Friday, 3 September 2021

फक्त देवाच्या कृपेमुळे

💝मनुष्याने विसरून जावे असे त्याच्यात कांहींसुद्धा नाही.💝


प्रभो मनुष्य म्हणजे असा कोण आहे की तुझे त्याच्याकडे लक्ष असावे.?किंवा मनुष्याची संतती तरी काय की तू तिला दर्शन द्यावेस.मनुष्याने अशी कोणती योग्यता संपादिली आहे की तीमुळे तू त्याजवर कृपा करावीस.?.

 *निष्कर्ष:-माझे आज जे काही अस्तित्व आहे,ते फक्त देवाच्या कृपेमुळे आहे.* 


प्रभू तू मला विसरलास तरी मला कुरकुर करायला कोठे जागा आहे.?आणि तू माझी विनंती ऐकली नाहीस तरी मला काय म्हणता येण्यासारखे आहे.?हे मात्र खरोखर माझ्या मनात येईल,आणि मला म्हणता येईल की "हे प्रभो मी कोणी नाही मला करिता येत नाही मजमध्ये चांगले असे काही नाही.उलट मी प्रत्येक बाबतीत उणा आहे आणि माझी प्रवृत्ती निरंतर अशी आहे की मी काही नाही."

 *निष्कर्ष:-मी एक मनुष्य म्हणून शून्य आहे.पण ख्रिस्तात त्याच्या सहवारीस.* 


तू मला उचलून धरिले नाहीस आणि मला आतून शिक्षण दिले नाहीस तर मी सर्वथा निस्तेज होत जातो आणि शेवटी थंड पडतो.

 *निष्कर्ष:-पवित्रशास्त्राचे ज्ञान आणि मार्गदर्शन हेच माझ्या आत्मिक जीवनाचे रहस्य आणि बळ आहे त्याशिवाय मी काहीच नाही.* 


पण मी व्यर्थ असून तुझ्यापुढे कांहींच नाही,मी एक अस्थिर आणि अशक्त मनुष्य आहे.खरोखर रिकाम्या फुशारक्या हा एक दृष्ट व्याधीच आहे.अत्यंत मोठी व्यर्थता ती हीच; कारण ही खऱ्या वैभवापासून दूर ओढणारी  असून आमच्या दैवी शांतीचा विध्वंस करणारी आहे.कारण मनुष्य स्वतःकडे पाहून खुष होणारा असला म्हणजे तो तुला नाखूष करणारा असतो.त्याला मनुष्याची स्तुतीची तहान लागू लागली की तो खऱ्या सद्गुणांना मुकून बसतो.


No comments:

Post a Comment