Monday, 9 November 2020

क्षणिक की सार्वकालिक

 *लूक १५:११-२४*


     *क्षणिक की सार्वकालिक*


    *तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने,पूर्ण जीवाने, व पूर्ण मनाने प्रीति कर*

          *मत्तय२२:३७*


आजच्या शास्त्रपाठातील वचन, "माझा वाटा मला द्या". म्हणजे जे काही आहे त्यात  माझा वाटा आहे त्या माझ्या वाट्यात तुमचा वाटा नाही, खरेतर सर्व वडिलांनीच मिळविले होते सर्व काही त्यांचेच होते,पण हे तो विसरला होता.मी आधी माझा आंनद शोधणार,मला हवे तसे जगणार अशी त्याची मानसिकता होती. आणि मग खरी सुरुवात पापाला येथूनच होते.  आमच्या अंतकरणाला जी पापाची बाधा झालेली आहे तिचे हे परिणाम किंवा लक्षणं असतात. मी, माझे,मला ह्यालाच प्रथम स्थान असते,आणि देवाला दुय्यम असते.म्हणजेच सर्वात मोठी आज्ञा आपण मोडीत असतो ती म्हणजे तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंत:करणाने,पूर्ण जीवाने,पूर्ण मनाने प्रीति कर.. पुष्कळदा काही लोकांना वाटते की,आम्ही चोरी करीत नाही, खोटं बोलत नाही, स्वच्छ जीवन जगतो,म्हणून आम्हाला क्षमेची व पश्चातापाची गरज नाही.पण जो मनुष्य स्वतःला प्रथमस्थान देऊन आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो तो सर्वात जास्त दुःखी होतो,जसं ह्या उधळ्या पुत्राने आधी केले पण नंतर त्याला अनेक संकटे सहन करावी लागली. तो फक्त स्वतःवर प्रेम करीत होता देवावर नाही. म्हणजे तो *क्षणिक सुखासाठी सार्वकालिक सुखाला* नाकारीत होता. 

     *जॉन पीटर* ह्या सुप्रसिद्ध कवीच्या ह्या सुदंर ओळी मला आवडतात, कारण त्या ओळींच्या मागची त्यांची मानसिकताही तितकीच सुंदर आहे,ते लिहितात,

 *डोंगरमाथ्यावर  मावळताना*

*सूर्य, रम्य अशा संध्याकाळी*

*बाहुपाशामध्ये असावे मी* 

   *सदैव येशूच्या जवळी*.

जेव्हा एका पब्लिशर ने हे गीत ऐकलं तेव्हा तो जॉन पीटर याना म्हणाला मी तुला ह्या गीतासाठी दीड हजार डॉलर देतो,पण एक अटीवर, ती म्हणजे ह्या ओळीतील *येशूच्या* हा शब्द काढून त्याजागी एका मुलीचे नाव टाकलं तरच..पहा तुझे भवितव्य बदलून जाईल.  पण ह्या थोर कवीने नकार दिला. त्या कंपनीने, लोकांनी , मित्रांनी त्यांना मूर्ख ठरवले,सर्वांनी नावं ठेवली.

*पण एक जण त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला,शाबास भल्या व विश्वासु दासा*.. *क्षणिक सुखापेक्षा तू सार्वकालिक सुखाला महत्त्व देऊन माझ्यावरील प्रेमाला प्रथम स्थान दिलेस,ये माझ्याजवळ*

      *प्रेमळ पित्या केवळ तूच माझ्या जीवनात प्रथमस्थानी असावास असे कर* *कारण क्षणिक सुखापेक्षा त्यात सार्वकालिक सुख आहे*  

               *आमेन*     


  

No comments:

Post a Comment