Friday, 20 November 2020

ख्रिस्त सहवासासाठी स्वतःला शुद्ध करू

 *२ करिंथ ६ :१४-१८ व ७ : १*


    *ख्रिस्त सहवासासाठी*

         *स्वतःला शुद्ध करू.*


     *तेव्हा प्रियजनहो , आपणाला  ही अभिवचने मिळाली आहेत , म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.*

     *२ करिंथ ७ : १*


     जेव्हा ख्रिस्ताला आम्ही ओळखायला लागतो , त्याचा तारणारा म्हणून  स्वीकार करतो तेव्हा ख्रिस्ताशी जवळच नातं असावं असं वाटू लागतं. *देणग्याहून देणगी देणारा हवा असतो.*

    ह्या ख्रिस्ताच्या  अधिक जवळ जर जायचे , ख्रिस्त सहवास लाभावा असे वाटते तर शुद्ध व्हायला पाहिजे. शुद्ध होणं गरजेचं आहे. *याकोब ४ : ८*

*सांगते , "देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जनहो , हात निर्मळ करा , अहो द्विबुद्धीच्या लोकानो आपली अंतःकरणे शुद्ध करा.* देवाचा सहवास हवा आहे तर  अंतःकरण शुद्ध होणं आवश्यक आहे. याकोब म्हणतो , तुम्ही घाणेरडे हात , अशुद्ध अंतःकरण आणि द्विबुद्धीने उपासना कसे करू शकता? *तो म्हणतो , हात स्वच्छ करा , हृदय शुद्ध करा , द्विबुद्धीचे नाही तर  एका विचारावर ठाम असा*. 

    *मग आपण कसे शुद्ध , स्वच्छ होऊ शकतो ? उत्तर आहे देवाच्या वचनाद्वारे आपण शुद्ध होऊ शकतो.* *इफिस ५ : २६ मध्ये प्रेषित पौल सांगत आहे की , त्याने म्हणजे येशू ख्रिस्ताने तिला म्हणजे मंडळीला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र केले.*  *म्हणजेच काय तर देवासमोर येण्यापूर्वी आम्ही कसे शुद्ध होऊ शकतो तर देवाच्या वचनाद्वारे.* *जसे पाणी शरीराला स्वच्छ करते तसे देवाचे वचन आत्म्याला शुद्ध करते. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील ? तुझ्या म्हणजे देवाच्या वचनानुसार राखण्याने.*  *दावीद हेच सांगतो की देवाच्याच वचनाद्वारे आपण स्वतःला शुद्ध करू शकतो*. *कारण देवाचे वचन हे आरसा आहे , तो आरसा आपण काय आहोत कसे आहोत हेच दाखवतो.* *आपण बायबल वाचतो असेच फक्त नाही तर बायबल आपल्याला वाचत असते.* *ती वचने वाचताना अंतकरणाला भिडतात* *पापाची जाणीव करून देतात. त्यामुळेच काही लोकांना बायबल वाचायला आवडत नाही. पण वचन फक्त पाप दाखवीत नाही तर त्यावरचा मार्ग सुद्धा दाखवते.  देवाचे वचन शुद्ध करते*. 

    *दुसरं म्हणजे "ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण शुद्ध होतो".* *प्रभू येशूचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. असे   १ योहान १ : ७  हे  वचन सांगते* .

    *जेव्हाआपण देवाच्या पवित्र वचनाच्याद्वारे आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध होतो तेव्हा  वचन  पापाची जाणीव करून देत ख्रिस्ताच्या रक्ताची आठवण करून देते आणि प्रभूचे रक्त अभिवचन देते.*  *जेव्हा ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केल्यावर आम्हाला वचनाद्वारे दिसणारी , जाणवलेली सर्व पापे प्रभुजवळ कबूल करून पश्चाताप करतो तेव्हा प्रभूच्या पवित्र रक्ताखाली आपण येतो आणि प्रभू आम्हाला शुद्ध करतो.* 

   *कारण प्रभू येशू विश्वासू व न्यायी आहे तो  सर्व पापांची क्षमा  करतो.* 

    *जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शुद्ध करतो तेव्हा कोणीही आम्हाला अशुद्ध ठरवू शकत नाही. आणि ख्रिस्तापासून दूर करू शकत नाही. ख्रिस्ताच्या प्रेमळ सहवासात सदैव राहतो.  त्यासाठी परमेश्वराचे आभार मानू.* 

    *दयाघन ईश्वरा तुझा सहवास लाभावा म्हणून तुझ्या पवित्र वाचनाने आणि मोलवान रक्ताने आम्हाला शुद्ध कर .*      *आमेन .*

     

No comments:

Post a Comment