Tuesday, 10 November 2020

उघडे कान... बंद तोंड

*उघडे कान... बंद तोंड*

याकोब.१ः१९-२१*

सर्व विश्वासणार्‍यांनी देववचनाच्या आकलनाबाबत जागृत असावे अशी याकोबाची अपेक्षा होती. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण ‘‘विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते’’ (रोम.१०ः१७). देवाचे वचन आपल्याला भरवसा ठेवणारा विश्वास देते. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा देव आपल्यामध्ये नवजीवन निर्माण करतो.अनेक लोक देववचन ऐकतात, परंतु काही लोकांसाठी ते केवळ शब्द असतात. देववचन म्हणून ते त्याचा स्वीकार करीत नाहीत. हा केवढा विरोधाभास आहे की, सर्व निर्मिती ही त्याचा शब्द पाळते, पण जे आपण देवाच्या प्रतिरूपाचे निर्माण करण्यात आलो आहोत व आपणांस निवड करण्याची मुभा दिली आहे, ते आपण त्याचा शब्द पाळीत नाही. अनेकांना देववचनाचे प्रचंड ज्ञान असते, परंतु ते वचन त्यांना काय सांगते यावर ते विश्वास ठेवत नाहीत, म्हणून ते देवाच्या वचनाला प्रतिसाद देत नाहीत. जेव्हा आपल्या विरोधात कोणी काही बोलले तर तत्काळ त्यांना फटकारू नये. त्याद्वारे आपण अडचणीत येण्याची शक्यता असते. ह्या संदर्भात देवाचे वचन काय म्हणते ते ऐका, ‘‘बोलण्यात उतावळा असा तुला कोणी दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते’’ (नीति.२९ः२०). ‘'फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा’’ (नीति.१०ः१९).ज्या नियमाने आपले जीवन जगावे तो नियम नीति.१५ः१ मध्ये सांगितला आहे : ‘‘मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.’’_तोंडच्या शब्दाने मनुष्य चांगले फळ भोगतो, परंतु कपटी इसमांच्या जिवाला बलात्कारूप फळ मिळते; जो आपले तोंड सांभाळतो तो जीव राखतो; जो आपले तोंड वासतो त्याच्यावर अरिष्ट येेते (नीति.१३ः२३)._*

No comments:

Post a Comment