Friday, 13 November 2020

आत्म्याने परिपूर्ण व्हा

 *इफिस ५ : १५-१९.*


        *आत्म्याने परिपूर्ण व्हा.*


       *त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.*  *प्रे. कृ. ४:३१.*


      बायबल सांगते की पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. *का पवित्र आत्म्याने भरायचे किंवा परिपूर्ण व्हायचे?* देवाने का ही आज्ञा दिली? काय उद्देश आहे देवाचा?

     ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या  संदर्भात महत्वाची आज्ञा म्हणजे संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगा. पण बऱ्याच जणांना वाटते की आम्हाला देवाचे कार्य करता येत नाही. येशूविषयी सांगताना कुठेतरी संकोच वाटतो किंवा कुचंबणा होते , भीती वाटते. दोन हजार वर्षांपूर्वी येशूच्या शिष्यांची हीच अवस्था होती. येशूला वधस्तंभावर दिल्यानंतर ते सर्व दार लावून खोलीत घाबरून बसले होते. 

      त्यांची ही अवस्था जोवर ते आत्म्याने परिपूर्ण झाले नव्हते तोवर होती. पण प्रे. कृ. २ :४ ह्या वचनात शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. आणि मग मात्र ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि धैर्याने प्रभू येशूची सुवार्ता सांगू लागले. 

   म्हणजेच पवित्र आत्म्याने जेव्हा आपण परिपुर्ण होतो तेव्हा धैर्य प्राप्त होते. आणि मगच आपणही प्रभू येशूची सुवार्ता धैर्याने सांगू लागतो. ती भीती  ,तो संकोच , जाऊन त्याची जागा आता येशूवरील प्रेमाने घेतली जाते. आणि जो येशूवर प्रेम करतो त्याच्यामध्ये धैर्य येते व तोच येशूच्या आज्ञा पाळतो. 

    प्रभू येशूने स्वर्गात जाताना सुवार्ता सांगण्याचीच  आज्ञा दिली आहे. म्हणूनच जर आम्हाला प्रभूची आज्ञा पाळायची आहे तर पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हायला पाहिजे. 

     जेव्हा एखादी गाडी बिघडली , इंजिन खराब झाले तरी उतारावरून ती सहज  खाली जाते  पण चढावर मात्र नाही जाऊ शकत , त्यासाठी इंजिन परिपूर्ण किंवा पॉवर फुल असायला हवे . तसेच पापाकडे जाताना , देहस्वभाप्रमाणे चालताना पवित्र आत्म्याची गरज नसते आणि भरधाव वेगाने त्याकडे वाटचाल चालू असते आमची.

      मात्र  जेव्हा  आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालतो तेव्हा देवच देहस्वभावाच्या गोष्टी दूर करायला मदत करतो . देहस्वभावापसून दूर राहिलो तर आत्म्याची फळे दिसतात.. 

     म्हणुनच प्रभूची आज्ञा पाळण्यासाठी , आत्म्याची फळे प्राप्त होण्यासाठी व सुवार्तेसाठी पवित्र आत्म्याची व धैर्याची आम्हाला नितांत गरज आहे. 

     *प्रार्थना करू या की देवबापा तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर म्हणजे धैर्याने आम्ही तुझी सेवा करू..*   *आमेन.*

   

No comments:

Post a Comment