जन्म, जो मृत्यू घेऊन येतो
*याकोब.१ः१२-१५*
जेव्हा आपल्या जीवनात आपल्याला वाईट करण्याचा मोह होतो, तेव्हा त्या वाईट गोष्टी देवापासून आल्या आहेत असा विचार कधीच करू नका. याउलट आपण पापात पडण्यापासून रोखण्यासाठी देव जेवढे करता येईल तेवढे करत असतो. परंतु आपण देहात इतके अशक्त आहोत की आपण कधी कधी देवाला तुच्छ लेखून वाइटाला अनुसरतो.
याकोब म्हणतो, ‘‘तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो’’ (याकोब.१ः१४). विशेषतः ‘‘भुलवला’’ ह्या शब्दांकडे लक्ष द्या. वासनेचा उगम अंतर्यामी असलेल्या शत्रूपासून आहे - म्हणजेच आपला जुना स्वभाव; तसेच भुलवणूक ही बाह्य शत्रूकडून - सैतानाकडून येते.
याकोब.१ः१५ हे वचन आपल्याला पापाच्या उगमाविषयीच नाही, तर त्याच्या अंतिम परिणामाविषयीही सांगते, ‘‘मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते.’’ याकोब ह्या वचनांमध्ये वासना व पाप ह्यांच्यावर त्या व्यक्ती असल्याचा आरोप करून गर्भधारणा, जन्म, मृत्यूविषयी सांगतो.
वासनेवर वेश्येचा आरोप केला असून ती गर्भवती होते व पाप ह्या ‘अपत्याला’ जन्म देते, ज्याचा बाप सैतान आहे. मग पापदेखील गर्भवती होऊन आपल्या नातवाला म्हणजे ‘मृत्यूला’ जन्म देते.
जेव्हा पापमय इच्छेचा मनामध्ये प्रवेश होतो, तेव्हा त्या इच्छेला वेळीच रोखले नाही, तर ती वाढत जाते व कृतीत उतरवली जाते. हा नियमच आहे की, मन ज्या गोष्टींवर जगते शेवटी त्याच गोष्टी कृतीत उतरवते.
_वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्याने वाइटाला जिंक (रोम.१२ः२१)._
No comments:
Post a Comment