Sunday, 8 November 2020

आशीर्वाद आणि शाप

         *✨आशीर्वाद आणि शाप✨*


*तो वैराणांतल्या झुडूपासारखा होईल, व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही, अरण्यांतील रूक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यांत तो वस्ती करील..✍*

                  *( यिर्मया १७:६)*


                           *...मनन...*


          *!!..परमेश्वराची स्तुती असो..!!*


     परमेश्वरावर विश्वास ठेवणारा कसा आशीर्वादित होतो आणि परमेश्वरावर विश्वास न ठेवणारा कसा शापित होतो हे आपणांस ह्या अध्यायातून पाहावयास मिळते. देवाचे आशीर्वाद नसणे म्हणजे शाप होय. शाप म्हणजे दुःख, संकटे, अशांती, हाती घेतलेल्या कामात यश न मिळणे इत्यादि होय. परमेश्वरावर विश्वास न ठेवता जो मनुष्य मनुष्यावर विश्वास ठेवतो व त्याचे साहाय्य मागतो आणि ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणांतल्या झुडूपाप्रमाणे म्हणजे एकट्या पडलेल्या, देवापासून दूर गेल्यामुळे सर्व मनुष्यांतून टाकून दिलेल्या, देवाने सोडून दिलेल्या मनुष्यासारखा होईल. झुडूपाची वाढ जशी खुंटलेली असते तशी वचनाच्या अभावामुळे, देवाचे सान्निध्य नसल्यामुळे त्याची वाढ होणार नाही. देवापासून दूर गेल्यामुळे तो रूक्ष स्थळे म्हणजे जिथे कुठल्याच प्रकारचा ओलावा नाही, क्षारभूमी म्हणजे पडीत जमीन, व निर्जन प्रदेश म्हणजे जिथे वस्ती नाही, जो प्रदेश ओसाड पडलेला आहे अशा अरण्यांमध्ये त्याची वस्ती होईल. आणि याउलट जो पुरूष परमेश्वरावर विश्वास ठेवतो व ज्याचा भावविषय परमेश्वर आहे त्याला धन्य म्हटले आहे. त्याच्याबद्दल असे लिहिले आहे की, *तो जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदीकिनारी पसरील, उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहातील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही. ( यिर्मया १७:८)* 


     ख्रिस्ताकडे जोपर्यंत एखादी व्यक्ती येत नाही, तोपर्यंत त्याच्या पूर्वजांच्या अधर्माचा, पापांचा भार हा त्याच्यावर असतो कारण शाप हे एका पिढीकडून दूसऱ्या पिढीकडे जात असतात. यिर्मया म्हणतो, *आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत. आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगितो. ( विलापगीत ५:७)* बायबल मध्ये आपण पाहातो की, चार पिढ्यांपर्यंत शाप असू शकतात. आपण बायबल मधून एक उदाहरण पाहू या - असे लिहिले आहे की, *त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, जो कोणी यरिहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल, त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा जेष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. ( यहोशवा ६:२६)* आणि आपण पाहातो की, खूप वर्षांनंतर हे शापोच्चारण परमेश्वराद्वारे पूर्ण झाले. जवळ जवळ पाचशे वर्षानंतर,  *अहाबाच्या कारकिर्दीत बेथेलकर हिएल याने यरिहो नगर परत वसविले. त्याने त्याचा पाया घातला तेव्हा त्याचा जेष्ठ पुत्र अबीराम मरण पावला, आणि त्याने त्याच्या वेशी उभारिल्या तेव्हा त्याचा कनिष्ठ पुत्र सगूब मरण पावला. ( १ राजे १६:३४)* अशाप्रकारे परमेश्वराने नूनाचा पुत्र यहोशवा ह्याच्या द्वारे सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले. 


    परंतु परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. तो न्यायी न्यायाधीश आहे. पूर्वीच्या शापांपासून मनुष्याला सोडवावे, मुक्त करावे म्हणून त्याने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांच्याशी बोलला. येशूने म्हटले, *तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील. ( योहान ८:३२)* आणि खरोखरच त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने सर्व प्रकारच्या बंधनातून, दास्यातून मुक्त केले. परमेश्वराने आम्ही आशीर्वाद निवडावेत की शाप हे आमच्यावर सोपविलेले आहे. परंतु त्याची स्वतःची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्यासाठी आशीर्वादच निवडून घ्यावेत. परमेश्वर म्हणतो, *आकाश व पृथ्वी ह्यांना तुझ्याविरूद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापूढे ठेवले आहेत, म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तूं व तुझी संतति जिवंत राहील. ( अनुवाद ३०:१९)* ह्याचा अर्थ असा आहे की, परमेश्वराची इच्छा नाही की एकाही मनुष्याचा नाश व्हावा, तर परमेश्वराची इच्छा आहे की, आम्ही आशीर्वाद आणि जीवन निवडून घ्यावे. सर्वांचे तारण व्हावे आणि सर्वांना सार्वकालिक जीवनाचा लाभ मिळावा.


      प्रियांनो, आम्हीही कधी कधी रागात असलो म्हणजे आमच्या मुखातून शापोच्चार बाहेर पडतात. परंतु सांभाळा प्रियांनो, आम्ही कधीही आमच्या मुखाने वाईट गोष्टींचा उच्चार करू नये. कारण आमचे ते शब्द कुणासाठी तरी एकप्रकारे शापास कारणीभूत असे ठरतात. म्हणून आम्ही आमच्या जिभेवर, आमच्या मुखावर ताबा ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण मुखाने जे बोलू ते घडून येत असते.  

    

       *

No comments:

Post a Comment