Tuesday, 10 November 2020

विश्वास आणि सत्कर्मे

 *याकोब २:१४-२६*


    *विश्वास आणि सत्कर्मे*   


    *त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की लोकांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करावे*.


     अशी मान्यता आहे की संपूर्ण जगातील ९०% लोक *येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे* हे मान्य करतात, पण केवळ ३०% लोकांनीच ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला आहे. ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे केवळ बोलणे ,ह्या निव्वळ वल्गना आहेत.अशा लोकांबद्दल याकोब बोलत आहे. *खरा विश्वास हा इतरांना आमच्या जगण्यातून, कृतीतून दिसायला हवा*.गरजवंताला अन्नाची वाण आहे,त्यांना धड कपडे नाहीत हे जाणून अन पाहूनही जर त्याला मदत न करता फक्त तोंडी कळवळा व्यक्त करतो की, थंडी वाजते का तर ऊब घे, भूक लागली असेल तर तृप्त हो सुखाने जा, पण देत काहीच नाही तर *विश्वासणारे आणि अविश्वासणारे यात काहीच फरक नाही, दोघेही सारखेच*!! *जे देवावर प्रेम करण्याचा आणि विश्वासाचा दावा करतात पण फळ देत नाहीत तर ते अविश्वासणाऱ्या सारखेच आहेत*. उदाहरणच द्यायचे तर , तुम्हाला वाचता येते पण जर वाचनच करीत नाही तर तुम्ही वाचता न येणाऱ्या सारखेच आहात. 

        बायबल सांगते,भुते ,दुरात्मे ही विश्वास ठेवतात, घाबरतात,पण ते काय करतात तर सत्कर्माच्या उलट कर्मे करून देवाविरुद्ध बंड करतात. तुमचे विश्वासाद्वारे खरेच तारण झाले आहे तर ते लपून राहणारच नाही, तुमच्या चांगल्या कृतीतून प्रकट होणारच. अब्राहामाने देवाशी  कोणताही वाद न घालता फक्त आज्ञापालन केले इसहाकाच्या बाबतीत. *खरा विश्वास हा कार्य करतो, आज्ञापालन करतो*. जर फळं नाहीत, पुरावा नाही, साक्ष नाही,  ख्रिस्ताची चित्तवृत्ती दिसत नाही ,तुमच्या जीवनात कार्य होत नाही तर  तुमचा विश्वास प्रकट होत नाही..

   महत्वाचे म्हणजे, तुमचे तारण कर्माने होत नाही, भरपूर दान देण्याने होत नाही, चर्चच्या मेंबरशीपमूळे होत नाही, *तूमच्या तारणासाठी  ख्रिस्ताला तुमचा फक्त विश्वासच हवाय, इतर गोष्टी अपेक्षित नाहीत,  पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे येता आणि खरा ख्रिस्त तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्या सत्कर्मातून लोकांना दिसतो हे तुम्हाला दिसते*..कारण ते तुमचा आदर करीत असतात. 

    *तीत १:१६ मध्ये पौल म्हणतो, "आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात, *परंतु कृतीने त्याला नाकारतात*, *तेअमंगळ, आज्ञाभंजक,प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत*...

  *चांगली कृत्ये ,सत्कर्मे करणे हा विश्वासूपणाचा पुरावा असू शकत नाही, पण सत्कर्माचा, चांगले वागण्याचा अभाव हा मात्र अविश्वास दाखवतो किंवा ती व्यक्ती अविश्वासणारी आहे याकडे निर्देश करतो*!!!

   *आज आपण स्वतःला विचारू या की माझा विश्वास खरा आहे की निर्जीव आहे*..

    *दयाघन ईश्वरा, माझा तुझ्यावरील विश्वास हा माझ्या सत्कर्मातून तुला आणि इतरांना दिसावा म्हणून माझ्या आचार विचारांचा ताबा तुझ्या हाती असू दे की ज्यामूळे आमचा प्रकाश लोकांसमोर पडून तुझे गौरव व्हावे*..

           

No comments:

Post a Comment