*स्तोत्र १९ : ७ - ११*
*हृदयात वचन आहे काय?*
*म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा*.
*अनुवाद ११ : १८.*
निशायला कामानिमित्त नेहमीच एक शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. त्याची एक सवय आहे की तो नेहमी प्रवासाला जाताना आपल्या सुटकेस मध्ये एक पुस्तक ठेवायचा . आणि त्याचे वाचनही करायचा. त्याचा हा नियम कधी चुकत नाही.पुस्तकाशिवाय त्याला अगदीच करमत नाही. त्यात तो अगदी रमून जातो. त्यामुळे तो कधीच अनावश्यक विचार करीत नाही किंवा कोणाच्या विरोधात बोलत बसण्यात वेळही वाया घालवीत नाही. आपलं काम बरं आणि आपलं पुस्तक बरं !!
देवाने आपल्याला सांगून ठेवले आहे की तुमच्या ध्यानी मनी ,तुमच्या हृदयात ही वचने नेहमीच जपून ठेवा.
कारण जेव्हा हे वचन आमच्या हृदयाच्या सुटकेस मध्ये हे वचन आम्ही जपून ठेवतो तेव्हा आपोआप त्या वचनाचे मनन आणि चिंतन होतच राहते त्यामुळे त्याचा उलगडा आणि त्याचे प्रकटीकरण परमेश्वर आपल्याला करीत असतो. त्यामुळे जीवनातील नकारात्मक विचार , निघून जातात. ह्या उत्तम आशा वचनाच्या चिंतनामुळे उत्तम आणि देवाला आवडणाऱ्या देवाच्या सानिध्यात नेणाऱ्या गोष्टी आमच्या आचरणात यायला लागतात.आमचा जीव त्यात रमून जातो.
*जेव्हा ह्या देवाच्या वचनांचा उलगडा होतो ती वचने बावनकशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आणि मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड लागतात.* आणि रोजच्या जीवनात त्याचा अनुभव येतोच.ही वचने आमचे हृदयाला आनंदीत करतात. कितीही कठीण प्रसंग आला असेल तरीही अंतरीचा हा आनंद लोप पावत नाहीच. हे बायबल जे देवाचे वचन आहे ते आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. आमचे अध्यात्मिक नेत्र प्रकाशमान करते. त्यामुळे अंधकाराच्या साम्राज्यापासून ते दूर ठेवते. कारण जेव्हा देवाचे वचन हृदयात असते तेव्हा आमच्या पावलांना दिव्यासारखे होत आमच्या जीवनाच्या मार्ग उजळून टाकते. आणि जेव्हा हे वचन आमच्या आचरणात येते तेव्हा जी आशीर्वादाची फळे मिळतात ती इतरांनाही दिसतातच.
*आमच्या हृदयाच्या सुटकेसमध्ये हे देवाचे वचन आहे काय? जर आम्हाला वरील सर्व आशीर्वाद हवे आहेत तर जपून ठेऊ हे देवाचे वचन सदैव आमच्या हृदयात !!* *सर्व समर्थ ईश्वरा तुझे पवित्र वचन सदैव माझ्या हृदयात राहूदे* *आमेन.*
No comments:
Post a Comment