प्रकटीकरणातील सात मंडळ्या :-
1) इफिस येथील मंडळीस पत्र :-
जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ खावयास देईन .
2) स्मुर्णा :-
तुझे कलेश व दारिद्र्य ठाऊक आहे , मरेपर्यंत विश्वासू राहा , म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन , जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाशी बाधा होणारच नाही .
3) पर्गम :-
तुझे राहण्याची ठिकाण ठाऊक आहे माझा साक्षी व माझा विश्वासु आहे जो विजय मिळवतो त्याला गुप्ते राखलेल्या मान्यातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन , त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही .
4) थुवतीरा :-
तुझी कृत्ये , तुझी प्रीती , विश्वास , सेवा व धीर मला ठाऊक आहे , विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्ये करीत राहतो त्याला माझ्या पित्यापासून मला मिळाला त्या राष्ट्रांवरचा अधिकार मी देईन , मी त्याला प्रभात तारा देईन .
5) सार्दिस :-
तू मेलेला आहेस , जागृत हो . जो विजय मिळवतो तो शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल . मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन .
6) फिलदेल्फीया :-
तुझी शक्ती थोडी आहे , तरी तू माझे वचन पाळले आहेस व माझे नाव नाकारले नाही जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन , तो तेथुन बाहेर जाणार नाही , त्याच्यावर माझ्या देवाचे नाव , देवाची नगरी (यरुशलेम ) हिचे नाव व माझे नवे नाव लिहिन .
7) लावदीकिया :-
तु शीत नाहीस व उष्ण नाहीस , कोमट आहेस दीन , दरिद्री , दुबळा , उघडावाघडा आहेस . मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन .
No comments:
Post a Comment