*जगाशी मैत्री करू नका*
*याकोब.४ः४-७*
जगाशी व्यभिचारात्मक प्रेमसंबंध ठेवण्याविषयी याकोब जो दोषारोप करतो त्याचा विचार करा. पुढील अनुवादातून ते दाखवले आहे : ‘‘आपल्या पतीच्या शत्रूवर प्रेम करणार्या एखाद्या अविश्वासू पत्नीसारखे तुम्ही आहात. देवाच्या शत्रूंबरोबर म्हणजेच या जगातील वाईट वासनांबरोबर मैत्री केल्याने तुम्ही देवाचे शत्रू होता, हे तुम्हांला समजत नाही काय? मी पुनः एकवार सांगतो, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो, तो देवाचा शत्रू बनतो’’ (याकोब.४ः४ - लिव्हिंग बायबल).
जगाशी मैत्री असण्यावरून ती व्यक्ती हेच दर्शवते की, ती जगाच्या तत्त्वसिद्धान्तांना, पद्धतींना अधिक महत्त्व देते. जुन्या करारातील आमोस संदेष्ट्याने विचारले की, ‘‘पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकांबरोबर चालतील काय?’’ (आमोस ३ः३). जो विश्वासणारा या दुष्ट जगाच्या चालीरीतींशी सहमत होऊ शकतो, तो खेदजनक रीतीने सर्वसमर्थ देवाच्या सहभागितेतून दूर गेलेला आहे ज्याने त्याला पापाच्या शिक्षेतून आणि सामर्थ्यातून बाहेर काढले आहे!
एखाद्या व्यक्तीची जीवनपद्धती सातत्याने जगिक असेल तर हे याचे स्पष्ट चिन्ह आहे की त्या व्यक्तीने कधीच येशू ख्रिस्तावर तिचा तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला नसतो.
दुसर्या बाजूला असेही काही विश्वासणारे आहेत की, जे ख्रिस्ताच्या सहभागितेतून दूर असून काही काळ जगिक जीवन जगतात. कदाचित ह्याचे कारण हेच की त्यांच्यापैकी अनेकांना ख्रिस्त हा तारणारा म्हणून हवा असतो, पण प्रभू म्हणून नको असतो. त्यांना सार्वकालिक दोषापासून मुक्त झालो आहोत, हे जाणून मिळणारी खातरी व शांती हवी असते, तरी त्यांना ख्रिस्ताला त्यांच्या जीवनाचा प्रभू करण्याऐवजी स्वतःला संतुष्ट करण्यासाठी जगायचे असते.
_जगावर व जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही (१योहान.२ः१५)._
No comments:
Post a Comment