Monday, 4 April 2022

सुवार्ता ( मराठी )


येशुला कोणी धरून दिले ? का धरुन दिले ?


               रोमकरांस पत्र 4:25

तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.



1) येशुला 30 चांदीच्या सिक्यात विकले , म्हणून नाही

2) येशुच्या गालावर चुंबन घेऊन यहूदा इस्कॉर्योत ने    धरून दिले नाही

3) यहुदा इसकोर्योतने नाही तर , आमच्या अपराधाने येशुला धरून दिले


तर लिहीले आहे ,,


1) माझ्या अपराधाने , 

2) तुमच्या अपराधाने ,  

3) मानवजातीच्या अपराधाने 


येशुला धरून दिले ... 


      ही सत्यता कधी माहीत होती का ?



1) येशुला कोणी धरून दिले ? यहूदा इस्कॉर्योतने नाही

2) तर माझ्या पापामुळे , मानव जातीच्या पापामुळे    येशुला धरून देण्यात आले


                  यशया 53 : 6

आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.


1) आदमाच्या चुकीमुळे , येशु ख्रिस्ता पासुन तर        आत्तापर्यंत सर्वजण भटकले आहे

2) परमेश्वराचा शोध करणारा कोणी ही नाही

3) खऱ्या परमेश्वराला ओळखणारा कोणी ही नाही

4) आपण लोक अल्लाह म्हणतो , आपण लोक खुदा    म्हणतो , आपण लोक भगवंत म्हणतो ,

5) आपण लोक भगवान म्हणतो , आपण लोक ईश्वर    म्हणतो , आपण लोक देव म्हणतो

6) तोच परमेश्वर , यहोवा , एलोहिम , तो त्रेक्य देव    परमेश्वर म्हणतो सर्व जण भटकले आहात

7) आपण लोक म्हणतो ना , सर्व मार्ग एक आहे

8 ) तर वर बसलेला परमेश्वर म्हणतो , सर्व भटकले आहात


                   यशाया 53:6 


आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.


 1) वधस्तंभ खांद्यावर घेऊन येशु चालत होता

 2) तर त्याला रोमी सरकार कडून मिळालेली शिक्षा  नव्हती

 3) ती पिलाता कडून मिळालेली शिक्षा नव्हती

 4) त्याला हेरोद राजा कडून मिळालेली शिक्षा नव्हती


येशू वर जो वधस्तंभ लादण्यात आला होता तो सर्व मानव जातीच्या पापांसाठी वधस्तंभ लादण्यात आला होता  , जे सर्व भटकलेले होते -- (2)


मुर्तीला परमेश्वर म्हणणाऱ्याची का चीड येते ,


1) का चीड येते प्लास्टिक आणि लाकडाला परमेश्वर म्हणणाऱ्या ची ?

 2) का चीड येते अशा लोकांची झाडावरती ,            झाडाखाली , 

3) पाण्यावरती , पाण्याखाली , डोंगरावर ,              डोंगराखाली , सूर्य , चंद्र 

4) अशा गोष्टीची परमेश्वराला का चीड येते ? कारण  आपण तेव्हा भटकले होतो

 5) तर आम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी येशुवर      वधस्तंभ लादण्यात आला होता


ही सत्यता माहीत होती का ,,,


       1)  जेव्हा आम्ही भटकले होतो , तेव्हाच मार्ग          काढला होता 

       2)  आणि मार्गामध्ये येऊन पुन्हा भटकले 

       3) तर कोणता मार्ग काढणार ?


            प्रेषितांची कृत्ये 10:43


त्याच्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.”


               असे का ?


               1 पेत्र 2:25 


कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.


 1) येशुने वधस्तंभ घेतला हिंदू भावांसाठी

 2) येशुने वधस्तंभ घेतला मुस्लिम भावांसाठी

 3) येशुने वधस्तंभ घेतला बुद्धिष्ट भावांसाठी

 4) येशुने वधस्तंभ घेतला यहूदी भावांसाठी

 5) येशुने वधस्तंभ घेतला जैन , शीख , आदिवासी    भावांसाठी

 6) येशुने वधस्तंभ घेतला तुमच्या साठी आणि माझ्या साठी 


तर येशु आमच्या पापांची क्षमा करतो ?


अ) कारण येशूच , आमच्या पापांची क्षमा करतो


                       कलस्सै 2:13 

जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होता त्या तुम्हांला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले, त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;


1) कधी कोणी म्हटले का माझ्याजवळ या , मी तुमच्या पापांची क्षमा करीन , येशूला सोडून , काढून दाखवा


2) कधी कोणता ईश्वर , कधी कोणता देवता , कधी कोणता पक्षी , प्राणी , सूर्य , चंद्र , गॅलक्सी , पृथ्वीवरील वस्तू कधी मनुष्याला म्हटली का माझ्यावर विश्वास करा , मी तुमच्या पापांची क्षमा करीन ?


3) येशू म्हणतो माझ्यावर विश्वास करा , मी तुमच्या पापांची क्षमा करीन , तुम्हाला पापांची क्षमा मिळेल , तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची क्षमा मिळेल , ज्याची पृथ्वीवर कोणी क्षमा करू शकत नाही


4) कोणताही ग्रंथ वाचून पहा , तुम्हाला भेटणार नाही , ते कुराण असेल , ऋग्वेद असेल , हिंदुचा श्लोक असेल , गीता असेल , कधी कोणी म्हटले का ? मी तुमच्या पापांची क्षमा करीन ?


5) तुम्हाला नाही भेटणार , फक्त येशू म्हटला , मी तुमच्या पापांची क्षमा करीन


आपण किती पण ---


1) बकऱ्याचे रक्त , कोंबड्याचे रक्त , वासराचे रक्त

2) याचे रक्त , त्याचे रक्त , पांढरे कपडे , लाल                   कपडे

3)  डोक्यावरील केस काढून टाका , अंगावर राख      ओढून घ्या

4) आपण कधीच - कधीच पवित्र होऊ शकत नाही

5) धार्मिक बनू शकत नाही

6)आपण कधीच कधीच शुद्ध होऊ शकत नाही


परंतु असा एक व्यक्ती आहे , एक मसीहा असा आला , त्याच्या पवित्र रक्ताने सर्वांना शुद्ध केले


अ) येशूच्या पवित्र रक्ताने

ब) येशूच्या सांडलेल्या रक्ताने

क) येशूने पापांची क्षमा केली 


★ कारण येशूचे रक्त , सर्व पापांपासून शुद्ध करते


1) आपल्यावर जेवढे पण श्राप होते , बंधन होते , येशु म्हणतो , मी सर्व दूर केले , सर्व श्राप मिटून टाकले , आपल्या पापांची क्षमा केली  


 2) असा फायदा कोण देऊ शकतो ? कोण करू शकतो ? जर येशूने क्षमा केली तर दुसरा , तिसरा , चौथा  आरोप करू शकत नाही


 3) मी ख्रिशनविषयी बोलत नाही , तुम्ही सफेद कपडे घाला , मी त्या विषयी बोलत नाही , बहिणींनी कानात सोने घालू नये , मी त्याविषयी बोलत नाही 


4) तुम्ही तुमचा कल्चर चेंज करा , मी  त्याविषयी बोलत नाही , तुम्ही तुमचे खाणे पिणे चेंज करा , मी त्याविषयी बोलत नाही


 5) मी बोलत आहे आपल्या जीवन परिवर्तना विषयी , येशु धर्म परिवर्तन करण्यासाठी नाही आला तर , येशु जीवन परिवर्तन करण्यास आला आहे


पापांची क्षमा झाल्याशिवाय कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही


स्वर्गाचे द्वार येशू आहे 


                       योहान 14:6 

येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.



                       


        



No comments:

Post a Comment