पापक्षमा येशूची वचने :-
1) मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण ‘प्रीती पापांची रास झाकून टाकते.’
1 पेत्राचे 4:8
2) पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’
1 पेत्राचे 2:9
3) तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता;
इफिसकरांस पत्र 2:1
4) कारण बैलांचे व बकर्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.
इब्री लोकांस पत्र 10:4
5) परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.
यशया 1:18
6) जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही.
1 योहानाचे 1:9-10
7) पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही.
1 योहानाचे 1:7-8
8 ) तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.
यशया 44:22
9) हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.
स्तोत्रसंहिता 51:1-2
10) तो आपण केलेली सर्व पातके लक्षात आणून वळेल तर तो खातरीने वाचेल, मरायचा नाही.
यहेज्केल 18:28
11) प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, ह्यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हांला अडथळा होणार नाही.
यहेज्केल 18:30
12) कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.”
इब्री लोकांस पत्र 8:12
13) ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य! ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!
स्तोत्रसंहिता 32:1-2
14) मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले; मी आपली अनीती लपवून ठेवली नाही; “मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन” असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केलीस. (सेला)
स्तोत्रसंहिता 32:5
15) जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
1 योहानाचे 1:9
16) कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणार्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही; तर मागे फिरा व जिवंत राहा.
यहेज्केल 18:32
17) खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.
यशया 53:5
18) आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.
यशया 53:6
19) त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्यांपुढे गप्प राहणार्या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही.
यशया 53:7
20) पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.
स्तोत्रसंहिता 103:12
21) नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली.
स्तोत्रसंहिता 40:2
22) तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’
1 पेत्राचे 1:19
23) कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन, आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.”
इब्री लोकांस पत्र 8:12
24) आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.
योएल 2:13-14
No comments:
Post a Comment