*स्तोत्र १००*
*मंदिरात जाताय* ?
" पुन्हा जगण्याची संधी मिळाली तर आताच्या जीवनाहून वेगळे असे काय कराल?" असा प्रश्न एका सर्व्हे दरम्यान प्रौढ लोकांना विचारला गेला, तेव्हा त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली, कोणी म्हणाले, मी अधिक प्रभावीपणे जगेन, कोणी उतरले, मी आणखी धोका पत्करीन यशस्वी होण्यासाठी, कोणी म्हणाले , मी जास्त विचारपूर्वक जगेन, थोडक्यात सांगायचे झाल्यास , मी ह्या जीवनाचा , कुटुंबाचा ,अनेक गोष्टीचा पुन्हा विचार करून जगू..
ख्रिस्ती या नात्याने मंदिरात जातानाआजवर आम्ही कसे गेलो, किंवा वागलो आणि ह्या नंतर कसे वागणार? कारण हे १००वे स्तोत्र मंदिरात येण्यासाठी आवाहन करणारे स्तोत्र आहे. मग मंदिरात आम्ही कसे आणि कशासाठी गेले पाहिजे हे यात सांगितले आहे.
मंदिरात जाताना आमच्या मनात खूपदा एखाद्या बद्दल राग,द्वेष,आकस, घेऊनच आम्ही जातो, अहंकार तर खूपच असतो की ते बोलत असतील तरच मी बोलेन उगाचच कोणाला महत्त्व देणार नाही. किंवा आज पाळकसाहेब कशावर अन कसे बोलतील कोण जाणे, कंटाळवाणं नको व्हायला. आजकाल फारचं कंटाळा येईल असे बोलतात, असले विचार घेऊन मंदिरात जातो. आजवर कदाचित आपण हेच विचार घेऊन गेलो असू.
पण हे स्तोत्र सांगते की, पहिली गोष्ट म्हणजे *देवाचा जयजयकार करीत आणि गीतं गात* मंदिरात परमेश्वरापुढे या,म्हणून नकारात्मक विचार सोडून आनंदाने उपासना संगीतातील गीतं गात जाऊ. म्हणजे भक्ती भावाने जायला हवे.
दुसरे म्हणजे, *आनंदाने सेवा* केली पाहिजे,स्तुती व जयजयकाराबरोबर सेवा तितकीच महत्वाची आहे, मार्था प्रभुसाठीच करीत होती, पण त्यात कुरकुर होती की मी एकटीच काम करते प्रभू मरियेला सांग मला मदत करायला. पण प्रभू म्हणतो मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो काढून घेतला जाणार नाही, *कारण कुरकुर करीत सेवा करण्यापेक्षा भक्ती करणे उत्तम आहे*. केवळ जबाबदारी म्हणून सेवा केलेली मान्य होत नाही..
तिसरी गोष्ट म्हणजे *देवाला *जाणून* *घेत त्याच्यावर प्रीती केली* पाहिजे,जाणून घेणं म्हणजे प्रभू येशूने वधस्तंभावर आमच्यासाठी के केले नेमकेपणाने हे समजून घेणे, ते जाणल्यावरच देवावर आम्ही प्रेम करू शकतो आणि जेव्हा आपण देवावर प्रीती करतो तेव्हा इतरावरही प्रीती करण्याची भावना निर्माण होते आणि मनातील द्वेष, आकस, अहंकार,हे नकारात्मक विचार निघून जातात. चौथी गोष्ट म्हणजे *उपकारस्तुती* देवाने आजवर दिलेल्या सर्व उत्तम आशीर्वादा बद्दल आणि आज मंदिरात त्याच्या पवित्र जनांच्या सहभागीतेत आणल्याबद्दल उपकारस्तुती केली पाहिजे कारण *देव चांगला आहे, त्याची दया सनातन आणि सत्यता पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे*..
पुन्हा एकवार देवानं आम्हाला संधी दिली आहे, *म्हणून आम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणिय असा यज्ञ म्हणून समर्पित करु कारण हिच अध्यात्मिक सेवा आहे*..
*प्रभू येशू तुझ्या मंदिरात जाताना आमच्यातील सर्व तुला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक व खरेपणाने व आत्म्याने तुझ्या मंदिरात घेऊन जा* *अशी आम्ही तुला विनंती करतो* *आमेन*!!
No comments:
Post a Comment