 

23) कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.”
                     इब्री लोकांस पत्र 8:12 

24) आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.  परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.
                    योएल 2:13‭-‬14 


तरुणासाठी वचने

तरुणासाठी वचने :-

1) हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.  ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.
                    उपदेशक 11:9‭-‬10 

2) आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.
                      उपदेशक 12:1 



3) तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.
                  स्तोत्रसंहिता 119:9 

4) तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.  ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजीत होणार नाहीत.
                स्तोत्रसंहिता 127:4‭-‬5 



5) कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्‍यांचा कित्ता हो.  मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्यांकडे लक्ष ठेव.
                    1 तीमथ्याला 4:12‭-‬13 

6) तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्‍यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.
                    2 तीमथ्याला 2:22 



7) म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.  देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.
                    रोमकरांस पत्र 12:1‭-‬2 

8) म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.  देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.
                     रोमकरांस पत्र 12:1‭-‬2 

9) कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”
                    1 पेत्राचे 1:16 


10) पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’
                      1 पेत्राचे 2:9 

11) कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत;  आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.
                  1 योहानाचे 2:16‭-‬17 



12) मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.
                         स्तोत्रसंहिता 32:8 

13) तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
                स्तोत्रसंहिता 119:105 

14) मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो; मला साहाय्य कोठून येईल?  आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.
                     स्तोत्रसंहिता 121:1‭-‬2 

15) तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
                  स्तोत्रसंहिता 119:18 



16) जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य!  जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य!
                 स्तोत्रसंहिता 119:1‭-‬2 


17) जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही,  तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.
                   स्तोत्रसंहिता 1:1‭-‬2 


18) जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो;
                      याकोबाचे पत्र 1:5 


19) तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत; तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही.
                      नीतिसूत्रे 4:12 



Friday, 25 October 2019

आशीर्वाद उशिरा मिळण्याची कारणे

शास्त्रभाग :- योहान 5 : 1, 8

विषय       :- आशीर्वाद उशिरा मिळण्याची कारणे

प्रस्तावना  :-

         परमेश्वराला आपल्याला भरपूर आशीर्वाद द्यायचे आहे . कारण परमेश्वराला आशीर्वाद द्यायला आवडतात . आशीर्वाद म्हणजे आपल्या प्रश्नाची सुटका . आपल्याला असे वाटते की जेव्हा आपण देवाकडे येतो तेव्हा आपले सर्व प्रश्न सुटावे . परंतु कित्येक वेळा वर्षानुवर्षे एकच अवस्था असते . आम्ही ज्या नियमाने चालतो त्या नियमाने चालत असताना तरीपण आपले प्रश्न सुटत नाही , आपल्या समस्या सुटत नाही . कधीकधी आपल्यासमोर लोक बरे होऊन जातात , आपल्यासमोर लोकांना नोकऱ्या लागतात , आपल्यासमोर अनेक लोकांचे प्रश्न सुटले जातात . परंतु काही आपल्या जीवनाकडे पाहत असताना , परमेश्वर आपल्या प्रश्नाची सुटका करत नाही ? देवाचे लक्ष आपल्याकडे नाही का ? परमेश्वराचे अंतकरण आपल्या संबंधाने कठोर झाले का ? अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या जीवनामध्ये आपण शोधत असतो . आणि कधी कधी जीवनात हाताश , निराश होऊन परमेश्वरावरचा विश्वास सोडून देतो . परमेश्वर माझ्या विश्वासाला खरा उतरला नाही . ज्या गोष्टी आपण पहिल्या केल्या पाहिजे त्या नाही करतो म्हणून आपल्या उत्तराला विलंब लागतो . आपली जी अवस्था आहे त्या अवस्थेतून बाहेर यायला तयार नाही . म्हणून आपल्याला आशीर्वादाला विलंब , उशीर लागतो .

          पवित्रशास्त्रामध्ये 38 वर्षे एका व्यक्तीला आशीर्वादाची वाट पहावी लागली . ती व्यक्ती प्रत्येक प्रोसेस मध्ये जाऊन पोहोचली आहे . जिथे जायला पाहिजे तेथे तो गेला आहे . हे जेथे थांबायला पाहिजे तेथे तो थांबला आहे .  38 वर्ष त्याच्या जीवनात अनेक लोक बरे होऊन गेले . परंतु 38 वर्षे या व्यक्तीला वाट पहावी लागली .

  आज आपण पाहणार आहोत की , आपल्या जीवनात आशीर्वाद लवकर मिळण्यासाठी काय केले पाहिजेत ?
    
    38 वर्षे वाट पाहणारा , 38 वर्षे झगडणारा , 38 वर्षे एकाच प्रश्नामध्ये अडकून पडलेला ,  जगामध्ये प्रति व्यक्तीच्या जीवनात महान महान कार्य घडत आहे . मग आपल्या जीवनात चमत्काराला विलंब का करावा  ? आपण आपल्या समस्यामध्ये वर्षानुवर्ष अडकून का पडावे ? आपल्याला नाही वाटत का देवाचा अभिषेक आपल्यामध्ये असावा . मला नाही वाटत की देवाचा सामर्थ्य माझ्यामध्ये असावं . आपल्याला नाही वाटत की आपल्या परिवारामध्ये आनंद असावा . आपल्याला नाही वाटत कि आपल्या परिवारामध्ये शांती असावी , भरपूरी असावी . परंतु या सर्व गोष्टी येण्यासाठी विलंब लागतात . काही गोष्टीचे दडपण आपल्या जीवनामध्ये होते म्हणून आशीर्वादाला विलंब लागतो , ते अशिर्वाद आपल्या जवळ येण्यास वेळ लागतो .

योहान 05:01, 08 


    38 वर्षे या व्यक्तीला चमत्काराची वाट पहावी लागली .  आणि त्याच्या चमत्काराला अडतीस वर्षे विलंब लागल्याचे कारण येशूने त्याला विचारलेला प्रश्न . तुला बरं होण्याची इच्छा आहे काय ? परमेश्वर आपल्या इच्छेशिवाय जीवनामध्ये चमत्कार करणार नाही . चमत्कारासाठी आपल्या जीवनात इच्छा असावी . जर इच्छा असेल तर धडपड करावी लागते .
  वचन सांगते  की , येशूने त्याला बरेच वर्षे पडलेले पाहिले . जोपर्यंत आपण पडलेले अवस्थेत असतो , तोपर्यंत देव आपल्याला पहात नसतो . आपली अवस्था समजली पाहिजे . आपण कोठे पडलेलो आहोत , आपण प्रार्थनेत पडलो का कि ,  विश्वासांमध्ये कमी पडलो की , पवित्रतामध्ये कमी पडलो की , शुद्धतामध्ये कमी पडलो की , सेवेमध्ये कमी पडलो आपण कोठे कमी पडलो . ज्या ठिकाणी आपण कमी पडलो असेल ज्या ठिकाणी आपण कमतरतेत पडू नये . आपला आशीर्वाद , आपला चमत्कार तेवढा लांब जाईल .



वचन तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता.


तो बरोबर त्यामार्गे गेला  . त्याने शोर्टकट निवडला नाही . मेंढरे दरवाजा , या दरवाजाने मेंढरे आत जायचे तो दरवाजा . मेंढरे दरवाजा कोणता ? तर माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात . मेंढरा मध्ये लीनता आहे , नम्रता आहे . चमत्कारासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये नम्रता , लीनता असावी लागते . नम्रता , लीनता म्हणजे माघार घेणे . जर माघार घेण्याची वृत्ती आमच्यामध्ये नसेल तर आपला चमत्कार 38 वर्ष दूर जाणार आहे . परंतु ही व्यक्ती नम्र होऊन त्या दरवाज्याजवळ गेली आहे . देवासमोर नम्र व्हा , एकमेकासमोर नम्र व्हा . आपल्या जीवनामध्ये कधी कठीणपणा येऊ देऊ नका . आपले हृदय  कठीण जेवढे बनणार तेवढा चमत्कार लांब जाणार आहे . आपल्या अंतःकरणाला मृदू ठेवा . आपल्यातील कठीणपणा जाणे गरजेचे आहे . आपल्या जीवनातला कठीपणा गेला नाही तर प्रभूची इच्छा असेल तर ते प्रभू करणार नाही . कारण प्रभूला कठोर  हृदय , हेकेखोर हृदय सर्व प्रकारच्या घाण गोष्टींनी भरलेले आशा हृदयांत परमेश्वर चमत्कार करत नाही . म्हणून  येशू त्या व्यक्तीला म्हणाला एवढी वर्षे का पडलेला आहेस . किती दिवस आपण अशाच अवस्थेत पडलेलो आहोत . देवाचे वचन आपल्याशी बोलले आहे , देवाच्या वचनाने आपली भेट घेतली आहे . परंतु जसे माझ्या हृदयाने त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे , पवित्रशास्त्र प्रतिसाद द्यायला पाहिजे माझे ते दिले नाही . अंतकरण मृदू बनावं देवाचे वचन ग्रहण करण्यासाठी मृदू बनावं . मेंढरे दरवाजातून आत जाणे माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात . मेंढरे दरवाज्यातून आज जाणे म्हणजे नम्रता धारण करणे . कुणीही प्रभूला नम्रतेशिवाय प्राप्त करून घेऊ शकत नाही . चमत्काराचा अनुभवायचा असेल तर नम्र होणे गरजेचे आहे . बायबल सांगते ,  आधी नम्रता मग मान्यता . देव कधी मान्यता देतो , जेव्हा आपण नम्र बनतो . आपल्यामध्ये गर्व , अहंकार , फुशारकी , हेकेखोरपणा , ताठरपणा , कठीणपणा आपल्यामध्ये असेल तर आपला चमत्कार आपल्यापासून दूर असणार आहे .

यरुशलेमेत मेंढरेदरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत.

योहान 5:2 



   मेंढरे दरवाजाजवळ तो गेला आहे  . तो तेथे बरोबर त्या ठिकाणी गेला . त्या तळेचे नाव काय ? बेथेसदा कृपेचे घर . आपण देवाकडे येतो देवाला म्हणतो मला कृपे खाली घे . बायबल सांगते , परमेश्वर ज्या वर कृपा करायची त्यावर तो कृपा करतो . परमेश्वर कोणाला कृपा  करतो , आपण रडलो म्हणून कृपा करतो का ?  38 वर्षे तो त्या कृपेत पडलेला आहे त्याचा नावाचा उल्लेख नाही . का बरं ? या व्यक्तीमध्ये असणारी कमतरता . प्रत्येक व्यक्तीचे नाव घेतले आहे रक्तश्रावी स्त्री , याईराची कन्या ,  विधवा स्त्री , शतापती चाकर , जक्कय , मार्था यांचा उल्लेख केला आहे . पण अडतीस वर्षे दुखणेकरी व्यक्तीचा उल्लेख केला नाही . का बरं ? त्याला कारण आहे की कृपाच्या घराकडे तो आला आहे . देवाने कृपा करावी म्हणून यासाठी जी क्रिया करावी ती त्याने केली नाही . देवाच्या मंदिरात आलो आपण आणि म्हटलं देवा माझ्यावर कृपा करा आणि देव कृपा करेल असे नाही . या भ्रमात राहू नका . परमेश्वराची कृपा होण्यासाठी फार कष्ट करावे लागते .



उदा . मोशे


      मोशे यावर परमेश्वराची कृपा होती . का ? परमेश्वर म्हणतो भूतलावर सर्वात नम्र व्यक्ती मोशे आहे .  सर्वात जास्त नम्र व्यक्ती मोशे .  नम्रता ही देवाची कृपा होण्याची पायरी आहे . मेंढरे दरवाजातून जाताना जसे मेंढरे खाली मान घालून जातात तसे देवासमोर आपण खाली मान घालून चालावे . इस्राएल लोकाबाबत परमेश्वर म्हणतो हे ताठ मानाचे लोक आहेत , हे माझ्या विसाव्या येणार नाही . आपल्यामध्ये अहंकार असेल , माघार घेण्याची वृत्ती नसेल माझ्या विसाव्यात येणार नाही . विसावा म्हणजे काय आमच्या प्रश्नातून सुटका . देवाची कृपा येण्यासाठी आपल्या जीवनाचे परिवर्तन करून घेणे , स्वतःमध्ये बदल करून घेणे , स्वभाव मध्ये बदल करून घेणे . अडतीस वर्षे व्यक्ती , 38 वर्षे  कृपेखाली बसला आहे पण 38 वर्षे त्यांच्या स्वभावामध्ये बदल झाला नाही . 38 वर्षे तो तिथेच बसला परंतु त्याला देवाची कृपा मिळाली  नाही . का मिळाली नाही . देवाला सर्वांवर कृपा करावी वाटते , सर्वांवर दया करावी वाटते पण का करत नाही , तर पवित्र शास्त्रात सर्वात मोठे कारण सांगितले आहे ते म्हणजे सर्वांनी पाप केले आहे देवाच्या गौरवाला उणे पडले आहे . जर आपल्यामध्ये पाप असेल तर देवाची कृपा नाही . कृपा म्हणजे परमेश्वराचा गौरव . जर परमेश्वराची कृपा झाली तर परमेश्वराचा गौरव झाला . देवाच्या गौरवाला आपण उणे पडू नये , त्याला अंतरता कामा नये . आपण पाप केले तर देवाचे गौरव , देवाची कृपा निघून जाणार आहे .





उदा .मोशे


मोशे चाळीस दिवस-रात्र रात्र पर्वतावर होता आणि तो मोशे पर्वतावरून खाली आल्यावर लोक त्याला पाहू शकत नव्हते . त्याच्या  चेहर्‍यावर तेज होते . मोशेने आपल्या मुखावर आच्छादन टाकले होते पण जसेजसे लोकांमध्ये राहात असताना , लोकांचे प्रश्न हाताळताना मोशेचे तेज नाहीसे होत गेले , एवढा मोठा सेवक त्याच्या चेहर्‍यावर किरणे बाहेर पडत होती पण लोकांनी त्याचे तेज काढून घेतले . आमची संगती आमच्या चेहऱ्याचे तेच काढून टाकते . 38 वर्षे व्यक्ती हा कृपेच्या घरात होता , तेथे त्याला कृपा झाली नाही .

वचन  :- कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे 

योहान 5:4 

        परमेश्वर कधी चुकत नाही . परमेश्वर वेळोवेळी चमत्कार करतो . वेळोवेळी परमेश्वर त्याच्या लोकांची भेट घेतो . परमेश्वर त्याची वेळ चुकत नाही . पाणी हलत पण माझी इच्छा नाही त्या पाण्यात पडावे . येशू त्याला विचारतो तुला बरे होण्याची इच्छा आहे काय ? तो म्हणतो मला सोडणारे कोणी नाही ही हे सबब नही .  मला वाटतं 38 वर्षे ती व्यक्ती कोणाला म्हटला असता मला नेऊन टाकावं , हात जोडले असते , विनंती केली असती तर कोणीतरी टाकलं असतं . त्याने एखाद्याच्या पायाला धरलं असतं तर तो पाण्यात गेला असता . पण त्याला 38 वर्षे चमत्कार पाहण्यात रस होता . तुम्ही चमत्कार पाहणारे बनू नका तर चमत्कार अनुभव घेणारे बना . चमत्कारामध्ये तुमचा भाग असावा , साक्ष असावी . तुमच्या जीवनामध्ये प्रभूने माझ्या जीवनात कार्य केले आहे , तुमचेही साक्षीची जीवन बनले पाहिजे .

वचन :- त्यांमध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. [ते पाणी हलण्याची वाट पाहत असत;

योहान 5:3 

    तेथे असे म्हटले आहे  लुळे , आंधळे , लंगडे , पांगळे , रोगी नाना प्रकारचे लोक तेथे होते . आणि प्रत्येक व्यक्ती पाणी हल्ले की त्या पाण्यात उतरत होते . लक्षात ठेवा पाणी कोणाची वाट पाहणार नाही . जो पर्यंत पाणी हालते तोपर्यंत उडी मारायची . पाणी हल्ल्यावर जी व्यक्ती पाण्यात उडी मारेल , ती व्यक्ती पाण्यात पडेल बरा होईल . जी व्यक्ती त्या पाण्यात जाईल ती अभिषेकाने भरला जाईल . जी व्यक्ती त्या पाण्याचा येईल त्या पाण्याचे सत्व त्याला येईल . जी व्यक्ती त्या पाण्यात उतरेल तीच व्यक्ती परमेश्वराची कृपा मिळविल .  परंतु जी व्यक्ती ती पाणी हललेले पाहून सुद्धा आणि त्याची इच्छा नाही पाण्यामध्ये उतरावे , ज्याची इच्छा नाही त्याला परमेश्वर कुठल्याच बाबतीत सक्ती करत नाही . परमेश्वर म्हणतो जीवन-मरण आशीर्वाद व शाप सर्व तुझ्यासमोर ठेवलेले आहे . निवड करणे आपल्या हातात आहे . परमेश्वर त्या पाण्यात उतरण्याची सक्ती करत नाही परंतु तो लोकांसाठी पाणी हलवतो ज्यांना पाण्यामध्ये उत्तराचे आहे परंतु मला बरे होण्याची इच्छा आहे काय ? येशुनी विचारले तुला बरे होण्याची इच्छा आहे काय ? तुम्हाला बरे होण्याची इच्छा नाही तर या जगात कोणीच तुम्हाला बरे करू शकणार नाही .



उदा . रक्तस्त्रावी स्त्री

      तीची इच्छा होती बरे होण्याची . तीने येशूच्या गोंडेला स्पर्श केला . तुमची इच्छा आहे ना त्या अवस्थेत त्याला स्पर्श करा . जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत राहणार आहे . देवाला त्याच अवस्थेत  राहणारे लोक आवडत नाही . तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे , तुमच्यामध्ये प्रगती दिसली पाहिजे .

वचन :- [ते पाणी हलण्याची वाट पाहत असत;

योहान 5:3 

       ते लोक डोळ्यात तेल घालून पाणी हलण्याची वाट पहात होते .

उदा . एलिया व अलिशा


        एलिया अलिशाला म्हणाला तू जर मला स्वर्गात जाताना पाहशील तर तुला दुप्पट आशीर्वाद , अभिषेक प्राप्त होईल . म्हणून आपले स्वामी जाणार आहे म्हणून त्याचा डोळा लागत नव्हता , त्याची नजर नेहमी आपल्या स्वामी वर होती , तो आपल्या स्वामी वर लक्ष देऊन होता , स्वामीला जाताना पाण्याची त्याला उत्कंठा लागली होती . त्याचे सर्व लक्ष आपल्या स्वामीकडे लागलेले होते . अभिषेक सहज मिळवता येत नाही , अनमोल गोष्टी सहज मिळत नाही , त्याचे लक्ष विचलित झाले नाही .
   
       आपले लक्ष विचलित करणारे या जगात अनेक गोष्टी आहेत , असंख्य गोष्टी आहेत . आपला अभिषेक , आपले पाचारण , परमेश्वराचे सामर्थ्य , आपले आरोग्य , आपला आनंद आपल्याकडे टिकून राहू नये म्हणून विचलित करणारे असंख्य गोष्टी आपल्या जीवनात येतात . जर आपले लक्ष विचलित झाले तर जी कृपा , अनुग्रह आपल्याला मिळणार आहे ते अनुग्रहकडे आपले दुर्लक्ष होणार आहे आणि त्याच ठिकाणी आपली कृपा दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार आहे , त्या दुसऱ्या व्यक्तीला मिळणार आहे . लक्षात ठेवा आपल्याला कृपा मिळाली पाहिजे . म्हणून खबरदारी घेतली पाहिजे .


वचन :- त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.

योहान 5:4 


     38 वर्षे व्यक्तीला पाणी पाण्याचा हलण्याचा टायमिंग माहिती होता परंतु तो टायमिंग चुकला . देवाला चमत्कार करायचा पण आपण चुकतो आणि आशीर्वाद दुसरे घेऊन जातात .

उदा . मोशे , अहरोन , कालेब हे तिघेही बरोबर चालले . मोशेनंतर अहरोन आला . कारण त्यांनी टाइमिंग बरोबर साधला आणि इस्राएल लोकांचा टाइमिंग  चुकला . 38 वर्षे व्यक्ती चुकला आणि दुसऱ्याच बरा होऊन जात होता .



वचन :-  मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्याआधी उतरतो.”

योहान 5:7 


        या जगात आपल्या बरोबर कायमस्वरूपी सोबती राहणारे कोणीच नाही . त्या मनुष्याला कुणीतरी आणून सोडत असेल कारण तो पंगू होता . बरेच दिवस तो सोबत राहिला असेल पण तो सोडून गेला असेल . म्हणून मनुष्यावर भिस्त ठेवू नका . परमेश्वर अवलंबून रहा . परमेश्वरावर विश्वास ठेवणारा व्यक्ती कधीच निराश होत नाही . व्यक्तीवर अवलंबून राहणाऱ्या व्यक्ती अडतीस वर्षे तसाच राहतो .

     एकाच अवस्थेत राहिल्याने येशूला राग येतो . निराश तर निराश आनंदी तर आनंदित आणि सारखी माघारी जाणारी वृत्ती  . किती काळ आपण या अवस्थेत असणार आहोत , किती काळ आपले मन अविश्वासाच असणार आहे , किती काळ आमचे अंतकरण कठीण असणार आहे , किती काळ आमचं अंतकरण द्वेषाने , रागाने भरलेले असणार आहे ,  प्रभुचे वचन स्वीकारण्याची , त्याला प्रतिसाद देण्याची , त्याच्याविरुद्ध बंड करण्याचे अंतकरण असणार . परमेश्वर त्या अवस्थेत पाहतो तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात परमेश्वर तुम्हाला पाहतो .



उदा . दानियल


   दानियल या व्यक्तीला सिंहाच्या गुहेत टाकल्यावर त्याची अवस्था परमेश्वराने पाहिली .



उदा . बंदी शाळेमध्ये पेत्र असताना त्याची अवस्था परमेश्वरने पाहिली .

उदा . दाविद राजा ज्यावेळेस गच्चीवरून फिरत असताना परमेश्वराने त्याची अवस्था पाहिजे त्याचा परिणाम तलवार तुझा पिच्छा सोडणार नाही .

     परमेश्वराला  वाटते या अवस्थेतून आपण बाहेर यावे . आपली अवस्था बदलावी जर आपण प्रार्थनेमध्ये कमी अवस्थेत असेल तर पुन्हा त्या प्रार्थनेच्या अवस्थेत वाढावं .  विश्वासाच्या अवस्थेत कमी झालो असेल तर पुन्हा विश्वासात वाढव .

     माझा कोणी माणूस नाही . तुम्ही म्हणाल हा माझा , तो माझा तेव्हा तुम्ही निराश व्हाल . जेव्हा तुम्ही कबूल कराल येशूकडे माझा कोणीच नाही तेव्हा येशू तुमचा खास माणूस बनाल . तुमच्या जवळचे सर्व सोडून जातील पण विश्वासाचा माणूस म्हणतो युगाच्या समाप्ती पर्यंत मी तुमच्याबरोबर आहे .  तो तुम्हाला सोडणार नाही , टाकणार नाही कारण त्याचं नाव इमानुएल आम्हाबरोबर देव आहे .

वचन  :- येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”

योहान 5:8 


     माझा कोणी माणूस नाही , माझा कुणी डॉक्टर नाही ,  माझा कोणी मुलगा नाही , मला कोणती मेडिसिन नाही हे कबूल करायचे आहे तेव्हा येशू म्हणतो , आपली बाज घेऊन चालू लाग . एका शब्दाच्या द्वारे तुमची अवस्था बदलली जाईल . येशुमध्ये बाज बदलण्याचे सामर्थ्य आहे . ज्या दिवशी तुम्ही बोलणार आहे त्या दिवशी तुमच्या जीवनात आनंद फुलणार आहे . तुला बरे व्हायचे आहे ना आता येशू आला आहे . तुझ्या समोर जे बरे झाले ते विसरून जा , आता येशू आला आहे . आता पाण्याची गरज नाही , तुला व्यक्तीची गरज नाही , कारण येशु आला आहे . तुला कुठल्या आधाराची गरज नाही , कारण येशू आला आहे . म्हणून आज सूटका नक्की आहे . सुटका देण्यासाठी येशु आला आहे . आज मी बरा होऊन जाणार आहे . येशु स्वतः ते तळे आहे आणि येशु स्वतः  तुमच्याकडे आला आहे . अहो तान्हेल्यानो तुम्ही मजकडे या  .



उदा . शोमरोनी स्त्री :-


       ज्यावेळेस या स्त्रीने पाणी मागितले तेव्हा तिला येशु म्हणाला ,  पाणी का मागते जीवन मागितले असते ते दिले असते ?



आपल्या जीवनामध्ये प्रगती दिसली पाहिजे . आपली अवस्था बदलली पाहिजे . आपले लक्ष त्या परमेश्वराच्या वचनाकडे लागले पाहिजे . कारण परमेश्वर आपल्या जीवनात चमत्कार करणारा , कार्य करणारा परमेश्वर आहे . ज्यावेळेस आपण आपली अवस्था बदलू त्या वेळेस परमेश्वर आपला आशीर्वाद करणार आहे .

Monday, 14 October 2019

प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य कोणत्या प्रकारे मरण पावले

प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य कोणत्या प्रकारे मरण पावले :-


1) योहान :- 

         उकळत्या तेलामध्ये टाकण्यात आले परंतु परमेश्वराने त्याला वाचवले नंतर पटमुस टापू निर्वासित करून फक्त तेथे नैसर्गिक मरण पावला



2) मत्तय :-

     इथोपियामध्ये तलवारीने कापून टाकल्या च्या द्वारे मरण पावला

3) मार्क :-

 अलेक्झांड्रिया मध्ये रस्त्यावर ओडून तोडून मरण पावला

4) लुक :-  

ग्रीस शहरांमध्ये जैतूनाच्या झाडाला दोरी बांधून मरण पावला


5) पेत्र  :- 

    रोम शहरांमध्ये वधस्तंभावर उलटा टांगुन मारण्यात आले.        ( इ . स 60 )


 6) याकोब :-

       उंचावरून ढकलून दिले आणि मरेपर्यंत तलवारीने मारले 
      ( इ . स 44 )



7) बर्थलमय :- 

जीवित अवस्थांमध्ये पूर्ण शरीराची कातडी काढल्याने मरण पावला




8) अंद्रिया :-

 वधस्तंभावर बांधून टाकले त्यावर त्याने मरेपर्यंत घोषणा केली आणि आपला प्राण दिला


9) यहूदा  ( तद्य ) :-

       मासेदोनियामध्ये धोंडे मारून मरण पावला
( इ . स 50 )



10) मत्तीया  :-

पहिले धोंड्याने मारले आणि मुंडके कापून टाकले


11) पौल :-

    सम्राट नीरोच्या द्वारे रोम शहरात मुंडके कापल्याच्या द्वारे मरण पावला



12 ) थोमा :- 

    भारतात चेन्नईमध्ये भाल्याचे द्वारे मरण पावला
     ( इ .स 49 )



13) फिलीप्प :- 

 इजिप्तच्या तुरुंगामध्ये लोखंडाच्या हुकाला लटकुन त्याला मारण्यात आले 
( इ . स 80 )

14) शिमोन कनानी :-

इंग्लंड मध्ये क्रुसावर मरण दिले



15)   (येशूला) धरून देणारा यहूदा इस्कर्योत :

  याने येशूला तीस रुपयांमध्ये विकून दिले नंतर त्याला पश्चाताप झाला आणि यरुशलेमच्या बाहेर जाऊन त्याने स्वतःला फाशी  लाऊन घेतली


Sunday, 13 October 2019

चिंता व काळजीविषयी येशूचे वचन

 चिंता व काळजीचे वचन :-

1) तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण   परमेश्वराला शरण जाणार्‍यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची   वाण पडत नाही.
                        स्तोत्रसंहिता 34:10 

2) परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार     नाही.
                       स्तोत्रसंहिता 23:1 

3) आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर   भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.
                     स्तोत्रसंहिता 37:5

4) परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर,   म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल;   दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.
                    स्तोत्रसंहिता 37:34 

5) जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी   चालतो तो धन्य!  तू आपल्या श्रमांचे फळ खाशील; तू सुखी   होशील, तुझे कल्याण होईल.
                    स्तोत्रसंहिता 128:1‭-‬2




6) तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न     खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल   ते  झोपेतही देतो.
                   स्तोत्रसंहिता 127:2 

7) लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे      परमेश्वराकडे असते.
                 नीतिसूत्रे 21:31

8) कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी     प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी     देवाला कळवा.
                फिलिप्पैकरांस पत्र 4:6 


9)  म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी     की, त्याने योग्य वेळी तुम्हांला उंच करावे.  
                  1 पेत्राचे 5:6‭

10) त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो     तुमची काळजी घेतो.
                  1 पेत्राचे 5:‭7




11) कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा   तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा!   बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा   तुम्हांला  मिळाला आहे.
                   रोमकरांस पत्र 8:15 

12) परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती   करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना   देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.
                 रोमकरांस पत्र 8:28 

13) ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त   करील?  क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा  तलवार ही विभक्त करतील काय?
                रोमकरांस पत्र 8:35 

14) आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे;   तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने   की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
               करिंथकरांस दुसरे पत्र 8:9 

15) तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व   मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी   तुम्हांला मिळतील. 
                      मत्तय  6:33

 16) ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता     उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.
                     मत्तय 6:34 

17) प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही     अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो   जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो   त्याच्यावर आशा ठेवावी.
                 1 तीमथ्याला 6:17 



Thursday, 10 October 2019

विजयशाली ख्रिस्ती जीवन

शास्त्र भाग :- लुक 5 : 1 ,11

 विषय :- ख्रिस्तातील विजयशाली जीवन

 प्रस्तावना :-

      प्रभू येशूच्या काळामध्ये गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी ही घटना घडली आहेत . पेत्र सारी रात्र कष्ट करून एकही मासा त्याच्या हाती लागला नाही . तो निराश , खिन्न , हताश झाला होता . परंतु त्याने येशुकडे पाहिले आणि त्याला भरपूर मासे हाती लागले . ही घटना पेत्राच्या जीवनामध्ये , अंतकरणामध्ये नव्याने घडली .
          आजही सैतान आपल्या जीवनामध्ये निराशा , खिन्नपणा , दुःख आणण्याचा प्रयत्न करीत आहे  . परंतु आपण प्रभू येशूकडे पाहिले पाहिजे . पेत्राच्या जीवनात , अंतःकरणामध्ये घडलेली ही घटना आज आपल्या जीवनामध्ये  , अंतःकरणा मध्ये नव्याने पुन्हा घडणार आहे .



मग आपल्या जीवनामध्ये , अंतरकरणामध्ये ही घटना कशी घडणार आहे

यासाठी आपण वचनाचा काही भाग पाहू :-

वचन 3 :-  येशू पेत्राच्या मचवा मध्ये बसला

        मचवा आपले जीवन रुपी तारुचे प्रतीक आहे . येशू पेत्राच्या मचव्यामध्ये आला . त्याचप्रमाणे प्रियानो येशूला आमच्या जीवनामध्ये यायचे आहे . तेथे दुसरा मचवाही होता परंतु प्रभू येशूला पेत्राचा मचवा आवडला . पेत्राची निवड केली , आज अनेक लोक आहेत परंतु येशु ते आवडले नाहीत परंतु आपण येशुला आवडलेलो आहोत ,  येशूने आपली निवड केली आहे .
तिथे पेत्राने येशूला आपल्या मचव्यात जागा दिली . (प्रकटीकरण 3 : 20 ) येशू आज आता आपल्या अंतकरणात , हृदयाचा दरवाजा ठोकीत आहे . त्याच प्रमाणे आपणही येशूला आपल्या जीवनामध्ये , हृदयामध्ये , अंतकरणयामध्ये  जागा दिली पाहिजे . माशांचा घोळका घेण्यापूर्वी ( माशाचा घोळका म्हणजे आशीर्वाद ) येशूने शिक्षण दिले . त्याचप्रमाणे आपल्याला जगिक आशीर्वाद येण्याअगोदर येशु आपल्याला आत्मिक शिक्षण ,  स्वर्गीय ज्ञान तो देईल .



वचन 4 :- येशु पेत्राला मचवा खोल पाण्यात घेऊन जाण्यास सांगत आहे

      जर आपल्याला देवापासून आशीर्वाद पाहिजे असेल तर आपला मचवा खोल पाण्यात म्हणजे आपले जीवन विश्वासाच्या , पवित्रतेच्या , प्रार्थनेच्या , वचनाच्या , देवाच्या सहभागीतेच्या खोल सागरात आपले जीवनाचे तारू हाकरले पाहिजे  . म्हणजेच आपण देवाच्या विश्वासात , पवित्रतेत , प्रार्थनेत , वचनात आणि देवाच्या सभागीतेत आपण वाढलो पाहिजे .

वचन 5 :- पेत्र येशूला म्हणत हे सारी रात्र कष्ट करून आम्हाला काही मिळाले नाही

   पेत्राच्या जीवनात येशूला महत्त्व नव्हते . त्याने येशूचा स्वीकार केला नव्हता . म्हणून सारी रात्र कष्ट करून काहीच मिळाले नाही . त्याच प्रमाणे जर येशू आपल्याबरोबर नसेल ,  त्याचा स्वीकार केला नसेल तर  रात्रंदिवस कितीही कमावले तरी आपल्याला काहीच मिळणार नाही . येशूला आपल्या जीवनात महत्त्व नसेल तर येशूशिवाय आपण काहीच करू शकत नाही .


वचन 5 व्याच्या शेवटी पेत्र म्हणतो तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो

याचे दोन आध्यात्मिक अर्थ आहेत

1) आज्ञापालन :-

       तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो येथे पेत्राने  आज्ञापालन केले . त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आपण येशूचे आज्ञापालन केले पाहिजे , येशूची वाणी ऐकली पाहिजे , येशूच्या वचनाप्रमाणे चाललो पाहिजे , येशूचा शब्द ऐकला पाहिला पाहिजे  . वचन सांगते तसं शब्द पाहिल्याने देव संतुष्ट होतो तसा होमाने व यज्ञाने होत नाही . म्हणून आपण आज्ञापालन केले पाहिजे .

 

2) प्रतिकूल परिस्थितीमध्ये येशूवर विश्वास ठेवणे

1) पेत्राला समुद्राचा आढावा पूर्ण होता ,
2) पेत्राला समुद्राचा पूर्ण अभ्यास होता ,
3) समुद्रावरील वातावरण , तेथील परिसर त्याला माहीत होते 4) पेत्र रात्रभर कष्ट करून थकला होता .
5) येशु कोळी नव्हता , येशूला मासे धरताना कधीच कुणी          पाहिले नव्हते .
6) तरीही पेत्राने येशूवर विश्वास ठेवला आणि जाळी           टाकायला  तयार झाला .

       एखाद्या असा म्हणतो की मला पूर्ण माहिती आहे , सारी रात्र कष्ट केले तरीही मासा हाती लागला नाही आणि येशु म्हणतो येथे जाळी टाक .पेत्र रोज मासे धरणारा होता . परंतु पेत्राने मनात शंका न धरता त्याने येशू वर विश्वास ठेवला आणि त्याने जाळी खाली टाकली .

      त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आशीर्वाद मिळण्याअगोदर आपण आज्ञापालन केले पाहिजे , देवाचा शब्द ऐकला पाहिजे , देवाच्या वचनाप्रमाणे चाललो पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनातील समस्यात ,अडचणीत ,  दुःखात आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीवर आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे .

वचन 6 :- त्यांना भरपूर मासे मिळाले

       पेत्राने येशूच्या सांगण्यावरून पाण्यात जाळी सोडली म्हणजे पेत्राने येशूचा शब्द ऐकला , आज्ञापालन केले . पेत्र हा खिन्न होता , दुःखी होता , निराश झाला होता तरीही या परिस्थितीत पेत्राने येशूवर विश्वास ठेवला आणि त्याला भरपूर मासे मिळाले .




      त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आपण येशूच्या वचनाप्रमाणे आज्ञापालन केले पाहिजे आणि कोणतीही समस्या , अडचणी , दुःख , निराशा , हाताश असो अशा परिस्थितीत आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे तेव्हा आपल्याला विपुल मासे म्हणजे विपुल आशीर्वाद मिळतो .


वचन 7 :-

1) जाळ्यामध्ये भरपूर मासे सापडले

2) दुसऱ्या मचाव्यातील लोकांना मासे गोळा     करण्याकरिता बोलाविले


आपण प्रभूमध्ये जीवन जगत असताना , आपण देवाचे आज्ञापालन केले , सर्व परिस्थितीत आपण येशूवर विश्वास ठेवला तर परमेश्वरापासून भरभरून आशीर्वाद मिळतो .जेव्हा आपण आशीर्वादाने भरतो तेव्हा त्या आशीर्वादाची साक्ष आपण इतरांना सांगितली पाहिजे , देवाने आपल्या जीवनात केलेल्या चमत्काराविषयी आपण इतरांना सांगितली पाहिजे .



कारण :-

1) आपली साक्ष इतरांना जीवन देऊ शकते
2) इतरांचे जीवन बदलू शकते
3) आपली साक्ष इतरांना देवाकडे घेऊन येतील
4) आपली साक्ष ते स्वर्गाच्या राज्याचे वाटेकरी होतील 5)आपली साक्ष  देवाच्या राज्यात अधिक आत्मे येतील 6)आपण जिवंत देवाची लेकरं आहोत हे आपल्या     साक्षीवरून  समजतील . बायबल  सांगते तुम्ही माझे   साक्षीदार आहात .

वचन 8:- पेत्र येशूचा पाया पडला

    पेत्राने येशूचे ऐकल्याने त्याला विपूल मासे मिळाले . यावरून येशूख्रिस्त हा सामर्थ्यशाली प्रभू आहे . हे  पेत्राच्या   लक्षात आले आणि तो येशूच्या पाया पडला .
  त्याचप्रमाणे आपणही येशूच्या चरणाजवळ आलो पाहिजे . त्याच्या दयासनाजवळ पाहिजे . त्याच्या सानिध्यात आलो पाहिजे . त्यासाठी आपण बायबल वचन वाचले पाहिजे , प्रार्थना केली पाहिजे . कारण देवाजवळ येणे यातच आपले हित व कल्याण आहे  .

वचन 8 च्या वचनाच्या  शेवटी :-

पेत्र म्हणतो प्रभुजी माझ्यापासून दूर जा , कारण मी पापी आहे याचे दोन अर्थ आहे .

1) पापाची कबुली

2) पेत्राने स्वतःची अवस्था ओळखली


       आपल्या जीवनात निराशा , दुःख , अडचणी , समस्या , आजार , व्याधी येण्याचे कारण हे आहे की ,  आपण सत्य स्वीकारत नाही आणि पेत्राने सत्य स्वीकारले . तो म्हटला हे येशू मी स्वार्थी आहे , मी पापी आहे हे त्याने स्वीकारले म्हणजेच त्याने प्रामाणिकपणे त्याने पापाची कबुली दिली . आणि येशूने हीच प्रामाणिकता पाहिली .

       जेव्हा मनुष्याला सत्य समजते तेव्हा प्रत्येक मनुष्य नम्र होतो आणि म्हणतो मी कोणीच नाही , मी मानव आहे , माझे विचार , माझे स्वार्थ , माझे कर्तृत्व , माझा अनुभव , माझी कला , माझे गुण , माझी हुशारी यांनी मी काहीच करू शकत नाही . फक्त येशु हे सर्वकाही तूच करू शकतो . तुझ्या सामर्थ्यापुढे मी नम्र होतो , लीन होतो , क्षमाशील , कनवाळू होतो . हे तेव्हाच कळते जेव्हा आपण वचन स्वीकारतो . हे सर्व वचनामुळे घडते  .




वचन 10 :- इथून पुढे तू माणसे धरणारा होशील

   
        येशु पेत्राला म्हणतो , मी तुला माणसे धरणारा बनवील . येशूची इच्छा आहे की आपण माणसे धरणारे बनलो पाहिजे . ज्या जाळेत माणसे धरणार आहोत ,  ते जाळे आहे प्रेमाचे , उन्नतीचे , अभिषेकाचे , सामर्थ्याचे , संयमाचे , आशीर्वादाचे , क्षमाशीलाचे ,  भरभराटीचे , सौख्याचे , आनंदाचे , शांतीचे , आरोग्याचे जाळे आहे . या जाळेत आपण स्वतःला अडकुया आणि इतरांसाठी , एकमेकांसाठी आशीर्वादाचे भाग ठरवूया  .


वचन 11 :- सर्व सोडून त्याचे अनुयायी झाले

   
       पेत्राने येशूला स्वीकारले , पेत्राने स्वार्थ सोडला ,  लोभ त्याग केला . त्याने पाप कबूल केले आणि सत्यता स्वीकारली देवाचा अभिषेक स्वीकारला , तो येशूच्या मागे चालू लागला .

        जर आपण येशूला स्वीकारले तर प्रथम स्वतःमध्ये बदल घडवून देवाचा अभिषेक स्वीकारला पाहिजे . आपल्यामधून स्वार्थ , लोभ सोडून येशूच्या मागे चाललो पाहिजे . येशूसाठी सिद्ध झालो पाहिजे . येशूच्या कार्य करण्यासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे .


अशाप्रकारे

1) आपण प्रभू येशूला आपल्या जीवनात , अंतकरणात , हृदयात घेतले पाहिजे
2) आपण विश्वासात पवित्रतेत , वचनात , प्रार्थनेत वाढलो     पाहिजे
3) आपण आज्ञापालन व प्रतिकूल परिस्थितीवर विश्वास   ठेवला पाहिजे
4) हे सर्व गोष्टी पाळणे विपुल आशीर्वाद प्राप्त होतील 5)आपल्या जीवनात घडलेली साक्ष इतरांना सांगितले पाहिजे 6) आपल्या जीवनातीळ वाईट गोष्टी काढल्या पाहिजे
7) पापाची कबुली दिली पाहिजे
8) आपण माणसे धरणारे बनले पाहिजे
9) देवाच्या राज्यात लोक आणले पाहिजे



Monday, 7 October 2019

येशूचा अधिकार

येशूने दिलेला अधिकार वचने :-


1) म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल.
याकोबाचे पत्र 4:7

2) आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.
मत्तय 16:18

3) मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
मत्तय 16:19

4) प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;
यशया 61:1 

5) ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे,  आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे.
इब्री लोकांस पत्र 2:14‭-‬15 

6) उलटपक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.
रोमकरांस पत्र 8:37 

7) आपल्याला ठाऊक आहे की, मेलेल्यांतून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही; त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही.
रोमकरांस पत्र 6:9 

8) कारण तुम्ही बलवान आहात. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.
1 योहानाचे 2:14 

9) पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
1 योहानाचे 3:8 

10) मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे; कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे.
1 योहानाचे 4:4



11) चेपलेला बोरू तो मोडणार नाही, व मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो न्यायाला विजय देईल .
मत्तय 12:20 

12) पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही.
लूक 10:19 

13) मी तुम्हांला खचीत सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
मत्तय 18:18 

14) त्याच्या ठायी जीवन होते, व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.  तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.
योहान 1:4‭-‬5 

15) पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
योहान 8:12



16) तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.”
योहान 8:32

17) आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल;
योहान 12:31

18) मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही.
योहान 10:28

19) तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.
योहान 8:44

20) “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”  मरणाची नांगी पाप, आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे;
करिंथकरांस पहिले पत्र 15:55‭-‬56

21) आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले.  त्याने सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.
कलस्सैकरांस पत्र 2:14‭-‬15



Sunday, 6 October 2019

बायबल पुस्तक विभागणी

जुनाकारार पुस्तक विभागणी :- 39 पुस्तके

अ) पहिला विभाग :- 

    पंचग्रंथ पुस्तके (5)     

 1) उत्पत्ती 
 2) निर्गम
 3) लेवीय 
 4)  गणना 
 5) अनुवाद



ब) दुसरा विभाग :-

ऐतिहासिक पुस्तके (12)

1) यहोशवा 
2) शास्ते 
3) रूथ 
4) 1 शमुवेल
5) 2 शमुवेल
6) 1 राजे 
7) 2 राजे 
8) 1 इतिहास 
9) 2 इतिहास 
10) एज्रा 
11) नेहम्या 
12) एस्तेर



क ) तिसरा विभाग :-

     काव्याची पुस्तके (5)

1) ईयोब 
2) स्तोत्रसंहिता 
3) उपदेशक 
4) गीतरत्न 
5) नीतिसूत्रे



ड) चौथा विभाग :- 

    श्रेष्ठ संदेष्टे (5)

1 ) यशया
2) यिर्मया 
3) विलापगीत 
4) यहेज्केल 
5) दानियल



इ) पाचवा विभाग :-

   कनिष्ठ संदेष्टे (12)

1) होशय 
2) योएल 
3) आमोस 
4) ओबद्या 
5) योना
6) मिखा
7) नहूम 
8)  हबकुब
9) सफन्या
10) हाग्गय  
11) जखऱ्या 
12) मलाखी



नविनकरारातील पुस्तकाची विभागणी  :-  

 27 पुस्तके


पाच शुभवर्तमान :-

1) मत्तय  
2) मार्क 
3) लुक 
4) योहान 
5) प्रेषित



नविन करारातील पत्रे :-

1)  रोमकरांस पत्र
2)  1करींथकरांस पत्र
3)  2 करींथकरांस पत्र
4)  गलतीकरांस पत्र
5)  इफिसकरांस पत्र
6)  फिलीप्पेकरांस पत्र
7)  कलस्सेकरांस पत्र 
8)  1 थेस्सलनीकाकारांस पत्र
9)  2 थेस्सलनीकाकारांस पत्र 
10)  तीमाथ्याला पहिले पत्र 
11)  तीमाथ्याला दुसरे पत्र 
12)  तीताला पत्र 
13)  फिलेमोनाला पत्र
 14)  इब्री लोकांस पत्र 
15)  याकोबाचे पत्र 
16)  पेत्राचे पहिले पत्र
17)  पेत्राचे दुसरे पत्र 
18)  योहानाचे पहिले पत्र 
19)  योहानाचे दुसरे पत्र 
20)  योहानाचे  तिसरे पत्र 
21)  यहूदाचे पत्र



22)  योहानाला झालेले प्रकटीकरण