Friday, 6 November 2020

खोट्या शांतीपासून सावध असा


*खोट्या शांतीपासून सावध असा*

*कलस्सै.३ः१३-१७*


खोट्या शांतीपासून आपण सावध असले पाहिजे. जे चुकीच्या गोष्टी करतात त्यांना त्यापासून शांती मिळत असेल, पण ती देवापासून आलेली शांती नसते. कोणीतरी असे म्हटले आहे, ‘‘हृदयामध्ये असणारी शांती ही नेहमीच देवाची शांती असते असे नाही.’’ 


शांतीचे उगमस्थान ठरवण्यासाठी घ्यावयाची महत्त्वाची चाचणी पुढीलप्रमाणे आहे : जर माझ्या अंतःकरणात एखाद्या बाबीविषयी शांती असेल, पण त्याच बाबीविषयी ख्रिस्ताच्या शरीरातील इतर सभासदांसहित माझ्या अंतःकरणात शांती असते काय? समजून उमजून प्रत्येक जणच एखाद्या विशिष्ट मुद्याबाबत सहमत होणार नाही, पण जर एखाद्या व्यक्तीला ती स्वतः योग्य आहे असे वाटते, तर तिला तिच्या निर्णयावर प्रश्‍न विचारवयास कारण असते. जर आपण देवाच्या इच्छेबाहेर असू, तर आपण खर्‍या विश्वासणार्‍यांच्या गटामध्ये फूट व विसंगती आणण्यास कारणीभूत ठरू. 


खरा विश्वासणारा कोण याचे मूल्यमापन करणे किती कठीण काम आहे, याची मला जाणीव आहे, खास करून एखाद्या गटाच्या बाबतीत. जे त्या गटाचे सभासद असतात त्यांच्यापैकी काहींचे तारण झाल्याचा पुरावा दिसत नाही. तर इतर वेळा काही जण स्पष्टपणे तारणाचा पुरावा दाखवतात, पण ख्रिस्ती जीवनाशी संबंधित असणार्‍या बाबींत परिपक्व निर्णय घेत असल्याचा पुरावा दाखवत नाहीत.


खोट्या शांतीपासून रक्षण करण्याच्या सर्वांत सुरक्षित मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे तुम्ही जे सर्वकाही करता त्यात येशू ख्रिस्ताला संतोषवण्याची तुमची इच्छा असते याची खातरी करून घ्या. ‘‘सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे’’ (कलस्सै.१ः१८) अशी जर तुमची तळमळ असेल, तर तुमच्या जीवनाद्वारे त्याचे गौरव होत नसल्यास त्याबाबत त्याने तुम्हांला दोषी ठरवावे व तुमच्या जीवनातील शांतीची उणीव दाखवावी म्हणून तुम्ही त्याच्यावर भरवसा ठेवू शकता. 


_तुझे नियमशास्त्र प्रिय मानणार्‍यांना फार शांती असते. त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही (स्तोत्र.११९ः१६५)._



No comments:

Post a Comment