शास्त्र भाग :- लुक 5 : 1 ,11
विषय :- ख्रिस्तातील विजयशाली जीवन
प्रस्तावना :-
प्रभू येशूच्या काळामध्ये गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी ही घटना घडली आहेत . पेत्र सारी रात्र कष्ट करून एकही मासा त्याच्या हाती लागला नाही . तो निराश , खिन्न , हताश झाला होता . परंतु त्याने येशुकडे पाहिले आणि त्याला भरपूर मासे हाती लागले . ही घटना पेत्राच्या जीवनामध्ये , अंतकरणामध्ये नव्याने घडली .
आजही सैतान आपल्या जीवनामध्ये निराशा , खिन्नपणा , दुःख आणण्याचा प्रयत्न करीत आहे . परंतु आपण प्रभू येशूकडे पाहिले पाहिजे . पेत्राच्या जीवनात , अंतःकरणामध्ये घडलेली ही घटना आज आपल्या जीवनामध्ये , अंतःकरणा मध्ये नव्याने पुन्हा घडणार आहे .
मग आपल्या जीवनामध्ये , अंतरकरणामध्ये ही घटना कशी घडणार आहे
यासाठी आपण वचनाचा काही भाग पाहू :-
वचन 3 :- येशू पेत्राच्या मचवा मध्ये बसला
मचवा आपले जीवन रुपी तारुचे प्रतीक आहे . येशू पेत्राच्या मचव्यामध्ये आला . त्याचप्रमाणे प्रियानो येशूला आमच्या जीवनामध्ये यायचे आहे . तेथे दुसरा मचवाही होता परंतु प्रभू येशूला पेत्राचा मचवा आवडला . पेत्राची निवड केली , आज अनेक लोक आहेत परंतु येशु ते आवडले नाहीत परंतु आपण येशुला आवडलेलो आहोत , येशूने आपली निवड केली आहे .
तिथे पेत्राने येशूला आपल्या मचव्यात जागा दिली . (प्रकटीकरण 3 : 20 ) येशू आज आता आपल्या अंतकरणात , हृदयाचा दरवाजा ठोकीत आहे . त्याच प्रमाणे आपणही येशूला आपल्या जीवनामध्ये , हृदयामध्ये , अंतकरणयामध्ये जागा दिली पाहिजे . माशांचा घोळका घेण्यापूर्वी ( माशाचा घोळका म्हणजे आशीर्वाद ) येशूने शिक्षण दिले . त्याचप्रमाणे आपल्याला जगिक आशीर्वाद येण्याअगोदर येशु आपल्याला आत्मिक शिक्षण , स्वर्गीय ज्ञान तो देईल .
वचन 4 :- येशु पेत्राला मचवा खोल पाण्यात घेऊन जाण्यास सांगत आहे
जर आपल्याला देवापासून आशीर्वाद पाहिजे असेल तर आपला मचवा खोल पाण्यात म्हणजे आपले जीवन विश्वासाच्या , पवित्रतेच्या , प्रार्थनेच्या , वचनाच्या , देवाच्या सहभागीतेच्या खोल सागरात आपले जीवनाचे तारू हाकरले पाहिजे . म्हणजेच आपण देवाच्या विश्वासात , पवित्रतेत , प्रार्थनेत , वचनात आणि देवाच्या सभागीतेत आपण वाढलो पाहिजे .वचन 5 :- पेत्र येशूला म्हणत हे सारी रात्र कष्ट करून आम्हाला काही मिळाले नाही
पेत्राच्या जीवनात येशूला महत्त्व नव्हते . त्याने येशूचा स्वीकार केला नव्हता . म्हणून सारी रात्र कष्ट करून काहीच मिळाले नाही . त्याच प्रमाणे जर येशू आपल्याबरोबर नसेल , त्याचा स्वीकार केला नसेल तर रात्रंदिवस कितीही कमावले तरी आपल्याला काहीच मिळणार नाही . येशूला आपल्या जीवनात महत्त्व नसेल तर येशूशिवाय आपण काहीच करू शकत नाही .वचन 5 व्याच्या शेवटी पेत्र म्हणतो तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो
याचे दोन आध्यात्मिक अर्थ आहेत1) आज्ञापालन :-
तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो येथे पेत्राने आज्ञापालन केले . त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आपण येशूचे आज्ञापालन केले पाहिजे , येशूची वाणी ऐकली पाहिजे , येशूच्या वचनाप्रमाणे चाललो पाहिजे , येशूचा शब्द ऐकला पाहिला पाहिजे . वचन सांगते तसं शब्द पाहिल्याने देव संतुष्ट होतो तसा होमाने व यज्ञाने होत नाही . म्हणून आपण आज्ञापालन केले पाहिजे .2) प्रतिकूल परिस्थितीमध्ये येशूवर विश्वास ठेवणे
1) पेत्राला समुद्राचा आढावा पूर्ण होता ,
2) पेत्राला समुद्राचा पूर्ण अभ्यास होता ,
3) समुद्रावरील वातावरण , तेथील परिसर त्याला माहीत होते 4) पेत्र रात्रभर कष्ट करून थकला होता .
5) येशु कोळी नव्हता , येशूला मासे धरताना कधीच कुणी पाहिले नव्हते .
6) तरीही पेत्राने येशूवर विश्वास ठेवला आणि जाळी टाकायला तयार झाला .
एखाद्या असा म्हणतो की मला पूर्ण माहिती आहे , सारी रात्र कष्ट केले तरीही मासा हाती लागला नाही आणि येशु म्हणतो येथे जाळी टाक .पेत्र रोज मासे धरणारा होता . परंतु पेत्राने मनात शंका न धरता त्याने येशू वर विश्वास ठेवला आणि त्याने जाळी खाली टाकली .
त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आशीर्वाद मिळण्याअगोदर आपण आज्ञापालन केले पाहिजे , देवाचा शब्द ऐकला पाहिजे , देवाच्या वचनाप्रमाणे चाललो पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनातील समस्यात ,अडचणीत , दुःखात आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीवर आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे .
वचन 6 :- त्यांना भरपूर मासे मिळाले
पेत्राने येशूच्या सांगण्यावरून पाण्यात जाळी सोडली म्हणजे पेत्राने येशूचा शब्द ऐकला , आज्ञापालन केले . पेत्र हा खिन्न होता , दुःखी होता , निराश झाला होता तरीही या परिस्थितीत पेत्राने येशूवर विश्वास ठेवला आणि त्याला भरपूर मासे मिळाले .त्याचप्रमाणे आपल्या जीवनात आपण येशूच्या वचनाप्रमाणे आज्ञापालन केले पाहिजे आणि कोणतीही समस्या , अडचणी , दुःख , निराशा , हाताश असो अशा परिस्थितीत आपण येशूवर विश्वास ठेवला पाहिजे तेव्हा आपल्याला विपुल मासे म्हणजे विपुल आशीर्वाद मिळतो .
वचन 7 :-
1) जाळ्यामध्ये भरपूर मासे सापडले
2) दुसऱ्या मचाव्यातील लोकांना मासे गोळा करण्याकरिता बोलाविले
आपण प्रभूमध्ये जीवन जगत असताना , आपण देवाचे आज्ञापालन केले , सर्व परिस्थितीत आपण येशूवर विश्वास ठेवला तर परमेश्वरापासून भरभरून आशीर्वाद मिळतो .जेव्हा आपण आशीर्वादाने भरतो तेव्हा त्या आशीर्वादाची साक्ष आपण इतरांना सांगितली पाहिजे , देवाने आपल्या जीवनात केलेल्या चमत्काराविषयी आपण इतरांना सांगितली पाहिजे .
कारण :-
1) आपली साक्ष इतरांना जीवन देऊ शकते2) इतरांचे जीवन बदलू शकते
3) आपली साक्ष इतरांना देवाकडे घेऊन येतील
4) आपली साक्ष ते स्वर्गाच्या राज्याचे वाटेकरी होतील 5)आपली साक्ष देवाच्या राज्यात अधिक आत्मे येतील 6)आपण जिवंत देवाची लेकरं आहोत हे आपल्या साक्षीवरून समजतील . बायबल सांगते तुम्ही माझे साक्षीदार आहात .
वचन 8:- पेत्र येशूचा पाया पडला
पेत्राने येशूचे ऐकल्याने त्याला विपूल मासे मिळाले . यावरून येशूख्रिस्त हा सामर्थ्यशाली प्रभू आहे . हे पेत्राच्या लक्षात आले आणि तो येशूच्या पाया पडला .त्याचप्रमाणे आपणही येशूच्या चरणाजवळ आलो पाहिजे . त्याच्या दयासनाजवळ पाहिजे . त्याच्या सानिध्यात आलो पाहिजे . त्यासाठी आपण बायबल वचन वाचले पाहिजे , प्रार्थना केली पाहिजे . कारण देवाजवळ येणे यातच आपले हित व कल्याण आहे .
वचन 8 च्या वचनाच्या शेवटी :-
पेत्र म्हणतो प्रभुजी माझ्यापासून दूर जा , कारण मी पापी आहे याचे दोन अर्थ आहे .1) पापाची कबुली
2) पेत्राने स्वतःची अवस्था ओळखली
आपल्या जीवनात निराशा , दुःख , अडचणी , समस्या , आजार , व्याधी येण्याचे कारण हे आहे की , आपण सत्य स्वीकारत नाही आणि पेत्राने सत्य स्वीकारले . तो म्हटला हे येशू मी स्वार्थी आहे , मी पापी आहे हे त्याने स्वीकारले म्हणजेच त्याने प्रामाणिकपणे त्याने पापाची कबुली दिली . आणि येशूने हीच प्रामाणिकता पाहिली .
जेव्हा मनुष्याला सत्य समजते तेव्हा प्रत्येक मनुष्य नम्र होतो आणि म्हणतो मी कोणीच नाही , मी मानव आहे , माझे विचार , माझे स्वार्थ , माझे कर्तृत्व , माझा अनुभव , माझी कला , माझे गुण , माझी हुशारी यांनी मी काहीच करू शकत नाही . फक्त येशु हे सर्वकाही तूच करू शकतो . तुझ्या सामर्थ्यापुढे मी नम्र होतो , लीन होतो , क्षमाशील , कनवाळू होतो . हे तेव्हाच कळते जेव्हा आपण वचन स्वीकारतो . हे सर्व वचनामुळे घडते .
वचन 10 :- इथून पुढे तू माणसे धरणारा होशील
येशु पेत्राला म्हणतो , मी तुला माणसे धरणारा बनवील . येशूची इच्छा आहे की आपण माणसे धरणारे बनलो पाहिजे . ज्या जाळेत माणसे धरणार आहोत , ते जाळे आहे प्रेमाचे , उन्नतीचे , अभिषेकाचे , सामर्थ्याचे , संयमाचे , आशीर्वादाचे , क्षमाशीलाचे , भरभराटीचे , सौख्याचे , आनंदाचे , शांतीचे , आरोग्याचे जाळे आहे . या जाळेत आपण स्वतःला अडकुया आणि इतरांसाठी , एकमेकांसाठी आशीर्वादाचे भाग ठरवूया .
वचन 11 :- सर्व सोडून त्याचे अनुयायी झाले
पेत्राने येशूला स्वीकारले , पेत्राने स्वार्थ सोडला , लोभ त्याग केला . त्याने पाप कबूल केले आणि सत्यता स्वीकारली देवाचा अभिषेक स्वीकारला , तो येशूच्या मागे चालू लागला .
जर आपण येशूला स्वीकारले तर प्रथम स्वतःमध्ये बदल घडवून देवाचा अभिषेक स्वीकारला पाहिजे . आपल्यामधून स्वार्थ , लोभ सोडून येशूच्या मागे चाललो पाहिजे . येशूसाठी सिद्ध झालो पाहिजे . येशूच्या कार्य करण्यासाठी स्वतःला समर्पित केले पाहिजे .
अशाप्रकारे
1) आपण प्रभू येशूला आपल्या जीवनात , अंतकरणात , हृदयात घेतले पाहिजे2) आपण विश्वासात पवित्रतेत , वचनात , प्रार्थनेत वाढलो पाहिजे
3) आपण आज्ञापालन व प्रतिकूल परिस्थितीवर विश्वास ठेवला पाहिजे
4) हे सर्व गोष्टी पाळणे विपुल आशीर्वाद प्राप्त होतील 5)आपल्या जीवनात घडलेली साक्ष इतरांना सांगितले पाहिजे 6) आपल्या जीवनातीळ वाईट गोष्टी काढल्या पाहिजे
7) पापाची कबुली दिली पाहिजे
8) आपण माणसे धरणारे बनले पाहिजे
9) देवाच्या राज्यात लोक आणले पाहिजे
No comments:
Post a Comment