Sunday, 27 October 2019

तरुणासाठी वचने

तरुणासाठी वचने :-

1) हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.  ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.
                    उपदेशक 11:9‭-‬10 

2) आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.
                      उपदेशक 12:1 



3) तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.
                  स्तोत्रसंहिता 119:9 

4) तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.  ज्या पुरुषाचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! वेशीवर शत्रूंशी त्यांची बोलाचाली होत असता ते फजीत होणार नाहीत.
                स्तोत्रसंहिता 127:4‭-‬5 



5) कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्‍यांचा कित्ता हो.  मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्यांकडे लक्ष ठेव.
                    1 तीमथ्याला 4:12‭-‬13 

6) तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्‍यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.
                    2 तीमथ्याला 2:22 



7) म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.  देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.
                    रोमकरांस पत्र 12:1‭-‬2 

8) म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.  देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.
                     रोमकरांस पत्र 12:1‭-‬2 

9) कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”
                    1 पेत्राचे 1:16 


10) पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’
                      1 पेत्राचे 2:9 

11) कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत;  आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.
                  1 योहानाचे 2:16‭-‬17 



12) मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन.
                         स्तोत्रसंहिता 32:8 

13) तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
                स्तोत्रसंहिता 119:105 

14) मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावतो; मला साहाय्य कोठून येईल?  आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.
                     स्तोत्रसंहिता 121:1‭-‬2 

15) तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
                  स्तोत्रसंहिता 119:18 



16) जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य!  जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य!
                 स्तोत्रसंहिता 119:1‭-‬2 


17) जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही; पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही; आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही,  तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.
                   स्तोत्रसंहिता 1:1‭-‬2 


18) जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो;
                      याकोबाचे पत्र 1:5 


19) तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत; तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही.
                      नीतिसूत्रे 4:12 



No comments:

Post a Comment