*लूक १७:११-१९*
*कृतज्ञता*
*आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला* *हा तर शोमरोनी होता*. *लूक १७:१६*
नुकताच एक मेसेज whatsapp वर आला तो असा, "सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो; काहींना ओंजळभर मिळते तर काहींना रांजणभर;पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला".. आपलंही असंच असतं ना, *परमेश्वराने भरभरून आशीर्वाद दिलेत पण किती कृतज्ञतेने आम्ही ते स्वीकारतो ,आणि त्यातला आंनद समजून घेत खरंच जगायला शिकतो का*? हाच खरा प्रश्न आहे.आणि हीच वस्तुस्थिती आजच्या शास्त्रपाठात दिसते.
आमच्या मागण्या देवाने मान्य कराव्यात म्हणून खूप प्रार्थना, विनंत्या करतो. प्रभू त्या ऐकतोही. *पण मग इच्छा पूर्ण झाल्याच्या आनंदात उपकार, कृतज्ञता व्यक्त करायची हे आपण सोईस्करपणे विसरून जातो त्या नऊ कोडी यहुदी पुरुषांप्रमाणे*! दहा जणांनी विनंती केली बरे होण्यासाठी, सर्वांना प्रभूने बरे केले.पण कृतज्ञता एकानेच व्यक्त केली. का ते नऊ जण परतले नाही आणि हा एकटाच आला? *कारण परत ख्रिस्ताकडे यावे,कृतज्ञता व्यक्त करावी हा निर्णय त्याने घेतला*. उपकारस्तुतीने भरलेले जीवन निवडायचे की सतत दोष,उणीवा, कमतरताच पहात बसायचे,निवड आपल्या हातात आहे.
प्रभू त्याला म्हणतो, *उठ जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे* या वचनाचा नेमका अर्थ ग्रीक भाषेत असा आहे की *तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे*. त्याने लांबूनच आभार मानले नाहीत तर प्रभूच्या पायावर,रस्त्यावरच्या धुळीत तो पालथा पडला. *जडला तो ख्रिस्ताशी*. आपण उपकार तात्पुरते मानतो की खरंच ख्रिस्ताशी जडून आहोत.. प्रत्येकाने विचार करावा.
कोणीतरी म्हटले आहे की, *तुम्ही नम्र होऊन कृतज्ञ होऊ शकता किंवा कुरकुर करून द्वेषाला कारणीभूत ठरता*..
आजच निवड करण्याची संधी आहे कारण आजही जीवनाचा श्वास प्रभू येशूने आमच्यामध्ये ठेवला आहे..
*कृतज्ञता व्यक्त न करणे म्हणजे कृतघ्नता निवडणे आणि तारणापासून दूर राहणे*.
येशू आमच्याबरोबर सतत आहे तर का आम्ही आभार मानू नयेत? उपकारस्तुतीच्या जीवनाशिवाय कसे राहू शकतो आम्ही!!
प्रार्थना करू आपण की *हे तारण करणाऱ्या ईश्वरा आम्हाला उपकारस्तुतीने भरलेलं अंतःकरण दे म्हणजे आम्ही सदैव तुझ्या चरणी कृतज्ञ राहू*.. *आमेन*..
No comments:
Post a Comment