💝 ईस्टर संडे काय??? 💝
🔴*लेंत, उपासकाळ, राख लावणे, अंडे, ससे - पगन संस्कृती - पवित्र बायबल नुसार अयोग्य आहे.*
प्रियांनो वचन सांगते, *नोहाचे तीन मुले शेम, हाम आणि याफेथ. हामाला कुश झाला, कूशाला निम्रोद झाला;* तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. तो *परमेश्वरासमोर* बलवान पारधी झाला, म्हणून ‘निम्रोदासारखा *परमेश्वरासमोर* बलवान पारधी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे. शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. (उत्पत्ती 10:6-10) प्रियांनो, अब्राहामाचे वडिल तेरह हे निम्रोदा राजाकडे मंत्री होते. निम्रोदाच्या राजाच्या काळात तेरहच्या घरी विविध दैवतांच्या मुर्ती तयार केल्या जात. लोक तेथे येऊन उपासना करत व दक्षिणा (दान) देऊन जात किंवा मुर्ती विकत घेऊन जात. म्हणजे पक्के मुर्तीपुजक होते आणि अतिशय श्रीमंत होते. *परमेश्वराने* अब्राहामाला पाचारण केले तेव्हा अब्राहामाने सर्व सोडले आणि आपल्या वडिलांना घेऊन हारानात गेले. (उत्पत्ती 11:31)
_या निम्रोदाची राजाची पत्नी राणी सिमॅरिमस. निम्रोदाने स्वतःला देव व सिमॅरिमसला देवी म्हटले होते. ती दोघे प्रजेसाठी दैवत होते. हीच पगन संस्कृती होय. सिमॅरिमस हिचे दुसरे नाव अष्टारोथ. निम्रोदाच्या मृत्यू नंतर हिने स्वतःची पुजा उपासना करायला प्रजेला सांगितले. जिवंत परमेश्वर संपूर्ण सृष्टीच्या निर्मात्याला सोडून लोक माणसांच्या आणि मुर्तींच्या भजनी लागले. अष्टारोथच्या पुजेबद्दल पवित्र बायबल मधील काही वचने कृपया वाचावी. शास्ते 2:13, शास्ते 10:6-7, 1 शमुवेल 7:3-4, 1 शमुवेल 31:10_
_निम्रोदाच्या मृत्युनंतर काही वर्षांनी अनैतिक संबंधांतून सिमॅरिमस गरोदर राहिली आणि तिला तम्मुज झाला. तिने तिच्या देवत्वाचा फायदा घेतला आणि सांगितले की निम्रोद माझ्या पोटी जन्माला दे अशी सूर्याकडे मागणी केली. म्हणून मला हा मुलगा तम्मुज झाला आहे. तम्मुज व निम्रोद ही दोनही निम्रोदाची नावे आहेत. पुढे तम्मुज मोठा झाल्यावर सिमॅरिमस ने ताम्मुज सोबत लग्न केले. तीने सांगितले की ती स्वतः आजन्म कुमारिका आहे. ती रात्री तम्मुज सोबत जाते तेव्हा कुमारीका असते, सकाळी ती परत कुमारीका असते. पुढे तम्मुज 40 वर्षांचा होता तेव्हा तो शिकारीला गेला तेव्हा रान डुकराच्या हल्ल्यात तम्मुज मरण पावला. त्याच्या मृत्यूचा दिवस हा अठवड्याचा मधला दिवस म्हणजे आजच्या कॅलेंडर नुसार बुधवार होता. सिमॅरिमस (अष्टारोथ) ने फतवा काढला की तम्मुज साठी सर्वांनी उपास करुन शोक (दु:ख) करायचे. परंतु रविवारच्या दिवशी सुर्य देवतेची आराधना उपासना केली जात असे कारण तो सुर्याचा दिवस आहे, म्हणून रविवार मात्र शोकात घालवायचा नाही असे तिने सांगितले. म्हणून तम्मुजच्या मृत्यूच्या बुधवार नंतर रविवार सोडून चाळीस दिवस उपास करायला सुरुवात झाली. पुढे चाळीस दिवस संपल्यावर सिमॅरिमस म्हणाली की ती स्वर्गात गेली आणि तम्मुज परत जिवंत मागितला. मग परमेश्वराने सांगितले तम्मुज सहा महिने आत्म्यांच्या प्रदेशात राहिल आणि सहा महिने जिवंत होईल. याचे चिन्ह म्हणून निम्रोद ट्री (तम्मुज ट्री) हे सदाहरित राहील. निम्रोद ट्री म्हणजे ख्रिसमस ट्री. पुढे तिने सांगितले की बाबेलच्या (इराक) जमीनीवर जेथे ससे खेळत होते आणि अंडे देत होते तेथे एक फार मोठे अंडे आकाशातून (स्वर्गातून) उतरताना तिने पाहिले. (ससे अंडी देत नाहीत. पिले देतात.) त्या अंड्याचे नाव तिने इस्टर एग ठेवले. तिने जाहिर केले की, तम्मुज आता सुर्यदेव बनुन आपल्या मधे आहे याचे हे चिन्ह आहे._
याच प्रथेप्रमाणे इस्राएल लोक *देवाच्या इच्छेविरुद्ध* तम्मुजसाठी शोक करत, सुर्याची उपासना करत याचेही *पवित्र बायबल* मध्ये संदर्भ आहे. वचन सांगते, तो मला आणखी म्हणाला, “ते ह्यांहूनही अधिक अमंगळ कृत्ये करीत आहेत, ती तुला दिसून येतील.” तेव्हा त्याने मला *परमेश्वराच्या मंदिराच्या* उत्तरेस असलेल्या दरवाजाजवळ आणले, तर तेथे स्त्रिया बसून तम्मुजासाठी शोक करत होत्या. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला हे दिसते ना? ह्याहून अधिक अमंगळ गोष्टी तुझ्या दृष्टीस पडतील.” तेव्हा त्याने मला *परमेश्वराच्या मंदिराच्या* आतल्या अंगणात नेले, तो पाहा, *परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी देवडीच्या व वेदीच्या* दरम्यान सुमारे पंचवीस इसम *परमेश्वराच्या मंदिराकडे* पाठ करून व पूर्वेकडे तोंड करून उभे होते; ते पूर्व दिशेस सूर्याची उपासना करीत होते. (यहेज्केल 8:13-16)
प्रियजनहो, आजही फार मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोक हा इतिहास माहित नसल्याने अज्ञानामुळे किंवा माहिती असून त्याकडे दुर्लक्ष करुन तम्मुजासाठी शोक करत आहेत. या दिवसांना ख्रिश्चन लोक दु:खाचे दिवस लेंत समय म्हणतात. सिमॅरिमस (अष्टारोथ) आणि प्रजेने तम्मुजसाठी चाळीस दिवस उपास केले, डोक्यावर राख टाकली, गोणताट नेसून राखेत बसले अशासाठी की तम्मुज (निम्रोद) यास सूर्य देवतेने परत जिवंत करावे. रविवार वगळता चाळीस दिवसांनंतर येणाऱ्या रविवारी तो परत जिवंत होईल हे राणीने सांगितले होते म्हणून लोकांनी केले. याच सिमॅरिमस ला म्हणजे अष्टारोथला आकाशराणी (यिर्मया 7:18) म्हटले जात असे. तिला इश्तार किंवा इश्तियार देवी देखील म्हटले जाते. यांची सेवा उपासना करणे परमेश्वराच्या क्रोधाला आपल्यावर ओढवून घेणे आहे.
*लेंत समयाबद्दल ख्रिश्चन लोकांच्या चुकीच्या धारणा, विचार व पवित्र बायबलचे मार्गदर्शन - 1)प्रभु येशू ख्रिस्ताने* चाळीस दिवस उपास केले म्हणून आम्ही देखील करतो. - तर उपास केल्यानंतर *प्रभु येशू ख्रिस्ताची* स्वतः सैतानाने समक्ष परीक्षा घेतली होती. तुम्ही उपासांनंतर सैतानाचा सामना करणार का? *2)प्रभुजींनी* उपास बुधवारी सुरु केले होते का? - नाही. असे *पवित्र बायबल* मध्ये कोठेही लिहिलेले नाही. *3)प्रभुजींना उपास संपल्यावर लगेचच वधस्तंभावर खिळले का? - नाही. उपास संपल्यानंतर प्रभु येशू ख्रिस्ताची सेवा सुरु झाली आहे.* वल्हांडन सनापूर्वी चाळीस दिवस नाही तर सहा महिने आगोदरच *प्रभुजींनी* उपास केले होते. इंग्रजी कॅलेंडर नुसार सप्टेंबर ऑक्टोबर च्या काळात *प्रभु येशू ख्रिस्ताने* रानात उपास केले होते. *4)प्रभु येशू ख्रिस्ताने* उपासांच्या दरम्यान रविवारची सुटी केली होती का? - नाही *प्रभु येशू ख्रिस्ताचे* उपास सलग होते. तर मग उपास करणाऱ्यांनी सलग चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास करायला हवेत. *5)प्रभु येशू ख्रिस्ताचे* रविवारी *पुनरुत्थान* झाले म्हणून रविवारी उपास करायचे नाही असे म्हटले जाते. - रविवार व्यतिरिक्त इतर इतर दिवस *प्रभु येशू ख्रिस्त जिवंत* नाहीत का? आहेत तर उपास, दु:ख, शोक कशासाठी? *प्रभुजी* सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी *पुनरुत्थीत* झाले आहेत. *आता आपण फक्त पुनरुत्थीत प्रभु येशू ख्रिस्ताच गाजवावा. 6)परमेश्वराने* मोशेला नियमशास्त्र दिले तेव्हा मोशेने चाळीस दिवस चाळीस रात्री उपास केले. - एलीयाने देखील केले परंतु इस्त्राएल लोकांनी कधीही चाळीस दिवस उपास केले नाहीत. नोहाच्या काळात चाळीस दिवस रात्र पाऊस पडला त्याचा उपासांशी काहीही संबंध नाही. *7)पवित्र बायबल* चाळीस दिवस उपास करायला सांगते का - नाही. - फक्त एकच दिवस उपास करायला नियमशास्त्रात लिहिले आहे. (लेवीय 23:27-32) *प्रभु येशू* म्हणतात की उपास गुप्त असावे. त्यामध्ये ढोंगीपणा नसावा. (मत्तय 6:16-18) त्यासाठी एक की अनेक किंवा ठराविक दिवस सांगितला किंवा सांगितले नाहीत.
*8)पवित्र बायबलमधील* प्रेषितीय मंडळीने चाळीस दिवसांचे लेंत उपास केल्याचा किंवा करायला सांगितल्याचा *पवित्र बायबल* मधे कोठेही उल्लेख नाही. किंवा *स्वतः प्रभु येशू ख्रिस्ताने* देखील असे आज्ञापिले नाही. *9)प्रभु येशू ख्रिस्ताने स्वतःच्या डोक्यावर राख टाकली होती का? - नाही.* *10)तारणासाठी* उपास करणे, शोक करणे, दानधर्म करणे अशा काही कृती केल्या की या प्रथेनुसार मनुष्य शुद्ध होतो पवित्र होतो त्याच्या पापांची क्षमा होते असे म्हटले जाते - परंतु *पवित्र बायबल सांगते की, मनुष्याचा उद्धार हा प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेनेच होतो कर्मांनी अजिबातच नाही. (इफिसकरांस पत्र 2:9)* तसेच पापांबद्दल शोक करायला ठराविक दिवस नसतात. पापांची जाणीव झाली की ताबडतोब त्या बद्दल शोक करावा पश्चात्ताप करावा *प्रभु येशू ख्रिस्ताकडेच* क्षमायाचना करावी. त्यासाठी लेंत समयाची वाट पहाणे अयोग्य आहे. *11)परमेश्वराने म्हटले* की तु माती आहेस आणि परत मातीला मिळशील याची आठवण म्हणून डोक्याला राख लावतात असे म्हटले जाते. - ही *परमेश्वराने* मनुष्याला दिलेली शिक्षा होती. परंतु सुमारे 2000 वर्षांपूर्वी *प्रभु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतःला अर्पण करून आपल्याला पापातून मरनातून सोडविले आहे.* आता आपण दु:ख करत बसण्यापेक्षा *पुनरुत्थीत प्रभु येशू ख्रिस्ताला गाजवावो व गौरव द्यावा.* आता आपण बंधनातून मुक्त झालेलो आहोत. *कोणी म्हणेल की मग विश्वासणारे मरत नाही का? मरतात ना? - नाही विश्वासणारे मरत नाहीत. झोपी जातात, महानिद्रा घेतात. प्रे कृ 7:60, 1 थेस्सलनी 4:13-15, करिंथकरांस पहिले पत्र 15:6,20,51 अविश्वासणारे मात्र मरतात.*
*12)* डोनल्ड ए मॅकेंझी यांच्या मीथ्स ऑफ बाबेल या पुस्तकात पान नंबर 305-325 ब्रिटनिका एनसायक्लोपिडिया खंड 18 पान नंबर 926, तसेच कॅथोलिक एनसायक्लोपिडिया मध्ये देखील या बाबी नमुद केलेल्या आहेत की रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन ने इ. स. 313 मध्ये आकाशात क्रॉस सारखे चिन्ह पाहिले आणि आवाज ऐकला की हे काय आहे ते शोध. त्याने त्या चिन्हाचा म्हणजे क्रॉसचा उपयोग केला आणि त्याला युद्धात विजय मिळत गेला. मग त्याने ख्रिस्ती लोकांना स्वातंत्र्य द्यायला सुरुवात केली. त्याने स्वतः जून्या पगन संस्कृती मधील रुढी परंपरा न सोडता ख्रश्चन धर्म स्वीकारला. त्याच्या नंतर इ. स. 380 मध्ये सम्राट थिओडोशियस ने इ. स. 325 च्या काउन्सील ऑफ नेशीयाच्या ठरावानुसार पगन संस्कृती मधील रुढी परंपरा चर्च मध्ये लागू करण्यास मान्यता दिली आणि इ. स. 385 पासून अधिकृतपणे पगन संस्कृती मधील रुढी परंपरा रिवाज चर्च मध्ये सामिल झाले. आणि त्या वेळच्या ख्रिस्ती धर्म पुढारी, याजक, वडील वर्गाने भितीपोटी, लालसेपोटी, या पगन परंपरा चर्च मध्ये सामील करायला संमती दिली. तेव्हापासून चर्च मध्ये फोटो, मुर्ती दिसायला सुरुवात झाली. पगन संस्कृती मधील गोष्टींची ख्रिश्चन धर्माशी सांगड घालून त्या अधिकृत करायला सुरुवात केली. अशा प्रकारे *प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिवसाला* इस्टर हे पगन देवी सिमॅरिमसचे नाव दिले गेले. किती भयंकर प्रकार आहे हा! *पुनरुत्थान दिनी* इस्टर एग्ज आणि ससे चर्च मध्ये अर्पण केले जातात, सजवले जातात. किती किती दु:खदायक आहे हे! *परमेश्वराला मुर्ती पूजेचा भयंकर राग आहे. सर्वात जास्त राग आहे. संपुर्ण मानवजातीला प्रभु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या व्दारे नितीमत्व प्राप्त होते धार्मिकता प्राप्त होते तो दिवस प्रभुचे पुनरुत्थान गाजवायचे* सोडून हॅपी इस्टर म्हणून पगन संस्कृती मधील देवी देवतांच्या नावाचा महिमा करुन मनुष्य स्वतःला *देवाच्या क्रोधाचा* भागीदार करुन घेत आहे. कारण परमेश्वराने स्पष्ट आज्ञा दिली आहे की, मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; *_इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये._* (निर्गम 23:13) *परमेश्वराने* मनुष्याला सावधानता बाळगायला सांगितले आहे. मुर्ती पुजा फार दुर परंतु इतर देवतांची नावे देखील मुखातून बाहेर पडायला नको हे किती स्पष्ट अाज्ञापिले आहे. असे असतानाही *पुनरुत्थान दिनी* अन्य देवतांच्या आराधना कळत किंवा नकळत करुन मनुष्य सैतानाला खुष करत आहे आणि *निर्माणकर्त्या परमेश्वराला* दु:ख देत आहे.
प्रियजनहो, लेंत समयातील उपास हे तम्मुजासाठी केले जात आहेत. त्यांचा *पवित्र बायबलशी* काहीही संबंध नाही. आणखी दु:ख याचे वाटते की ज्यांना हे सर्व माहिती आहे ते लोक म्हणतात आम्ही तम्मुजासाठी नाही करत. परंतु लक्षात ठेवा की, कोणतेही निमित्त करुन धार्मिकता येत नाही. खोट्या रुढी परंपरा पाळण्यात नक्कीच नाही. ज्यांना सत्य कळते पण वळत नाही ते अनेक कारणे सांगून बंधणात राहतात. *ज्यांना सत्य समजते ते बंधमुक्त होतात. प्रियजनहो खरी धार्मिकता प्रभु येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनात आहे. सत्य समजून घ्या आणि बंधमुक्त व्हा. सत्य प्रभु येशू ख्रिस्तच आहे. तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील.” (योहान 8:32) आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. (प्रकटीकरण 3:13) देवबाप करो हा संदेश समजण्यासाठी सर्वांना बुद्धी देवो. खोट्या रुढी परंपरा सोडून केवळ प्रभु येशू ख्रिस्ताला अनुसरण्यासाठी आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याचे सहाय्य व मार्गदर्शन पुरवो. आणि आपल्या सर्वांना प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेनेच रॅप्चर मध्ये सहभागी करुन अनंतकाळचे जीवन देवो. आमेन.*
No comments:
Post a Comment