Friday, 20 November 2020

काय आहे 666 क्रमांकाचे रहस्य ?

 *काय आहे 666 क्रमांकाचे रहस्य ?*


(ज्यांना *666* विषयी माहीतच नाही त्यांनी अवश्य वाचा.) 

पवित्रशास्त्रात म्हणजे बायबलमध्ये *666* हा अंक सैतानाला उद्देशून आहे. 

युगाच्या समाप्तीपूर्वी सैतान *666* या कोड नंबरच्या आधारे जगावर राज्य करेल असे भविष्य यांत केलेले आहे. 

आज आपण *666* या सैतानाच्या नंबरच्या किती जवळ आहोत? 

(Mark of the beast 666.)


काय आपल्याला ठाऊक आहे का की, *666 हा नंबर 2017 या वर्षात आपल्या प्रत्येकाकडे आहे ?* 


आपल्याला माहीतच आहे की, टेक्नाॅलाॅजी आज इतकी प्रगत झालेली आहे की RFID नावाची *"माइक्रो चिप "* चा शोध लागला आहे. ही चिप तांदुळाच्या दाण्याएवढी आहे. 

आता 2017 मध्ये जर हा खरोखरच नवीन शोध आहे तर याचे फायदेही बरेच असतील. 

परंतू त्याचे साईड इफेक्ट्स् (नुकसान) बद्दल काहीही सांगितले जात नाही. 


या टेक्नाॅलाॅजीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की,भविष्यात आपल्याला क्रेडिट कार्ड्स/ डेबीट कार्ड्स यांची गरज पडणार नाही. कारण ही चिप प्रत्येक माणसाच्या उजव्या हातात किंवा कपाळावर बसविण्यात (इंप्लांट) करण्यात येणार आहे. तेव्हा आपण कोणत्याही कार्डाशिवाय केवळ बोटांनी स्वाईप करून पैशांचा व्यवहार करू शकाल. कोणत्याही पास कोड शिवाय आटोमॅटीक दरवाजा उघडला जाईल. इतकेच नव्हे.. तुमचा स्मार्ट फोन आटोमॅटीक तुम्हाला रिस्पॉन्स देईल.

 या सर्व गोष्टी आता आपल्याला हळूहळू कळत आहेत. 


परंतु तुम्हाला माहीत आहे का.. *बायबलमध्ये 2016 वर्षापूर्वी* या टेक्नाॅलाॅजीविषयी लिहून ठेवण्यात आले आहे.

 

या तंत्रज्ञानाचा उपयोग करून एक हुकूमशहा पूर्ण जगावर राज्य करण्यासाठी तयार आहे. 

बायबलमधील प्रकटीकरण (Revelation) या पुस्तकात 13 व्या अध्यायात दोन हुकूमशहांविषयी लिहिलेआहे. त्यांना पशू /श्वापद असे म्हटले आहे.

हा हुकूमशहा आपल्यापेक्षा मोठ्या हुकूमशहाची पुजा करण्यास सर्व जगाला भाग पाडेल. सर्व जगातील लोकांना त्याच्यासमोर गुडघे टेकायला लावेल. जो कोणी असे करणार नाही त्याला मृत्यूदंड /शिरच्छेद हीच शिक्षा राहील. दुस-या देवाचे नाव घेण्याची परवानगी नसेल. सर्व जगाचा तोच देव राहील. 

बायबलमध्ये लिहिले आहे ..... हा हुकूमशहा (Dictator) जगातील गरीब- श्रीमंत, लहान- मोठे, स्वतंत्र- गुलाम असे कोणीही असो ... या सर्वांच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर त्याच्या ओळखीचे चिन्ह...  एक शिक्का / छाप /निशाणी कायमस्वरूपी देईल. ही निशाणी / शिक्का म्हणजे त्या हुकूमशहाचा कोडवर्ड *(666)* ज्याच्याकडे नसेल ती व्यक्ती काहीही विकत घेऊ शकणार नाही किंवा विकू शकणार नाही.


म्हणजे आपल्या खिशात हजारो रूपये असतील, पण त्या हुकूमशहाची निशाणी नसेल तर आपले ते पैसे काहीही कामाचे होणार नाहीत. पैशांपेक्षा निशाणी /शिक्का महत्वाचा राहील. (सर्व व्यवहार कॅशलेस होतील. नोटा नसतील.)

या हुकूमशहाचा पासवर्ड कोड नंबर *666* हा आहे. या नंबरच्या आधारे तो सर्व जगावर सत्ता चालवेल. सर्व जगाची संपत्ती, धन-दौलत त्याच्या ताब्यात राहील. 


होय !  आजची आर्थिक स्थिती पहा. आजच्या प्रगत टेक्नाॅलाॅजीमुळे लवकरच चलनाची देवाण-घेवाण बंद होणार आहे. सर्व व्यवहार *"मनी ट्रांझेक्शन"* या चिपद्वारे होतील आणि कागदी नोटांची काहीही किंमत राहणार नाही. या प्रकारे सर्व जग त्या हुकूमशहाच्या कंट्रोलमध्ये जाणार आहे. 


बायबलमध्ये 2016 वर्षापूर्वीच जगाच्या अंतसमयी या टेक्नाॅलाॅजीचा हा हुकूमशहा /सैतान/ श्वापद (Dictator) कसा वापर करेल हे सांगून ठेवण्यात आले आहे. 


अमेरिकेत बराक ओबामाने *'ओबामा केअर'* योजनेअंतर्गत या चिपचा वापर (इंप्लांट) करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ओबामा अपयशी ठरले. या चिपमुळे आमच्यावर प्रत्येक क्षणी नजर ठेवली जाईल, आपण काय करतो, काय खातो, काय पितो, कोठे जातो, कोणाला भेटतो, काय बोलतो, काय विकत घेतो, काय विकतो इत्यादी बऱ्याच गोष्टींवर सरकारचे बारीक लक्ष असेल. म्हणून आम्हाला आमचे स्वातंत्र्य धोक्यात आणायचे नाही, असा लोकांनी विरोध केला आणि सरकारला नमविले. तरीही 2017 पर्यंत संपूर्ण अमेरिकेत ही *चिप इंप्लांट* करण्याचे आताच्या सरकारने ठरवले आहे. 


स्विडन सरकारने या टेक्नाॅलाॅजीचा पुरस्कार करीत एक पाऊल पुढे टाकून सर्व कार्यालयातील कर्मचारी वर्गाला चिप बसवून (इंप्ल्पांट करून) ऑफीस हायटेक केले आहे. त्यामुळे तेथील कर्मचारी इंटरनेट चालवण्यापासून ते आपल्या जेवणाची ऑर्डर सुद्धा देण्यापर्यंतची कामे या चिपद्वारे करीत आहेत. या चिपमुळे तुमच्या शेतात पाणी केव्हा द्यायचे आहे हे तुम्हाला घरी बसून सुद्धा कळेल व घरी बसूनच शेतात पाणी सोडता येईल. 

युएस्एच्या एका  MC10 या कंपनीने या टेक्नाॅलाॅजीचा उपयोग करून एक डिजीटल टॅटू (Tatoo) चा शोध लावला आहे. हा टॅटू जो कोणी कंपनीकडून शरीरावर गोंदवून घेईल त्याला आपल्या शरीरातील प्रत्येक आजाराची माहिती सहजपणे समजेल. 

याप्रमाणे हळूहळू त्या हुकूमशहासाठी ही टेक्नाॅलाॅजी कसा मार्ग मोकळा करीत आहे हे समजून येते. 


*सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कोणी आपल्या हातावर किंवा आपल्या कपाळावर त्या श्वापदाचे चिन्ह ( *666*) *लावून घेईल तो सैतानाचा ठरेल!*

*तो अग्नी व गंधकाच्या सार्वकालिक नाशासाठी पात्र ठरेल!*


बायबलमध्ये म्हटले  आहे.... या सर्व गोष्टी (चिन्हे) होताना दिसतील तेव्हा समजून घ्या की, ... प्रभू येशू ख्रिस्त या जगातील आपल्या लोकांना आपल्यासमवेत घेवून जाण्यासाठी पुन्हा येणार आहे. 

आज आपण ज्या समयात जगत आहोत... तो समय बायबलच्या आधारे समजून घेतल्यास कित्येक लोक सुवार्तेच्या द्वारे बचावले जावू शकतात. तारले जावू शकतात.

जो शेवटपर्यंत विश्वासू राहील तोच तारला जाईल. प्रभू येशू ख्रिस्त त्या विश्वास ठेवणा-याला त्या हुकूमशहाच्या जाचापासून सोडवील. 

ही संकटे सुरू होण्यापूर्वी ख-या विश्वासणा-या लोकांचे *'लोकांतरण'* (rapture) होईल. म्हणजे ते प्रभू येशूद्वारे अंतराळात वर उचलले जातील. 


*तुम्ही या गोष्टींवर  विश्वास ठेवाल किंवा नाही हे मला ठाऊक नाही.*

*परंतु एवढे मात्र खरे की, जग त्याच दिशेने पुढे जात आहे.*


.AMEN

No comments:

Post a Comment