Friday, 25 October 2019

आशीर्वाद उशिरा मिळण्याची कारणे

शास्त्रभाग :- योहान 5 : 1, 8

विषय       :- आशीर्वाद उशिरा मिळण्याची कारणे

प्रस्तावना  :-

         परमेश्वराला आपल्याला भरपूर आशीर्वाद द्यायचे आहे . कारण परमेश्वराला आशीर्वाद द्यायला आवडतात . आशीर्वाद म्हणजे आपल्या प्रश्नाची सुटका . आपल्याला असे वाटते की जेव्हा आपण देवाकडे येतो तेव्हा आपले सर्व प्रश्न सुटावे . परंतु कित्येक वेळा वर्षानुवर्षे एकच अवस्था असते . आम्ही ज्या नियमाने चालतो त्या नियमाने चालत असताना तरीपण आपले प्रश्न सुटत नाही , आपल्या समस्या सुटत नाही . कधीकधी आपल्यासमोर लोक बरे होऊन जातात , आपल्यासमोर लोकांना नोकऱ्या लागतात , आपल्यासमोर अनेक लोकांचे प्रश्न सुटले जातात . परंतु काही आपल्या जीवनाकडे पाहत असताना , परमेश्वर आपल्या प्रश्नाची सुटका करत नाही ? देवाचे लक्ष आपल्याकडे नाही का ? परमेश्वराचे अंतकरण आपल्या संबंधाने कठोर झाले का ? अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या जीवनामध्ये आपण शोधत असतो . आणि कधी कधी जीवनात हाताश , निराश होऊन परमेश्वरावरचा विश्वास सोडून देतो . परमेश्वर माझ्या विश्वासाला खरा उतरला नाही . ज्या गोष्टी आपण पहिल्या केल्या पाहिजे त्या नाही करतो म्हणून आपल्या उत्तराला विलंब लागतो . आपली जी अवस्था आहे त्या अवस्थेतून बाहेर यायला तयार नाही . म्हणून आपल्याला आशीर्वादाला विलंब , उशीर लागतो .

          पवित्रशास्त्रामध्ये 38 वर्षे एका व्यक्तीला आशीर्वादाची वाट पहावी लागली . ती व्यक्ती प्रत्येक प्रोसेस मध्ये जाऊन पोहोचली आहे . जिथे जायला पाहिजे तेथे तो गेला आहे . हे जेथे थांबायला पाहिजे तेथे तो थांबला आहे .  38 वर्ष त्याच्या जीवनात अनेक लोक बरे होऊन गेले . परंतु 38 वर्षे या व्यक्तीला वाट पहावी लागली .

  आज आपण पाहणार आहोत की , आपल्या जीवनात आशीर्वाद लवकर मिळण्यासाठी काय केले पाहिजेत ?
    
    38 वर्षे वाट पाहणारा , 38 वर्षे झगडणारा , 38 वर्षे एकाच प्रश्नामध्ये अडकून पडलेला ,  जगामध्ये प्रति व्यक्तीच्या जीवनात महान महान कार्य घडत आहे . मग आपल्या जीवनात चमत्काराला विलंब का करावा  ? आपण आपल्या समस्यामध्ये वर्षानुवर्ष अडकून का पडावे ? आपल्याला नाही वाटत का देवाचा अभिषेक आपल्यामध्ये असावा . मला नाही वाटत की देवाचा सामर्थ्य माझ्यामध्ये असावं . आपल्याला नाही वाटत की आपल्या परिवारामध्ये आनंद असावा . आपल्याला नाही वाटत कि आपल्या परिवारामध्ये शांती असावी , भरपूरी असावी . परंतु या सर्व गोष्टी येण्यासाठी विलंब लागतात . काही गोष्टीचे दडपण आपल्या जीवनामध्ये होते म्हणून आशीर्वादाला विलंब लागतो , ते अशिर्वाद आपल्या जवळ येण्यास वेळ लागतो .

योहान 05:01, 08 


    38 वर्षे या व्यक्तीला चमत्काराची वाट पहावी लागली .  आणि त्याच्या चमत्काराला अडतीस वर्षे विलंब लागल्याचे कारण येशूने त्याला विचारलेला प्रश्न . तुला बरं होण्याची इच्छा आहे काय ? परमेश्वर आपल्या इच्छेशिवाय जीवनामध्ये चमत्कार करणार नाही . चमत्कारासाठी आपल्या जीवनात इच्छा असावी . जर इच्छा असेल तर धडपड करावी लागते .
  वचन सांगते  की , येशूने त्याला बरेच वर्षे पडलेले पाहिले . जोपर्यंत आपण पडलेले अवस्थेत असतो , तोपर्यंत देव आपल्याला पहात नसतो . आपली अवस्था समजली पाहिजे . आपण कोठे पडलेलो आहोत , आपण प्रार्थनेत पडलो का कि ,  विश्वासांमध्ये कमी पडलो की , पवित्रतामध्ये कमी पडलो की , शुद्धतामध्ये कमी पडलो की , सेवेमध्ये कमी पडलो आपण कोठे कमी पडलो . ज्या ठिकाणी आपण कमी पडलो असेल ज्या ठिकाणी आपण कमतरतेत पडू नये . आपला आशीर्वाद , आपला चमत्कार तेवढा लांब जाईल .



वचन तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता.


तो बरोबर त्यामार्गे गेला  . त्याने शोर्टकट निवडला नाही . मेंढरे दरवाजा , या दरवाजाने मेंढरे आत जायचे तो दरवाजा . मेंढरे दरवाजा कोणता ? तर माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात . मेंढरा मध्ये लीनता आहे , नम्रता आहे . चमत्कारासाठी पहिल्यांदा आपल्यामध्ये नम्रता , लीनता असावी लागते . नम्रता , लीनता म्हणजे माघार घेणे . जर माघार घेण्याची वृत्ती आमच्यामध्ये नसेल तर आपला चमत्कार 38 वर्ष दूर जाणार आहे . परंतु ही व्यक्ती नम्र होऊन त्या दरवाज्याजवळ गेली आहे . देवासमोर नम्र व्हा , एकमेकासमोर नम्र व्हा . आपल्या जीवनामध्ये कधी कठीणपणा येऊ देऊ नका . आपले हृदय  कठीण जेवढे बनणार तेवढा चमत्कार लांब जाणार आहे . आपल्या अंतःकरणाला मृदू ठेवा . आपल्यातील कठीणपणा जाणे गरजेचे आहे . आपल्या जीवनातला कठीपणा गेला नाही तर प्रभूची इच्छा असेल तर ते प्रभू करणार नाही . कारण प्रभूला कठोर  हृदय , हेकेखोर हृदय सर्व प्रकारच्या घाण गोष्टींनी भरलेले आशा हृदयांत परमेश्वर चमत्कार करत नाही . म्हणून  येशू त्या व्यक्तीला म्हणाला एवढी वर्षे का पडलेला आहेस . किती दिवस आपण अशाच अवस्थेत पडलेलो आहोत . देवाचे वचन आपल्याशी बोलले आहे , देवाच्या वचनाने आपली भेट घेतली आहे . परंतु जसे माझ्या हृदयाने त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे , पवित्रशास्त्र प्रतिसाद द्यायला पाहिजे माझे ते दिले नाही . अंतकरण मृदू बनावं देवाचे वचन ग्रहण करण्यासाठी मृदू बनावं . मेंढरे दरवाजातून आत जाणे माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात . मेंढरे दरवाज्यातून आज जाणे म्हणजे नम्रता धारण करणे . कुणीही प्रभूला नम्रतेशिवाय प्राप्त करून घेऊ शकत नाही . चमत्काराचा अनुभवायचा असेल तर नम्र होणे गरजेचे आहे . बायबल सांगते ,  आधी नम्रता मग मान्यता . देव कधी मान्यता देतो , जेव्हा आपण नम्र बनतो . आपल्यामध्ये गर्व , अहंकार , फुशारकी , हेकेखोरपणा , ताठरपणा , कठीणपणा आपल्यामध्ये असेल तर आपला चमत्कार आपल्यापासून दूर असणार आहे .

यरुशलेमेत मेंढरेदरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत.

योहान 5:2 



   मेंढरे दरवाजाजवळ तो गेला आहे  . तो तेथे बरोबर त्या ठिकाणी गेला . त्या तळेचे नाव काय ? बेथेसदा कृपेचे घर . आपण देवाकडे येतो देवाला म्हणतो मला कृपे खाली घे . बायबल सांगते , परमेश्वर ज्या वर कृपा करायची त्यावर तो कृपा करतो . परमेश्वर कोणाला कृपा  करतो , आपण रडलो म्हणून कृपा करतो का ?  38 वर्षे तो त्या कृपेत पडलेला आहे त्याचा नावाचा उल्लेख नाही . का बरं ? या व्यक्तीमध्ये असणारी कमतरता . प्रत्येक व्यक्तीचे नाव घेतले आहे रक्तश्रावी स्त्री , याईराची कन्या ,  विधवा स्त्री , शतापती चाकर , जक्कय , मार्था यांचा उल्लेख केला आहे . पण अडतीस वर्षे दुखणेकरी व्यक्तीचा उल्लेख केला नाही . का बरं ? त्याला कारण आहे की कृपाच्या घराकडे तो आला आहे . देवाने कृपा करावी म्हणून यासाठी जी क्रिया करावी ती त्याने केली नाही . देवाच्या मंदिरात आलो आपण आणि म्हटलं देवा माझ्यावर कृपा करा आणि देव कृपा करेल असे नाही . या भ्रमात राहू नका . परमेश्वराची कृपा होण्यासाठी फार कष्ट करावे लागते .



उदा . मोशे


      मोशे यावर परमेश्वराची कृपा होती . का ? परमेश्वर म्हणतो भूतलावर सर्वात नम्र व्यक्ती मोशे आहे .  सर्वात जास्त नम्र व्यक्ती मोशे .  नम्रता ही देवाची कृपा होण्याची पायरी आहे . मेंढरे दरवाजातून जाताना जसे मेंढरे खाली मान घालून जातात तसे देवासमोर आपण खाली मान घालून चालावे . इस्राएल लोकाबाबत परमेश्वर म्हणतो हे ताठ मानाचे लोक आहेत , हे माझ्या विसाव्या येणार नाही . आपल्यामध्ये अहंकार असेल , माघार घेण्याची वृत्ती नसेल माझ्या विसाव्यात येणार नाही . विसावा म्हणजे काय आमच्या प्रश्नातून सुटका . देवाची कृपा येण्यासाठी आपल्या जीवनाचे परिवर्तन करून घेणे , स्वतःमध्ये बदल करून घेणे , स्वभाव मध्ये बदल करून घेणे . अडतीस वर्षे व्यक्ती , 38 वर्षे  कृपेखाली बसला आहे पण 38 वर्षे त्यांच्या स्वभावामध्ये बदल झाला नाही . 38 वर्षे तो तिथेच बसला परंतु त्याला देवाची कृपा मिळाली  नाही . का मिळाली नाही . देवाला सर्वांवर कृपा करावी वाटते , सर्वांवर दया करावी वाटते पण का करत नाही , तर पवित्र शास्त्रात सर्वात मोठे कारण सांगितले आहे ते म्हणजे सर्वांनी पाप केले आहे देवाच्या गौरवाला उणे पडले आहे . जर आपल्यामध्ये पाप असेल तर देवाची कृपा नाही . कृपा म्हणजे परमेश्वराचा गौरव . जर परमेश्वराची कृपा झाली तर परमेश्वराचा गौरव झाला . देवाच्या गौरवाला आपण उणे पडू नये , त्याला अंतरता कामा नये . आपण पाप केले तर देवाचे गौरव , देवाची कृपा निघून जाणार आहे .





उदा .मोशे


मोशे चाळीस दिवस-रात्र रात्र पर्वतावर होता आणि तो मोशे पर्वतावरून खाली आल्यावर लोक त्याला पाहू शकत नव्हते . त्याच्या  चेहर्‍यावर तेज होते . मोशेने आपल्या मुखावर आच्छादन टाकले होते पण जसेजसे लोकांमध्ये राहात असताना , लोकांचे प्रश्न हाताळताना मोशेचे तेज नाहीसे होत गेले , एवढा मोठा सेवक त्याच्या चेहर्‍यावर किरणे बाहेर पडत होती पण लोकांनी त्याचे तेज काढून घेतले . आमची संगती आमच्या चेहऱ्याचे तेच काढून टाकते . 38 वर्षे व्यक्ती हा कृपेच्या घरात होता , तेथे त्याला कृपा झाली नाही .

वचन  :- कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे 

योहान 5:4 

        परमेश्वर कधी चुकत नाही . परमेश्वर वेळोवेळी चमत्कार करतो . वेळोवेळी परमेश्वर त्याच्या लोकांची भेट घेतो . परमेश्वर त्याची वेळ चुकत नाही . पाणी हलत पण माझी इच्छा नाही त्या पाण्यात पडावे . येशू त्याला विचारतो तुला बरे होण्याची इच्छा आहे काय ? तो म्हणतो मला सोडणारे कोणी नाही ही हे सबब नही .  मला वाटतं 38 वर्षे ती व्यक्ती कोणाला म्हटला असता मला नेऊन टाकावं , हात जोडले असते , विनंती केली असती तर कोणीतरी टाकलं असतं . त्याने एखाद्याच्या पायाला धरलं असतं तर तो पाण्यात गेला असता . पण त्याला 38 वर्षे चमत्कार पाहण्यात रस होता . तुम्ही चमत्कार पाहणारे बनू नका तर चमत्कार अनुभव घेणारे बना . चमत्कारामध्ये तुमचा भाग असावा , साक्ष असावी . तुमच्या जीवनामध्ये प्रभूने माझ्या जीवनात कार्य केले आहे , तुमचेही साक्षीची जीवन बनले पाहिजे .

वचन :- त्यांमध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. [ते पाणी हलण्याची वाट पाहत असत;

योहान 5:3 

    तेथे असे म्हटले आहे  लुळे , आंधळे , लंगडे , पांगळे , रोगी नाना प्रकारचे लोक तेथे होते . आणि प्रत्येक व्यक्ती पाणी हल्ले की त्या पाण्यात उतरत होते . लक्षात ठेवा पाणी कोणाची वाट पाहणार नाही . जो पर्यंत पाणी हालते तोपर्यंत उडी मारायची . पाणी हल्ल्यावर जी व्यक्ती पाण्यात उडी मारेल , ती व्यक्ती पाण्यात पडेल बरा होईल . जी व्यक्ती त्या पाण्यात जाईल ती अभिषेकाने भरला जाईल . जी व्यक्ती त्या पाण्याचा येईल त्या पाण्याचे सत्व त्याला येईल . जी व्यक्ती त्या पाण्यात उतरेल तीच व्यक्ती परमेश्वराची कृपा मिळविल .  परंतु जी व्यक्ती ती पाणी हललेले पाहून सुद्धा आणि त्याची इच्छा नाही पाण्यामध्ये उतरावे , ज्याची इच्छा नाही त्याला परमेश्वर कुठल्याच बाबतीत सक्ती करत नाही . परमेश्वर म्हणतो जीवन-मरण आशीर्वाद व शाप सर्व तुझ्यासमोर ठेवलेले आहे . निवड करणे आपल्या हातात आहे . परमेश्वर त्या पाण्यात उतरण्याची सक्ती करत नाही परंतु तो लोकांसाठी पाणी हलवतो ज्यांना पाण्यामध्ये उत्तराचे आहे परंतु मला बरे होण्याची इच्छा आहे काय ? येशुनी विचारले तुला बरे होण्याची इच्छा आहे काय ? तुम्हाला बरे होण्याची इच्छा नाही तर या जगात कोणीच तुम्हाला बरे करू शकणार नाही .



उदा . रक्तस्त्रावी स्त्री

      तीची इच्छा होती बरे होण्याची . तीने येशूच्या गोंडेला स्पर्श केला . तुमची इच्छा आहे ना त्या अवस्थेत त्याला स्पर्श करा . जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही वर्षानुवर्षे त्याच अवस्थेत राहणार आहे . देवाला त्याच अवस्थेत  राहणारे लोक आवडत नाही . तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे , तुमच्यामध्ये प्रगती दिसली पाहिजे .

वचन :- [ते पाणी हलण्याची वाट पाहत असत;

योहान 5:3 

       ते लोक डोळ्यात तेल घालून पाणी हलण्याची वाट पहात होते .

उदा . एलिया व अलिशा


        एलिया अलिशाला म्हणाला तू जर मला स्वर्गात जाताना पाहशील तर तुला दुप्पट आशीर्वाद , अभिषेक प्राप्त होईल . म्हणून आपले स्वामी जाणार आहे म्हणून त्याचा डोळा लागत नव्हता , त्याची नजर नेहमी आपल्या स्वामी वर होती , तो आपल्या स्वामी वर लक्ष देऊन होता , स्वामीला जाताना पाण्याची त्याला उत्कंठा लागली होती . त्याचे सर्व लक्ष आपल्या स्वामीकडे लागलेले होते . अभिषेक सहज मिळवता येत नाही , अनमोल गोष्टी सहज मिळत नाही , त्याचे लक्ष विचलित झाले नाही .
   
       आपले लक्ष विचलित करणारे या जगात अनेक गोष्टी आहेत , असंख्य गोष्टी आहेत . आपला अभिषेक , आपले पाचारण , परमेश्वराचे सामर्थ्य , आपले आरोग्य , आपला आनंद आपल्याकडे टिकून राहू नये म्हणून विचलित करणारे असंख्य गोष्टी आपल्या जीवनात येतात . जर आपले लक्ष विचलित झाले तर जी कृपा , अनुग्रह आपल्याला मिळणार आहे ते अनुग्रहकडे आपले दुर्लक्ष होणार आहे आणि त्याच ठिकाणी आपली कृपा दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार आहे , त्या दुसऱ्या व्यक्तीला मिळणार आहे . लक्षात ठेवा आपल्याला कृपा मिळाली पाहिजे . म्हणून खबरदारी घेतली पाहिजे .


वचन :- त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.

योहान 5:4 


     38 वर्षे व्यक्तीला पाणी पाण्याचा हलण्याचा टायमिंग माहिती होता परंतु तो टायमिंग चुकला . देवाला चमत्कार करायचा पण आपण चुकतो आणि आशीर्वाद दुसरे घेऊन जातात .

उदा . मोशे , अहरोन , कालेब हे तिघेही बरोबर चालले . मोशेनंतर अहरोन आला . कारण त्यांनी टाइमिंग बरोबर साधला आणि इस्राएल लोकांचा टाइमिंग  चुकला . 38 वर्षे व्यक्ती चुकला आणि दुसऱ्याच बरा होऊन जात होता .



वचन :-  मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्याआधी उतरतो.”

योहान 5:7 


        या जगात आपल्या बरोबर कायमस्वरूपी सोबती राहणारे कोणीच नाही . त्या मनुष्याला कुणीतरी आणून सोडत असेल कारण तो पंगू होता . बरेच दिवस तो सोबत राहिला असेल पण तो सोडून गेला असेल . म्हणून मनुष्यावर भिस्त ठेवू नका . परमेश्वर अवलंबून रहा . परमेश्वरावर विश्वास ठेवणारा व्यक्ती कधीच निराश होत नाही . व्यक्तीवर अवलंबून राहणाऱ्या व्यक्ती अडतीस वर्षे तसाच राहतो .

     एकाच अवस्थेत राहिल्याने येशूला राग येतो . निराश तर निराश आनंदी तर आनंदित आणि सारखी माघारी जाणारी वृत्ती  . किती काळ आपण या अवस्थेत असणार आहोत , किती काळ आपले मन अविश्वासाच असणार आहे , किती काळ आमचे अंतकरण कठीण असणार आहे , किती काळ आमचं अंतकरण द्वेषाने , रागाने भरलेले असणार आहे ,  प्रभुचे वचन स्वीकारण्याची , त्याला प्रतिसाद देण्याची , त्याच्याविरुद्ध बंड करण्याचे अंतकरण असणार . परमेश्वर त्या अवस्थेत पाहतो तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात परमेश्वर तुम्हाला पाहतो .



उदा . दानियल


   दानियल या व्यक्तीला सिंहाच्या गुहेत टाकल्यावर त्याची अवस्था परमेश्वराने पाहिली .



उदा . बंदी शाळेमध्ये पेत्र असताना त्याची अवस्था परमेश्वरने पाहिली .

उदा . दाविद राजा ज्यावेळेस गच्चीवरून फिरत असताना परमेश्वराने त्याची अवस्था पाहिजे त्याचा परिणाम तलवार तुझा पिच्छा सोडणार नाही .

     परमेश्वराला  वाटते या अवस्थेतून आपण बाहेर यावे . आपली अवस्था बदलावी जर आपण प्रार्थनेमध्ये कमी अवस्थेत असेल तर पुन्हा त्या प्रार्थनेच्या अवस्थेत वाढावं .  विश्वासाच्या अवस्थेत कमी झालो असेल तर पुन्हा विश्वासात वाढव .

     माझा कोणी माणूस नाही . तुम्ही म्हणाल हा माझा , तो माझा तेव्हा तुम्ही निराश व्हाल . जेव्हा तुम्ही कबूल कराल येशूकडे माझा कोणीच नाही तेव्हा येशू तुमचा खास माणूस बनाल . तुमच्या जवळचे सर्व सोडून जातील पण विश्वासाचा माणूस म्हणतो युगाच्या समाप्ती पर्यंत मी तुमच्याबरोबर आहे .  तो तुम्हाला सोडणार नाही , टाकणार नाही कारण त्याचं नाव इमानुएल आम्हाबरोबर देव आहे .

वचन  :- येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”

योहान 5:8 


     माझा कोणी माणूस नाही , माझा कुणी डॉक्टर नाही ,  माझा कोणी मुलगा नाही , मला कोणती मेडिसिन नाही हे कबूल करायचे आहे तेव्हा येशू म्हणतो , आपली बाज घेऊन चालू लाग . एका शब्दाच्या द्वारे तुमची अवस्था बदलली जाईल . येशुमध्ये बाज बदलण्याचे सामर्थ्य आहे . ज्या दिवशी तुम्ही बोलणार आहे त्या दिवशी तुमच्या जीवनात आनंद फुलणार आहे . तुला बरे व्हायचे आहे ना आता येशू आला आहे . तुझ्या समोर जे बरे झाले ते विसरून जा , आता येशू आला आहे . आता पाण्याची गरज नाही , तुला व्यक्तीची गरज नाही , कारण येशु आला आहे . तुला कुठल्या आधाराची गरज नाही , कारण येशू आला आहे . म्हणून आज सूटका नक्की आहे . सुटका देण्यासाठी येशु आला आहे . आज मी बरा होऊन जाणार आहे . येशु स्वतः ते तळे आहे आणि येशु स्वतः  तुमच्याकडे आला आहे . अहो तान्हेल्यानो तुम्ही मजकडे या  .



उदा . शोमरोनी स्त्री :-


       ज्यावेळेस या स्त्रीने पाणी मागितले तेव्हा तिला येशु म्हणाला ,  पाणी का मागते जीवन मागितले असते ते दिले असते ?



आपल्या जीवनामध्ये प्रगती दिसली पाहिजे . आपली अवस्था बदलली पाहिजे . आपले लक्ष त्या परमेश्वराच्या वचनाकडे लागले पाहिजे . कारण परमेश्वर आपल्या जीवनात चमत्कार करणारा , कार्य करणारा परमेश्वर आहे . ज्यावेळेस आपण आपली अवस्था बदलू त्या वेळेस परमेश्वर आपला आशीर्वाद करणार आहे .

No comments:

Post a Comment