*यहेज्केल ४७: ३-५*
*पवित्र आत्म्याची*
*आनंद देणारी नदी*!!
*जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्या प्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील*.
*योहान ७:३८*
शालेय जीवनात आपण इतिहास , भूगोल या विषयांचा अभ्यास केलेला आहे. त्यात असं लक्षात येते की मनुष्याने नदीच्या काठी प्रामुख्याने शहरे वसवली होती. कारण पाणी हे जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. शेती, व्यवसाय, पशुपालन नदीकाठीच उत्तम होऊ शकत होते. आणि यामुळेच नदीकाठच्या लोकांचे जीवन समृद्ध आणि आनंददायी होते आणि आजही तसेच आहे.
बायबलमध्ये सुध्दा अशाच एका नदीच वर्णन आहे, *जिचे प्रवाह देवाच्या नगराला , परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे*.
*स्तोत्र ४६:४*. *ही आनंद देणारी नदी आहे पवित्र आत्म्याची ! *प्रभू येशू म्हणतो , जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील*. पवित्र आत्म्याविषयी प्रभू सांगत आहे.
जेव्हा आपण ख्रिस्ताचा तारणारा म्हणून पश्चाताप पूर्वक विश्वासाने स्वीकार करतो तेव्हा पवित्र आत्मा रुपी ह्या नदीत आमची ख्रिस्तामध्ये वाटचाल सुरू होते , *मापनसुत्रे घेतलेला पुरुष ख्रिस्त आहे. त्याच्याच हातात खर स्टँडर्ड , एकक आहे.* येशूवर विश्वास म्हणजेच ख्रिस्ती जीवनाची सुरुवात घोटाभर पाण्यापासून होते. प्रश्न हा आहे की किती वर्षे आम्ही घोटाभर पाण्यात आहोत? १० वर्ष की २० वर्ष? म्हणजे अध्यात्मिक जीवनात पुढे वाटचाल नाही , प्रगती नाही तर आनंदात वाढ नाही.
जर ही आनंद देणारी नदी आहे तर जास्त आनंद हवाय तर पुढे गेल पाहिजे. *गुढघाभर पाण्यात* म्हणजे प्रार्थनामय जीवन!! आनंद आणखी वाढतो, पण तिथेच न थांबता पुढे *कमरे एवढ्या पाण्यात* जायचं म्हणजे कंबर कसून सुवार्तेच्या कामाला सुरुवात केली पाहिजे, फलदायी जीवनात वाटचाल सुरु झाली पाहिजे मग पहा ती नदी जीवन अधिक आनंदीत करते. पण इथेही न थांबता पुढे *डोक्यापर्यंत पाण्यात पोहून* *जायचे म्हणजे पवित्र आत्म्याने भरलेले परिपूर्ण जीवन !! देवाचे पवित्र आत्म्याने भरलेले खास लोक व्हायचे आहे की जे स्वतः आनंदीत असतात आणि इतरांना आनंद देतात. ही नदी जीवन, आनंद आणि आरोग्य आम्हाला आणि प्रभूच्या सामर्थ्याने इतरांना सुद्धा देते*
*विचार करू आपण या पवित्र आत्म्याच्या नदीत किती वर्षे आम्ही घोटाभर पाण्यातआहोत , गुडघाभर, कमरेपर्यंत की पूर्ण डोक्यापर्यंत पाण्यात आहोत !!*
*सामर्थ्यशाली पित्या ह्या जिवंत पाण्याच्या पवित्र आत्म्याच्या नदीत घोटाभर पाण्यात न थांबता फलदायी जीवन जगत पूर्णपणे बुडून जावं आणि आनंदी व्हावे असे होऊ दे .* *आमेन*
No comments:
Post a Comment