Tuesday, 7 June 2022

GOD - परमेश्वर DT-1 (मराठी)

 ★ DT चा उद्देश काय आहे ?



1) वचना चे पूर्ण ज्ञान असावे


आता मी म्हणतो की, वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो; 


माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत.


गलतीकरांस पत्र 4:1‭, ‬19 


गलतीयो 4:1 काही भेद नसतो गलतीयो 4:19 ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण करणे :-



1) कलस्सै 1:28 


आम्ही त्याची घोषणा करतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो व प्रत्येक माणसाला शिकवतो; अशासाठी की, प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठायी पूर्ण असे उभे करावे.




1) घोषणा 2) ज्ञान 3) शिकवणे 4) पूर्ण करणे



2) Leader तयार करणे :-


माझा उद्देश या DT ने तुमचे ज्ञान  वाढवणे नाही तर ज्ञानी लीडर तयार करणे आहे यासाठी की ख्रिस्ताचे देहा साठी प्राचीनला सिद्ध करणे आहे



★  या ट्रेनिंग ला आपण तीन हिस्स्या मध्ये शिखणार :-



1) Invite - बुनियादी शिक्षण

2) Invest - गहरी शिक्षण 

3) Empowerment - सशक्तिकरण चे शिक्षण



★ Discipleship Training :-


आम्हाला एक असे ख्रिस्ताचे देह तयार करायचे आहे , ज्याला वचनाचे पूर्ण ज्ञान असावे


1) GOD - Invite परमेश्वर



★ Worldly People Concept Regarding GOD No GOD or Many GOD'S



★ चला मग पाहू या बायबल काय म्हणते ? एका खऱ्या परमेश्वरा विषयी



★ पूर्ण जगामध्ये खऱ्या परमेश्वराविषयी ज्ञान असणे खूप गरजेचे आहे , नाहीतर दुनिया खतम केली जाईल


               यशाया 1:9 , 


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.



         रोमकरांस पत्र 9:29 


त्याप्रमाणे यशयाने पूर्वी म्हटले, “जर सेनाधीश प्रभूने आमच्यासाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, व गमोराप्रमाणे बनलो असतो.”


         

               अनुवाद 6:12 


ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप.



★ अर्थ -



1) आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सदोम आणि गमोरा या दोन शहरांचा नाश का झाला ? कारण कि तिथे परमेश्वर नव्हता


2) आणि हे पण माहीत आहे 6 लाख इजरायल लोक का नाही गेले वचन दत्तक देशामध्ये ? कारण की ते परमेश्वराला विसरून गेले होते


3) आणि याची वार्निंग कुठे देत आहे ? पाचवे पुस्तक मध्ये 6 अध्याय 12 वचनामध्ये


4) तर किती इम्पॉर्टंट आहे की आपण परमेश्वराला जाणून घेणे 


5) तुम्ही विचाराल की अजून दुनिया खतम (नष्ट) झाली नाही , तर अजून पण प्रभु चे लोक आहेत , त्यांच कारणाने भारत नेपाळ etc वाचलेले आहे


 6) स्वतःला शाबासकी द्या , आपले जग वाचलेले आहेत , आपल्याला गर्व (घमेंड) असला पाहिजे , आपल्या परमेश्वरावर


7) एक अशा परमेश्वराला तुम्ही जाणतात , ज्याने पूर्ण दुनियाला वाचवले आहे


8) एका व्यक्तीच्या कारणाने आणि त्या व्यक्तीचे नाव आहे मोशे , नाहीतर 6 लाख लोक पूर्ण बदमाश होते , कधी धोका देत होते , कधी पाण्याचा चक्कर , कधी म्हणतात लसुन नाही , कधी म्हणतात कांदा नाही , काय फर्माईश होती या लोकांचे , गजबचे लोक होते 


9) त्या कारणाने एक व्यक्ती त्याचे नाव आहे मोशे , त्याने परमेश्वराला जिवंत ठेवले आपल्या हृदया मध्ये , तो परमेश्वरा बरोबर चालला , तेव्हा परमेश्वर त्याला बोलला , मोशे तू आहे तर हे आहे


10) तसेच मी पण तुम्हा सर्वांना म्हणतो , तुम्ही स्वतःला कमी समजू नका , तुमचा जो पण इलाका आहे , तुमचे गाव तुम्हाला नाव ठेवत आहे , शेजारचे लोक म्हणतात पहा ये ख्रिस्ती लोक आले


11) तुमच्यामुळे ते लोक जिवंत आहे , ही गोष्ट तुम्हाला नंतर समजून येईल



          फिलिप्पैकरांस पत्र 3:8    


इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा,



1) पौल म्हणतो काही पण हो मी ख्रिस्ताला धरून राहील , काही पण हो , मी परमेश्वराला विसरणार नाही , काही पण हो मी ख्रिस्ताला प्राप्त करूनच राहील या गोष्टी पौल म्हणत आहे


2) सर्व काही हानी समजतो , अशी कोणती हानी समजतो ?


3) तुम्हा सर्वांना माहित आहे पौल असा जीवन जगला , त्याला म्हणतात त्यागाचे जीवन जगला , कमीत कमी 13-14 पत्र त्याने लिहिले आहे , त्याच्या जीवनशैली वरुण कळते की त्याने लग्न केले नाही


4) तो म्हणतो माझ्या जवळ पैसा नव्हता , आणि तो म्हणतो की मला जेवण नव्हते , आणि तो म्हणतो मला दगडाने मारण्यात आले ,  पाण्यात डूबण्यात आले माझ्याजवळ खूप काही संकटे आली


5) असा व्यक्ती म्हणतो की मी ही हानी उचलली आहे आणि त्याला मी कचरा समजतो , का ? कारण ख्रिस्त मला प्राप्त व्हावा


असे ख्रिस्ताचे देह DT मध्ये मला तयार करायचे आहे


★ खऱ्या परमेश्वराला ओळखायचे आहे का ? तर का ?



1) सदोम आणि गमोरा का नाश केले ? का ?



1) खऱ्या परमेश्वरला ओळखत नव्हते , लोटाची फॅमिली तीन लोक वाचले आणि पत्नी (बायको) मिठाचे खांब झाली


2) आम्हाला यातून हे शिकायला भेटले की आम्हाला जगातल्या गोष्टी वर ध्यान द्यायचे नाही , ही शिकवण येशू आज पर्यंत आम्हाला देत आहे


2) निनवे शहर :- 1 लाख 20 हजार



1) हे लोक खऱ्या परमेश्वराला ओळखत नव्हते , यांच्यामध्ये योना ला पाठवले , योना ने संदेश दिला आणि खरा पश्चाताप केला , पूर्ण शहराने गुडघ्यावर येऊन पश्चाताप केला


2) त्या कारणाने हे नगर वृद्ध , मुले , तरुण आणि जे वाईट होते ते बाहेर टाकण्यात आले आणि त्यांनी खऱ्या परमेश्वराला ओळखले , पूर्ण नगर वाचले गेले


★ या दोन्ही शहरांमध्ये एकच फरक आहे , खऱ्या परमेश्वराची ओळख


1) एका शहराने ओळखले नाही , एका शहराने ओळखले आणि ज्याने ओळखले ते शहर वाचले गेले


2) याचा अर्थ असा आहे की जे शहर परमेश्वराला नाही ओळखणार ते शहराचा नाश होणार



3) पूर्ण जग परमेश्वराला नाही ओळखणार ते नष्ट केले जाईल परंतु काही लोकांमुळे ही दुनिया सुरक्षित आहे


4) काही सरकार विचार करत असेल की ते चालत आहे देश परंतु मी , तुम्ही , आपण खऱ्या अर्थाने चालवत आहोत


5) लंडनचा प्रिन्स असेल , अमेरिकेचा प्रेसिडेंट असेल हे सर्व सुरक्षित आहे ना , फक्त या पृथ्वीवर येशूची मंडळी आहे म्हणून , ज्या दिवशी मंडळी उचलली जाईल , त्या दिवसापासून दुनिया खतम


★ या प्लॅनेटवर मनुष्याचे संपूर्ण कर्तव्य एकच आहे , खऱ्या परमेश्वराला ओळखणे :-


          

                उपदेशक 12:13 


आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.




★ परमेश्वराला एका मनुष्यकडून काय पाहिजे ?


एका मनुष्याने जन्म घेतल्यानंतर त्याचे पहिले काम खऱ्या परमेश्वराला ओळखणे , त्याचा सेवक बनणे आणि त्याची सेवा करणे


★ परमेश्वरा विषयी खरे ज्ञान देणे :-


    

            प्रेषितांची कृत्ये 17:23


कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो.


1) या शहरांमध्ये भरपूर लोक परमेश्वराला (God) मानत होते , त्यांच्यामध्ये हा बंदा गेला , हे अशा ईश्वराची आराधना करत होते परंतु ओळख नव्हती


2) आज अनेक लोक म्हणतात की वर कोणी तरी आहे , मी त्याला घाबरतो , वर कोणीतरी आहे मी त्याला मानतो , वर कोणी तरी आहे मी त्याची पूजा करतो परंतु कोण आहे माहित नाही ?


                     

                 प्रेषित 17:23


ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो.


1)  या पृथ्वी वर टाटा असो , बिर्ला असो , तो अंबानी असो , कोणी पण असो , लंडनचा प्रिन्स असो , अमेरिका प्रेसिडेंट असो


2) परंतु आपल्याला माहीत असावे या पृथ्वीच्या वर सर्वात मोठे काम , सर्वात मोठा मनुष्य  एका खऱ्या परमेश्वराची ओळख दुसऱ्याला माहिती करून देणे आणि त्यामध्ये तुम्ही आणि मी , आपण आहोत



★ चला मग सुरुवात करूया , सर्वात प्रथम दोन Consepts आहे परमेश्वरा विषयी , त्याला पाहू :-


1) मनुष्याने स्वतः आपले परमेश्वर बनवून मनुष्यावर प्रकट केले


2) परमेश्वराने स्वतः ला मनुष्यावर प्रकट केले



1) पहिला - 


             रोमकरांस पत्र 1:19 


कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे.


1) तो डाकू असो , तो शिपाई असो , तो संत असो , तो महात्मा असो , पुरुष व स्त्री असो , कोणी पण असो , या सर्व मनुष्याच्या मनामध्ये परमेश्वराचे ज्ञान स्वतः परमेश्वराने त्यांच्या मनात टाकले आहे


2) कोणी ईश्वर आहे , वर कोणीतरी बसला आहे , वर कोणी तरी सृष्टीला चालवत आहे , जर कोणत्या मनुष्याला विचारले कोणी ईश्वर आहे का ? होय आहे कोणी तरी ईश्वर आहे , एक किंवा अनेक , पौल म्हणतो , प्रत्येक माणसाच्या मनात भावना आहे


1) सर्वप्रथम पाहूया ,  मनुष्याने बनवलेल्या परमेश्वराच्या Consept ची


★ आज कोणा-कोणाला परमेश्वर म्हणत आहे , जगामध्ये जे मनुष्याने बनवले आहे :-


1) स्वतःचा परमेश्वर , परिवाराचा परमेश्वर , पतीचा परमेश्वर ,  मित्राचा परमेश्वर , समाजाचा परमेश्वर , दगडाचा परमेश्वर , लाकडाचा परमेश्वर , लोखंडाचा परमेश्वर , प्लास्टिकचा परमेश्वर , सोने चांदी चा परमेश्वर , प्राण्यांच्या रूपा मध्ये परमेश्वर , जीवजंतुच्या रूपा मध्ये परमेश्वर , पक्ष्यांच्या रूपा मध्ये परमेश्वर , मनुष्यांच्या रूपामध्ये परमेश्वर , सृष्टीच्या रूपा मध्ये परमेश्वर 


2) एक खरा बायबल मानणारा ज्याने आपले स्वतःचे जीवन येशूला दिले आहे , हे सर्व बनवलेले परमेश्वर मानणार नाही


★ मनुष्य हे सर्व का बनवू शकला ?

                  

             रोमकरांस पत्र 1:19


कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते;



     रोमकरांस पत्र  1:23 , 25 सांगते ,


 मनुष्याने आप-आपल्या बुद्धीने परमेश्वर बनवले आहे



            रोमकरांस पत्र 1:23 


आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली.



           रोमकरांस पत्र 1:25 


त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली, आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मित वस्तूंची भक्ती व सेवा केली; तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन.


1) सृष्टीची , सूर्याची , चंद्राची आणि निसर्गाची वर्शिप करू शकता काय? सरळ गोष्ट आहे , नाही करू शकत


2) चंद्राची , सूर्याची पूजा कसी करू शकतात ? सूर्याची पूजा कशी करू शकतात ? गृहा ची पूजा कशी करू शकतात ?


3) हे सर्व परमेश्वराने बनवले आहे , नदीची आराधना पूजा केली जाते , झाडाझुडपांची पूजा केली जाते


4) परमेश्वर प्राणी  होऊ शकतो का ? हे सर्व परमेश्वर कसे होऊ शकतात ?


★ हे सर्व परमेश्वर कसे होऊ शकतात ?


          यशाया 44:6 , 20


इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो: “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.




★ परंतु या सहा हजार वर्षांमध्ये मनुष्य करोडो परमेश्वर बनवण्यामध्ये कामयाब झाला आहे , आणि हा सिलसिला आत्तापर्यंत चालत आहे


                यशाया 42:8 

मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसर्‍यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही.



★ सीक्रेट पुस्तक काय म्हणते ?

   

आपण आपली दुनिया स्वतः बनवू शकतात , आपल्या बुद्धीने


★ हे पुस्तक म्हणते , 


      आपल्याला जे पण पाहिजेन , आपल्याकडे एक अट्रॅक करा  , चार गोष्टीने


1) आपल्याला माहिती पाहिजे , आपल्याला काय पाहिजे ?


2) विश्वास करा आपल्याला भेटणार


3) दर्शन मध्ये पाहण्यास सुरुवात करा


4) जे आपल्याला पाहिजे ते जोर-जोराने बोला



★ ही सर्व प्रॅक्टिस आज काल चर्चमध्ये पाहायला भेटत आहे , आणि ते शिकवत आहे


           ★ उद्या बोलूया ★

No comments:

Post a Comment