*मार्क १४:३-९*
*दरवळ सुगंधाचा*
*कोणीएक स्त्री जटामांसीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली; तिने ती कुपी फोडून त्याच्या ( येशूच्या ) मस्तकावर ओतली*. *मार्क १४:३*.
आपण जे मध्यम वर्गीय आहोत त्या आपली एक सवय असते, कोणी काही भेटवस्तू दिली तर आपण ती तशीच जपून,जपून ठेवतो,तिच्याकडे फक्त पाहूनच आपलं समाधान होत असते. म्हणजे अत्तराची बाटली असेल तर आपण ती न वापरता तशीच ठेवतो. पण त्यामुळे होत काय की त्या अत्तराचा गंध कसा आहे हे समजतच नाही. पण जेव्हा उघडतो तेव्हा कळते की कित्ती मस्तं सुगंध आहे आणि त्या सुगंधाचा दरवळ सर्वत्र पसरतो,आणि सर्वांनाच आनंद देऊन जातो.
ती सुगंधी कुपी काय आहे माहिती आहे का... ती कुपी म्हणजे आमचे जीवन आहे. आणि ह्या कुपीत देवाने सर्वांना आणि देवाला ही गंधाळून टाकणारे अत्तर ठेवले आहे. जसे वेगवेगळ्या गंधाच्या बाटल्या असतात तसेच आमच्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधाचे अत्तरआहे.हे सुगंधी द्रव्य म्हणजे वेगवेगळी दानं होत.
पण ते अत्तर बाहेर येण्यासाठी त्या स्त्रीने कुपी फोडली , मगच ती ते सुगंधी द्रव्य प्रभूच्या मस्तकावर ओतू शकली. याचा अर्थ ती तुटली, पूर्णपणे प्रभू येशूला समर्पित झाली. तुम्हाला अन मलाही असंच तुटायचं आहे म्हणजे भग्न आणि अनुतप्त होतप्रभु चरणी हे जीवन समर्पित करायचे आहे, तेव्हाच पवित्र आत्मा आमच्यामध्ये असणाऱ्या सुगंधित द्रव्यरूपी दानांचा उपयोग करून घेतो. *मग कोणामध्ये हे सुगंधी द्रव्य उत्तम संदेशाचे,सेवेचे,गीत गाण्याचे, प्रार्थनेचे, काहींना आध्यत्मिक शिक्षण देण्याचे तर कुणाला लेखनाचे असेल*.ह्या दानांचा उपयोग इतरासाठी आणि प्रभूच्या गौरवासाठी केला पाहिजे. फक्त गरज आहे ती तुटण्याची प्रभूचरणी समर्पित होण्याची. मग पहा आमच्या ह्या दानरुपी सुगंधी द्रव्यांचा दरवळ,सुगंध हा इतरांना आणि आमच्या प्रभू येशूला आनंद देऊन जातो.पवित्र आत्म्याने दिलेली ही दानं आमच्या जीवनरुपी कुपीत ठेवलेली आहेत. *तिने कुपी फोडली,आमच्यातील जुना मनुष्य फुटला पाहिजे, तुटला पाहिजे, मगच हा सुगंध दरवळेल* *.जर आमच्या ख्रिस्ती जीवनाचा सुगंध दरवळत नसेल तर निश्चितच आमचे जीवन त्या कुपीमध्ये आम्ही त्या भेटवस्तू प्रमाणे बंदिस्त करून ठेवले आहे..
*आजच त्या प्रभू चरणी भग्न व अनुतप्त होत समर्पित होऊ*..
*सर्वसमर्था ह्या जीवनरूपी कुपीचा त्यात असणाऱ्या दानांचा उपयोग तुला व इतरांना सुगंधित दरवळाचा आनंद देण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सहाय्याने करून घे* *आमेन*..
No comments:
Post a Comment