Thursday, 7 April 2022

सैतानाचे 7 खोटेपणा (मराठी )

 सैतानाचे 7 खोटेपणा :-



★  त्या अगोदर येशूने काय म्हटले ? मी तुमच्या मध्ये ठेवत आहे ,


                

                    योहान 8:44 


तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.


1) तर येशु काय म्हटला ? सैतान , इबालिश खोटा आहे , तर त्याने 7 खोटेपणा जगाशी बोलला आहे 

2) चला पाहू त्याचे 7 खोटेपणा , त्या बरोबर हे पण म्हटला ,


              

                  प्रकटी 12:9 


मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.


 ★ तर सैतानाने 7 खोटेपणा ने जगाला भरकटवले आहे  ,


 1) जर हा व्हिडीओ कोणी  ख्रिस्ती बहीण-भाऊ ते पाहत असेल ते समझो

2) त्याबरोबर कोणी अशी ख्रिस्ती बहीण-भाऊ नाही , ते ख्रिस्ती Follower नाही , त्यांनी येशूचा कधी अनुभव घेतला  नाही

3)  कोणी पण माझा हिंदू भाऊ , मुस्लिम भाऊ ,शीख , नाही तर कोणी पण असेल मी सांगतो की , या 7 खोटेपणा पासून वाचा

 4) तुम्हाला पण वाचायचे आहे आणि जे येशूचे Follower आहे त्यांना पण वाचायचे आहे


 ★ सर्वात पहिला सैतानाचा खोटेपणा , जगाशी बोलला आहे , मनुष्यांशी बोलला आहे  , 


ते खोटेपणा आहे , , 



1) परमेश्वर नाही :-

     

                      स्तोत्रसंहिता 14:1 


मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही,” लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही.



1)  याचा अर्थ हा आहे  पहिला खोटेपणा आहे , तो जगाशी बोलला

2) कोणी परमेश्वर नाही 



 पाहू या , खरे काय आहे ?



                 याकोब 2:19 


एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.



1) सैतानाला पण माहीत आहे की , खरा परमेश्वर कोण आहे ?

2) परंतु त्याने पूर्ण जगाला खोटे सांगून ठेवले आहे , की कोणी परमेश्वर नाही



2) स्वर्ग आणि नरक नाहीं :-



                   लूक 16:24


तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’


1)  तुम्हाला माहीत आहे , ही लाजर आणि श्रीमंताची घटना आहे , तेथे श्रीमंत नरका मध्ये आहे आणि म्हणतो की लाजराला पाठव

 2)  ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी

 3) कारण की मी अग्नी मध्ये क्लेश भोगत आहे , नरकात मी क्लेश भोगत आहे


  याचा अर्थ आहे , नरक आहे 



 खरं काय आहे ?

  

                 प्रकटी 21:8 


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


1)  याचा अर्थ आहे , येशु म्हटला की नरक आहे

2) तर आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे


3) आम्ही पापी नाही :-


1) काही लोक म्हणतात की , आम्ही कधी मच्छर नाही मारला , माशी नाही मारली , आम्ही कधी पाप केले नाही , खोटे बोललो नाहीं , खून केला नाही , तर आम्ही पापी कसो झालो ?
2) लक्षात ठेवा , पाप केल्यावरच पापी होत नाही , आपला जन्मच पापात झाला आहे
3) म्हणून आम्ही पापी आहोत , सैतानाचे हे खोटेपणा आहे की , आम्ही पाप केले नाही
 4) तर मी पापी नहीं , हा त्याचा खोटेपणा आहे 



   पाहू या , खरं काय आहे ?


              रोमकरांस पत्र 3:23 

कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;


तर सर्वांमध्ये पाप आले ,


1) हिंदू , मुस्लिम , सिख , बुद्धिष्ट , ईसाई , पारसी आपण कुठलेही असो नॅशनल , इंटरनॅशनल असेल , सर्व मनुष्य पापी आहे  , वचन सांगते

2) सैतान म्हणतो , कोणी पापी नाही

3) तर हे खरं आहे की , आम्ही सर्व पापी आहोत आणि आम्हाला तारणकर्त्याची गरज आहे


4) सर्व देव एक आहे :-



1) सैतान म्हणतो सर्व देव एक आहे 

2) सर्वत्र , जगामध्ये जितके भी धर्म आहे , सर्व देव एक आहे



  तर खरं काय आहे ?

     


                 1 करिंथ 8:4 


आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, “जगात (देवाची) म्हणून मूर्तीच नाही;” आणि “एकाखेरीज दुसरा देव नाही.”



1) तर एक कोण आहे ? येशु , ज्याची मी गोष्ट करत आहे , तो एक परमेश्वर आहे
 2) सैतान म्हणतो , कोणी परमेश्वर नाही , सर्व देव एक सारखे आहेत , तर देवच एक आहेत
3) परंतु वचन सांगते , एक परमेश्वर आहे , त्याला जाणणे खूप गरजेचे आहेत



5) पुनर्जन्म असतो :-

★  सैतान म्हणतो , पुनर्जन्म असतो , हे सैतानाचे खोटेपणा आहे


 खरं काय आहे ? पाहू या ,


                     इब्री 9:27 


ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,


 1) मनुष्यासाठी एकदा जन्म घेणे त्याच्या नंतर मरणे आणि त्याच्या नंतर सरळ न्याय होणे नियुक्त आहे

 2)  याचा अर्थ आहे , पुनर्जन्म नाही

 3) मनुष्यासाठी एकदा जन्म घेणे  मरणे आणि त्याच्या नंतर सरळ न्याय होणे नियुक्त आहे


6) कर्म करा , पापापासून वाचा :-

 शैतान म्हणतो कर्म करा , पापापासून वाचा



  खरं काय आहे ?


           इफिसकरांस पत्र 2:8‭-‬9 


कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.


1) तुम्ही टाटा आहात , तुम्ही अंबानी आहात , तुम्ही बिर्ला आहात  , तुम्ही लंडन चे प्रिन्स आहात , तुम्ही कोणी पण असू द्या तुमचे पैसे तुमच्या पापांची पापक्षमा करू शकत नाही  
2) तुमचे दान-कर्म पंडित ला ,  मौलाना ला , या चर्च च्या फादर ला आणि असे किती ही लोक आहे की कोणतेही दान करम केल्याने तुम्हाला पाप क्षमा नाही मिळणार 
3) जोपर्यंत येशूच्या द्वारे तारण होत नाही , येशूच्या रक्त द्वारे तारण होत नाही
4) दानधर्म केल्याने तारण होत नाही , हे सैतानाचे खोटेपणा आहे



7) फक्त येशूच तारणकर्ता नाही :-


1) आज पूर्ण जगामध्ये 2000 वर्षापूर्वी पासून एक संदेश दिला जात आहे , येशूचा स्वीकार करा , नरका पासून वाचा , पापापासून वाचा
2) परंतु लुसिफरने फार मोठे खोटेपणा केरून ठेवला आहे , फक्त येशु तारणकर्ता नाही
3) किती नाव , आणि किती मार्ग आहे की ज्याच्या द्वारे तारण आहे
 4) हे सर्वात मोठे खोटेपणा आहे



तर खरे हे आहे की , 


                        2 करिंथ 4:4


  त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.




 परंतु खरं काय आहे ?


             प्रेषितांची कृत्ये 4:12 


आणि तारण दुसर्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”



         फिलिप्पैकरांस पत्र 2:10‭-‬11 


ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.



 ★ प्रियांनो ,  सैतानाच्या  7 खोटेपणा वर विश्वास नाही करायचा



 1) पृथ्वीच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून हा व्हिडीओ पाहत असेल
 2) तुम्ही कोणत्याही धर्म जातीचे , कॉमचे कोणी का असेना , तुम्ही मनुष्य आहात
 3) तुम्हाला तारणकर्ता  येशूची गरज आहे
 4)  माझी इच्छा आहे की , आपण सैतानाच्या 7 खोटेपणा पासून वाचावे
 5) विश्वासी असो या अविश्वासी आणि प्रभू यीशू ख्रिस्ताच्या  मागे ते चालत असेल .

No comments:

Post a Comment