येशू का मनुष्य म्हणून आला ?
पहिले कारण :-
1) आदाम ची जागा घेण्यासाठी :-
1) असा संदेश आज तुम्ही ऐकणार आहात
2) असे वचन आज तुम्ही ऐकणार आहात
3) अशा संदेशांना आज तुम्ही ऐकणार आहात
या पृथ्वीवर 25 डिसेंबर ला येशूचा जन्म झाला , परंतु का झाला होता ? - - (2)
1) अन्न (जेवण ) देण्यासाठी नाही
2) तुमचे मुले , मुली , भावांना जिवंत करण्यासाठी नाही
3) तुम्हाला आरोग्य देण्यासाठी नाही
4) दृष्ट आत्मा ( भुते ) काढण्यासाठी नाही
तर लिहिले आहे , आदाम ची जागा घेण्यासाठी येशू चा जन्म झाला .
तर प्रश्न निर्माण होतो , का ?
याचे कारण आहे
आदाम आज्ञाधारक नव्हता , हे सर्वात मोठे कारण आहे
रोमकरांस पत्र 5:19
कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या (आदाम ) आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या ( येशू ) आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.
1) कारण या पृथ्वीवर पहिला आदाम Fail झाला होता
2) परमेश्वराची आज्ञा पाळण्या मध्ये आदाम आज्ञाधारक नव्हता
3) त्या कारणाने येशूला आदाम ची जागा घेण्यासाठी दुसरा आदम म्हणून यावे लागले
येशू ख्रिस्त या पृथ्वीवर - - -
1) माझ्या मुस्लिम भावांनो तुम्ही ऐका
2) माझ्या हिंदू भावांनो तुम्ही ऐका
3) माझ्या प्रत्येक जातीच्या लोकांनो तुम्ही ऐका
4) माझ्या यहुदी भावांनो तुम्ही ऐका
5) जितके माझे कॅथलिक भाऊ आहे तुम्ही ऐका
6) जरी येशु ख्रिस्त एक बेबी ( बाळ ) म्हणून जन्म झाला
परंतु त्याला बेबी (बाळ ) म्हणून करून ठेवू नका
1) कारण तो बाळ नाही
2) तर तो सर्वांचा निर्माणकर्ता (बाप) आहे (2)
मला पवित्र नाही बनायचं ,,
1) येशूच्या पवित्रता मध्ये पवित्र राहायचे आहे
2) मला बाहेरील धार्मिकता मध्ये नाही तर
3) मला येशूच्या धार्मिकता मध्ये धार्मिक बनायचे आहे
4) डोंगराच्या वर , डोंगराच्या खाली
5) पाण्याच्या वर , पाण्याच्या खाली
5) चंद्र , सूर्य अशा कुठल्याच गोष्टी मला करायचे नाही
कारण येशूच्या आज्ञा पालनाने मी पण आज्ञा पालन केले आहे
आपण किती पण ---
1) बकऱ्याचे रक्त , कोंबड्याचे रक्त , वासराचे रक्त
2) याचे रक्त , त्याचे रक्त , पांढरे कपडे , लाल कपडे
3) डोक्यावरील केस काढून टाका , अंगावर राख ओढून घ्या
4) आपण कधीच - कधीच पवित्र होऊ शकत नाही
5) धार्मिक बनू शकत नाही
6) आपण कधीच कधीच शुद्ध होऊ शकत नाही
परंतु असा एक व्यक्ती आहे , एक मसीहा असा आला की त्याने आज्ञा मानली
अ) आणि त्याच्या आज्ञा पालनाने
ब) आपण त्याच्या सर्व आज्ञा पाळल्या आहे
क) येशूने सर्वांना पापांची क्षमा केली
कोणाची जागा घेतली ? तर आदाम ची जागा घेतली
आदामा ची जागा घेण्यासाठी येशू ख्रिस्ताला शरीरामध्ये जन्म घ्यावा लागला
1) न्यायाच्या दिवशी हर एक जातीचा व्यक्ती त्या येशू समोर उभा राहील
2) तर ज्याने आपले जीवन येशुला दिले तो वाचेल
3) आणि ज्यांने आपले जीवन येशुला दिले नाही
4) तर त्याची परिस्थिती फार भयानक असेल
5) त्याचे जीवन नरकात जाणार
दुसरे कारण -
2) आमच्या साठी प्रायश्चित करण्यासाठी :-
इब्री 2: 17
म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे.
यासाठी लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे
★ महायाजक काय करत होता ?
1) कोणत्या तरी प्राण्याचे रक्त घेऊन परमेश्वराजवळ अति पवित्र स्थानामध्ये उभा राहत होता
2) आणि म्हणांचा की , मी आहे महायाजक यांच्या पापाबद्दल मी उभा आहे
3) आपल्यासमोर मागे 6000 लोक उभे आहे
4) त्यांच्या पापाचे रक्त , बकऱ्याचे रूपामध्ये , त्या कोकराच्या रूपा मध्ये उभा आहे , यांना क्षमा कर
परंतु येशूला पहा मित्रांनो ,
1) येशू स्वतः रक्त घेऊन प्रायश्चित्त झाला होता
2) त्यासाठी येशुने शरीरामध्ये जन्म घेतला
3) यासाठी येशु आमच्या पापांबद्दल प्रायश्चित्त झाला
तिसरे कारण :-
3) आमच्यासाठी महायाजक होण्यासाठी :-
का ? कारण आम्हाला साहाय्यता करण्यासाठी
इब्री 2:18
कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.
इब्री 4:15
कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला वाटत नाही .
1) असा येशू आहे जो आपली सहायता करणार आहे
2) कधी ? जेव्हा आपण दुःखामध्ये असेल , त्रासांमध्ये असेल
3) जेव्हा आपल्याला समजते की सर्व मार्ग बंद झाले आहे
4) खूप टोचर आहे , खूप वेदना आहे , खुप तकलीब आहे
5) तेव्हा येशू म्हणतो मी आहे
6) काय म्हणून तर महायाजक म्हणून
7) तुमची सहाय्यता करेन
अ) तकलीफ , त्रास काय असते हे येशुला माहित आहे
ब) भूक काय असते हे , येशूला माहित आहे
क) तहान काय असते हे , येशूला माहित आहे
ड) घर नाही हे , येशूला माहित आहे
इ) पैसा नाही , येशूला माहित आहे
ई) अपमान होने काय असते हे , येशूला माहित आहे
ए) बदनामी काय असते हे , येशूला माहित आहे
ऐ) खोटे बोलून बदनाम करणे हे , येशूला माहित आहे
ख) घरातून बाहेर काढणे हे , येशूला माहित आहे
ग) येशूला कोणी वेडा म्हणायचे , हे त्याला माहित होते
1) तुम्हाला कोणी वाईट म्हणतात , येशू त्यातून गेला आहे
2) तुम्ही त्रासातून जात आहात , येशू त्यातून गेला आहे
3) तुम्ही आता दुःखातून जात आहात , येशू त्यातून गेला आहे
4) कोणी तुम्हाला वेडे म्हणतात का ? येशु त्यातून गेला आहे
5) तुमचे घरचे , नातेवाईक तुम्हाला नाव ठेवतात का ? येशु त्यातून गेला आहे
6) येशू म्हणतो माझ्या मुला - मुली , दास-दासी यातून मी गेलो आहे
7) आणि मी असा महायाजक आहे की , मी तुझी सहाय्यता करू शकतो
म्हणून येशू शरीरामध्ये जन्मला तो आमच्यासाठी महायाजक बनला
★ चौथे कारण :-
4) आमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी :-
का ?
1) परमेश्वराजवळ आमच्यासाठी एक मध्यस्ती करणारा पाहिजे होता
2) परमेश्वर डायरेक्ट मनुष्याशी बोलू शकत नाही
3) जर बोलेल तर तो मनुष्य मरेल
उदा . मोशे
1) मोशे 40 दिवस परमेश्वराजवळ बातचीत करून खाली काय उतरला तर इस्रायली काय म्हणू लागली
2) तुझा चेहरा पाहू शकत नाही , तो म्हणाला , का ?
3) तुझ्या चेहऱ्यावर तेज आहे , पडदा टाक , कपडा टाक , तेव्हा पाहू शकतो
4) परमेश्वराचे तेज पाहू शकत नाही
5) परमेश्वराचे तेज मोशेच्या चेहऱ्यावर होते , त्याला पाहू शकत नव्हते
6) तर तुम्ही परमेश्वराला कसे पाहू शकता ?
7) तर तुम्ही मराल
त्यासाठी परमेश्वराला सुरुवातीपासून एक मध्यस्ती करणारा पाहिजे होता
तो कोण झाला ?
1 तीमथ्य 2:5
कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशु हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.
A) काही लोक म्हणतात की येशू मनुष्य परमेश्वर कसा असू शकतो ?
B) येशू ख्रिस्त मनुष्य म्हणून आला , कारण हे बायबल सांगते
1) परंतु हे समजून घ्या की , तो मध्यस्थी करण्यासाठी मनुष्य झाला
2) आदाम ची जागा घेण्यासाठी मनुष्य झाला
3) महायाजक बनण्यासाठी तो मनुष्य झाला
4) सहायता करण्यासाठी मनुष्य झाला
* तो मध्यस्त यासाठी झाला की , त्याचा उद्देश काय होता ?
तर ,,,
इब्री 7 : 25
ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.
ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्यांना
[ इब्री 7:25 ]
देवाजवळ कोण येतात ?
1) हिंदू येतात
2) मुस्लिम येतात
3) शीख येतात
4) बुधिस्त येतात
5) पारसी येतात
6) जैन येतात
7) यहुदी येतात
8) आदिवासी येतात
9) गरीब येतात
10) श्रीमंत येतात
अ) जे त्याच्या जवळ येतात तो येशु त्यांचे पूर्ण पूर्ण तारण करू शकतो , का ?
ब) कारण तो त्यांच्यासाठी विनंती करण्यास सर्वदा जिवंत आहे
परमेश्वरा च्या बाजूला कोण बसले आहे ?
1) एक असा व्यक्ती जो 100 % परमेश्वर पण आहे
2) आणि 100 % मनुष्य पण आहे (2)
3) येशूने आपले रक्त वाहीले आहे
4) येशूने आपल्यासाठी प्रार्थना केली आहे
5) येशू बसला आहे परमेश्वराजवळ , आपल्या जवळ
6) तुम्ही येशूला पहा
7) तो येशू ख्रिस्त म्हणतो , मी मध्यस्थी करीन
उदा . मोशे
1) जोपर्यंत इज्राइल जवळ मोशे होता (मध्यस्थी)
2) अहरोन ला पण माहीत होते , हूर ला पण माहित होते जोपर्यंत मोशेचे हात उंच राहील
3) जोपर्यंत तो मध्यस्ती करेल
4) आपण पलीष्टी बरोबर , कनानी बरोबर , आपल्याला शत्रू बरोबर विजय मिळत राहील
अ) मोशेला ठेवले होते मध्यस्थी करण्यास इस्रायल साठी
ब) एलीया ची गोष्ट बोलू तर , एलीया ला ठेवले होते मध्यस्थी करण्यासाठी
याकोब 5:17
एलीया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता; त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही.
तर परमेंश्वराने मोशेला , एलीयाला मधीस्थ करण्यासाठी ठेवले होते
1) तर आपल्या जवळ सार्वकालीन जो कधी मरू शकत नाही , नेहमी जीवंत राहनार
2) त्याला परत कोणतेच मरण मारू शकत नाही
3) त्याला कबर थांबू शकत नाही
4) परमेश्वराजवळ उभा राहून , बसून आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे
रोमकरांस पत्र 8:34
तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशु आहे.
1) परमेश्वर म्हणतो , मला मोशे नाही पाहिजे ?
2) मला एलीया नाही पाहिजे ?
3) मला कोणताच नॅशनल, इंटरनॅशनल, ऑफ्रिका , अमेरिका , इकडचा , तिकडचा ,
4) मोठ - मोठे नाव वाले सेवक नाही पाहिजे ?
का ?
कारण माझ्या जवळ एक मसीया आहे , जो माझ्यासाठी मध्यस्थी करतो
यासाठी जर आपल्याजवळ एवढा चांगला मध्यस्थी करणारा आहे , तर इकडे तिकडे का जातो ?
1) याच्याकडून प्रार्थना का करून घेतात , त्याच्याकडून प्रार्थना का करून घेतात
2) त्याला पैसे पाठवून द्या , त्याला दहा हजार रुपये द्या , त्याला पंधरा हजार रुपये द्या
3) काय माहीत काय -काय रिपोर्ट येतो
4) लोक म्हणतात प्रार्थना करा , प्रार्थना करा
5) तर हे का विसरले की , आपल्याजवळ एक असा पास्टर आहे
6) आपल्याजवळ असा प्रभू आहे , आपल्या जवळ असा रक्षणकर्ता आहे
( इब्री 13:20 ) येशु ख्रिस्त पास्टर आहे
आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’
तर तुम्हाला कोणाजवळ जायचे आहे ? मित्रांनो ,
1) आपण का इकडे-तिकडे भटकत आहोत ?
2) आपण का प्रार्थना निवेदन देत आहोत
3) कधी याची , कधी त्याची , कधी प्रेयर टावर , कधी हे टावर , कधी ते टावर
परंतु तुम्ही येशू जवळ का येत नाही ?
1) ज्याच्याजवळ आहे आपल्या सर्व समस्यांचे पावर
2) माझ्यासाठी प्रार्थना करतो , माझ्या साठी मध्यस्थी करतो
3) मी नाही पळणार इकडे तिकडे , मी आता चिठ्ठी नाही पाठवणार
4) कोणत्या संस्थेला चिठ्ठी नाही पाठवणार
5) कोणत्या देश-विदेश मध्ये , अमरीका , आफ्रिका मध्ये , प्रेयर फॉर मी ( Preyer For Me )
6) असा कोणता प्रकारचा फोन , असा कोणत्या प्रकारची चिट्ठी
7) असे कोणत्या प्रकारचे फेसबुक वर
8) असे कोणत्या प्रकारचे नॉन्सन्स मी नाहीं करणार
का ?
कारण मला माहित झाले ( रोम 8:34 )
A) माझ्याजवळ असा मध्यस्थी करणारा आहे , जो
B) माझ्यासाठी प्रार्थना करतो
C) प्रार्थना करत आहे
★ विचार करा , काय मसीहा भेटला आहे
A) याला म्हणतात ख्रिशनॅटी
B) याला म्हणतात इसायत
C) याला म्हणतात खरा सेवक
D) याला म्हणतात खरा मसीहा चा पुत्र
E) हे शिकवले जात नाही , आज
★ पाचवे कारण :-
5) आमच्यासाठी परमेश्वराला प्रकट केले :-
कोणी ? येशूने
A) परमेश्वर कसा असतो ?
B) परमेश्वरा चे खरे रूप काय आहे ?
C) परमेश्वराचे अस्तित्व काय आहे ?
येशूने परमेश्वराला प्रगट केले ।
का ?
A) जर येशू आला नसता
B) तर आपण परमेश्वराला कधीच जाणले नसते
कुठे लिहिले आहे ?
योहान 1:18
देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने (येशु) त्याला प्रकट केले आहे.
कोणाला ? परमेश्वराला
A) येशू पित्याच्या उराशी बाळ म्हणून बसला आहे असे लिहिले नाही
B) ही बायबलची भाषा आहे , जसे लाजर अब्राहामाच्या उराशी बसला आहे , आठवले का
★ कोणाला प्रकट केले ? परमेश्वराला
A) परमेश्वर काय करतो , हे कधीच समजले नसते
B) परमेश्वर किती दयाळू आहे , हे आपल्याला कधी समजले नसते
C) परमेश्वर किती प्रेमी आहे ? परमेश्वर कसा आहे ? हे कधीच समजले नसते
★ तर परमेश्वराला प्रकट करण्यासाठी मानव जात Fail झाली
A) अब्राहम Fail झाला , परमेश्वराला प्रकट करण्यास
B) मोशे Fail झाला , परमेश्वराला प्रकट करण्यास
C) जोशवा Fail झाला , परमेश्वराला प्रकट करण्यास
D) दाविद , शॉल , जेवढे प्रॉफिट होते ते सर्व Fail झाले
E) यासाठी परमेश्वराने स्वतः निवड केली की , मी येशुला पाठवीन
F) मनुष्य म्हणून , माझा संदेष्टा म्हणून , माझा प्रॉफिट म्हणून , मला प्रकट करेल
1 योहान 5:20
आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.
A) याचा अर्थ असा आहे की येशू ख्रिस्त या पृथ्वीवर का आला ?
B) कारण येशू ख्रिस्त पृथ्वीवर परमेश्वराला घेऊन आला
कुठे लिहिले आहे ?
कलस्सै 2:9
कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते,
A) येशू परमेश्वराला का प्रकट करू शकतो ?
B) कारण येशू स्वतः परमेश्वर आहे
उदा . फिलीप
A) मला पित्याला पाहायचे आहे , मला परमेश्वराला पाहायचे आहे , हे फिलिप म्हटला
B) तर येशूने म्हटले , ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले आहे , परमेश्वराला पाहिले आहे
अ) तुम्ही मुस्लीम भावांनो , तुम्ही हिंदू भावांनो तुम्ही अन्य जाती , तुम्ही यहुदी भावांनो
ब) तुम्ही Only Jesus वाले, तुम्ही Yohova Vitness वाले , माता येरुशलेम वाले
क) तुम्हाला ही गोष्ट का का लक्षात येत नाही की ,
ड) येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराचे स्वरुप परिपूर्णता दिसून येते
No comments:
Post a Comment