Wednesday, 18 November 2020

उणीव

 *मार्क- १०:१७-२२*

               *उणीव*


      *तुझ्यात एका गोष्टीची उणीव  आहे* *मार्क-१०:२१*


 पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केलेल्या सर्व व्यक्तिरेखा मध्ये श्रीमंत तरुण आमचे प्रतिनिधित्व करीत आहे असे मला ठामपणे वाटते. 

      तो नियमशास्त्र काटेकोरपणे

पाळीत होता. त्यामुळे त्याला वाटत होते की, तो सार्वकालिक जीवन मिळविण्यास पात्र आहे.आम्हीही असेच आहोत. नियमितपणे मंदिरात येतो, हात उंचावून स्तुती करतो, भरघोस दान देतो, पवित्र शास्त्राचे नियमितपणे वाचन करतो,मनन करतो.उत्तम आचरण करण्याचा आमचा प्रयत्न सुध्दा असतो.म्हणून आम्हाला वाटते, आम्ही परिपूर्ण आहोत. कारण त्या तरुणांप्रमाणे आम्ही आमच्याच चष्म्यातून स्वतःस पाहतो. म्हणून आमच्या उणिवा आम्हास दिसत नाहीत.. 

      अंतकरण पारखणाऱ्या देवाला आमच्या अःतकरणाची निर्मळता हवी आहे.म्हणून आमच्या उणिवा त्याला दिसतात. त्या तो आम्हाला दाखवून देतो. आता त्या उणिवा दूर करावयाच्या की नाही हे मात्र त्याने आमच्यावर सोपवले आहे. 

      हा तरुण महान प्रभूच्या समक्षतेत येऊनही निराश होऊन गेला. कारण प्रभूने दाखवलेली द्रव्यलोभाची उणीव दूर करण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याने जीवनात प्रथम स्थान देवाला नाही तर संपत्तीच्या मोहाला दिले होते. *माझ्या समोर तुला अन्य देव नसोत* , ह्या आज्ञेचा त्याने भंग केला होता..  प्रभुनेही आपले नियम त्याच्यासाठी बदलले नाहीत. त्याला जाऊ दिले.  कारण देव म्हणतो *जसा मी पवित्र आहे तसे तुम्हीही असावे*. प्रभू येशू त्या तरुणाला नियमशास्त्र कसे पाळायचे हे दाखवीत होता. *आम्हाला नियमशास्त्र ख्रिस्ताकडे आणते*( *गलती- ३:४* )

पण नियमशास्त्र आमचे तारण करीत नाही. नियमशास्त्राच्या कर्माने नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आपले तारण होते. 

 *आम्हीसुद्धा स्वतःच्या नाही तर प्रभूच्या नजरेतून स्वतःचे आत्मपरीक्षण करीत आपल्यातील उणिवा दूर केल्या पाहिजेत,कारण परमेश्वर अंतःकरण परखणारा आहे*...

     प्रार्थना करूया की *प्रभू येशू , आमच्या उणिवा दूर करण्यास तुझ्या दृष्टीने आम्हास पहावयास शिकव*...

                      *आमेन

     

No comments:

Post a Comment