चिंता व काळजीचे वचन :-
1) तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणार्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.
स्तोत्रसंहिता 34:10
2) परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.
स्तोत्रसंहिता 23:1
3) आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे; त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.
स्तोत्रसंहिता 37:5
4) परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.
स्तोत्रसंहिता 37:34
5) जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य! तू आपल्या श्रमांचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.
6) तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता, व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे; तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो.
स्तोत्रसंहिता 127:2
7) लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.
नीतिसूत्रे 21:31
8) कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.
फिलिप्पैकरांस पत्र 4:6
9) म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांला उंच करावे.
1 पेत्राचे 5:6
10) त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो.
11) कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.
रोमकरांस पत्र 8:15
12) परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.
रोमकरांस पत्र 8:28
13) ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय?
रोमकरांस पत्र 8:35
14) आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
करिंथकरांस दुसरे पत्र 8:9
15) तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.
मत्तय 6:33
16) ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.
मत्तय 6:34
17) प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.
1 तीमथ्याला 6:17
No comments:
Post a Comment