Friday, 27 November 2020

दुगना यहोवा ने उसे दे दिया।


*जब अय्यूब ने अपने मित्रों के लिये प्रार्थना की, तब यहोरवा ने उसका सारा दु:ख दूर किया, और जितना अय्यूब का पहिले था, उसका दुगना यहोवा ने उसे दे दिया।*


अय्यूब 42:10


 हमारे  प्रेम में ज्यादा ताकत है या शत्रु की नफरत में हमारा प्रेम जो मसीह का प्रेम है वह बलवंत है शत्रु के ह्रदय को परिवर्तित करने के लिए या किसी के ह्रदय को भी परिवर्तित करने के लिए

 खुदा के प्रेम में बड़ी ताकत है जो हमारे अंदर है आमीन


शैतान कभी भी छीन नहीं सकता आपसे आपके लोगों को यदि आप खुदा के प्रेम से भरे हुए हैं तो 

शैतान की नफरत की सामर्थ बड़ी नहीं खुदा के प्रेम सामर्थ बड़ी है प्रेम की जो आपके अंदर है |

यह प्रेम की सामर्थ बदल देगी आपके परिवार को बदल देगी आपके पड़ोस को बदल देगी आपके मुल्क को आपके रिश्तो के अंदर से कड़वाहट भाग जाएगी प्रेम की सामर्थ के द्वारा और इसके अंदर बड़ा बल है क्योंकि यह खुदा का प्रेम है जो आपके अंदर है | आमीन

*1 कुरिन्थियों 13:1-13*


Monday, 23 November 2020

मागे नाही तर पुढे पहा.

 *लूक  १७ : २८-३३.*


        *मागे नाही तर पुढे पहा.*


    *जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील  तो आपल्या जीवाला मुकेल , आणि जो कोणी आपल्या जीवाला मुकेल तो आपला जीव वाचविल*. 

               *लूक १७:३३*


       *प्रभू येशू स्वतः म्हणत आहे  , " लोटाच्या बायकोची आठवण करा .*   लोटाची बायको म्हटलं की मला रुथची सुद्धा आठवण येते . कारण या दोघीही लोटाशी संबंध असणाऱ्या स्त्रिया आहेत. एक *लोटाची पत्नी* ,  तर दुसरी म्हणजे लोटाला  जो मवाब नावाचा मुलगा त्याच्या स्वतःच्या मुलीपासून झाला होता त्याच्या म्हणजे मवाबी  वंशातील *रूथ* नावाची स्त्री आहे. *एकीने म्हणजे लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिलं आणि मोठा अनर्थाला सामोरं जावं लागलं. तर एकीने म्हणजे रुथने पुढेच दृष्टी ठेवली  म्हणून  मोठे प्रतिफळ व मोठा मानसन्मान  तिला मिळाला.*

      सदोम गमोरा सोडताना देवदूताने लोटाला सांगितले होते की मागे वळून पाहू नका . तरीही लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिलं आणि ती मिठाचा खांब झाली. पण एवढ्यावरच अनर्थ थांबला नाही तर लोटाच्या मुली आणि लोट यांच्याकडून महापातक घडले. *नीतिमान लोटाच्या वंशात अनितीमान , दुष्ट , व्यसनाधीन , मूर्तीला  मुलाचा बळीअर्पण करणारा असा मवाबी वंश तयार झाला*. मागे वळून पाहण्याने किती भयानक नाश ओढवतो हे विसरू नका.

     मागे वळून पाहणं म्हणजे पुन्हा सदोम व गमोरासारख्या  पातकात पडणे.  मागे वळून पाहणं हे फार धोक्याचं आहे. संकटांची मालिका आणि देवापासून दुरावा हेच काय ते हाती येते . पण याच वंशातील रुथने मात्र जेव्हा नामीच्या प्रीतीपूर्ण वागण्याने जिवंत देवाला जाणले तेव्हा मात्र रुथने  आपली दृष्टी पुढे म्हणजे ह्या जिवंत देवावर , परमेश्वरावर स्थिर केली आणि अतिशय महान प्रतिफळाची , आशीर्वादाची मानकरी ठरली. मत्तयाच्या पहिल्या अध्यायात प्रभू येशूच्या वंशावळीत तीचं नाव आहे. *कारण ती म्हणते नामीला जी  नामी जिवंत देवावर विश्वास ठेवणारी होती की , " तुझा देव तोच माझा देव.*

      प्रभूने आम्हालाही त्या पापाच्या , सदोम, गमोराच्या दलदलीतून बाहेर काढलं आहेच.  आता मागे वळून पाहणे नाही तर फक्त त्या ख्रिस्तावर दृष्टी ठेवून चालत प्रतिफळ मिळवायचं आहे ..

     *कारण मागे वळून पाहण्यात शाप आहेत तर पुढे ख्रिस्ताकडे पाहण्यात आशीर्वाद आहेत. मागे पाहण्यात न्याय तर पुढे पाहण्यात कृपा आहे. मागे पाहण्यात लोट आहे तर पुढे पाहण्यात ख्रिस्त आहे.* 

   *आमचा भूतकाळ कितीही वाईट असला तरी आता आम्हाला ख्रिस्त सापडला आहे . रूथप्रमाणे पूर्ण जिवाने , पूर्ण शक्तीने , पूर्ण बुद्धीने सर्वस्व अर्पण करीत ख्रिस्तावर प्रीति करीत   येशू ख्रिस्तावरच दृष्टी ठेवू.* *मागे नाही तर पुढे ख्रिस्ताकडे पाहू!!*

 *प्रभू येशू रूथ प्रमाणे केवळ तुझ्यावरच दृष्टी ठेऊन आम्ही आशीर्वादीत व्हावे  असे कर.*

       *आमेन*

     

आत्म्याद्वारेच सुज्ञानप्राप्ती



      *✨आत्म्याद्वारेच सुज्ञानप्राप्ती✨*


 *ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो..✍🏼*

                 *( १ करिंथ २:१३ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


      पौल जरी स्वतःच्या सुवार्ता कार्याविषयी बोलत आहे तरी तो सर्व गौरव देवाला, पवित्र आत्म्याला देत आहे. पवित्र आत्म्याने पवित्र शास्र लिहिण्यासाठी कशी प्रेरणा दिली ते तो सांगत आहे. पवित्र शास्राचे विचार आणि भाषा ह्या दोन्हींनाही देवाच्या आत्म्याने प्रेरणा दिली. ज्याप्रमाणे आपल्या मनात काय आहे ते केवळ त्या त्या व्यक्तीलाच माहीत असते त्याप्रमाणे देवाचे विचार फक्त पवित्र आत्माच जाणतो. पवित्र शास्रातील वचने किंवा शास्रभाग लिहिताना एकाही लेखकाने चुकीचा शब्द किंवा शब्दप्रयोग वापरला नाही. पवित्र आत्म्याने सर्व चुकांपासून आणि असत्यापासून देवाच्या पवित्र वचनांचे रक्षण केले. प्रेषित जगाच्या लौकिक रितीप्रमाणे बोलत नाहीत. तर पवित्र आत्म्याने शिकवलेले, मार्गदर्शन केलेलेच बोलत आहे. कारण देवाने आपल्या पुत्रामध्ये आम्हाला एवढ्या सढळपणे दिले आहे ते समजून घ्यावे म्हणून प्रेषितांना हाच पवित्र आत्मा दिलेला आहे. पौल म्हणतो, *हे तर ह्या शास्रलेखाप्रमाणे आहे, "डोळ्याने जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपल्यावर प्रीति करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे; कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले; कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो." ( वचन ९,१०)*


    देवाविषयीचे सत्य लोकांना सांगण्यासाठी प्रेषित जगाच्या ऐहिक ज्ञानाचा आधार घेत नाहीत. तर ते आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक शब्दांनी आध्यात्मिक सत्य सांगतात. जगीक वक्ते वापरतात ते अलंकारिक शैलीतंत्र त्यांनी अंगिकारले नाही. आपले ज्ञान मानवजातीला कळवावे अशी देवाची इच्छा होती. आणि केवळ पवित्र आत्म्याद्वारेच देवाचे सत्य आणि ज्ञान मानवजातीला प्रकट केले जाते. पवित्र आत्मा स्वतः देवच असल्यामुळे तो देवाचे विचार पूर्णपणे समजू शकतो. देव बोलणारा देव आहे. आणि आपले अंतःकरण व मनोदय आपल्या सेवकांच्या, प्रेषितांच्या द्वारे उघड करावे हे त्याला बरे वाटले. देवाने ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले आहे. देवाने निवडलेल्या विश्वासणाऱ्यांना त्यांच्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे देवाचे प्रकटीकरण दिले होते. *आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे; ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ( वचन १२)* पवित्र शास्राच्या लेखकांनी पवित्र आत्म्याने  शिकवलेले शब्द लिहिले. देवाला जे सांगायचे होते ते त्यांनी अगदी अचूकपणे सांगावे यासाठी त्यांनी वापरलेल्या शब्दांची निवड सुद्धा पवित्र आत्म्यानेच केली. म्हणजेच ते लिहिण्यासाठी त्यांना योग्य ते शब्द पुरवले. पवित्र शास्र लिहिण्यासाठी प्रेषितांना पवित्र आत्म्याने साहाय्य केले. पवित्र आत्म्याने प्रत्येक लेखकाच्या शब्दसंग्रहाचा व लेखनशैलीचा उपयोग करून घेतला. आणि जे आम्ही देवाचे पवित्र वचन वाचणारे ते पवित्र आत्म्याच्या मदतीने आणि मार्गदर्शनानेच देवाचे वचन समजू शकतो, ग्रहण करू शकतो. आम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आणि पवित्र आत्म्याच्या साहाय्याने चालावे. देवाचे पवित्र वचन वाचण्यासाठी, आणि ते समजण्यासाठी पवित्र आत्म्याचे साहाय्य मागावे. आमचे आचरण पवित्र वचनाप्रमाणे असावे.


         *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*


     *

उचलून धरा

 *निर्गम - १७:८-१६*

                            *उचलून धरा*


*अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात उचलून धरले*..*निर्गम-१७:१२*


       एकदा मंडळीतील एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन पाळकांकडे आले . मुलाच्या बाबतीत त्यांना सल्ला हवा होता. मुलगा अभ्यास करीत नाही ही त्यांची तक्रार होती. पाळकसाहेबांनी त्या मुलाला तू अभ्यास का करीत नाही वगैरे न विचारता एवढेच विचारले की, "आता झालेल्या परीक्षेत तुला किती गुण मिळाले"? तो मुलगा उत्तरला " ४०%". अरे व्वा व्वा, म्हणजे तू अभ्यास करतोस की बाळा, आता एक कर आणखी थोडा अभ्यास कर.तू नक्कीच उत्तम गुणांनी पास होशील." बस एवढेच ते बोलले, कोणताही उपदेश केला नाही. अशा प्रकारे पळकसाहेबांच्या त्याला उचलून धरण्यामुळे त्याला एकप्रकारे प्रोत्साहन मिळाले. आणि खरच पुढील परीक्षेत त्याला ७६% मार्क्स मिळाले. 

    अगदी ह्याच गोष्टीची गरज धार्मिक बाबतीतही आहे. प्रभू येशूचे अनेक सेवक त्याची सुवार्ता सांगतात, मंडळींचे पाळकसाहेब ,  

तरुण वर्ग, महिला मंडळ असे अनेक लोक देवाची सेवा करतात तेंव्हा आमचे कर्तव्य आहे की ,त्यांच्या ऊणिवावर बोट न ठेवता त्यांच्या सेवाकार्याची प्रशंसा करीत , त्यांच्यासाठी प्रार्थना करीत हे प्रभूंचे राज्य आणि कार्य वाढविण्यासाठी त्यांना हातभार लावायचा आहे. त्यांचा उत्साह वाढविणारे दोन शब्द बोलून तर पहा, दुपटीने ते देवाची सेवा मनापासून आणि प्रेमाने करतील. आज सेवकांची गरज आहे. कारण *पीक फार आहे आणि कामकरी थोडे आहेत*. 

     मोशे प्रार्थना करीत होता आणि हूर व अहरोन त्यात सहभागी झाले म्हणून खाली यहोशवाचा विजय आणि आमालेक्यांचा पराभव झाला. तसे ह्या देवाच्या सेवकांमुळे देवाचे राज्य वाढीस लागून त्याची शांती प्रस्थापित होईल.. 

  कारण प्रभू येशूच्या सेवकांना हातभार लावणे म्हणजे देवाचे राज्य वाढविणे.. आणि ह्याचे प्रतिफळ आम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण देवाचे वचन सांगते की, *ह्या लहानातील एकाला थंड पाण्याचा प्याला जो कोणी देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही*.

 प्रार्थनेत सेवकांची आठवण ठेवीत प्रभूला विनवणी करू की *तुझी सेवा करणाऱ्याचे हात उचलून धरण्यास आमचे सहाय्य कर*. *आमेन*

     

Sunday, 22 November 2020

परमेश्वराचे मंदिर

 *मत्तय २१:१२-१७*


              *परमेश्वराचे मंदिर*


     *तुमचे शरीर , तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय?* 

           *१ करिंथ ६: १९*


     मंदिर कशासाठी आहे? आम्ही येथे का आहोत? देवाचा आमच्याविषयी काय प्लॅन आहे?

*या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे, एकच उद्देश आहे, तो म्हणजे "देवाला गौरव देणे*.

आमचं घर जर घाण झालं, कचरा असेल, पसारा पडलेला असेल, तर आपण काय करतो? हे कचरा असलेलं, पसारा असलेलं, घाणेरडं झालेलं घर सोडून आपण दुसऱ्या घरात रहायला जातो का? नाही, उलट ते आपण स्वच्छ करतो, पसारा आवरतो, पडदे बदलतो, आणि मग आमचं घरात आम्हाला प्रसन्न वाटू लागते . आंनद होतो.  *कारण ते घर आमचं स्वतःचं आहे*.

    *जुन्या करारात लोकांसाठी परमेश्वराने मंदिर बांधायला लावले, पण नव्या करारात परमेश्वराने माणसाचीच निवड देवाचे किंवा येशूख्रिस्ताचे मंदिर म्हणून केली आहे*.जेव्हा आम्ही येशु ख्रिस्ताचा आमचा तारणारा म्हणून स्वीकार करतो, तेव्हा आमचे तारण होते. बरेच लोक तारण म्हणजे काय विचारले तर काय सांगतात तर, *तारण होणे म्हणजे स्वर्गात जाणे* असे म्हणतात. पण हा एक तारणाचा रिझल्ट  नक्कीच आहे, *पण तारण म्हणजे पृथ्वीवरचा माणूस स्वर्गात जाणे असेच फक्त नाही तर स्वर्गातील देव आमच्यात येऊन राहणे ह्याला तारण म्हणतात*. आणि म्हणून आपण देवाचे मंदिर आहोत. 

    जर आम्ही देवाचे मंदिर आहोत तर ख्रिस्ताच्या दृष्टीने योग्य मंदिर आहोत काय? स्वच्छ आहे का हे मंदिर? की राग , लोभ, द्वेष, अहंकार, आकस, मत्सर, चढाओढ, याचा व्यापार आणि पसारा मांडून ठेवलाय ?.प्रभूला आंनद  होतो काय?त्याला आवडणारे हे मंदिर आहे की नाही?  *कारण 

*एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे प्रत्येक विश्वासणाऱ्याने की घाणेरड्या मंदिरात प्रभू येशूला आनंद होत नाही*.  *पण हा पातकाचा पसारा जरी प्रभूला आवडला नाही तरी तो हे मंदिर सोडून जात नाही, तर ते मंदिर प्रभू येशु स्वच्छ करतो*.. 

   कोरडा वापरतो प्रभू. हे अहंकार, स्वार्थ, मोह, लोभ, द्वेष, मत्सर याचे चौरंग प्रभू येशु उधळून लावतो, आम्हाला दुःख, वेदना नक्कीच होतात कारण ह्या सर्व देवाला अप्रिय गोष्टी आपल्याला फार प्रिय असतात. पण परमेश्वराला माहीत आहे की ह्या गोष्टी आम्हाला रसातळाला, नाशाकडे घेऊन जातात. बायबल सांगते, *१ करिंथ ६:२० मध्ये, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा*. *आमच्यावर फक्त प्रभू येशु ख्रिस्ताचा अधिकार आहे. आम्ही आमचे नाही* . रक्त सांडलयं प्रभू येशूने, अवहेलना सहन केली हे कसे विसरू शकतो आपण!! उत्तम शुक्रवारीच फक्त आठवायचे का हे? विचारू आपल्या मनाला!!. 

   *जसं स्वतःचे  स्वच्छ घर आपल्याला आनंद देते तसेच आमचे स्वच्छ, प्रेमाने भरलेले, पापविरहित , शुद्ध व ख्रिस्तावरील विश्वासाने परीपूर्ण अंतकरणरूपी मंदिर परमेश्वराला प्रसन्न करते*. म्हणून हे देवाचे शरीररूपी मंदिर सदैव स्वच्छ आणि पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करू!!.

      *सृष्टीच्या निर्माणकर्त्या ख्रिस्ता आमच्या देहात , हृदयात तुला न आवडणारा जो बाजार आम्ही मांडला असेल तो तू उधळून लाव, आम्हाला स्वच्छ कर.*

              

Saturday, 21 November 2020

मीपणा सोडून द्या



           *✨मीपणा सोडून द्या✨*


*मी नियमशास्राविरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो..✍*

                       *( रोम ७:९)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     प्रत्येक मनुष्यामध्ये पाप वस्ती करते, व पापाच्या धोरणाप्रमाणे तो वागत असतो. त्याच्या ठायी असलेली कितीतरी कृत्ये देवाच्या दृष्टीने पाप आहेत. पण नियमशास्रावाचून त्याला ते कळत नाही, त्याची जाणीव होत नाही. त्याला वाटत राहाते की तो खूप सुखी, आनंदी आहे. पापांमुळे तो  देवाच्या सहभागितेतून वेगळा केलेला आहे हे त्याला माहीत नसते. परंतु देवाच्या आज्ञा ऐकल्यानंतर पापांची जाणीव होते आणि देवापासून दूर असल्यामुळे पापामध्ये जगत असल्याचे समजते. आणि आपण पापात मेलेलो आहोत असे दिसून येते. पौल म्हणतो, *तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. ( इफिस २:१)* परंतु जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे येतो, त्याच्या आज्ञांचे पालन करून त्याच्या मार्गाने चालायला लागतो तेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये जगत आहोत, त्यामुळे आम्ही ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित असे जीवन जगले पाहिजे. पौल म्हणतो, *तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःला देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. ( रोम ६:१३)* आम्ही पापी स्वभाव टाकून देऊन ख्रिस्ताचा स्वभाव धारण केला पाहिजे. ख्रिस्ताच्या स्वभावाचे म्हणजे ख्रिस्तासारखे झाले पाहिजे.


    आपण पाहातो की, सैतान हा सुद्धा एक पवित्र देवदूत म्हणून निर्माण करण्यात आला होता. त्याचे पतन होण्यापूर्वीचे त्याचे नाव लुसिफर होते. यहेज्केल २८:१४ मध्ये वर्णन केले आहे की सैतान एक पाखर घालणारा अभिषिक्त करूब म्हणून निर्माण केला होता. तसे पाहिले असता तो एक उच्च श्रेणीचा देवदूत म्हणून निर्माण केला गेला होता. परंतु त्याला त्याच्या सौंदर्याचा आणि पदाचा गर्व झाला. त्याच्यामुळे आणखीही देवाने निर्माण केलेले अनेक देवदूत त्यांची सुंदरता आणि पदामुळे गर्विष्ठ झाले. देवाच्या सिंहासनावर बसावे असे त्याने ठरविले. सैतानाच्या गर्वामुळे त्याला देवापेक्षाही आपण श्रेष्ठ आहोत असे वाटले आणि देवाच्या सिंहासनावर बसण्याची लालसा त्याला उत्पन्न झाली. *जो तू आपल्या मनात म्हणालास, 'मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन; मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन', त्या तूला अधोलोकात टाकले आहे. ( यशया १४:१२-१५)* मीपणाविषयी अनेक ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्या या पापामुळे त्याचे पतन झाले. त्याला स्वर्गातून खाली फेकण्यात आले आणि देवाने त्याला परत स्वर्गात येण्यास प्रतिबंध केला. *हे देदिप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास ! राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धूळीत कसे टाकले ! ( यशया १४:१२)* 


    ख्रिस्ती विश्वासणाऱ्याने आपल्या जीवनातील गर्व किंवा मीपणा सोडून देणे आणि देवाला आपल्यामध्ये राहू देणे हेच समर्पित जीवन आहे. विजयी आणि आशीर्वादित जीवन जगण्याचा उत्तम व योग्य मार्ग हाच आहे. देवाचा आपल्याविषयीचा संकल्प, आपल्याविषयीच्या योजना त्याला आपल्यामध्ये व आपल्याद्वारे पूर्ण करू द्यावेत. पौल म्हणतो, *मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो.* आम्ही ख्रिस्ताला आमच्या जीवनात जेव्हा आम्ही प्रवेश करू देतो तेव्हा आमचे जीवन परिपूर्ण होते. त्यासाठी आम्हाला आमच्यामध्ये असलेला मीपणा काढून टाकणे गरजेचे आहे, पौल म्हणतो,  *किती मी कष्टी माणूस ! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील ?  ( रोम ७:२४)* आणि जेव्हा आम्ही आमच्या ठायी असलेल्या या *मी* ला काढून टाकतो, तेव्हा जो परिपूर्ण आहे, तो ख्रिस्त आत येतो. कारण जेव्हा *मीपण संपते तेव्हाच ख्रिस्त आमच्यामध्ये येतो* आणि ख्रिस्त आमच्यामध्ये येतो तेव्हा आमचे जीवन बदलून जाते. आमचे जीवन ख्रिस्ताच्या अधीन होते, त्याच्या सामर्थ्याच्या अधीन होते. पराजयाची जागा जय घेतो, दुःख, कष्ट संपतात आणि आमचे जीवन आनंदाने, हर्षाने भरून जाते. आम्ही ख्रिस्तामध्ये असतो तेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये कार्य करणारा नियम आम्हाला या जगाच्या व पापाच्या पलीकडे वर उचलून धरतो. जेणेकरून आमच्यावर आता पापाची सत्ता चालणार नाही. आम्ही आता पापाच्या बंधनात नाही. तर आम्ही ख्रिस्ताच्या अधीन आहोत.


    म्हणून प्रियांनो, *मीपणाने* आणि पापाने भरलेल्या आमच्या जीवनातून बाहेर येऊन आत्म्याने भरलेल्या जीवनात आम्ही प्रवेश करावा. कारण *मीपणापासून* काहीही लाभ होणार नाही आणि अपयशाशिवाय काहीच निष्पन्न होणार नाही. म्हणून आम्ही आमचे जीवन ख्रिस्ताकडे सोपवून द्यायचे आहे म्हणजे तो आम्हाला आपल्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण करील. सर्व वाइटापासून आम्हाला राखील.


*अहंपणा सोडून पुत्राकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या, तो तुम्हाला विजयी जीवन देईल.*


         *

Friday, 20 November 2020

काय आहे 666 क्रमांकाचे रहस्य ?

 *काय आहे 666 क्रमांकाचे रहस्य ?*


(ज्यांना *666* विषयी माहीतच नाही त्यांनी अवश्य वाचा.) 

पवित्रशास्त्रात म्हणजे बायबलमध्ये *666* हा अंक सैतानाला उद्देशून आहे. 

युगाच्या समाप्तीपूर्वी सैतान *666* या कोड नंबरच्या आधारे जगावर राज्य करेल असे भविष्य यांत केलेले आहे. 

आज आपण *666* या सैतानाच्या नंबरच्या किती जवळ आहोत? 

(Mark of the beast 666.)


काय आपल्याला ठाऊक आहे का की, *666 हा नंबर 2017 या वर्षात आपल्या प्रत्येकाकडे आहे ?* 


आपल्याला माहीतच आहे की, टेक्नाॅलाॅजी आज इतकी प्रगत झालेली आहे की RFID नावाची *"माइक्रो चिप "* चा शोध लागला आहे. ही चिप तांदुळाच्या दाण्याएवढी आहे. 

आता 2017 मध्ये जर हा खरोखरच नवीन शोध आहे तर याचे फायदेही बरेच असतील. 

परंतू त्याचे साईड इफेक्ट्स् (नुकसान) बद्दल काहीही सांगितले जात नाही. 


या टेक्नाॅलाॅजीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की,भविष्यात आपल्याला क्रेडिट कार्ड्स/ डेबीट कार्ड्स यांची गरज पडणार नाही. कारण ही चिप प्रत्येक माणसाच्या उजव्या हातात किंवा कपाळावर बसविण्यात (इंप्लांट) करण्यात येणार आहे. तेव्हा आपण कोणत्याही कार्डाशिवाय केवळ बोटांनी स्वाईप करून पैशांचा व्यवहार करू शकाल. कोणत्याही पास कोड शिवाय आटोमॅटीक दरवाजा उघडला जाईल. इतकेच नव्हे.. तुमचा स्मार्ट फोन आटोमॅटीक तुम्हाला रिस्पॉन्स देईल.

 या सर्व गोष्टी आता आपल्याला हळूहळू कळत आहेत. 


परंतु तुम्हाला माहीत आहे का.. *बायबलमध्ये 2016 वर्षापूर्वी* या टेक्नाॅलाॅजीविषयी लिहून ठेवण्यात आले आहे.

 

या तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक हुकूमशहा पूर्ण जगावर राज्य करण्यासाठी तयार आहे. 

बायबलमधील प्रकटीकरण (Revelation) या पुस्तकात 13 व्या अध्यायात दोन हुकूमशहांविषयी लिहिलेआहे. त्यांना पशू /श्वापद असे म्हटले आहे.

हा हुकूमशहा आपल्यापेक्षा मोठ्या हुकूमशहाची पुजा करण्यास सर्व जगाला भाग पाडेल. सर्व जगातील लोकांना त्याच्यासमोर गुडघे टेकायला लावेल. जो कोणी असे करणार नाही त्याला मृत्यूदंड /शिरच्छेद हीच शिक्षा राहील. दुस-या देवाचे नाव घेण्याची परवानगी नसेल. सर्व जगाचा तोच देव राहील. 

बायबलमध्ये लिहिले आहे ..... हा हुकूमशहा (Dictator) जगातील गरीब- श्रीमंत, लहान- मोठे, स्वतंत्र- गुलाम असे कोणीही असो ... या सर्वांच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर त्याच्या ओळखीचे चिन्ह...  एक शिक्का / छाप /निशाणी कायमस्वरूपी देईल. ही निशाणी / शिक्का म्हणजे त्या हुकूमशहाचा कोडवर्ड *(666)* ज्याच्याकडे नसेल ती व्यक्ती काहीही विकत घेऊ शकणार नाही किंवा विकू शकणार नाही.


म्हणजे आपल्या खिशात हजारो रूपये असतील, पण त्या हुकूमशहाची निशाणी नसेल तर आपले ते पैसे काहीही कामाचे होणार नाहीत. पैशांपेक्षा निशाणी /शिक्का महत्वाचा राहील. (सर्व व्यवहार कॅशलेस होतील. नोटा नसतील.)

या हुकूमशहाचा पासवर्ड कोड नंबर *666* हा आहे. या नंबरच्या आधारे तो सर्व जगावर सत्ता चालवेल. सर्व जगाची संपत्ती, धन-दौलत त्याच्या ताब्यात राहील. 


होय !  आजची आर्थिक स्थिती पहा. आजच्या प्रगत टेक्नाॅलाॅजीमुळे लवकरच चलनाची देवाण-घेवाण बंद होणार आहे. सर्व व्यवहार *"मनी ट्रांझेक्शन"* या चिपद्वारे होतील आणि कागदी नोटांची काहीही किंमत राहणार नाही. या प्रकारे सर्व जग त्या हुकूमशहाच्या कंट्रोलमध्ये जाणार आहे. 


बायबलमध्ये 2016 वर्षापूर्वीच जगाच्या अंतसमयी या टेक्नाॅलाॅजीचा हा हुकूमशहा /सैतान/ श्वापद (Dictator) कसा वापर करेल हे सांगून ठेवण्यात आले आहे. 


अमेरिकेत बराक ओबामाने *'ओबामा केअर'* योजनेअंतर्गत या चिपचा वापर (इंप्लांट) करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ओबामा अपयशी ठरले. या चिपमुळे आमच्यावर प्रत्येक क्षणी नजर ठेवली जाईल, आपण काय करतो, काय खातो, काय पितो, कोठे जातो, कोणाला भेटतो, काय बोलतो, काय विकत घेतो, काय विकतो इत्यादी बऱ्याच गोष्टींवर सरकारचे बारीक लक्ष असेल. म्हणून आम्हाला आमचे स्वातंत्र्य धोक्यात आणायचे नाही, असा लोकांनी विरोध केला आणि सरकारला नमविले. तरीही 2017 पर्यंत संपूर्ण अमेरिकेत ही *चिप इंप्लांट* करण्याचे आताच्या सरकारने ठरवले आहे. 


स्विडन सरकारने या टेक्नाॅलाॅजीचा पुरस्कार करीत एक पाऊल पुढे टाकून सर्व कार्यालयातील कर्मचारी वर्गाला चिप बसवून (इंप्ल्पांट करून) ऑफीस हायटेक केले आहे. त्यामुळे तेथील कर्मचारी इंटरनेट चालवण्यापासून ते आपल्या जेवणाची ऑर्डर सुद्धा देण्यापर्यंतची कामे या चिपद्वारे करीत आहेत. या चिपमुळे तुमच्या शेतात पाणी केव्हा द्यायचे आहे हे तुम्हाला घरी बसून सुद्धा कळेल व घरी बसूनच शेतात पाणी सोडता येईल. 

युएस्एच्या एका  MC10 या कंपनीने या टेक्नाॅलाॅजीचा उपयोग करून एक डिजीटल टॅटू (Tatoo) चा शोध लावला आहे. हा टॅटू जो कोणी कंपनीकडून शरीरावर गोंदवून घेईल त्याला आपल्या शरीरातील प्रत्येक आजाराची माहिती सहजपणे समजेल. 

याप्रमाणे हळूहळू त्या हुकूमशहासाठी ही टेक्नाॅलाॅजी कसा मार्ग मोकळा करीत आहे हे समजून येते. 


*सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कोणी आपल्या हातावर किंवा आपल्या कपाळावर त्या श्वापदाचे चिन्ह ( *666*) *लावून घेईल तो सैतानाचा ठरेल!*

*तो अग्नी व गंधकाच्या सार्वकालिक नाशासाठी पात्र ठरेल!*


बायबलमध्ये म्हटले  आहे.... या सर्व गोष्टी (चिन्हे) होताना दिसतील तेव्हा समजून घ्या की, ... प्रभू येशू ख्रिस्त या जगातील आपल्या लोकांना आपल्यासमवेत घेवून जाण्यासाठी पुन्हा येणार आहे. 

आज आपण ज्या समयात जगत आहोत... तो समय बायबलच्या आधारे समजून घेतल्यास कित्येक लोक सुवार्तेच्या द्वारे बचावले जावू शकतात. तारले जावू शकतात.

जो शेवटपर्यंत विश्वासू राहील तोच तारला जाईल. प्रभू येशू ख्रिस्त त्या विश्वास ठेवणा-याला त्या हुकूमशहाच्या जाचापासून सोडवील. 

ही संकटे सुरू होण्यापूर्वी ख-या विश्वासणा-या लोकांचे *'लोकांतरण'* (rapture) होईल. म्हणजे ते प्रभू येशूद्वारे अंतराळात वर उचलले जातील. 


*तुम्ही या गोष्टींवर  विश्वास ठेवाल किंवा नाही हे मला ठाऊक नाही.*

*परंतु एवढे मात्र खरे की, जग त्याच दिशेने पुढे जात आहे.*


.AMEN

जगाशी मैत्री करू नका



*जगाशी मैत्री करू नका*

*याकोब.४ः४-७*


जगाशी व्यभिचारात्मक प्रेमसंबंध ठेवण्याविषयी याकोब जो दोषारोप करतो त्याचा विचार करा. पुढील अनुवादातून ते दाखवले आहे : ‘‘आपल्या पतीच्या शत्रूवर प्रेम करणार्‍या एखाद्या अविश्वासू पत्नीसारखे तुम्ही आहात. देवाच्या शत्रूंबरोबर म्हणजेच या जगातील वाईट वासनांबरोबर मैत्री केल्याने तुम्ही देवाचे शत्रू होता, हे तुम्हांला समजत नाही काय? मी पुनः एकवार सांगतो, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो, तो देवाचा शत्रू बनतो’’ (याकोब.४ः४ - लिव्हिंग बायबल).


जगाशी मैत्री असण्यावरून ती व्यक्ती हेच दर्शवते की, ती जगाच्या तत्त्वसिद्धान्तांना, पद्धतींना अधिक महत्त्व देते. जुन्या करारातील आमोस संदेष्ट्याने विचारले की, ‘‘पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय?’’ (आमोस ३ः३). जो विश्वासणारा या दुष्ट जगाच्या चालीरीतींशी सहमत होऊ शकतो, तो खेदजनक रीतीने सर्वसमर्थ देवाच्या सहभागितेतून दूर गेलेला आहे ज्याने त्याला पापाच्या शिक्षेतून आणि सामर्थ्यातून बाहेर काढले आहे!


एखाद्या व्यक्तीची जीवनपद्धती सातत्याने जगिक असेल तर हे याचे स्पष्ट चिन्ह आहे की त्या व्यक्तीने कधीच येशू ख्रिस्तावर तिचा तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला नसतो. 


दुसर्‍या बाजूला असेही काही विश्वासणारे आहेत की, जे ख्रिस्ताच्या सहभागितेतून दूर असून काही काळ जगिक जीवन जगतात. कदाचित ह्याचे कारण हेच की त्यांच्यापैकी अनेकांना ख्रिस्त हा तारणारा म्हणून हवा असतो, पण प्रभू म्हणून नको असतो. त्यांना सार्वकालिक दोषापासून मुक्त झालो आहोत, हे जाणून मिळणारी खातरी व शांती हवी असते, तरी त्यांना ख्रिस्ताला त्यांच्या जीवनाचा प्रभू करण्याऐवजी स्वतःला संतुष्ट करण्यासाठी जगायचे असते. 


_जगावर व जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही (१योहान.२ः१५)._



मसीह सत्य, मार्ग और जीवन है

 💝 यह कैसे समझें कि मसीह सत्य, मार्ग और जीवन है ?💝

संदर्भ के लिए बाइबल के पद:*_


_*"आदि में वचन था, और वचन परमेश्‍वर के साथ था, और वचन परमेश्‍वर था। यही आदि में परमेश्‍वर के साथ था" (युहन्ना 1:1-2)।*_


_*"और वचन देहधारी हुआ; और अनुग्रह और सच्‍चाई से परिपूर्ण होकर हमारे बीच में डेरा किया,* और हम ने उसकी ऐसी *महिमा देखी, जैसी पिता के एकलौते की महिमा" (युहन्ना 1:14)।*_


_*"मार्ग और सत्य और जीवन मैं ही हूँ; बिना मेरे द्वारा कोई पिता के पास नहीं पहुँच सकता" (युहन्ना 14:6)।*_


_*"आत्मा तो जीवनदायक है, शरीर से कुछ लाभ नहीं; जो बातें मैं ने तुम से कही हैं वे आत्मा हैं, और जीवन भी हैं" (युहन्ना 6:63)।*_


परमेश्वर के प्रासंगिक वचन:


_सत्य मानव संसार से आता है, फिर भी वह सत्य जो मनुष्य के मध्य है उसे मसीह के द्वारा पहुंचाया गया है। इसका उद्गम मसीह से होता है, अर्थात्, *स्वयं परमेश्वर से, और इसे मनुष्य के द्वारा अर्जित नहीं किया जा सकता है।*_


_*"वचन देह में प्रकट होता है" से "सफलता या असफलता उस पथ पर निर्भर होती है जिस पर मनुष्य चलता है" से*_


_"आदि में वचन था, और वचन परमेश्वर के साथ था, और वचन परमेश्वर था, और वचन देहधारी हुआ।" यह (वचन के देह में प्रकट होने का कार्य) वह कार्य है, जिसे परमेश्वर अंत के दिनों में संपन्न करेगा, *और उसकी संपूर्ण प्रबंधन योजना का अंतिम अध्याय है, और इसलिए परमेश्वर को पृथ्वी पर आ कर अपने वचनों को देह में प्रकट करना ही है।*_


_"वचन देह में प्रकट होता है" से "परमेश्वर के वचन के द्वारा सब कुछ प्राप्त हो जाता है" से_


_राज्य के युग में, परमेश्वर नए युग की शुरूआत करने, अपने कार्य के साधन बदलने, और संपूर्ण युग में काम करने के लिये अपने वचन का उपयोग करता है। वचन के युग में यही वह सिद्धांत है, जिसके द्वारा परमेश्वर कार्य करता है। वह देहधारी हुआ ताकि विभिन्न दृष्टिकोणों से बातचीत कर सके, मनुष्य वास्तव में परमेश्वर को देख सके, जो देह में प्रकट होने वाला वचन है, और उसकी बुद्धि और आश्चर्य को जान सके। उसने यह कार्य इसलिए किये ताकि वह मनुष्यों को जीतने, उन्हें पूर्ण बनाने और ख़त्म करने के लक्ष्यों को बेहतर ढंग से हासिल कर सके। वचन के युग में वचन को उपयोग करने का यही वास्तविक अर्थ है। वचन के द्वारा परमेश्वर के कार्यों को, परमेश्वर के स्वभाव को, मनुष्य के मूल तत्व और इस राज्य में प्रवेश करने के लिए मनुष्य को क्या करना चाहिए, यह जाना जा सकता है। वचन के युग में परमेश्वर जिन सभी कार्यों को करना चाहता है, वे वचन के द्वारा संपन्न होते हैं। वचन के द्वारा ही मनुष्य की असलियत का पता चलता है, उसे नष्ट किया जाता है, और परखा जाता है। मनुष्य ने वचन देखा है, सुना है, और वचन के अस्तित्व को जाना है। जिसके परिणाम स्वरूप वह परमेश्वर के अस्तित्व पर विश्वास करता है, मनुष्य परमेश्वर के सर्वशक्तिमान होने और उसकी बुद्धि पर, साथ ही साथ मनुष्यों के लिये परमेश्वर के हृदय के प्रेम और मनुष्यों का उद्धार करने की उसकी अभिलाषा पर विश्वास करता है। यद्यपि 'वचन' शब्द सरल और साधारण है, देहधारी परमेश्वर के मुख से निकला वचन संपूर्ण ब्रह्माण्ड को कंपाता है; और उसका वचन मनुष्य के हृदय को रूपांतरित करता है, मनुष्य के सभी विचारों और पुराने स्वभाव, और समस्त संसार के पुराने स्वरूप में परिवर्तन लाता है। युगों-युगों से केवल आज के दिन का परमेश्वर ही इस प्रकार से कार्य करता है, और केवल वही इस प्रकार से बोलता और मनुष्य का उद्धार करता है। इसके बाद मनुष्य वचन के मार्गदर्शन में, उसकी चरवाही में, और उससे प्राप्त आपूर्ति में जीवन जीता है। वह वचन के संसार में जीता है, परमेश्वर के वचन के कोप और आशीषों में जीता है, और उससे भी अधिक वह परमेश्वर के वचन के न्याय और ताड़ना के अधीन जीता है। ये वचन और यह कार्य सब कुछ मनुष्य के उद्धार, परमेश्वर की इच्छा को पूरा करने, और पुरानी सृष्टि के संसार के मूल रूप रंग को बदलने के लिये है। परमेश्वर ने संसार की सृष्टि वचन से की, समस्त ब्रह्माण्ड में मनुष्य की अगुवाई वचन के द्वारा करता है, उन्हें वचन के द्वारा जीतता और उद्धार करता है। अंत में, वह इसी वचन के द्वारा समस्त प्राचीन जगत का अंत कर देगा। केवल तब उसके प्रबंधन की योजना पूरी होगी।_


_*"वचन देह में प्रकट होता है" से "राज्य का युग वचन का युग है" से*_

ख्रिस्त सहवासासाठी स्वतःला शुद्ध करू

 *२ करिंथ ६ :१४-१८ व ७ : १*


    *ख्रिस्त सहवासासाठी*

         *स्वतःला शुद्ध करू.*


     *तेव्हा प्रियजनहो , आपणाला  ही अभिवचने मिळाली आहेत , म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.*

     *२ करिंथ ७ : १*


     जेव्हा ख्रिस्ताला आम्ही ओळखायला लागतो , त्याचा तारणारा म्हणून  स्वीकार करतो तेव्हा ख्रिस्ताशी जवळच नातं असावं असं वाटू लागतं. *देणग्याहून देणगी देणारा हवा असतो.*

    ह्या ख्रिस्ताच्या  अधिक जवळ जर जायचे , ख्रिस्त सहवास लाभावा असे वाटते तर शुद्ध व्हायला पाहिजे. शुद्ध होणं गरजेचं आहे. *याकोब ४ : ८*

*सांगते , "देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जनहो , हात निर्मळ करा , अहो द्विबुद्धीच्या लोकानो आपली अंतःकरणे शुद्ध करा.* देवाचा सहवास हवा आहे तर  अंतःकरण शुद्ध होणं आवश्यक आहे. याकोब म्हणतो , तुम्ही घाणेरडे हात , अशुद्ध अंतःकरण आणि द्विबुद्धीने उपासना कसे करू शकता? *तो म्हणतो , हात स्वच्छ करा , हृदय शुद्ध करा , द्विबुद्धीचे नाही तर  एका विचारावर ठाम असा*. 

    *मग आपण कसे शुद्ध , स्वच्छ होऊ शकतो ? उत्तर आहे देवाच्या वचनाद्वारे आपण शुद्ध होऊ शकतो.* *इफिस ५ : २६ मध्ये प्रेषित पौल सांगत आहे की , त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने तिला म्हणजे मंडळीला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र केले.*  *म्हणजेच काय तर देवासमोर येण्यापूर्वी आम्ही कसे शुद्ध होऊ शकतो तर देवाच्या वचनाद्वारे.* *जसे पाणी शरीराला स्वच्छ करते तसे देवाचे वचन आत्म्याला शुद्ध करते. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील ? तुझ्या म्हणजे देवाच्या वचनानुसार राखण्याने.*  *दावीद हेच सांगतो की देवाच्याच वचनाद्वारे आपण स्वतःला शुद्ध करू शकतो*. *कारण देवाचे वचन हे आरसा आहे , तो आरसा आपण काय आहोत कसे आहोत हेच दाखवतो.* *आपण बायबल वाचतो असेच फक्त नाही तर बायबल आपल्याला वाचत असते.* *ती वचने वाचताना अंतकरणाला भिडतात* *पापाची जाणीव करून देतात. त्यामुळेच काही लोकांना बायबल वाचायला आवडत नाही. पण वचन फक्त पाप दाखवीत नाही तर त्यावरचा मार्ग सुद्धा दाखवते.  देवाचे वचन शुद्ध करते*. 

    *दुसरं म्हणजे "ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण शुद्ध होतो".* *प्रभू येशूचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. असे   १ योहान १ : ७  हे  वचन सांगते* .

    *जेव्हाआपण देवाच्या पवित्र वचनाच्याद्वारे आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध होतो तेव्हा  वचन  पापाची जाणीव करून देत ख्रिस्ताच्या रक्ताची आठवण करून देते आणि प्रभूचे रक्त अभिवचन देते.*  *जेव्हा ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केल्यावर आम्हाला वचनाद्वारे दिसणारी , जाणवलेली सर्व पापे प्रभुजवळ कबूल करून पश्चाताप करतो तेव्हा प्रभूच्या पवित्र रक्ताखाली आपण येतो आणि प्रभू आम्हाला शुद्ध करतो.* 

   *कारण प्रभू येशू विश्वासू व न्यायी आहे तो  सर्व पापांची क्षमा  करतो.* 

    *जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शुद्ध करतो तेव्हा कोणीही आम्हाला अशुद्ध ठरवू शकत नाही. आणि ख्रिस्तापासून दूर करू शकत नाही. ख्रिस्ताच्या प्रेमळ सहवासात सदैव राहतो.  त्यासाठी परमेश्वराचे आभार मानू.* 

    *दयाघन ईश्वरा तुझा सहवास लाभावा म्हणून तुझ्या पवित्र वाचनाने आणि मोलवान रक्ताने आम्हाला शुद्ध कर .*      *आमेन .*

     

परमेश्वराचे स्तुतीगान



            *✨परमेश्वराचे स्तुतीगान✨*


*' माझा जीव प्रभूला थोर मानितो ' कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत..✍*

               *( लूक १:४६,४९ )*


                           *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


    *"हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर..."* आपल्यासाठी महत्कृत्ये करणारा परमेश्वर खरोखरच स्तुतीस पात्र देव आहे. जेव्हा जेव्हा आमच्यासाठी आमचा प्रभू महत्कृत्ये करितो, तेव्हा तेव्हा आम्ही धन्य होऊन आमच्या मुखातून त्याचे स्तुती, स्तवन बाहेर पडते. आम्ही त्याने आमच्यासाठी केलेल्या उपकारांबद्दल ओठांचे फळ म्हणजे स्तुतीचा यज्ञ प्रभूला अर्पण केला पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे परमेश्वराने आमच्यासाठी आपला एकूलता एक पुत्र दिला. जेव्हा गब्रीएल देवदूताने कुमारी मरियेकडे येऊन  येशूच्या जन्माची घोषणा केली, जगाच्या तारणाऱ्या प्रभूची माता होण्यासाठी तिची निवड करण्यात आली, तेव्हा तिने देखील प्रभूची स्तुती केली. ती म्हणत आहे, *देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे, पाहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. ( लूक १:४७,४८)* अशाप्रकारे तिने देवाची स्तुती केली.


     आपण पाहातो की, मोशेने परमेश्वराच्या साहाय्याने मिसरातून इस्राएलाची सूटका केली. तेव्हा परमेश्वराने त्यांच्यासाठी अनेक महत्कृत्ये केली. तांबड्या समुद्रातून त्यांच्यासाठी कोरडी भूमी केली, खडक फोडून त्यांची तहान भागवली, स्वर्गीय मान्ना पुरवून त्यांची भूक भागवली, अशी अनेक महत्कृत्ये केली. तेव्हा मोशेने इस्राएल लोकांना म्हटले की, *तुम्ही परमेश्वराने केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत. (अनुवाद ११:७)* आपण पाहातो की दाविदाच्या जीवनात परमेश्वराने केलेल्या प्रत्येक महत्कृत्यांबद्दल तो वारंवार प्रभूची स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. स्तोत्रसंहिता पुस्तकातील निम्मी स्तोत्रे ही दाविदाने लिहिली आहेत. आणि दाविद त्या स्तोत्रांद्वारे देवाची स्तुती आणि स्तवन निरंतर करत आहे. बायबल आम्हाला देखील दाविदाप्रमाणे निरंतर स्तुती करण्यास सांगत आहे. देवाने आपल्याकरिता केलेल्या सर्व महत्कृत्यांबद्दल आपण जेव्हा त्याचे आभार मानू इच्छितो तेव्हा आपोआपच स्तोत्रसंहितेमधील सुंदर वचने आमच्या मुखातून बाहेर पडतात. आणि प्रतिदिवशी आम्ही देवाची स्तुती करतो, *परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे , गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. ( स्तोत्र ९२:१ ते ३)*


     देवाने आपल्याकरिता आणि गतकाळामध्ये आपल्या लोकांकरिता केलेले चमत्कार आठवून आपली अंतःकरणे देवाची थोरवी गाण्यास प्रेरित होतात. देवापासून प्राप्त झालेले आपले हे जीवन हेच परमेश्वराची स्तुती करण्याचे मोठे कारण आहे. दाविद म्हणतो, *भयप्रद व अद्भूत रितीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो, तुझी कृत्ये अद्भूत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. ( स्तोत्र १३९:१४)* खरोखरच केवळ आमचे जीवन म्हणजे केवळ आमचे शरीर, जीव, आत्मा हेच नाही तर, दृष्टी, श्रवणशक्ती आणि विचारशक्ती ह्या अनमोल देणग्या आमच्या जिवंत देवापासूनच आम्हाला देण्यात आल्या आहेत.


      आपला निर्माणकर्ता हा *"प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान "* देणारा आमचा प्रभू आहे म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गाने चालले पाहिजे. त्याच्यावर प्रेम केले पाहिजे, त्याची स्तुती आणि स्तवन केले पाहिजे. आपले त्याच्यावर खरोखरच प्रेम असेल तर आपण जे काही करू ते सर्वकाही त्याच्या गौरवासाठी केले पाहिजे. पौल म्हणतो, *तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. ( १ करिंथ १०:३१)* कारण परमेश्वराने आमच्यासाठी खूप अद्भूत कृत्ये केली आहेत, आम्हाला त्यांची मोजणी करता येणार नाहीत इतकी. दाविद म्हणतो, *हे परमेश्वरा, तू आम्हांसाठी केलेली अद्भूत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत, तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही, मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहे. ( स्तोत्र ४०:५)*


         

Wednesday, 18 November 2020

उणीव

 *मार्क- १०:१७-२२*

               *उणीव*


      *तुझ्यात एका गोष्टीची उणीव  आहे* *मार्क-१०:२१*


 पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केलेल्या सर्व व्यक्तिरेखा मध्ये श्रीमंत तरुण आमचे प्रतिनिधित्व करीत आहे असे मला ठामपणे वाटते. 

      तो नियमशास्त्र काटेकोरपणे

पाळीत होता. त्यामुळे त्याला वाटत होते की, तो सार्वकालिक जीवन मिळविण्यास पात्र आहे.आम्हीही असेच आहोत. नियमितपणे मंदिरात येतो, हात उंचावून स्तुती करतो, भरघोस दान देतो, पवित्र शास्त्राचे नियमितपणे वाचन करतो,मनन करतो.उत्तम आचरण करण्याचा आमचा प्रयत्न सुध्दा असतो.म्हणून आम्हाला वाटते, आम्ही परिपूर्ण आहोत. कारण त्या तरुणांप्रमाणे आम्ही आमच्याच चष्म्यातून स्वतःस पाहतो. म्हणून आमच्या उणिवा आम्हास दिसत नाहीत.. 

      अंतकरण पारखणाऱ्या देवाला आमच्या अःतकरणाची निर्मळता हवी आहे.म्हणून आमच्या उणिवा त्याला दिसतात. त्या तो आम्हाला दाखवून देतो. आता त्या उणिवा दूर करावयाच्या की नाही हे मात्र त्याने आमच्यावर सोपवले आहे. 

      हा तरुण महान प्रभूच्या समक्षतेत येऊनही निराश होऊन गेला. कारण प्रभूने दाखवलेली द्रव्यलोभाची उणीव दूर करण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याने जीवनात प्रथम स्थान देवाला नाही तर संपत्तीच्या मोहाला दिले होते. *माझ्या समोर तुला अन्य देव नसोत* , ह्या आज्ञेचा त्याने भंग केला होता..  प्रभुनेही आपले नियम त्याच्यासाठी बदलले नाहीत. त्याला जाऊ दिले.  कारण देव म्हणतो *जसा मी पवित्र आहे तसे तुम्हीही असावे*. प्रभू येशू त्या तरुणाला नियमशास्त्र कसे पाळायचे हे दाखवीत होता. *आम्हाला नियमशास्त्र ख्रिस्ताकडे आणते*( *गलती- ३:४* )

पण नियमशास्त्र आमचे तारण करीत नाही. नियमशास्त्राच्या कर्माने नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आपले तारण होते. 

 *आम्हीसुद्धा स्वतःच्या नाही तर प्रभूच्या नजरेतून स्वतःचे आत्मपरीक्षण करीत आपल्यातील उणिवा दूर केल्या पाहिजेत,कारण परमेश्वर अंतःकरण परखणारा आहे*...

     प्रार्थना करूया की *प्रभू येशू , आमच्या उणिवा दूर करण्यास तुझ्या दृष्टीने आम्हास पहावयास शिकव*...

                      *आमेन

     

प्रभूच्या चरणी



               *✨प्रभूच्या चरणी✨*


 *"..तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हाला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हाला सोडील.."✍🏼*

                 *( २ इतिहास १५:२ )*


                          *...मनन...*


           *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!* 


     आसाबद्दल लिहिले आहे की, परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते त्याने केले. त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक सुधारणा घडवून आणल्या. देवाच्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये संजीवन येण्यासाठी त्यांनी देवाचा मनापासून शोध घेणे, देवाला शरण जाणे, त्याच्या चरणी लागणे महत्वाचे आहे. *यहूदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या चरणी लागावे आणि नियमशास्र व आज्ञा ह्यांचे पालन करावे अशी त्याने ( आसा राजाने) त्यांना आज्ञा केली. ( २ इतिहास १४:४)* "परमेश्वराच्या चरणी लागणे" म्हणजे देवासोबत आमची घनिष्ट सहभागिता असावी अशी मनापासून इच्छा बाळगणे आणि त्याच्या हेतूंशी निष्ठावंत असणे. त्यासाठी दुष्ट प्रवृत्तींपासून दूर जाण्याची आणि आमचे जीवन शुद्धतेसाठी आणि पवित्रतेसाठी देवाला समर्पित करण्याची गरज असते. देवाला शरण जाण्याचे अनेक फायदे आहेत. जे परमेश्वराला शरण जातात, त्यांना देवाची शांती आणि संरक्षण यांचा अनुभव येतो. शांती म्हणजे केवळ विरोध, कलह, वादविवाद, लढाया यांचा अभाव असणे, एवढेच नाही, तर त्यामध्ये क्षमाशीलता, शुद्ध विवेकभाव, कल्याण आणि अभिष्टाची भावना यांचा समावेश आहे. हे सर्व देवाबरोबर असलेल्या नात्यामुळे मिळते. यशया म्हणतो, *"ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो." ( यशया २६:३)*


     जे लोक परमेश्वराला शरण जातात किंवा झटून त्याचा शोध घेतात त्यांना तो सापडेल असे अभिवचन देव देतो. ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या पापक्षमेचा स्वीकार करून जे लोक त्याचे नेतृत्व मान्य करतात त्यांच्यासाठी देवाने उपलब्ध करून दिलेल्या नव्या करारानुसार देवाची समक्षता समाधान, शांती, सांत्वन देते, सत्य प्रगट करते, देवभिरू चारित्र्य निर्माण करते आणि पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य पुरविते. जे लोक परमेश्वराला शरण जातात ते त्यांची संकटे व त्यांचे शत्रू यांवर जय मिळवितात. ख्रिस्ताच्या अनुयायांना मोहाचा सामना करण्यासाठी आणि सैतान व त्याच्या सैन्याविरूद्ध आध्यात्मिक लढाई करण्यासाठी मोठे सामर्थ्य प्राप्त होते. ( इफिस ६:१०-१८) देवाला शरण जाणाऱ्यांविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो की, *"तरूण सिंहानाही वाण पडते व त्यांची उपासमार होते; पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही." ( स्तोत्र ३४:१०)*


    याउलट जर आम्ही देवाला शरण गेलो नाही, देवावर भरंवसा ठेवला नाही तर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. आसानेही जीवनभर परमेश्वराची भक्ती करूनही आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या दिवसांत देवापासून तो दूर गेला. देवावर भिस्त ठेवण्याऐवजी त्याने मनुष्यावर भिस्त ठेवली. देवाला शरण जाण्याऐवजी तो मनुष्याला शरण गेला. त्याने देवावर अवलंबून राहण्याऐवजी मानवी मैत्रीवर अवलंबून राहिला. ( पाहा २ इतिहास १६:१-८) त्याने देवाच्या संदेष्ट्याचा नाकार करून त्याचा छळ केला. देवाने पाठविलेल्या संदेष्ट्याचा नाकार करणे, त्याचा संदेश ऐकण्यास नकार देणे, देवाकडून आलेल्या संदेष्ट्याचा छळ करणे हे आध्यात्मिक पतनाचे चिन्ह आहे. त्याचप्रमाणे त्याने त्याच्या आजारपणात देवाची मदत घेण्याऐवजी त्याने पूर्णपणे मानवी वैद्यांची मदत घेतली. ( वचन १२) अशाप्रकारे तो देवाला शरण जाण्याऐवजी देवापासून दूर गेला. परमेश्वर त्याला म्हणत आहे, *... हा तू मूर्खपणा केला म्हणून ह्यापूढे तुझ्यामागे लढाया लागणार. ( २ इतिहास १६:९)* प्रियांनो, जे परमेश्वराला शरण जातात, त्याच्याशी एकनिष्ठ राहातात ते देवाच्या दृष्टीने खूप मौल्यवान असतात. ते अडचणींचा किंवा आध्यात्मिक परीक्षांचा सामना करत असतील तर त्यामध्ये तो त्यांना साहाय्य करील, त्यांना आधार देईल. म्हणून आम्ही सदैव देवाला शरण जाऊन त्याच्या आज्ञांप्रमाणे वागले पाहिजे. परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करून आमच्या जीवनाद्वारे प्रभूला संतोष दिला पाहिजे. वचन सांगते, *...जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करितो. ( २ इतिहास १६:१६:९)*


         

Tuesday, 17 November 2020

येशुने हमारे कर्ज को चुका दिया

 _*यीशु ने हमारे कर्ज को चुका दिया*_


_यूहन्ना 12:31 अब इस जगत का न्याय होता है, *अब इस जगत का सरदार निकाल दिया जाएगा।*_


_अभी भी दुनिया का एक भविष्य का फैसला आने वाला है, 👉जहाँ दुष्टों को *धर्मी से अलग करके आग की झील में डाल दिया जाएगा।*  यह आयत दुनिया के उन पापों को संदर्भित करती है *जो यीशु पर रखे जाने वाले थे और यह कि वह हमारी सजा भुगतता था।*_


_यीशु को हमारे पापों की सजा भुगतनी पड़ी, इसलिए कोई कारण नहीं कि हमें उनके लिए कष्ट उठाना पड़े। पाप के लिए कीमत पहले से ही भुगतान किया गया है जो *इसे पूरी तरह से चुका सकता है और वह यीशु है। अब यीशु हम से चाहता है कि उसका छुटकारा अपना बनाने के लिए, उसे परमेश्वर और उद्धारकर्ता के रूप में उस पर विश्वास करके ग्रहण करें।*_


_पाप के पास एक मजदूरी है जिसे अदा करना चाहिए और कोई भी यीशु में विश्वास के बिना उस भुगतान से बच नहीं सकता है। जो कोई भी नया जन्म प्राप्त नहीं करता है, उसे उनके पापी स्वभाव के परिणामस्वरूप किए गए सभी गलत कार्यों के लिए उत्तरदायी ठहराया जाएगा।  हालांकि, जो लोग यीशु में विश्वास के माध्यम से नया जन्म प्राप्त करते हैं, उनके पास पापी स्वभाव नहीं है और इसलिए, उन्हें मृत्यु का भुगतान नहीं मिलेगा।_


_*शारीरिक मृत्यु के साथ-साथ पापी स्वभाव के प्रत्येक परिणाम (यानी बीमारी, अवसाद, भय, आदि) केवल आध्यात्मिक मृत्यु का एक उप-उत्पाद है जो पहले से ही हमारे अंदर था।  यहोवा ने आदम को बताया कि जिस दिन उसने निषिद्ध पेड़ का फल खाया, वह निश्चित रूप से मर जाएगा (उत्पति 2:17)।  उस दिन आदम शारीरिक रूप से नहीं मरा, लेकिन आध्यात्मिक रूप से मर गया।  आदम (उत्पति 5: 5) के लिए उनकी आध्यात्मिक मृत्यु के उप-उत्पाद के रूप में 930 साल बाद शारीरिक मृत्यु हुई।*_


_*अनन्त जीवन एक उपहार है।  शब्दकोश उपहार को "कुछ ऐसा है जो स्वेच्छा से और क्षतिपूर्ति के बिना, एक वर्तमान के रूप में परिभाषित करता है।"  इस उपहार को अर्जित करने से हमारा कोई लेना-देना नहीं है। आपको बस इसे विश्वास से प्राप्त करना है।*_

Monday, 16 November 2020

वचनाची तलवार घ्या



         *✨ वचनाची तलवार घ्या✨*


*तारणाचे शिरस्ञाण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या..✍*

                *( इफिस ६:१७ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


       आम्ही या भूतलावर जीवन व्यतित करीत असताना अनेक संकटांतून, क्लेशातून, दुःखातून, मोहपाशातून आम्हाला जावे लागते. आणि त्या प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा विजय मिळविण्यासाठी आम्हाला देवाचे वचन म्हणजे वचनाची तलवार हेच एक उपयुक्त असे साधन आहे. आपण नहेम्याच्या बाबतीत पाहातो की, त्याच्या देखरेखीखाली जेव्हा इस्राएली लोक यरूशलेमेचा कोट पुन्हा बांधीत होते, तेव्हा काम अर्ध्यावर आल्यानंतर शत्रू यरूशलेमेवर हल्ला करणार आहे असे त्यांनी ऐकले. त्यामुळे आधीच थकलेल्या लोकांचे मनोबल संपले, त्यांचे धैर्य खचले. तेव्हा नहेम्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि पहारेकरी नेमले. याशिवाय काम करणाऱ्यांनाही हत्यारे दिली. *कोट बांधणारे व भारवाहक एका हाताने काम करीत व दूसऱ्या हातात शस्रे धारण करीत. ( नहेम्या ४:१७)* नहेम्याने परमेश्वराची प्रार्थना कधीच विसरला नाही. प्रत्येक गोष्टींमध्ये त्याने प्रार्थनापूर्वक परमेश्वराचे साहाय्य मागितले. परिणामी त्याला यरूशलेमेचा कोट बांधण्यासाठी देवापासून साहाय्य व सामर्थ्य प्राप्त झाले.


     आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचीही सैतानाने अरण्यात परीक्षा पाहिली. परंतु सैतानाच्या प्रत्येक मोहयुक्त बोलण्याला आमच्या प्रभूने वचनाद्वारेच अडविले. आणि वचनाद्वारे योग्य ते उत्तर दिले. प्रभूला चाळीस दिवस आत्म्याने रानात नेले आणि त्या दिवसांमध्ये येशूने काहीही खाल्ले नाही आणि जेव्हा त्याला भूक लागली तेव्हा सैतान म्हणाला, *तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो म्हणून सांग. ( लूक ४:३)* परंतु आपण वाचतो की प्रभूने त्याला देवाच्या वचनाद्वारे उत्तर दिले की, *'मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही' असे शास्रा लिहिले आहे. ( लूक ४:४)* नंतर सैतानाने त्याला जगातील सर्व राज्ये दाखवून त्यावरचा सर्व अधिकार व वैभव देण्याचे आमिष दाखविले. तो म्हणतो, *म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. ( लूक ४:७)* परंतु जगाच्या मोहपाशात न अडकता ह्या बोलण्याला देखील प्रभूने वचनाद्वारेच उत्तर दिले की, *' परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर. ( लूक ४:८)* नंतर सैतानाने त्याला यरूशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे करून म्हटले, *तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्रात लिहिले आहे की, 'तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांस तुझ्याविषयी आज्ञा देईल' आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. ( लूक ४:९,१०,११)* परंतु प्रभू येशूने त्याला उत्तर दिले की, *'परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको.' ( लूक ४:१२)* अशाप्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाच्या सर्व मोहांवर परमेश्वराच्या वचनाद्वारेच विजय मिळविला. म्हणून आम्हीही वचनाची तलवार घेतली पाहिजे. वचनाद्वारेच सैतानावर विजय मिळविला पाहिजे.


    देवाच्या राज्याची बांधणी करणाऱ्या आम्हीही आमच्या आध्यात्मिक शत्रूच्या, सैतानाच्या हल्ल्यांपासून सावध राहावे. आणि देवाचे वचन म्हणजे आत्म्याची तलवार ही संरक्षणार्थ घ्यावी. शास्रवचने तोंडपाठ करावी, आणि त्यावर मनन चिंतन केल्याने आणि वचनाप्रमाणे आचरण केल्याने आम्हाला *'सैतानाच्या डावपेचापूढे टिकाव धरता येईल.' ( इफिस ६:११)* आणि  *येशूसाठी आपण करू ते सर्वकाळ टिकेल. ( १ करिंथ ३:११-१५)* आपण देवाविरोधात खूप मोठे पाप केले आहे असे कोणाला वाटत असेल तर त्याने लक्षात घ्यावे की येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने त्याला क्षमा मिळाली आहे. प्रभू येशू म्हणत आहे, *"हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे." ( मत्तय २६:२८)* प्रभू येशूच्या पवित्र, अनमोल रक्ताद्वारेच पापक्षमा मिळते. ज्या कोणाला देवाची सेवा करावी असे वाटते परंतु अपयश येण्याची भिती वाटते अशांनी येशूमध्ये राहिलो तर निश्चितच फळ देऊ शकू हे त्याचे शब्द विसरू नये. तो म्हणतो, *"मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहां, जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळे देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करिता येत नाही." ( योहान १५:५)* म्हणूनच प्रियांनो, आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये राहून वचनाप्रमाणे आचरण केले पाहिजे म्हणजे आम्ही फळ देणारे असे होऊ. कारण देवाचे वचन सर्व काही करण्यास समर्थ आहे. आम्ही हे लक्षात घेऊन वचनाची तलवार ही नेहमी आपल्या जवळ बाळगली पाहिजे. आणि पवित्र वचनाद्वारेच येणाऱ्या प्रत्येक कठीण परिस्थितीला, संकटांना तोंड दिले पाहिजे. 


         *

मंदिरात जाताय

 *स्तोत्र १००*


             *मंदिरात जाताय* ?


  " पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर आताच्या जीवनाहून वेगळे असे काय कराल?" असा प्रश्न एका सर्व्हे दरम्यान प्रौढ लोकांना विचारला गेला, तेव्हा त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली, कोणी म्हणाले, मी अधिक प्रभावीपणे जगेन, कोणी उतरले, मी आणखी धोका पत्करीन  यशस्वी होण्यासाठी, कोणी म्हणाले , मी जास्त विचारपूर्वक जगेन, थोडक्यात सांगायचे झाल्यास , मी ह्या जीवनाचा , कुटुंबाचा ,अनेक गोष्टीचा पुन्हा विचार करून जगू.. 

   ख्रिस्ती या नात्याने मंदिरात जातानाआजवर आम्ही कसे गेलो, किंवा वागलो आणि ह्या नंतर कसे वागणार? कारण हे १००वे स्तोत्र मंदिरात येण्यासाठी आवाहन करणारे स्तोत्र आहे. मग मंदिरात आम्ही कसे आणि कशासाठी गेले पाहिजे हे यात सांगितले आहे. 

     मंदिरात जाताना आमच्या मनात खूपदा एखाद्या बद्दल राग,द्वेष,आकस, घेऊनच आम्ही जातो, अहंकार तर खूपच असतो की ते बोलत असतील तरच मी बोलेन उगाचच कोणाला महत्त्व देणार नाही. किंवा आज पाळकसाहेब कशावर अन कसे बोलतील कोण जाणे, कंटाळवाणं नको व्हायला. आजकाल फारचं कंटाळा येईल असे बोलतात, असले विचार घेऊन मंदिरात जातो. आजवर कदाचित आपण हेच विचार घेऊन गेलो असू.

    पण हे स्तोत्र सांगते की,  पहिली गोष्ट म्हणजे *देवाचा जयजयकार करीत आणि गीतं गात* मंदिरात  परमेश्वरापुढे या,म्हणून नकारात्मक विचार सोडून आनंदाने उपासना संगीतातील गीतं गात जाऊ. म्हणजे भक्ती भावाने जायला हवे.

दुसरे म्हणजे, *आनंदाने सेवा* केली पाहिजे,स्तुती व जयजयकाराबरोबर सेवा तितकीच महत्वाची आहे, मार्था प्रभुसाठीच करीत होती, पण त्यात कुरकुर होती की मी एकटीच काम करते प्रभू मरियेला सांग मला मदत करायला. पण प्रभू म्हणतो मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो काढून घेतला जाणार नाही, *कारण कुरकुर करीत सेवा करण्यापेक्षा भक्ती करणे उत्तम आहे*. केवळ जबाबदारी म्हणून सेवा केलेली मान्य होत नाही.. 

    तिसरी गोष्ट म्हणजे *देवाला *जाणून* *घेत त्याच्यावर प्रीती केली* पाहिजे,जाणून घेणं म्हणजे प्रभू येशूने वधस्तंभावर आमच्यासाठी के केले नेमकेपणाने हे समजून घेणे, ते जाणल्यावरच देवावर आम्ही प्रेम करू शकतो आणि जेव्हा आपण देवावर प्रीती करतो तेव्हा इतरावरही प्रीती करण्याची भावना निर्माण होते आणि मनातील द्वेष, आकस, अहंकार,हे नकारात्मक विचार निघून जातात. चौथी गोष्ट म्हणजे *उपकारस्तुती* देवाने आजवर दिलेल्या सर्व उत्तम आशीर्वादा बद्दल आणि आज मंदिरात त्याच्या पवित्र जनांच्या सहभागीतेत आणल्याबद्दल उपकारस्तुती केली पाहिजे कारण *देव चांगला आहे, त्याची दया सनातन आणि सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे*.. 

   पुन्हा एकवार देवानं आम्हाला संधी दिली आहे, *म्हणून आम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणिय असा यज्ञ म्हणून समर्पित करु कारण हिच अध्यात्मिक सेवा आहे*..

    *प्रभू येशू तुझ्या मंदिरात जाताना आमच्यातील सर्व तुला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक व खरेपणाने व आत्म्याने तुझ्या मंदिरात घेऊन जा* *अशी  आम्ही तुला विनंती  करतो* *आमेन*!!

      

Saturday, 14 November 2020

मंदिराचे चिरे (पाषाण)

 *इफिस २:14-२२*


      *मंदिराचे चिरे (पाषाण)*



     *खाणीपाशीच घडिलेले चिरे आयते आणून ते मंदिर बांधले; ते बांधीत असता हातोडा,कुऱ्हाड किंवा आशा कोणत्याही लोखंडी हत्यारांचा आवाज मंदिरात ऐकू आला नाही*. *१राजे ६:७*..

    

     माझ्या मोठया भावाचे अक्षर आणि चित्रकला खूपच सुंदर आहे.. त्यासाठी त्याला शालेय पुरस्कार नेहमीच मिळत असत. ते पाहून मलाही चित्र काढण्याची *हुक्की* यायची. हुक्की अशासाठी म्हणते कारण माझं हस्ताक्षर आणि चीत्रकला म्हणजे शाईत मुगळा बुडवून वहिवर सोडला तर जी काही चित्तरकथा वहिवर उमटते तसे आहे. मग हुक्की च यावी लागायची,उपजत ती कला अंगी नव्हतीच.मग चित्रकलेच्या वहीची पानावर पानं मी फाडीत असे,कसलेही रंग भरायचे , त्यामुळे माझं चित्र काही आकार घेत नव्हते. मग आई म्हणायची,"अग तुला जे चित्र काढायचे ना ते मनात ठरव,मग रंगसंगती ठरव, **पूर्वतयारी* चांगली कर मग छान चित्र तुझेही होईल" .. मग मात्र मी तशी तयारी करून चित्र काढू लागले... 

    आजच्या वाचनात मंदिराच्या बांधकामाबद्दल पौल सांगत आहे, *प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचिलेले आहा, स्वतः ख्रिस्त येशु मुख्य कोनशीला आहे*.म्हणजे ह्या मंदिराच्या भिंती ज्या दगडाच्या किंवा पाषाणाच्या बांधल्या जात आहेत ते दगड आपण विश्वासणारे आहोत. 

    जर ते चिरे,किंवा दगड आपण आहोत तर हे चिरे आधी खाणीतच घडले गेले पाहिजेत.जसे शलमोनाने देवाचे मंदिर बांधले तेव्हा हातोडा, कुऱ्हाड याचे घाव खाणीतच सहन करावे लागले त्या चीऱ्यांना!!  मग ते सुबक चिरे मंदिरासाठी वापरले गेले. ही खाण म्हणजे हे जग आहे. ह्या जगातच आम्हाला प्रभूच्या मंदिरासाठी उपयोगी पडणारे सुबक चिरे व्हावे लागते.. *हे जीवन प्रभूने त्यासाठीच दिले आहे. जेव्हा हे घाव आमच्यावर पडतात तेव्हा जे निरुपयोगी कंगोरे, खडबडीतपणा जो आमच्यात आहे,मग तो द्वेषाचा, अहंकाराचा,आकसाचा, कुरकुरीचा,निंदेचा,अप्रितीचा,अविश्वासाचा असेल, हा सर्व खडबडीतपणा येथेच या जगात जीवन जगत असतानाच पूर्णपणे काढून टाकला पाहजे, देवाचे वचन आम्हाला घडवते, त्या पवित्र मंदिरासाठी तयार करते, म्हणून या वचनाद्वारे घाव बसतील कदाचित कारण हे वचन आमच्या दृष्टीने ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्यावरच घाव घालते म्हणजे, एखादे व्यसन असेल,मोह  असेल,जग आणि त्यातील भुरळ पडणाऱ्या गोष्टी असतील.. कारण ह्यामुळे आमचं रूप हे  कंगोरे ,हा खडबडीतपणा  विद्रूप करते, ते जीवन देवाच्या मंदिरासाठी उपयोगी नाही, देवाला हे मंदिर सुबक भिंतीचच बांधायचे आहे ,कारण त्याच पावित्र्य, प्रीति, शांती,आंनद,गौरव,कृपा, *प्रत्यक्ष त्याची उपस्थिती*  त्यात असणार आहे.. 

    वचन सांगते की *मंदिरात हातोडा, कुऱ्हाड याचा आवाज ऐकू आला नाही* हे मंदिर स्वर्गीय मंदिर आहे, इथेच,या जगातच आम्हाला प्रभुसाठी घडायचे आहे, मृत्यूनंतर ही संधी नाही, *नंतर फक्त स्वीकार किंवा अस्वीकार होणार आमचा त्या पवित्र मंदिरासाठी*!!!

 म्हणूनच  कागदावर जर सुदंर चित्र काढायचे तर *पूर्वतयारी* ही आधीच करावी लागते.. *तसेच तो सुबक चिरा आमच्या जीवनाचा इथेच घडवू या ,आमच्याच हातात आहे ते* कारण वाचनानुसार , *प्रभूच्या ठायी आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहोत आपण*... हि फार मोठी कृपा आहे आपल्यावर देवाची!!

      *सर्व समर्थ पित्या तुझ्या मंदिराचा चिरा व्हायचे आहे आम्हाला, तुला न आवडणारे अनितीचे पापाचे कंगोरे काढून टाक आणि आम्हाला सर्वार्थाने सुबक सुदंर कर तुझ्या मंदिरासाठी*... 

        

आप परमेश्वर की निज प्रजा हैं

 आप परमेश्वर की निज प्रजा हैं।

‘‘इधर उधर मत ताक, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूं।’’ (यशायाह 41:10)


प्रिय मित्र, आज आप के परमेश्वर की प्रतिज्ञा यशायाह 41:10 से ली गई है, ‘‘इधर उधर मत ताक, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूं।’’ यहां पर परमेश्वर आपको यह निश्चयता देता है कि वह हमारा परमेश्वर है। क्या हम सचमुच एक ऐसे परमेश्वर से आशीषित हैं? प्रभु आपका है। वह हम से दूर नहीं है। वह हमारे हर एक के लिए व्यक्तिगत उद्धारकर्त्ता है जो उसे अपना प्रभु मानते हैं। हम इतने आशीषित हैं और निश्चय परमेश्वर के चुने हुए लोग और उसकी निज प्रजा हैं। ऊपर चर्चित प्रतिज्ञा वचन के अनुसार परमेश्वर हम से कहता है कि हमें इधर उधर ताकना या भयभीत नहीं होना चाहिए। परमेश्वर नहीं चाहता कि हम अकेलेपन में रहें क्योंकि प्रभु हमारा परमेश्वर है। परमेश्वर आपको बीमारी से चंगा करेगा और आपको अकेलेपन से बाहर निकालेगा।


आज भी परमेश्वर आप हर एक के साथ रहने जा रहा है। मुझे अपने जीवन की एक विशेष घटित घटना याद आई है जो मेरे कॉलेज के दिनों में हुई थी। जब मैं कॉलेज में थी तब हम रात को मरीजों को देखने जाया करते थे। एक ऐसे समय पर जब मैं अकेली अस्पताल जा रही थी तो मैं ने अकेलेपन का अनुभव किया। उस समय रात के 11 और 12 के बीच का समय था। मैं ने कहा, ‘‘हे प्रभु, आप कहां हैं? मैं बिल्कुल अकेली हूं। मैं आपकी उपस्थिति का अनुभव नहीं कर पा रही हूं।’’ उस समय जब मैं ने आकाश की ओर देखा, आकाश में गहरा अंधकार था परन्तु चंद्रमा मुझ पर चमक रहा था। उस दिन प्रभु ने मुझ से यह कहकर बातें की, ‘‘मेरे बच्चे, मत डर। इधर उधर मत ताक, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूं। मैं न केवल तेरे साथ हूं, परन्तु तेरे चारों ओर हूं; आगे, पीछे और दाहिने और बाएं।’’ उसके वचन ने मुझे बहुत दिलासा दिया और तब से जब कभी भी मैं अकेलेपन का अनुभव करती या परेशान होती तो इस घटना को याद करती हूं और इससे मुझे बहुत शांति मिलती है। 

मेरे मित्र, उसी तरह से परमेश्वर आपके चारों ओर भी है। इधर उधर मत ताकें या निराश होवें क्योंकि वह आपका परमेश्वर है। ‘‘चाहे पहाड हट जाए या चाहे पडाहियां टल जाए तौभी तेरी करुणा हम पर से न हटेगी, न तेरी शांतिदायक वाचक वाचा न टलेगी, यहोवा जो तुझ पर दया करता है; उसका यही वचन है।’’ (यशायाह 54:10) आपके लिए परमेश्वर का प्रेम कभी न हटेगा या टलेगा। वह आपका एक मित्र, पिता और माता होगा। वह आपके साथ सदा हर रीति से होगा। आप संवेदनशील नहीं होना है। यदि आप इस सत्य पर अपना विश्वास रखेंगे तो आप अपने आप से प्रेम और परवाह का अनुभव करेंगे। आप गौरैयों से भी बढकर हैं और परमेश्वर आपकी चिंता करता है। परमेश्वर पर भरोसा रखें और आनन्दित हो जाएं। आप केवल परमेश्वर की स्तुति और धन्यवाद करते रहें।



Friday, 13 November 2020

त्याच्यावर सर्व भार टाका



     *✨त्याच्यावर सर्व भार टाका ✨*


*मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जूं आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे 'तुमच्या जिवांना विसावा मिळेल.'..✍*

                 *( मत्तय ११:२९ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


      आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखरच मनाचा सौम्य, लीन, नम्र होता. तो देवाचा एकुलता एक पुत्र होता. परंतु आमच्या पापांसाठी तो स्वर्ग सोडून ह्या पृथ्वीवर आला. लीन, नम्र झाला. आणि वधस्तंभावरचे मरण त्याने सोसले. स्वर्गीय पित्याने सर्व काही ख्रिस्ताच्या स्वाधीन केले आहे. पिता आणि पुत्र एकमेकांना पूर्णपणे ओळखतात व ते एकमेकांना प्रगट करितात. यामुळेच जे ख्रिस्ताला ओळखतात तेच केवळ देवपित्याला ओळखू शकतात. प्रभू म्हणत आहे की, *माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रगट करण्याची पुत्राची  इच्छा असेल, त्याच्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही. ( मत्तय ११:२७)* यामुळेच येशू ख्रिस्त जे श्रमाने व कष्टाने थकून गेलेले आहेत, तसेच, जे भाराखाली दबलेले आहेत त्यांना स्वतःकडे येण्याचे आमंत्रण देत आहे. हे भार कशाचे असतील ? तर हे भार आमच्या पापांचे असतात, आमच्या जगिक जीवनातील काळजी, चिंतांचे असतात, तसेच अनेक प्रकारच्या कठीण परिस्थितीचेही असतात. आम्ही ख्रिस्ताकडे येताच तो आमचा भार दूर करतो आणि आपल्याला विसावा मिळतो. त्याचे जूं घेणे म्हणजे त्याचे खरे शिष्य होणे व त्याच्या हातात विश्वासाने सर्व सोपवून देणे होय. 


    आम्ही जेव्हा याप्रकारे आम्हाला स्वतःला प्रभूच्या हाती सोपवून देतो तेव्हा तो आमच्या जीवनाद्वारे कार्य करतो आणि आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य पुरवितो. *तो भागलेल्यांस जोर देतो. निर्बलांस विपूल बल देतो. ( यशया ४०:२९)* देवाच्या सामर्थ्यात जगण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे येशूचे जूं खांद्यावर घेऊन त्याच्या मार्गाने चालणे आणि त्याच्यापासून शिकणे होय. त्याचे जूं हलके आहे. म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळावयास सोप्या आहेत. जर आम्ही त्याच्या आज्ञांचे पालन केले तर तो आमची सर्व पापे, अपराध, जे एखाद्या खूप मोठ्या ओझ्याप्रमाणे आम्ही खांद्यावर घेऊन चालत आहोत, ती सर्व तो आमच्या जीवनातून काढून दूर फेकून देतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, *पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. ( स्तोत्र १०३:१२)*  आमचे अपराध आमच्यापासून दूर करून तो आम्हाला पापमुक्त, दोषमुक्त करतो. आणि ख्रिस्तामध्ये नवीन जीवन, जे पूर्णपणे पापरहित, दोषरहित असे आहे ते जगण्याची संधी मिळवून देतो. म्हणून आम्ही आमचे सर्व जीवन, आमच्या जीवनात असलेले सर्व प्रकारचे भार, ओझे, सर्व काळजी, चिंता त्याच्यावर सोपवून दिल्या पाहिजेत. तो आमची काळजी घेणारा आमचा देव आहे. आमचे ओझे स्वतःवर घेऊन आम्हाला विसावा देणारा आमचा देव आहे.


*देवाच्या सामर्थ्यात दुर्बल होणे म्हणजेच ख्रिस्ती माणसाने अपराध करण्यासारखे आहे.*


       *!!..प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो..!!*


     *

आत्म्याने परिपूर्ण व्हा

 *इफिस ५ : १५-१९.*


        *आत्म्याने परिपूर्ण व्हा.*


       *त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.*  *प्रे. कृ. ४:३१.*


      बायबल सांगते की पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. *का पवित्र आत्म्याने भरायचे किंवा परिपूर्ण व्हायचे?* देवाने का ही आज्ञा दिली? काय उद्देश आहे देवाचा?

     ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या  संदर्भात महत्वाची आज्ञा म्हणजे संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगा. पण बऱ्याच जणांना वाटते की आम्हाला देवाचे कार्य करता येत नाही. येशूविषयी सांगताना कुठेतरी संकोच वाटतो किंवा कुचंबणा होते , भीती वाटते. दोन हजार वर्षांपूर्वी येशूच्या शिष्यांची हीच अवस्था होती. येशूला वधस्तंभावर दिल्यानंतर ते सर्व दार लावून खोलीत घाबरून बसले होते. 

      त्यांची ही अवस्था जोवर ते आत्म्याने परिपूर्ण झाले नव्हते तोवर होती. पण प्रे. कृ. २ :४ ह्या वचनात शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. आणि मग मात्र ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि धैर्याने प्रभू येशूची सुवार्ता सांगू लागले. 

   म्हणजेच पवित्र आत्म्याने जेव्हा आपण परिपुर्ण होतो तेव्हा धैर्य प्राप्त होते. आणि मगच आपणही प्रभू येशूची सुवार्ता धैर्याने सांगू लागतो. ती भीती  ,तो संकोच , जाऊन त्याची जागा आता येशूवरील प्रेमाने घेतली जाते. आणि जो येशूवर प्रेम करतो त्याच्यामध्ये धैर्य येते व तोच येशूच्या आज्ञा पाळतो. 

    प्रभू येशूने स्वर्गात जाताना सुवार्ता सांगण्याचीच  आज्ञा दिली आहे. म्हणूनच जर आम्हाला प्रभूची आज्ञा पाळायची आहे तर पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हायला पाहिजे. 

     जेव्हा एखादी गाडी बिघडली , इंजिन खराब झाले तरी उतारावरून ती सहज  खाली जाते  पण चढावर मात्र नाही जाऊ शकत , त्यासाठी इंजिन परिपूर्ण किंवा पॉवर फुल असायला हवे . तसेच पापाकडे जाताना , देहस्वभाप्रमाणे चालताना पवित्र आत्म्याची गरज नसते आणि भरधाव वेगाने त्याकडे वाटचाल चालू असते आमची.

      मात्र  जेव्हा  आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालतो तेव्हा देवच देहस्वभावाच्या गोष्टी दूर करायला मदत करतो . देहस्वभावापसून दूर राहिलो तर आत्म्याची फळे दिसतात.. 

     म्हणुनच प्रभूची आज्ञा पाळण्यासाठी , आत्म्याची फळे प्राप्त होण्यासाठी व सुवार्तेसाठी पवित्र आत्म्याची व धैर्याची आम्हाला नितांत गरज आहे. 

     *प्रार्थना करू या की देवबापा तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर म्हणजे धैर्याने आम्ही तुझी सेवा करू..*   *आमेन.*

   

वह हमारा "अब्बा पिता

 _*वह हमारा "अब्बा पिता"*_


_मरकुस 14:36 और कहा, *हे अब्बा, हे पिता, तुझ से सब कुछ हो सकता है; इस कटोरे को मेरे पास से हटा ले: तौभी जैसा मैं चाहता हूं वैसा नहीं, पर जो तू चाहता है वही हो।*_


 _*यद्यपि परमेश्वर को पुराने नियम में हमारे पिता के रूप में जाना जाता था, यद्यपि यीशु ने इस   शीषर्क के लगातार उपयोग को परमेश्वर के साथ हमारे संबंधों की एक नई समझ लाया,। यीशु ने अपने पिता के रूप में परमेश्वर को संदर्भित किया, और उसने परमेश्वर के रूप में हमारे पिता के रूप  मैं भी कहा।* इसने यीशु के *दिन के धार्मिक यहूदियों को अस्वीकार कर दिया, जिन्होंने अपने पिता को परमेश्वर को बुलाने के लिए कहा, क्योंकि वे समझ गए की वे परमेश्वर के बराबर थे।* हमें अपने पिता को परमेश्वर को बुलाने  के लिए कहां। क्योंकि वह समझ गए की *वह परमेश्वर के बराबर थे। हमें अपने पिता को परमेश्वर को बुलाने के लिए निर्देश दिय गय है,*_


_हमारे परमेश्वर की तरह, कोमल प्रेमपूर्ण प्रकृति का खुलासा करते हैं। शब्द" अब्बा एक  श्रेही  शब्द है जो एक युवा बच्चे ने अपने पिता को बुलाया, जो हमारे शब्द " डैडी" से मेल खाती हैं।यह एक शब्द है जो अंतरगता ओर श्रेहि व्यकत करने के लिए इस्तेमाल किया जाता हैं।यह एक सख्त न्यायाधीस के रूप में परमेश्वर के विचार को निकालता है और उसे एक प्रेमपूर्ण पिता के रूप में उसकी छवी रखता है जो परवाह करता है, समझता है, ओर हमारा सबसे अच्छा दोस्त है। "👉देखो पिता ने *कैसा प्रेम किया है, की हम परमेश्वर की संतान कहलाए',ओर हम हैं भी :इस कारण संसार हमे नहीं जानता , क्योंकि उसनें उसे भी नहीं जाना" देखें ( 1 यहुना  3:1)।*_


_हम लेपालक होने से परमेश्वर के पुत्र हैं यीशु प्रक़ति से परमेश्वर का पुत्र था।जैसा कि यीशु ने यहूदियों से कहा तुम अपने पिता सैतान के हो (यहुना 8:44   ईफि,2:3)_


 _*हालांकि यीशु हमें खरीदा और अपने परमेश्वर के  पुत्रों के रूप में अपनाया।*_


 _हम सिर्फ उत्तराधिकारियों  नहीं है, हम मसीह के साथ संयुक्त - वारिस है यह सोचने के लिए कि हम जो कुछ भी परमेश्वर का विरासत में आ चुके हैं, उसके साथ समान रूप से  सांझा करते हैं, ओर यह समझ के परे हैं_



Wednesday, 11 November 2020

देवापासूनच बल आणि सामर्थ्य



  *✨देवापासूनच बल आणि सामर्थ्य✨*


*परमेश्वर, जो माझा दुर्ग, त्याचा धन्यवाद होवो, तो माझ्या हातांना लढावयास शिकवितो, माझ्या बोटांना युद्ध करावयास शिकवितो..✍*

                 *( स्तोत्र १४४:१ )*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     राजासनावर आरूढ झालेल्या दाविद राजाने सर्व श्रेय परमेश्वराला दिले. आणि एका अतिसामान्य, मर्त्य मानवाला देवाने इतका चांगुलपणा दाखविला म्हणून तो देवाचे आभार मानत आहे. देवाला धन्यवाद देत आहे. तो परमेश्वराला दुर्ग म्हणजेच खडक असे संबोधित आहे. कारण परमेश्वर कधीही न बदलणारा देव आहे. खडकाप्रमाणे स्थिर आहे. देवाच्या अखत्यारित केवळ युद्धाची परिणीतीच नव्हे तर आणखी भरपूर गोष्टी असतात. सर्व तपशीलांकडे त्याचे लक्ष असते. हात, बोटे, प्रत्येक सैनिकांचे वैयक्तिक कौशल्य ह्याकडे त्याचे लक्ष असते. लढाई परमेश्वराची आहे, आपल्याला माहीत आहे की, विजयही त्याचाच आहे. ज्याप्रमाणे दाविदाने देवाच्या साहाय्याने आपल्यापेक्षा बलवान गल्याथाबरोबर लढून त्याच्यावर विजय मिळविला होता. त्याप्रमाणेच देवावर भरंवसा ठेवून आम्ही आमचे युद्ध लढले पाहिजे. त्यासाठी त्याच्या लोकांनी नेटाने आणि पूर्णपणे देवाला समर्पित होऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. पौल म्हणतो, *"शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा." ( इफिस ६:१०)* आम्ही प्रभूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून त्याला पूर्णपणे समर्पित झाले पाहिजे. 


    आमच्याकडे देवाला देण्यासारखे काहीही नाही, आपण त्याच्या काहीच उपयोगाचे नाही असे आम्हाला वाटते. परंतु आपण पाहातो की, देवाने मोशेला दर्शन दिले आणि इस्राएली लोकांना मिसरांच्या दासपणातून सोडविण्याचे काम त्याला सोपवून दिले. मोशेला देवाने सेवेसाठी पाचारण केले तेव्हा तो म्हणाला, *"हे प्रभू, मी बोलका नाही. मी मुखाचा जड आणि जिभेचाही जड आहे." ( निर्गम ४:१०)* मोशेच्या बोलण्यात काही दोष असेल किंवा तो भीत असेल. परंतु देवाने त्याचे हे अपुरेपण आपल्या पूरतेपणातून भरून काढले. आणि मग देवाने म्हटले, *"तर आता जा, मी तुझ्या मुखांस साहाय्य होईन आणि काय आणि कसे बोलावयाचे ते तुला शिकवीन." ( स्तोत्र १४४:१२)* आणि आपण पाहातो की देव सदैव मोशेच्या बरोबर चालला. अरण्यातील प्रवासामध्येही देवाने सर्व प्रकारे मोशेचे साहाय्य केले. त्याच्यातील कमतरता, उणेपण देवाने दूर केले.


     आपल्याला जरी वाटते की आपण काहीच कामाचे नाही, आपण सर्व गोष्टींनी दुर्बल आहोत, परंतु परमेश्वर तसे समजत नाही. तो अशा लोकांचाच त्याच्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करून घेतो. तो लीनांस उंच करितो. आम्ही लीन, नम्र असावे. देव आमच्या जीवनाद्वारे त्याचे कार्य करून घेतो. म्हणून आम्ही देवाच्या योजनेप्रमाणे चालावे, देवाची इच्छा पूर्ण करावी. आणि त्याच्या आमच्याविषयीच्या योजना आमच्या जीवनाद्वारे त्याला पूर्ण करण्यासाठी आपले जीवन त्याच्या हाती सोपवून द्यावे. त्याच्या बलवान हातांमधून आपण इतरांच्या आशीर्वादास कारण व्हावे.


*देव आपल्याला त्याच्या कार्यासाठी पाचारण करतो तेव्हा आपण एकटे नसतो,  आपल्यासोबत त्याचे सामर्थ्य आणि शक्ती असते.*


       

              

Tuesday, 10 November 2020

विश्वास आणि सत्कर्मे

 *याकोब २:१४-२६*


    *विश्वास आणि सत्कर्मे*   


    *त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की लोकांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करावे*.


     अशी मान्यता आहे की संपूर्ण जगातील ९०% लोक *येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे* हे मान्य करतात, पण केवळ ३०% लोकांनीच ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे. ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे केवळ बोलणे ,ह्या निव्वळ वल्गना आहेत.अशा लोकांबद्दल याकोब बोलत आहे. *खरा विश्वास हा इतरांना आमच्या जगण्यातून, कृतीतून दिसायला हवा*.गरजवंताला अन्नाची वाण आहे,त्यांना धड कपडे नाहीत हे जाणून अन पाहूनही जर त्याला मदत न करता फक्त तोंडी कळवळा व्यक्त करतो की, थंडी वाजते का तर ऊब घे, भूक लागली असेल तर तृप्त हो सुखाने जा, पण देत काहीच नाही तर *विश्वासणारे आणि अविश्वासणारे यात काहीच फरक नाही, दोघेही सारखेच*!! *जे देवावर प्रेम करण्याचा आणि विश्वासाचा दावा करतात पण फळ देत नाहीत तर ते अविश्वासणाऱ्या सारखेच आहेत*. उदाहरणच द्यायचे तर , तुम्हाला वाचता येते पण जर वाचनच करीत नाही तर तुम्ही वाचता न येणाऱ्या सारखेच आहात. 

        बायबल सांगते,भुते ,दुरात्मे ही विश्वास ठेवतात, घाबरतात,पण ते काय करतात तर सत्कर्माच्या उलट कर्मे करून देवाविरुद्ध बंड करतात. तुमचे विश्वासाद्वारे खरेच तारण झाले आहे तर ते लपून राहणारच नाही, तुमच्या चांगल्या कृतीतून प्रकट होणारच. अब्राहामाने देवाशी  कोणताही वाद न घालता फक्त आज्ञापालन केले इसहाकाच्या बाबतीत. *खरा विश्वास हा कार्य करतो, आज्ञापालन करतो*. जर फळं नाहीत, पुरावा नाही, साक्ष नाही,  ख्रिस्ताची चित्तवृत्ती दिसत नाही ,तुमच्या जीवनात कार्य होत नाही तर  तुमचा विश्वास प्रकट होत नाही..

   महत्वाचे म्हणजे, तुमचे तारण कर्माने होत नाही, भरपूर दान देण्याने होत नाही, चर्चच्या मेंबरशीपमूळे होत नाही, *तूमच्या तारणासाठी  ख्रिस्ताला तुमचा फक्त विश्वासच हवाय, इतर गोष्टी अपेक्षित नाहीत,  पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे येता आणि खरा ख्रिस्त तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्या सत्कर्मातून लोकांना दिसतो हे तुम्हाला दिसते*..कारण ते तुमचा आदर करीत असतात. 

    *तीत १:१६ मध्ये पौल म्हणतो, "आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात, *परंतु कृतीने त्याला नाकारतात*, *तेअमंगळ, आज्ञाभंजक,प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत*...

  *चांगली कृत्ये ,सत्कर्मे करणे हा विश्वासूपणाचा पुरावा असू शकत नाही, पण सत्कर्माचा, चांगले वागण्याचा अभाव हा मात्र अविश्वास दाखवतो किंवा ती व्यक्ती अविश्वासणारी आहे याकडे निर्देश करतो*!!!

   *आज आपण स्वतःला विचारू या की माझा विश्वास खरा आहे की निर्जीव आहे*..

    *दयाघन ईश्वरा, माझा तुझ्यावरील विश्वास हा माझ्या सत्कर्मातून तुला आणि इतरांना दिसावा म्हणून माझ्या आचार विचारांचा ताबा तुझ्या हाती असू दे की ज्यामूळे आमचा प्रकाश लोकांसमोर पडून तुझे गौरव व्हावे*..

           

उघडे कान... बंद तोंड

*उघडे कान... बंद तोंड*

याकोब.१ः१९-२१*

सर्व विश्वासणार्‍यांनी देववचनाच्या आकलनाबाबत जागृत असावे अशी याकोबाची अपेक्षा होती. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण ‘‘विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते’’ (रोम.१०ः१७). देवाचे वचन आपल्याला भरवसा ठेवणारा विश्वास देते. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा देव आपल्यामध्ये नवजीवन निर्माण करतो.अनेक लोक देववचन ऐकतात, परंतु काही लोकांसाठी ते केवळ शब्द असतात. देववचन म्हणून ते त्याचा स्वीकार करीत नाहीत. हा केवढा विरोधाभास आहे की, सर्व निर्मिती ही त्याचा शब्द पाळते, पण जे आपण देवाच्या प्रतिरूपाचे निर्माण करण्यात आलो आहोत व आपणांस निवड करण्याची मुभा दिली आहे, ते आपण त्याचा शब्द पाळीत नाही. अनेकांना देववचनाचे प्रचंड ज्ञान असते, परंतु ते वचन त्यांना काय सांगते यावर ते विश्वास ठेवत नाहीत, म्हणून ते देवाच्या वचनाला प्रतिसाद देत नाहीत. जेव्हा आपल्या विरोधात कोणी काही बोलले तर तत्काळ त्यांना फटकारू नये. त्याद्वारे आपण अडचणीत येण्याची शक्यता असते. ह्या संदर्भात देवाचे वचन काय म्हणते ते ऐका, ‘‘बोलण्यात उतावळा असा तुला कोणी दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते’’ (नीति.२९ः२०). ‘'फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा’’ (नीति.१०ः१९).ज्या नियमाने आपले जीवन जगावे तो नियम नीति.१५ः१ मध्ये सांगितला आहे : ‘‘मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.’’_तोंडच्या शब्दाने मनुष्य चांगले फळ भोगतो, परंतु कपटी इसमांच्या जिवाला बलात्कारूप फळ मिळते; जो आपले तोंड सांभाळतो तो जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येेते (नीति.१३ः२३)._*

इतरांच्या उन्नतीसाठी

 


          *✨इतरांच्या उन्नतीसाठी✨*


*तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापूढे मान वाकविण्यास लावतो..✍*

               *( २ करिंथ १०:५ )*


                        *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     आपण या जगामध्ये राहातो. म्हणजेच सर्वसाधारण मानवी अस्तित्वाच्या मर्यादांमध्ये जगातील जीवनात सहभागी असतो. पौल म्हणतो जगाच्या रीतीप्रमाणे किंवा देहस्वभावाप्रमाणे म्हणजेच केवळ मानवी स्वभावाप्रमाणे किंवा शंकास्पद साधनसामग्री घेऊन तो युद्ध करीत नाही तर देवाची शस्रसामुग्री घेऊन तो युद्ध करीत आहे. आणि तो म्हणतो की, *आमच्या युद्धाची शस्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. ( वचन ४)* देवाची शस्रसामुग्री म्हणजे देवाचे पवित्र वचन. आणि बायबल मध्ये पवित्र वचनाला हातोडा म्हटले आहे. हा वचनाचा हातोडा घेऊन ही तटबंदी जमीनदोस्त करण्यास पौल निघाला आहे. तटबंदी म्हणजे नगराच्या वेशीच्या तटाचे बुरूज, ज्यांच्याद्वारे नगराचे रक्षण केले जाते. किंवा तटबंदी म्हणजे लढाईत तटबंदी पाडण्यासाठी उभारण्यात आलेले मोर्चे. परंतु येथे तटबंदी म्हणजे तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले सर्व काही. ही तटबंदी देवाचे वचन म्हणजे सुवार्तेद्वारे पाडून टाकली जाणार आहे.


     सुवार्तेची घोषणा करून, लोकांच्या विरोधावर मात करून, प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापूढे मान वाकविण्यास लावणे हेच पौलाचे कार्य होते. तटबंदी जमीनदोस्त करून तिच्या आश्रयाला असणाऱ्या सर्वांना ख्रिस्ताकडे आणणे, खोटे तर्कवाद नामशेष करणे आणि लोकांचे विचार ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली आणणे हाच पौलाचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताचे प्रभुत्व मानावे व त्याच्या आज्ञा पूर्णपणे पाळाव्या. कारण आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध प्रगट होतो. म्हणूनच पौल म्हणतो, *तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध आहों. ( वचन ६)*


     आज बहुतेक ख्रिस्ती कार्याला शिस्त नाही. या कार्याचा आरंभ तर प्रबळ आवेगातून होतो, आमच्या मनात येणारा विचार घेऊन आम्ही ताबडतोब कृती करतो परंतु स्वतःला शिस्त लावीत नाही आणि ख्रिस्ताच्या आज्ञा पाळीत नाही. देवाचे आज्ञापालन करण्यातच खरा निश्चय, उत्साह, आवेश आहे. कोणतीही व्यक्ती तारणासाठी येशू ख्रिस्ताला समर्पित आहे. त्याचप्रमाणे देव, जग आणि पाप व सैतान यांच्यासंबंधी येशू ख्रिस्ताच्या विचारदृष्टीला बांधील आहे. म्हणजेच प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी आणि *ह्या युगाबरोबर समरूप होऊ नये, तर मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्यावे. ( रोम १२:२)* काही गोष्टी देवाच्या आत्म्याकडून मिळणाऱ्या दिव्य शक्तीनेच नष्ट कराव्या लागतात. अशा वेळी आम्ही झगडू नये तर बायबल सांगते त्याप्रमाणे, *"स्थिर उभे राहा आणि देव तुमचे तारण करील ते पाहा." ( निर्गम १४:१३)* इतकेच करावे आणि देवापासून होणारे तारण पाहावे.


*खोटे तर्कवाद, युक्तिवाद नष्ट केलेच पाहिजेत. मग लोक सुवार्तेच्या सत्याला वश होतील आणि ख्रिस्ताच्या प्रभुत्वाखाली त्यांना खरी जीवनप्राप्ती होईल.*

  

       

Monday, 9 November 2020

क्षणिक की सार्वकालिक

 *लूक १५:११-२४*


     *क्षणिक की सार्वकालिक*


    *तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने,पूर्ण जीवाने, व पूर्ण मनाने प्रीति कर*

          *मत्तय२२:३७*


आजच्या शास्त्रपाठातील वचन, "माझा वाटा मला द्या". म्हणजे जे काही आहे त्यात  माझा वाटा आहे त्या माझ्या वाट्यात तुमचा वाटा नाही, खरेतर सर्व वडिलांनीच मिळविले होते सर्व काही त्यांचेच होते,पण हे तो विसरला होता.मी आधी माझा आंनद शोधणार,मला हवे तसे जगणार अशी त्याची मानसिकता होती. आणि मग खरी सुरुवात पापाला येथूनच होते.  आमच्या अंतकरणाला जी पापाची बाधा झालेली आहे तिचे हे परिणाम किंवा लक्षणं असतात. मी, माझे,मला ह्यालाच प्रथम स्थान असते,आणि देवाला दुय्यम असते.म्हणजेच सर्वात मोठी आज्ञा आपण मोडीत असतो ती म्हणजे तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने,पूर्ण जीवाने,पूर्ण मनाने प्रीति कर.. पुष्कळदा काही लोकांना वाटते की,आम्ही चोरी करीत नाही, खोटं बोलत नाही, स्वच्छ जीवन जगतो,म्हणून आम्हाला क्षमेची व पश्चातापाची गरज नाही.पण जो मनुष्य स्वतःला प्रथमस्थान देऊन आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो तो सर्वात जास्त दुःखी होतो,जसं ह्या उधळ्या पुत्राने आधी केले पण नंतर त्याला अनेक संकटे सहन करावी लागली. तो फक्त स्वतःवर प्रेम करीत होता देवावर नाही. म्हणजे तो *क्षणिक सुखासाठी सार्वकालिक सुखाला* नाकारीत होता. 

     *जॉन पीटर* ह्या सुप्रसिद्ध कवीच्या ह्या सुदंर ओळी मला आवडतात, कारण त्या ओळींच्या मागची त्यांची मानसिकताही तितकीच सुंदर आहे,ते लिहितात,

 *डोंगरमाथ्यावर  मावळताना*

*सूर्य, रम्य अशा संध्याकाळी*

*बाहुपाशामध्ये असावे मी* 

   *सदैव येशूच्या जवळी*.

जेव्हा एका पब्लिशर ने हे गीत ऐकलं तेव्हा तो जॉन पीटर याना म्हणाला मी तुला ह्या गीतासाठी दीड हजार डॉलर देतो,पण एक अटीवर, ती म्हणजे ह्या ओळीतील *येशूच्या* हा शब्द काढून त्याजागी एका मुलीचे नाव टाकलं तरच..पहा तुझे भवितव्य बदलून जाईल.  पण ह्या थोर कवीने नकार दिला. त्या कंपनीने, लोकांनी , मित्रांनी त्यांना मूर्ख ठरवले,सर्वांनी नावं ठेवली.

*पण एक जण त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला,शाबास भल्या व विश्वासु दासा*.. *क्षणिक सुखापेक्षा तू सार्वकालिक सुखाला महत्त्व देऊन माझ्यावरील प्रेमाला प्रथम स्थान दिलेस,ये माझ्याजवळ*

      *प्रेमळ पित्या केवळ तूच माझ्या जीवनात प्रथमस्थानी असावास असे कर* *कारण क्षणिक सुखापेक्षा त्यात सार्वकालिक सुख आहे*  

               *आमेन*     


  

जन्म, जो मृत्यू घेऊन येतो


                       जन्म, जो मृत्यू घेऊन येतो

*याकोब.१ः१२-१५*


जेव्हा आपल्या जीवनात आपल्याला वाईट करण्याचा मोह होतो, तेव्हा त्या वाईट गोष्टी देवापासून आल्या आहेत असा विचार कधीच करू नका. याउलट आपण पापात पडण्यापासून रोखण्यासाठी देव जेवढे करता येईल तेवढे करत असतो. परंतु आपण देहात इतके अशक्त आहोत की आपण कधी कधी देवाला तुच्छ लेखून वाइटाला अनुसरतो. 


याकोब म्हणतो, ‘‘तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो’’ (याकोब.१ः१४). विशेषतः ‘‘भुलवला’’ ह्या शब्दांकडे लक्ष द्या. वासनेचा उगम अंतर्यामी असलेल्या शत्रूपासून आहे - म्हणजेच आपला जुना स्वभाव; तसेच भुलवणूक ही बाह्य शत्रूकडून - सैतानाकडून येते. 


याकोब.१ः१५ हे वचन आपल्याला पापाच्या उगमाविषयीच नाही, तर त्याच्या अंतिम परिणामाविषयीही सांगते, ‘‘मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते.’’ याकोब ह्या वचनांमध्ये वासना व पाप ह्यांच्यावर त्या व्यक्ती असल्याचा आरोप करून गर्भधारणा, जन्म, मृत्यूविषयी सांगतो.

वासनेवर वेश्येचा आरोप केला असून ती गर्भवती होते व पाप ह्या ‘अपत्याला’ जन्म देते, ज्याचा बाप सैतान आहे. मग पापदेखील गर्भवती होऊन आपल्या नातवाला म्हणजे ‘मृत्यूला’ जन्म देते.


जेव्हा पापमय इच्छेचा मनामध्ये प्रवेश होतो, तेव्हा त्या इच्छेला वेळीच रोखले नाही, तर ती वाढत जाते व कृतीत उतरवली जाते. हा नियमच आहे की, मन ज्या गोष्टींवर जगते शेवटी त्याच गोष्टी कृतीत उतरवते.


_वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्‍याने वाइटाला जिंक (रोम.१२ः२१)._



देवाला इतरांना देण्यात आनंद वाटतो



*देवाला इतरांना देण्यात आनंद वाटतो*

*याकोब.१ः१६-१८*


जे सर्व चांगले आहे त्याचा दाता देव आहे ह्या सत्याविषयी कसलीच शंका याकोबाने दाखवली नाही. याकोबाने इशारा दिला की, ‘‘फसू नका’’ (याकोब.१ः१६). ग्रीकमधून जो फसणे शब्द भाषांतरित केला त्याचा अर्थ आहे ‘‘भरकटणे’’ किंवा ‘‘मार्गावरून दूर जाणे’’ असा आहे. ह्या शब्दाचा उपयोग जे जहाज आपल्या मार्गापासून भरकटले असून भयंकर संकटात आहे अशा जहाजासाठी केला जातो. ह्या ठिकाणी याकोब क्षुल्लक चूक करणे याचा नाही तर गंभीर चूक करणे याचा संदर्भ देत आहे की जिचा परिणाम आश्‍चर्यकारक आणि भयंकर परिस्थितीत होऊ शकतो. 


येथे याकोब ‘‘प्रत्येक महान देणगी’’ असे न म्हणता ‘‘प्रत्येक उत्तम देणगी’’असे म्हणतो (व.१७). देणगी लहान असो की मोठी असो त्याने काही फरक पडत नाही, तर देव जे काही देतो ते सर्वकाही उत्तम असते. कधी कधी कठीण परिस्थितीतून जाणारी व्यक्ती देवापासून येणारे सर्व खरोखर चांगले आहे का हा प्रश्‍न विचारू शकते. पण अशा व्यक्तीला याकोब आश्वासन देतो की, तिने हा प्रश्‍न विचारण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या की, याकोब येथे देणगीसंबंधी बोलत आहे, देणग्या ह्या कोणाला त्याच्या पुण्याईमुळे मिळत नाहीत, तर केवळ देवाच्या कृपेमुळे मिळतात.


याकोब ह्या गोष्टीवर भर देतो की, जी देणगी मिळते ती ‘‘वरून येणारी’’ असते (व.१७). येथे याकोब स्वर्गीय गोष्टी व भौतिक गोष्टी ह्यांच्यामधील फरक दाखवतो. आपण सहजपणे ह्या जगिक गोष्टीत गुरफटून जातो व त्यांच्याविषयीच्या लालसेने पूर्ण पेटून उठतो की, ज्या कायम टिकत नाहीत. आपण ह्या भूतलावर कायम राहणार नाही, म्हणून आपल्या परीक्षांनाही आपण सार्वकालिक जीवनाच्या प्रकाशात पाहिले पाहिजे.


_ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत (२पेत्र.१ः३)._



कितना आनंद

                       

              कितना आनंद

*ईफिसियो 1:7  हम को उसके लोहू के द्वारा छुटकारा अर्थात अपराधों की क्षमा उसके अनुग्रह के धन के अनुसार मिला हैं*_


 _*जिस शरण आपने यीशु को अपने परमेश्वर और उद्धार करता के रूप में अपने दिल में आमंत्रित किया है आपके सभी पापों को क्षमा कर दिया गया है-हालेलुया प्रभु के नाम की महिमा हो🙏*_


 _*आपके पिछले  पाप आप के वर्तमान पाप और आपके भविष्य के पास एक बार नया जन्म लेने के लिए प्रयास करने की आवश्यकता नहीं है आपको उसके लहु के माध्यम से पूरी की माफी मिली है* आपके अनुसार नहीं लेकिन *परमेश्वर की कृपा के धन के अनुसार उसका  अन् मना  अंजाना और अवाछनिय  पक्ष¡*_


 _*👉📖बाइबल हमें बताती की पाप की मजदूरी  मृत्यु है (रोमियो 6 :23)!* दूसरे शब्दों में *पाप की सजा मौत है यह हमें यह  भी बताता है की खुन के  बहाए  बिना कोई क्षमा  नहीं है (इब्रानीयो 9:22) इस प्रकार रक्तत*_ 


 _पापों की क्षमा के लिए आवश्यक है यही कारण है की व्यवस्था की पुरानी बातों के तहत भी पाप अस्थाई रूप से बनी *जानवरों के खून के माध्यम से ढाप दिया गया था*_


_*🙏👉सुसमाचार की खुशखबरी यह है कि हमारे प्रभु और उद्धार करता यीशु मसीह स्वर्ग से पृथ्वी पर आए और क्रूस पर स्वयं का बलिदान किया उनके सीदध पापरहित लहू  हमारे सभी पापों के लिए क्षमा प्रदान की आप और मैं हमारे अपने पापों का भुगतान नहीं कर सकते इसलिए उन्होंने हमारे लिए किया अब जो भी उस पर विश्वास करता है वह कभी नहीं मरेगा*  👉अनन्त *उपहार प्राप्त करेगा हालेलुया*_


_प्रिय पाठक ध्यान दें की दावत किस तरह से *ऐसे व्यक्ति की कृपा का वर्णन  करता है जिससे पाप क्षमा किए जाते हैं:*_


 _ओह,  उन लोगों के लिए क्या खुशी *जिनके पापों को माफ कर दिया गया जिनके पास दृष्टि से बाहर है हां उन लोगों के लिए क्या खुशी है जिनको रेकार्ड से पाप  साफ, कर दिया है! रोमियो 4:7-8!*_ 


_*पापों की क्षमा  प्राप्त करने के लिए क्या खुशी और क्या ही आशीर्वाद है* इसके विपरीत जब *👉विश्वावासी ने सवाल करना शुरू कर दिया क्या यह वास्तव में समा किए जाते हैं तो यह सभी प्रकार की असुरक्षा वह और विनाशकारी बंदना की ओर*_


 _ले जाता है *परमेश्वर के साथ एक स्वस्थ संबंध में भय और असुरक्षा नहीं हो सकती एक विवाह संबंध में उदाहरण के लिए, यदि कोई पत्नी अपने पति के प्यार में खुद को महसूस नहीं कर सकती है तो वह कभी अपनी शादी में खुस नहीं रह पायेगी सम्पन होने से पहले यह शादी बिखर जायेगी इस तरह हमारे  स्वर्गीयपिता नहीं चाहते नहीं चाहते है कि हम हमेशा की   असुरक्षा में फंसे रहे क्योंकि हम कभी भी माफ़ी के बारे में सुनिश्चित नहीं होते हैं*_


_आज परमेश्वर के वचन पर आधारित हैं आनंदित हो ओर उसकी  *क्षमा के आशीर्वाद के लिए परमेश्वर का ध्न्यवाद करे इसलिए हमारे लिए प्रिय रूप से*_


_भुगतान किया गया और इतनी स्वतंत्र रूप से कर दिया गया *सुसमाचार इस लंगर को  सच करने दे और अपने दिल में ताकत डाले और असुरक्षा के भय को दूर करें*_

Sunday, 8 November 2020

आशीर्वाद आणि शाप

         *✨आशीर्वाद आणि शाप✨*


*तो वैराणांतल्या झुडूपासारखा होईल, व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही, अरण्यांतील रूक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यांत तो वस्ती करील..✍*

                  *( यिर्मया १७:६)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     परमेश्वरावर विश्वास ठेवणारा कसा आशीर्वादित होतो आणि परमेश्वरावर विश्वास न ठेवणारा कसा शापित होतो हे आपणांस ह्या अध्यायातून पाहावयास मिळते. देवाचे आशीर्वाद नसणे म्हणजे शाप होय. शाप म्हणजे दुःख, संकटे, अशांती, हाती घेतलेल्या कामात यश न मिळणे इत्यादि होय. परमेश्वरावर विश्वास न ठेवता जो मनुष्य मनुष्यावर विश्वास ठेवतो व त्याचे साहाय्य मागतो आणि ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणांतल्या झुडूपाप्रमाणे म्हणजे एकट्या पडलेल्या, देवापासून दूर गेल्यामुळे सर्व मनुष्यांतून टाकून दिलेल्या, देवाने सोडून दिलेल्या मनुष्यासारखा होईल. झुडूपाची वाढ जशी खुंटलेली असते तशी वचनाच्या अभावामुळे, देवाचे सान्निध्य नसल्यामुळे त्याची वाढ होणार नाही. देवापासून दूर गेल्यामुळे तो रूक्ष स्थळे म्हणजे जिथे कुठल्याच प्रकारचा ओलावा नाही, क्षारभूमी म्हणजे पडीत जमीन, व निर्जन प्रदेश म्हणजे जिथे वस्ती नाही, जो प्रदेश ओसाड पडलेला आहे अशा अरण्यांमध्ये त्याची वस्ती होईल. आणि याउलट जो पुरूष परमेश्वरावर विश्वास ठेवतो व ज्याचा भावविषय परमेश्वर आहे त्याला धन्य म्हटले आहे. त्याच्याबद्दल असे लिहिले आहे की, *तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील, उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहातील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही. ( यिर्मया १७:८)* 


     ख्रिस्ताकडे जोपर्यंत एखादी व्यक्ती येत नाही, तोपर्यंत त्याच्या पूर्वजांच्या अधर्माचा, पापांचा भार हा त्याच्यावर असतो कारण शाप हे एका पिढीकडून दूसऱ्या पिढीकडे जात असतात. यिर्मया म्हणतो, *आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत. आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगितो. ( विलापगीत ५:७)* बायबल मध्ये आपण पाहातो की, चार पिढ्यांपर्यंत शाप असू शकतात. आपण बायबल मधून एक उदाहरण पाहू या - असे लिहिले आहे की, *त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, जो कोणी यरिहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल, त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा जेष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. ( यहोशवा ६:२६)* आणि आपण पाहातो की, खूप वर्षांनंतर हे शापोच्चारण परमेश्वराद्वारे पूर्ण झाले. जवळ जवळ पाचशे वर्षानंतर,  *अहाबाच्या कारकिर्दीत बेथेलकर हिएल याने यरिहो नगर परत वसविले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा जेष्ठ पुत्र अबीराम मरण पावला, आणि त्याने त्याच्या वेशी उभारिल्या तेव्हा त्याचा कनिष्ठ पुत्र सगूब मरण पावला. ( १ राजे १६:३४)* अशाप्रकारे परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशवा ह्याच्या द्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले. 


    परंतु परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. तो न्यायी न्यायाधीश आहे. पूर्वीच्या शापांपासून मनुष्याला सोडवावे, मुक्त करावे म्हणून त्याने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांच्याशी बोलला. येशूने म्हटले, *तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील. ( योहान ८:३२)* आणि खरोखरच त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने सर्व प्रकारच्या बंधनातून, दास्यातून मुक्त केले. परमेश्वराने आम्ही आशीर्वाद निवडावेत की शाप हे आमच्यावर सोपविलेले आहे. परंतु त्याची स्वतःची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्यासाठी आशीर्वादच निवडून घ्यावेत. परमेश्वर म्हणतो, *आकाश व पृथ्वी ह्यांना तुझ्याविरूद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापूढे ठेवले आहेत, म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तूं व तुझी संतति जिवंत राहील. ( अनुवाद ३०:१९)* ह्याचा अर्थ असा आहे की, परमेश्वराची इच्छा नाही की एकाही मनुष्याचा नाश व्हावा, तर परमेश्वराची इच्छा आहे की, आम्ही आशीर्वाद आणि जीवन निवडून घ्यावे. सर्वांचे तारण व्हावे आणि सर्वांना सार्वकालिक जीवनाचा लाभ मिळावा.


      प्रियांनो, आम्हीही कधी कधी रागात असलो म्हणजे आमच्या मुखातून शापोच्चार बाहेर पडतात. परंतु सांभाळा प्रियांनो, आम्ही कधीही आमच्या मुखाने वाईट गोष्टींचा उच्चार करू नये. कारण आमचे ते शब्द कुणासाठी तरी एकप्रकारे शापास कारणीभूत असे ठरतात. म्हणून आम्ही आमच्या जिभेवर, आमच्या मुखावर ताबा ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण मुखाने जे बोलू ते घडून येत असते.  

    

       *

Friday, 6 November 2020

खोट्या शांतीपासून सावध असा


*खोट्या शांतीपासून सावध असा*

*कलस्सै.३ः१३-१७*


खोट्या शांतीपासून आपण सावध असले पाहिजे. जे चुकीच्या गोष्टी करतात त्यांना त्यापासून शांती मिळत असेल, पण ती देवापासून आलेली शांती नसते. कोणीतरी असे म्हटले आहे, ‘‘हृदयामध्ये असणारी शांती ही नेहमीच देवाची शांती असते असे नाही.’’ 


शांतीचे उगमस्थान ठरवण्यासाठी घ्यावयाची महत्त्वाची चाचणी पुढीलप्रमाणे आहे : जर माझ्या अंतःकरणात एखाद्या बाबीविषयी शांती असेल, पण त्याच बाबीविषयी ख्रिस्ताच्या शरीरातील इतर सभासदांसहित माझ्या अंतःकरणात शांती असते काय? समजून उमजून प्रत्येक जणच एखाद्या विशिष्ट मुद्याबाबत सहमत होणार नाही, पण जर एखाद्या व्यक्तीला ती स्वतः योग्य आहे असे वाटते, तर तिला तिच्या निर्णयावर प्रश्‍न विचारवयास कारण असते. जर आपण देवाच्या इच्छेबाहेर असू, तर आपण खर्‍या विश्वासणार्‍यांच्या गटामध्ये फूट व विसंगती आणण्यास कारणीभूत ठरू. 


खरा विश्वासणारा कोण याचे मूल्यमापन करणे किती कठीण काम आहे, याची मला जाणीव आहे, खास करून एखाद्या गटाच्या बाबतीत. जे त्या गटाचे सभासद असतात त्यांच्यापैकी काहींचे तारण झाल्याचा पुरावा दिसत नाही. तर इतर वेळा काही जण स्पष्टपणे तारणाचा पुरावा दाखवतात, पण ख्रिस्ती जीवनाशी संबंधित असणार्‍या बाबींत परिपक्व निर्णय घेत असल्याचा पुरावा दाखवत नाहीत.


खोट्या शांतीपासून रक्षण करण्याच्या सर्वांत सुरक्षित मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे तुम्ही जे सर्वकाही करता त्यात येशू ख्रिस्ताला संतोषवण्याची तुमची इच्छा असते याची खातरी करून घ्या. ‘‘सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे’’ (कलस्सै.१ः१८) अशी जर तुमची तळमळ असेल, तर तुमच्या जीवनाद्वारे त्याचे गौरव होत नसल्यास त्याबाबत त्याने तुम्हांला दोषी ठरवावे व तुमच्या जीवनातील शांतीची उणीव दाखवावी म्हणून तुम्ही त्याच्यावर भरवसा ठेवू शकता. 


_तुझे नियमशास्त्र प्रिय मानणार्‍यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही (स्तोत्र.११९ः१६५)._



खाली राहिल्याने, वर पोहोचणे



        खाली राहिल्याने, वर पोहोचणे*

*याकोब.१ः१-८*


जितकी अधिक विश्वासाची परीक्षा होते तितके परीक्षेतून जाणे सोपे जाते. कारण त्या परीक्षा धीर उत्पन्न करतात. आणि परीक्षांमधून गेल्याने विश्वासणारा त्याच्या विश्वासात अधिक खंबीर बनतो. 


टिकाव धरणे म्हणजे कष्ट व ताणतणाव सहन करण्याची क्षमता. धीर म्हणजे स्वनियंत्रण असल्याचा पुरावा दाखवून विनातक्रार वेदना सहन करण्याची क्षमता. एका अर्थाने या दोन्हीही संकल्पना याकोबाच्या विधानात समाविष्ट आहेत, ‘‘विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो’’ (याकोब.१ः३).


ज्या मूळ ग्रीक शब्दाचे भाषांतर ‘धीर’ असे केले आहे तो दोन शब्दांचा बनला असून त्याचा शब्दशः अर्थ ‘०च्या खाली राहणे’ असा होतो. जेव्हा व्यक्ती संकटाच्या खाली राहते, तेव्हा ती त्या संकटात टिकून राहते आणि विश्वासणारा ओझ्याखाली असल्यामुळे संकट हे स्वतःच धीर उत्पन्न करते. स्वनियंत्रण, ज्याचा धीराशी घनिष्ठ संबंध असतो, ते गलती.५ः२२-२३ मध्ये उल्लेखिलेल्या पवित्र आत्म्याच्या फळाचा एक भाग आहे. जर आपण अधिक धीर व स्वनियंत्रण आत्मसात करण्याची इच्छा बाळगतो, तर याचा अर्थ असा होतो की, आपणांला अधिकाधिक संकटांत टिकून राहावे लागणार आहे. 


संकटे कितीही कठीण असली, तरी ज्या ख्रिस्ती व्यक्तीचा ख्रिस्तावर पूर्णपणे भरवसा आहे तो त्या संकटात आनंदी असू शकतो. आणि जो धीर आपण वाढीस लावतो तो प्रभूने आपणांस दिलेल्या त्याच्या अभिवचनांची पूर्तता करीपर्यत वाट पाहण्यास समर्थ करतो. इब्री.१०ः३६ हे वचन म्हणते, ‘‘तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हांला सहनशक्तीचे अगत्य आहे.’’ गलती.६ः९ म्हणते, ‘‘चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.’’ 


_आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा (रोम.१२ः१२)._



Thursday, 5 November 2020

दरवळ सुगंधाचा

 *मार्क १४:३-९*


           *दरवळ सुगंधाचा*


    *कोणीएक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली; तिने ती कुपी फोडून त्याच्या ( येशूच्या ) मस्तकावर ओतली*. *मार्क १४:३*.


   आपण जे मध्यम वर्गीय आहोत त्या आपली एक सवय असते, कोणी काही भेटवस्तू दिली तर आपण ती तशीच जपून,जपून ठेवतो,तिच्याकडे फक्त पाहूनच आपलं समाधान होत असते. म्हणजे अत्तराची बाटली असेल तर आपण ती न वापरता तशीच ठेवतो. पण त्यामुळे होत काय की त्या अत्तराचा गंध कसा आहे हे समजतच नाही. पण जेव्हा उघडतो तेव्हा कळते की कित्ती मस्तं सुगंध आहे आणि त्या सुगंधाचा दरवळ सर्वत्र पसरतो,आणि सर्वांनाच आनंद देऊन जातो. 

     ती सुगंधी कुपी काय आहे माहिती आहे का... ती कुपी म्हणजे आमचे जीवन आहे. आणि ह्या कुपीत देवाने सर्वांना आणि देवाला ही गंधाळून टाकणारे अत्तर ठेवले आहे. जसे वेगवेगळ्या गंधाच्या बाटल्या असतात तसेच आमच्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधाचे अत्तरआहे.हे सुगंधी द्रव्य म्हणजे वेगवेगळी दानं होत.

  पण ते अत्तर बाहेर येण्यासाठी त्या स्त्रीने कुपी फोडली , मगच ती ते सुगंधी द्रव्य प्रभूच्या मस्तकावर ओतू शकली. याचा अर्थ ती तुटली, पूर्णपणे प्रभू येशूला समर्पित झाली. तुम्हाला अन मलाही असंच तुटायचं आहे म्हणजे भग्न आणि अनुतप्त होतप्रभु चरणी हे जीवन समर्पित करायचे आहे, तेव्हाच पवित्र आत्मा आमच्यामध्ये असणाऱ्या सुगंधित द्रव्यरूपी दानांचा उपयोग करून घेतो.  *मग कोणामध्ये हे सुगंधी द्रव्य उत्तम संदेशाचे,सेवेचे,गीत गाण्याचे, प्रार्थनेचे, काहींना आध्यत्मिक शिक्षण देण्याचे तर कुणाला लेखनाचे असेल*.ह्या दानांचा उपयोग इतरासाठी आणि प्रभूच्या गौरवासाठी केला पाहिजे.  फक्त गरज आहे ती तुटण्याची प्रभूचरणी समर्पित होण्याची. मग पहा आमच्या ह्या दानरुपी सुगंधी द्रव्यांचा दरवळ,सुगंध हा इतरांना आणि आमच्या प्रभू येशूला आनंद देऊन जातो.पवित्र आत्म्याने दिलेली ही दानं आमच्या जीवनरुपी कुपीत ठेवलेली आहेत. *तिने कुपी फोडली,आमच्यातील जुना मनुष्य फुटला पाहिजे, तुटला पाहिजे, मगच हा सुगंध दरवळेल* *.जर आमच्या ख्रिस्ती जीवनाचा सुगंध दरवळत नसेल तर निश्चितच आमचे जीवन त्या कुपीमध्ये आम्ही त्या भेटवस्तू प्रमाणे बंदिस्त करून ठेवले आहे.. 

    *आजच त्या प्रभू चरणी भग्न व अनुतप्त होत समर्पित होऊ*.. 

     *सर्वसमर्था ह्या जीवनरूपी कुपीचा त्यात असणाऱ्या दानांचा उपयोग तुला व इतरांना सुगंधित दरवळाचा आनंद देण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सहाय्याने करून घे* *आमेन*..

     

जीवनसंगर

 


*जीवनसंगर*


_‘‘तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करत नाही.’’ योहान १७:१५_


विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा आरंभ केल्याबरोबर लगेचच त्यांना स्वर्गात नेले तर एका अर्थी ते फारच छान होईल. तेथे ते सुरक्षित राहतील. मग त्यांना मोह परीक्षांना तोंड द्यावे लागणार नाही. शत्रूंशी संघर्ष करावा लागणार नाही, कोणते भेदभाव, अडचणी उरणार नाहीत. पण या जगात ख्रिस्ताचे कार्य कोण करणार? पापी लोकांना तारणाची शुभवार्ता कोण सांगणार, लोकांना पवित्र जीवनातून ख्रिस्ताचे सौंदर्य कोण दाखवणार? देवाची साक्ष देऊन त्याच्या लढाया लढण्यासाठी येथे कोणीच असणार नाही.

ख्रिस्ती लोकांना येथेच ठेवण्याचे आणखी एक कारण आहे. दऱ्या खोऱ्यांच्या सखलभागात वाढणारी झाडे मोठी दिमाखदार दिसतात कारण तेथे नाही वादळ नाही वारा-चहूबाजूंनी कडेकोट निवारा-मग ती जोमाने का वाढणार नाही? पण खरी डौलदार, शोभिवंत झाडे डोंगर टेकड्यांच्या माथ्यावर असतात तेथे ती कडक ऊन आणि तुफानी वारा यांना तोंड देत उभी असतात. माणसांचेही असेच आहे. उमदी, उदार माणसे ऐषआरामात, लाडाकोडात नव्हे तर अडचणी, कठिण परिस्थितीतच वाढून थोर होतात. खुद्द येशूदेखील संकटांच्या, संघर्षाच्या शाळेतच शिकून तयार झाला होता. जीवनात काहीच संघर्ष नसणे, कोठेतरी सपाट मैदानावर निवांत निवाऱ्यात, वादळ वाऱ्यापासून, अडचणीपासून दूर राहून मोठे होणे हे अगदीच सोपे आहे. कोणतीच चिंता नसणे, ओझी वाहवी न लागणे या प्रकारे वाढत गेल्याने अखेरीस त्यातून कोणत्या प्रकारचे जीवन साकार होणार? धन्यतेची उच्च शिखरे गाठावी हेच आमचे ध्येय असेल तर आपण संकटांच्या खाचखळग्यातून लढा देत संतोषाने पुढे चालले पाहिजे.

युद्धामध्ये विजय संपादन करून फौजा परत येतात तेव्हा जयजयकार करून त्यांचे स्वागत होते. पण सर्वात उच्चस्वराने जयजयकार कोणाचा होतो? ज्यांनी युद्धामध्ये अगदी कमी भाग घेतला त्यांचा? ज्यांचे ध्वज अगदी स्वच्छ, एकही सुरकुती नसलेले आहेत त्यांचा? नाही, ज्या पलटणीतील बहुतेक सैनिक युद्धात कामास आले, ज्यांचे ध्वज शत्रूच्या हल्ल्याने फाटले आहेत अशांचाच उच्चस्वराने जयजयकार होतो. उद्धार पावलेल्यांचे स्वर्गामध्ये स्वागत करते वेळेसही असेच होईल. ज्यांनी जास्तीत जास्त लढायांत भाग घेतला आहे, जे आपल्याठायी *प्रभू येशूच्या खुणा* अधिक प्रमाणात मिरवतात त्यांनाच श्रेष्ठ बहुमान मिळतील. तेव्हा ख्रिस्ती लोकांनी या जगात राहावे आणि कर्तव्यपूर्तीसाठी संघर्ष करताना बलवान व्हावे हेच इष्ट आहे.


*आम्हाला या जगात ठेवले आहे, एका विशिष्ट ठिकाणी, परिस्थितीत ठेवले आहे यामागे देवाचा काहीएक हेतू आहेच. तो लक्षात घेऊन त्याने सांगितले, आज्ञा दिली त्याप्रमाणे आम्ही आचरण करणे अगत्याचे आहे. येथील आचरणाचे प्रतिफळ खात्रीने मिळणारच आहे; याबद्दल शंका नसावी!*

देवाचे दयाळूपण



*देवाचे दयाळूपण*

*कलस्सै.३ः१२; तीत.३ः१-७*


विश्वासणार्‍याने ‘‘करुणायुक्त हृदय’’ धारण करावे (कलस्सै.३ः१२). ह्याचा संदर्भ सौम्य व कृपाळू वृत्तीशी आहे. जेव्हा ह्या गुणाचा मी विचार करतो, तेव्हा एका देवभीरू पुढार्‍याची मला आठवण होते. काही वर्षांपूर्वी त्याच भागातील एका पुढार्‍याने ह्या देवभीरू माणसाचे खूप नुकसान केले व त्याच्या नावाला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मंडळीच्या सभेमध्ये ह्या पुढार्‍याच्या बाबतीत दुसर्‍या व्यक्तीच्या ज्या कारवाया चालू आहेत त्यासंबंधी आमच्यापैकी काही जणांनी चिंता व्यक्त केली. तेव्हा ह्या देवभीरू पुढार्‍याने जे विधान केले ते मी कधीच विसरू शकणार नाही. ते म्हणाले, ‘‘माझ्या अंतःकरणात मी एक दृढ निश्चय केला आहे की कसेही करून मी त्या ख्रिस्ती पुढार्‍याला प्रेम व दया दाखवणारच.’’ त्यांनी तसे करून दाखवलेे. यालाच दयाळूपणा म्हणतात.


दयाळूपणा दाखवण्याच्या बाबतीत पवित्र शास्त्रातून आपल्याला दाविदाच्या जीवनातील उदाहरण पाहायला मिळते. पूर्वीचा राजा शौल दाविदाचा तिरस्कार करत असे व त्याने अनेक वेळा दाविदाला जिवे मारण्यास पाहिले. परंतु दाविदाने कधीच शौलाचा गैरफायदा घेतला नाही; तर उलट शौलाचा पुत्र योनाथान दाविदाचा जिवलग मित्र बनला. शौल व योनाथान यांचा वध झाल्यावर दाविदाने चौकशी केली, ‘‘योनाथानाप्रीत्यर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय? अशी चौकशी दाविदाने केली’’ (२शमु.९ः१). त्या वेळी योनाथानाचा अधू मुलगा मफीबोशेय याकडे दाविदाचे लक्ष वेधण्यात आले (व.३). दाविदाने मफीबोशेथाला बोलावणे पाठवले आणि २शमु.९ चा सारांश पाहा, ‘‘मफीबोशेथ यरुशलेमेत राहिला; कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी लंगडा होता’’ (व.१३). ह्याशिवाय दाविदाने शौलापासून जप्त केलेली जमीन त्याला परत केली. हा खरा कृतीत आणलेला दयाळूपणा होता.


_आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा (इफिस.४ः३२)._


*