Thursday, 3 December 2020

सुरुवात जरी लहान पण परिणाम महान

 *लूक १६: १०-१२*


     *सुरुवात जरी लहान*

                   *पण*

        *परिणाम महान* 

  

    *जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू  तो पुष्कळाविषयीहि विश्वासू आहे. आणि जो थोडक्या विषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीहि अन्यायी आहे.* *लूक १६:१०*.


       लहान सहान वाटणाऱ्या गोष्टी किती महत्वाच्या असतात ही पुढील उदाहरणावरून लक्षात येते. " एक लहान खिळा मिळाला नाही ,त्यामुळे घोड्याला नाल ठोकता आलीं नाही, म्हणून सैनिकाला घोडा मिळाला नाही , घोडा नाही म्हणून युद्धासाठी सैनिक मिळाला नाही, सैनिक मिळाला नाही म्हणून राजा मोठे युध्द हरला. राजा मोठे युध्द का हरला तर एक लहानसा खिळा घोड्याला नाल ठोकायला मिळाला नाही म्हणून !!! थोडक्यात काय तर खिळा जरी लहान वस्तू होती तरी ती नसल्याने मोठा पराभव झाला. 

 प्रभू येशु ख्रिस्ताच्या दृष्टीने लहान किंवा थोडक्या गोष्टीना फार महत्व आहे. *लहान गोष्टीपासून सुरुवात केल्यानेच सेवा फलदायी होते*. जर ह्याच लहान गोष्टीकडे क्षुल्लक समजून दुर्लक्ष केले तर सेवा फलदायी होत नाही. मोशेकडे एक सामान्य काठी गुरे राखण्यासाठी होती, परमेश्वर म्हणाला "तुझ्या हातात काय आहे?",  "काठी आहे प्रभु" मोशे उत्तरला , देव म्हणाला "ती खाली टाक." त्याने टाकली तिचा साप झाला , देव पुन्हा म्हणाला "आता शेपटीला धरून उचल". त्याने उचलली तो ती पुन्हा काठी झाली. *पण आता मात्र ती काठी ही देवाची काठी झाली.* 

त्यामुळे इस्राएल राष्ट्राला मोशेने परमेश्वराच्या सामर्थ्याने गुलामगिरीतुन बाहेर काढले . पाच लहानसे गोटे दावीदाकडे होते , पण त्या लहान गोट्यांच्या उपयोगाने बलाढ्य गल्याथ मारला गेला. *लहानशी अलाबास्त्र कुपी मरियेने येशूच्या पायावर ओतली , तो परमाळणारा गंधोत्सव सर्व  जग आज लूटत आहे, प्रभू येशूच्या वचनानुसार !!* 

     प्रभू येशूसाठी कार्य हे छोट्या गोष्टी पासूनच सुरू केले पाहिजे. *आम्हाला एकदमच मोठ्या गोष्टी करायला पाहिजे असतात.. एका व्यक्तीला किंवा एका कुटुंबातील लोकांना सुवार्ता सांगायला कमीपणा वाटतो. मोठे चर्च हवे असतात संदेश देण्यासाठी. कार्य करण्यासाठी. जेव्हा ही प्रवृत्ती असते तेव्हा कार्य होत नाही. दुसऱ्याशी तुलना करायलाच नको. त्याने अपयशच हाती येते. *समस्या ही नाहीच  की दुसरे जे करतात ते आम्ही करू शकत नाही तर समस्या ही आहे की, जे आम्ही करू शकतो तेच करीत नाही!* 

कारण लहान सहान गोष्टी करायला कमीपणा वाटतो. 

*देवाला आमचा उपयोग करून घ्यायचा आहे पण देव करीत नाही कारण लहान किंवा थोडक्या आम्हाला करता येणाऱ्या गोष्टी करण्यात आपल्याला रसच नसतो.* 

एका ठिकाणी प्रभू येशू म्हणतो *या लहानातील एकाला तुम्ही फक्त एक पेलाभर पाणी प्यायला दिले तर तुम्ही प्रतिफळाला मुकणारच नाही*. 

   *पेलाभर पाणी देणे ही लहान जरी वाटली तरी ती प्रतिफळ मिळवून देणारी सेवा आहे* .जर प्रभूपासून प्रतिफळाचीअपेक्षा आहे तर प्रभूच्या कार्याला छोट्या गोष्टी पासूनच सुरुवात करू. त्याच पुढे जाऊन मोठं स्वरूप धारण करतात. महान जे सेवक प्रभूचे होऊन गेले त्यांच्या सेवेची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टीतूनच झाली, कष्ट घेतले त्यांनी हाल सोसले, तेव्हा कोठे ते महान सेवक झाले. *स्वतः प्रभूने बारा शिष्यापासून सुरुवात केली आज जगभर करोडो लोक प्रभू येशूचे शिष्य आहेत*. *प्रभूची जर सुरुवात थोडक्या पासून होती तर मग आपल्याला का कमीपणा वाटावा ?*

     *दयाघन ईश्वरा तुझ्या सेवेची सुरुवात थोडक्यातून करण्यास आमचे सहाय्य कर आणि ही सेवा फलद्रुप कर .*

                *आमेन*

      

प्रार्थना का सुअवसर


*प्रार्थना का सुअवसर*

१ इतिहास २९:११-१९


_*मेरे पुत्र सुलैमान का मन ऐसा खरा कर दे कि वह तेरी आज्ञाओं, चितौनियों और विधियों को मानता रहे l १ इतिहास २९:१९*_


एक अत्यंत व्यक्तिगत अंग्रेजी गीत, जिसका शीर्षक है, “डैडी, अब प्रार्थना नहीं करते हैं(Daddy Doesn’t Pray Anymore),” गीतकार के अपने पिता की प्रार्थनाओं से प्रेरित है । हृदयस्पर्शी गीत से उसके पिता की प्रार्थना समाप्त होने का कारण पता चलता है : मोहभंग या थकावट नहीं, बल्कि उनकी अपनी मृत्यु । वह कल्पना करता है कि अब, प्रार्थना में यीशु के साथ बात करने के बजाय, उसके पिताजी यीशु के साथ चल रहे हैं और आमने-सामने बात कर रहे हैं ।


पिता की प्रार्थनाओं का यह स्मरण एक बाइबिल सम्बन्धी पिता की अपने बेटे के लिए प्रार्थना को ध्यान में रखता है । जब राजा दाऊद का जीवन शक्तिहीन होने लगा, उसने अपने बेटे सुलैमान को इस्राएल के अगले राजा के रूप में पदभार संभालने की तैयारी की ।


सुलैमान का अभिषेक करने के लिए एक साथ राष्ट्र को इकट्ठा करने के बाद, दाऊद ने प्रार्थना में लोगों का नेतृत्व किया, जैसा कि उसने पहले भी कई बार किया था । जब दाऊद ने इस्राएल के प्रति ईश्वर की विश्वासयोग्यता को स्मरण किया, तो उसने लोगों से उसके प्रति विश्वासयोग्य रहने की प्रार्थना की । फिर उसने अपने बेटे के लिए विशेष रूप से एक व्यक्तिगत प्रार्थना को शामिल किया, जिसमें परमेश्वर से कहा गया कि “मेरे पुत्र सुलैमान का मन ऐसा खरा कर दे कि वह तेरी आज्ञाओं, चितौनियों और विधियों को मानता रहे” (१ इतिहास  २९:१९) ।


हमारे पास उन लोगों के लिए ईमानदारी से प्रार्थना करने का उल्लेखनीय विशेषाधिकार है जिन्हें परमेश्वर ने हमारे जीवन में रखा है । विश्वासयोग्यता का हमारा उदाहरण एक अमिट प्रभाव डाल सकता है जो हमारे चले जाने के बाद भी बना रहेगा । जिस तरह परमेश्वर ने सुलैमान और इस्राएल के लिए दाऊद की प्रार्थना के उत्तरों को जारी रखा था, उसी प्रकार हमारी प्रार्थनाओं का प्रभाव हमारे बाद भी जारी रहता है l


_किसी की प्रार्थना ने किस प्रकार आपके जीवन पर महत्वपूर्ण प्रभाव डाला है? आप अपनी प्रार्थनाओं से दूसरों को कैसे प्रोत्साहित कर सकते हैं?_


_*🙇‍♂️स्वर्गिक पिता, मैं तुम्हारे सामने अपने प्रियजनों को लाता हूँ और पूछता हूँ कि आप उनके जीवनों में अपनी योजनाएं पूरी करें l*_



सभी अपेक्षाओं से परे

 _*सभी अपेक्षाओं से परे*_


_*मती 8:1,2,3जब वह उस पहाड़ से उतरा, तो एक बड़ी भीड़ उसके पीछे हो ली।*_

_*और देखो, एक कोढ़ी ने पास आकर उसे प्रणाम किया और कहा; कि हे प्रभु यदि तू चाहे, तो मुझे शुद्ध कर सकता है।*_

_*यीशु ने हाथ बढ़ाकर उसे छूआ, और कहा, मैं चाहता हूं, तू शुद्ध हो जा और वह तुरन्त को ढ़ से शुद्ध हो गया।*_

_*जब प्रभु आशीर्वाद देता है,* वह आपको *आपकी अपेक्षाओं से बढ़कर आशीष देता है।* *कुष्ठ रोग से पीड़ित व्यक्ति के चंगाई में, यीशु ने पहुंचकर उस आदमी को छुआ और कहा "में" मैं तैयार हूं शुद्धँ हो जाओ"* ओर *तुरन्त, वह आदमी ठीक हो गया।*_


_मेरे मित्र आपने ध्यान दिया कि यीशु ने उस व्यक्ति को सबसे पहले छुआ, इससे पहले कि वह उसे चंगा करें? में यीशू के छोटे  इशारों से प्यार करता हूं।ँ उस साधारण स्पर्श ने उस इंसान के लिए मानवता और गरिमा की भावना को बहाल किया,_

_*जो लंबे तक समय तक छुआ गया था। उसकी अशुद्ध और शारीरिक रूप से प्रतिकारक स्थिति के कारण, कोई भी उसके करीब नहीं होना चाहता था, बहुत दूर उसे छूने के।*_


_यीशु को पता था कि आदमी को सिर्फ शारीरिक चंगाई से ज्यादा की जरूरत है, इसलिए उसने उस व्यक्ति को ऊपर और परे दिया जो उसके लिए आशा थी।प्रिय, वह प्रेम और_ _*आवश्यकता से अधिक अनुग्रह आपके उद्धारकर्ता की ओर से है।आज तुम्हारी कमी क्या है? किसी भी सन्देह से परे जानें कि यीशु का  प्रावधान आपकी सभी  अपेक्षाओं को पार कर जाऐगा ।*_

Tuesday, 1 December 2020

ख्रिस्ताचा जन्म तो

 *फिलिपै २:५-११*


        *ख्रिस्ताचा जन्म तो*

    *देव असूनही मानव झाला*


       *कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे,  आम्हास पुत्र दिला आहे.* *यशया ९:६*.


      घरोघरी ख्रिस्त जन्माचा आनंद सोहळा सुरू झाला आहे.

  डिसेंबर महिना ह्या आनंद सोहळ्याची  चाहूल घेऊनच येतो. खरेदीची, घराच्या रंग सफेतीची, घर सजावटीची लगबग सुरू झाली असणारच. ख्रिस्त जन्माचा सोहळा म्हणजे फक्त आनंदच!!

  क्षणभर थांबून विचार करू आपण की का हा आनंद साजरा करतो आपण? *आजच प्रतीक वचन सांगते आम्हासाठी बाळ जन्माला , म्हणजे ख्रिस्त पूर्ण मानव होऊन या जगात आला. आणि आम्हासाठी पुत्र दिला अर्थात प्रत्यक्ष देवपित्याचा पुत्र म्हणजेच प्रत्यक्षात देवच  या पृथ्वीतलावर आला. पूर्ण मानव पूर्ण देव !!* यशया संदेष्ट्याने ही  भविष्यवाणी ख्रिस्त जन्माच्या  सातशे वर्षे अगोदरच केली होती. 

    *परमेश्वर मनुष्य होऊन स्वर्गातून पृथ्वीवर आला की ज्यामुळे पृथ्वीवरील मानवाला स्वर्गात जात यावे.* म्हणून हा आनंद सोहळा आपण साजरा करतो. पौल आजच्या मननाच्या शास्त्रपाठात याचे स्पष्टीकरण करीत आहे की, *मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन ख्रिस्ताने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले ; येथपर्यंत आज्ञापालन करून ख्रिस्ताने स्वतःला लीन केले*. ख्रिसमस म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर हे वचन समजून घेणे आवश्यक आहे. 

*राजासनावर बसणारा ख्रिस्त गव्हाणीत निजला , राजमुकुट आणि शुभ्र वस्त्रं धारण करणारा बाळंत्याने गुंडाळला गेला. सदैव पवित्र असणारा तो अपराधी म्हणून वधस्तंभावर गेला.*का केले प्रभूने असे कारण ख्रिस्ताला आमचा आत्मा मोलवान वाटतो.* *पृथ्वीवरील त्याच्या स्वतःच्या जीवनापेक्षा आमचं सार्वकालिक जीवन ख्रिस्ताला महत्वाचे वाटते.* *सर्वोच्च स्थानी असणारा ख्रिस्त आमच्यासाठी दास असा झाला. फक्त दास नाही तर तारणारा झाला.*  *वधस्तंभावर मरण पावला. येशू शिडीवरून खाली का आला तर त्या शिडीवरुन आम्ही वर जावे*.म्हणून *प्रभुसारखे नम्र आम्ही झालं पाहिजे. पण हा वर जाण्याचा मार्ग वरचढ, अहंकारी होण्यासाठी नाही तर हा मार्ग नम्र आणि लिनतेचा आहे.* 

    *मेलवीन ( Melvin ) नावाचे अभ्यासक म्हणतात की, " ख्रिस्ताने स्वतःचे गॉड कार्ड कुठेही वापरले नाही.तो कुठेही म्हणाला नाही की मी येशूख्रिस्त आहे म्हणून मीच आधी जाणार..* *किंवा तू कोणाशी बोलत आहेस हे तुला कळते काय? ,प्रभू कधीही कोणाला म्हणाला नाही की माझा हक्क आधी आहे. उलट ख्रिस्त नम्रच झाला.* आपणही नम्र झालंच पाहिजे कारण *विश्वासाने खरा ख्रिस्तमस पाळणे म्हणजे ख्रिस्ताचे अनुकरण करणे*.

   *जर आम्ही ख्रिस्तासारखे नम्र होऊ तर खऱ्या अर्थाने हा आनंद सोहळा साजरा करू.*


 *प्रभू येशु तुझ्यासारखी  नम्र चित्तवृत्ती आमच्यात येऊ दे म्हणजे तुझ्या जन्माचा आमचाआनंद द्विगुणित होईल.*        

              *आमेन*..

     

सावध राहण्याचा इशारा



         *✨सावध राहण्याचा इशारा✨*


 *ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे..✍🏼*

                 *( १ थेस्सल ५:६ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


     सावधगिरीचा इशारा देताना प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितले होते तेच प्रेषित पौल येथे सांगत आहे. परंतु येथे त्याला एका विशिष्ट मुद्द्यावर भर द्यायचा आहे. तो म्हणजे प्रभूचा दिवस. प्रभूचा दिवस याचा संबंध न्यायाकडे आहे. या भयंकर घटनेसंबंधीचा हा इशारा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी आहे, विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नाही. या दिवसाचा संबंध प्रकाशाचा उदय होण्याकडेही आहे. प्रकाश हे दिव्य प्रकटीकरणाचे व नीतिमत्वाचे प्रतीक आहे. विश्वासणारे तर आधीचेच प्रकाशात म्हणजे ख्रिस्ताच्या सान्निध्यात राहणारे लोक आहेत. ख्रिस्तावरील त्यांच्या विश्वासाच्या द्वारे ते आता पापाच्या आणि अज्ञानाच्या अंधारात नाहीत. कारण ख्रिस्ताचा प्रकाश त्यांच्यामध्ये, त्यांच्याबरोबर आहे. परिणामी त्यांच्यासाठी प्रभूचा दिवस हा प्रखर शोधक प्रकाश झोतासारखा असणार नाही. परंतु दुर्जनांची किंवा पापी जनांची या शोधक प्रकाशझोतामध्ये अंधाराच्या काळोख्या आवरणाखाली लोकांच्या नजरेआड केलेली पापे उघडकीस येतील. आणि पापी जनांना, दुष्कर्मे करणाऱ्यांना या प्रकाशापासून दूर जाऊन लपून बसावे वाटेल. याउलट जे नीतिमान आहेत असे म्हणजेच विश्वासणारे त्या दिवसाच्या परिपूर्ण प्रकाशाचे स्वागत करतील. त्यांना त्या दिवसाची भिती वाटणार नाही. कारण ज्यामुळे न्यायनिवाडा होईल अशाप्रकारची दोषपात्र कृत्ये त्यांनी केलेली नसणार. त्यांच्याविषयी पौल म्हणतो, *"बंधूजनहो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही." ( वचन ४,५)*


    त्यामुळेच पौल आम्हाला अंधकाराची कामे टाकून देऊन प्रकाशाची प्रजा होण्यास सांगत आहे. हा प्रकाश तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाच्या न्याय्य क्रोधाच्या, न्यायाच्या आणि शिक्षा देण्याच्या दिवसापासून आपली सूटका व्हावी म्हणून पौल आम्हाला आध्यात्मिकरित्या तयार राहायला सांगत आहे. प्रियांनो, देवाच्या क्रोधापासून आपली सूटका व्हावी असे वाटत असेल तर आपण आध्यात्मिकरित्या जागे आणि नैतिकदृष्ट्या सावध राहिले पाहिजे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त परत येईपर्यंत त्याच्यावरील आमची निष्ठा कायम ठेवून आपण विश्वासात, प्रीतीत आणि पूर्ण तारणाच्या आशेमध्ये टिकून राहिले पाहिजे. पौल म्हणतो, *"परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे, विश्वास व प्रीति हे उरस्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे." ( वचन ८)*  त्यासाठी विश्वासणाऱ्यांना प्रभूशी अविश्वासू होण्यास आणि त्याच्या पुनरागमनसमयी बेसावध राहण्यास भाग पाडणारी जगीक सुखे, मोह, चिंता किंवा आत्मिक गोष्टींपासून लक्ष विचलीत करणाऱ्या गोष्टींमध्ये अडकून पडू नये म्हणून आध्यात्मिकरित्या आपण सावध किंवा जागे राहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रभू म्हणत आहे, *"तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा." ( लूक २१:३६)* म्हणून प्रियांनो, सांभाळा, जगातील इतर लोकांबरोबर आमचा न्याय होऊ नये, आमचा नाश होऊ नये म्हणून आम्ही सदैव सावध आणि जागे राहून आमच्या प्रभूच्या येण्याची उत्कंठतेने वाट पाहावी. आम्ही अंधारात नाही तर प्रकाशाची प्रजा असल्यामुळे प्रकाशात राहावे. प्रकाशात राहण्यासाठी आम्हाला स्वतःला शुद्ध व पवित्र, निष्कलंक, निर्दोष राहाणे गरजेचे आहे. तरच आम्ही देवाचे लोक होऊ शकतो, तरच प्रकाशाची प्रजा होण्यास आम्ही पात्र आहोत. *कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. ( वचन ९)*


         *

कृपेमुळे विश्वासाने नीतिमान



       *✨कृपेमुळे विश्वासाने नीतिमान✨*


*परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले...✍*

                       *( रोम ४:२०)*


                           *...मनन...*


         *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    देवाने पापी माणसाला निर्दोष ठरविण्यासाठी ख्रिस्ताला ह्या जगात पाठविले, ह्यासाठी की ख्रिस्ताने त्यांच्यासाठी प्रायश्चित्त असे व्हावे. ख्रिस्तावरील विश्वासाने पापी नीतिमान ठरतो. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा नियमशास्रातील कर्मांवाचून नीतिमान ठरतो. यहूदी लोकांचा पूर्वज असा जो अब्राहाम, त्याला जिवंत देवाने स्वतःला प्रगट केले आणि त्याला आज्ञा व अभिवचने दिली. त्याला दर्शन देऊन परमेश्वराने म्हटले, *तूं आपला देश व नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल. ( प्रे. कृत्ये ७:३)* आणि अब्राहामाने देवाची आज्ञा पाळली. आणि आपण पाहातो की, पूढे परमेश्वराने अब्राहामाला खूप आशीर्वादित केले. 


     पवित्र शास्रामध्ये आपण पाहतो की, अब्राहाम शंभर वर्षांचा झाला होता आणि साराचे गर्भाशय निर्जिव होऊनही, परमेश्वराने त्यांस *आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती असेल,* असे अभिवचन दिले आणि काहीही आशा शिल्लक उरलेली नसतानाही अब्राहामाने आशेने त्यावर विश्वास ठेवला. शास्र सांगते, *अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. ( रोम ४:३)* त्याचा परमेश्वरावर इतका विश्वास होता की, *दिलेले वचन पूर्ण करण्यास परमेश्वर समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. ( रोम ४:२१)* ख्रिस्ताचे नीतिमत्व आमच्याकडे मोजण्यात येते. आणि मानवाला देवासमोर नीतिमान ठरविण्यांत येते.  *मनुष्य सत्कर्मे केल्यामुळे नीतिमान ठरत नाही, तर ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने नीतिमान ठरतो. ( रोम ३:२८)*


    आमचे तारण विश्वासाच्या द्वारे होते, म्हणून आम्ही ख्रिस्तावर संपूर्ण भरंवसा ठेवून विश्वासाने जगले पाहिजे. ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासाला खूप महत्व आहे. एखादी गोष्ट आपण परमेश्वराजवळ ती मागण्याअगोदरच मला मिळाली आहे असा विश्वास ठेवून मागितली तर, परमेश्वर नक्कीच आपली मागणी पूर्ण करतो. अब्राहामाच्या विश्वासाबद्दल अनेक उदाहरणे आपल्याला बायबल मध्ये पाहावयास मिळतात. अब्राहामाला विश्वासाच्या द्वारे तीन गोष्टी मिळाल्या, *नीतिमत्व, वतन आणि संतान. ( रोम ४:३,१३,१७)* त्याच्या कृपेने नीतिमान ठरल्यानंतर आम्हालाही मोठे लाभ मिळतात. *कृपा म्हणजे पात्रता नसताना झालेली मेहेरबानी* ह्या जीवनात विश्वासाच्या बरोबरीने आम्हाला परमेश्वराकडून शांती, क्षमा आणि अभिवचन ही मिळतात. ( रोम ५:१५) आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आम्हाला *तारणाची खात्री* मिळते. ( रोम ५:६ ते ११) म्हणून प्रियांनो, आपणही आपल्या अंतःकरणात असा विश्वास ठेवला पाहिजे की परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्याला तो कधीच लज्जित होऊ देणार नाही. विश्वासाद्वारे तो सर्व काही पूरवून देण्यास समर्थ आहे. त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही.


    देव एखाद्या व्यक्तीला नीतिमान ठरवितो म्हणजे नेमके काय करतो ते वचनाद्वारे पाहू या -


  *१) त्याच्या अपराधांची क्षमा करतो. ( कलस्सै २:१३) त्याच्या पापांची क्षमा करतो म्हणजेच सर्व पापांपासून त्याला मुक्त करतो. ( इफिस १:७)*


   *२) त्याच्या पापांवर पांघरूण घालतो. त्याच्या पापांबद्दल देव त्याला कधीच शिक्षा करणार नाही. ( रोम ८:१) त्यांची पापे तो पुन्हा आठवणारच नाही. ( इब्री १०:१७,१८)*


   *३) त्याच्या हिशेबी त्याने केलेल्या पापांची यादी नाही. आपल्या सर्व पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. ( कलस्सै १:१४)* 


   *अशाप्रकारे नीतिमान ठरलेला मनुष्य किती धन्य आहे !!*


          *

आनंद देणारी नदी

 *यहेज्केल ४७: ३-५*


       *पवित्र आत्म्याची*

      *आनंद देणारी नदी*!!


      *जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्या प्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील*.

        *योहान ७:३८*

 

      शालेय जीवनात आपण इतिहास , भूगोल या विषयांचा अभ्यास केलेला आहे. त्यात असं लक्षात येते की मनुष्याने नदीच्या काठी प्रामुख्याने शहरे वसवली होती. कारण पाणी हे जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. शेती, व्यवसाय, पशुपालन नदीकाठीच उत्तम होऊ शकत होते. आणि यामुळेच नदीकाठच्या लोकांचे जीवन समृद्ध आणि आनंददायी होते आणि आजही  तसेच आहे. 

   बायबलमध्ये सुध्दा अशाच एका नदीच वर्णन आहे, *जिचे प्रवाह देवाच्या नगराला , परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे*.

 *स्तोत्र ४६:४*.  *ही आनंद देणारी नदी आहे पवित्र आत्म्याची !  *प्रभू येशू म्हणतो , जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील*. पवित्र आत्म्याविषयी प्रभू सांगत आहे. 

     जेव्हा आपण ख्रिस्ताचा तारणारा म्हणून  पश्चाताप पूर्वक विश्वासाने स्वीकार करतो तेव्हा पवित्र आत्मा रुपी ह्या नदीत आमची ख्रिस्तामध्ये वाटचाल सुरू होते , *मापनसुत्रे घेतलेला पुरुष ख्रिस्त आहे. त्याच्याच हातात खर स्टँडर्ड , एकक आहे.* येशूवर विश्वास म्हणजेच  ख्रिस्ती जीवनाची सुरुवात  घोटाभर पाण्यापासून होते. प्रश्न हा आहे की किती वर्षे आम्ही घोटाभर पाण्यात आहोत? १० वर्ष की २० वर्ष? म्हणजे अध्यात्मिक जीवनात पुढे वाटचाल नाही , प्रगती नाही तर आनंदात वाढ नाही.

   जर ही आनंद देणारी नदी आहे तर जास्त आनंद हवाय तर पुढे गेल पाहिजे. *गुढघाभर पाण्यात* म्हणजे प्रार्थनामय जीवन!! आनंद आणखी वाढतो, पण तिथेच न थांबता पुढे *कमरे एवढ्या पाण्यात* जायचं म्हणजे कंबर कसून सुवार्तेच्या कामाला सुरुवात केली पाहिजे, फलदायी जीवनात वाटचाल सुरु झाली पाहिजे मग पहा ती नदी जीवन अधिक आनंदीत करते. पण इथेही न थांबता पुढे *डोक्यापर्यंत पाण्यात  पोहून* *जायचे म्हणजे पवित्र आत्म्याने भरलेले परिपूर्ण जीवन !! देवाचे पवित्र आत्म्याने भरलेले खास लोक व्हायचे आहे की जे स्वतः आनंदीत असतात आणि इतरांना आनंद देतात. ही नदी जीवन, आनंद आणि आरोग्य आम्हाला आणि प्रभूच्या सामर्थ्याने इतरांना सुद्धा देते*

  *विचार करू आपण या पवित्र आत्म्याच्या नदीत किती वर्षे आम्ही घोटाभर पाण्यातआहोत , गुडघाभर, कमरेपर्यंत की पूर्ण डोक्यापर्यंत पाण्यात आहोत !!*  

 *सामर्थ्यशाली पित्या ह्या जिवंत पाण्याच्या पवित्र आत्म्याच्या नदीत घोटाभर पाण्यात न थांबता   फलदायी जीवन जगत पूर्णपणे बुडून जावं आणि आनंदी व्हावे असे होऊ दे .*  *आमेन*