*निर्गम १४:१०-१४*
*देवाशिवाय सर्व निरर्थक*
*परमेश्वर तुम्हासाठी लढेल; तुम्ही शांत रहा*.
*निर्गम १४:१४*
फारो जेव्हा इस्राएल लोकांच्या मागे सैन्य घेऊन आला तेव्हा ते सर्व घाबरून गेले आणि कुरकुर करीत मोशेला दोष देत म्हणाले, "मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे मरायला आणले? पण फक्त मोशे म्हणतो, परमेश्वर तुम्हासाठी लढेल. केवढा विश्वास मोशेचा!!! त्याने आपले सर्व लक्ष देवाच्या सामर्थ्यावर केंद्रित केले, आणि तो स्वतः पुर्णपणे देवावर अवलंबून राहिला, आणि लोकांनाही तसे करायला लावले.. मोशेचा स्वतःवर नाही तर देवावर ठाम विश्वास होता. लोकांच्या दैहिक गरजासाठी सुध्दा मोशे देवावरच विसंबून होता. पुष्कळदा असे वाटते की मोशेला विश्वास न ठेवायला काय झाले, ठेवणारच तो कारण मिसरात देवाने जे चमत्कार केले इस्राएलच्या सुटकेसाठी ये सर्व मोशेने पाहिले होते आणि अनुभवले होतेच!!पण *एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे चमत्कार फक्त मोशेने नाही तर सर्व इस्राएल लोकांनी पाहिले व अनुभवले होते*. पण त्यांनी विश्वास न ठेवता कुरकुर केली.
आमच्या वैयक्तिक जीवनात अनेक चमत्कार देवाने केलेले असतात, त्या क्षणापूरते आम्ही भारावून जातो पण परीक्षा प्रसंग आले की आमची कुरकुर चालू होते देवाविरुद्ध. *आमच्या पुढे निवड करण्याची ती वेळ असते, देवावर पूर्ण विश्वास टाकून शांत रहायचे की कुरकुर करायची* मोशेने देवावर का विश्वास ठेवला तर त्याला माहिती होते की, *विजय मिळवून देण्याची क्षमता फक्त परमेश्वरातच आहे*... देवाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही.
देवाचे सुप्रसिद्ध सेवक स्टॅनले
यांनी त्यांचा अनुभव सांगितला की, एक चर्चच्या सेशन कमिटीने सर्व कारभार स्वतः करायचा ठरवला, स्टॅनले यांना सांगितले की, तुमची आणि तुमच्या प्रार्थनेची गरज नाही,आम्ही सर्व कारभार उत्तम चालवू. कारण त्यांना विश्वास होता की कॉर्पोरेट वर्ल्ड त्यांच्या पाठीशी आहे, हाती पैसा आहे, ज्ञान आहे, उच्च शिक्षित आहोत तर आमचे चर्च उत्तम चालणारच हा ठाम विश्वास त्यांना होता. पण देवाला आणि त्याच्यावरील विश्वासालाच त्यांनी फाटा दिला. आणि काय झाले माहिती आहे? अवघ्या सहा महिन्यांत मंडळीत फूट पडली. आणि वाताहत झाली. *कोणत्याही क्षणी देव ह्या गोष्टी काढून घेऊ शकतो*.
देवाशिवाय सर्व निरर्थक आहे. *कारण देवशिवाय एकाही व्यक्तीला आपण देवाकडे आणू शकत नाही*कोणत्याही कामात यश मिळवू शकत नाही*...
पैसा, पद, प्रतिष्ठा, आमचे मोठया लोकांशी संबंध ह्या सर्व गोष्टी देवाशिवाय निरर्थक आहेत.. मंदिराची सेवा असो, ऑफिसमधील काम असो, समाजसेवा असो किंवा घरच्या बाबतीतील प्रश्न असोत , प्रत्येक वेळी फक्त देवावरच अवलंबून राहत त्याच्यावर पूर्ण विश्वासून चालले पाहिजे. *कारण परमेश्वरा शिवाय सर्व निरर्थक आहे, तो आमच्यासाठी लढणारा आहे*...
*दयाघना माझ्या जीवनात फक्त तुलाच प्रथम स्थान असू दे आणि तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक आहे याची जाणीव सतत असुदे* *आमेन*...
No comments:
Post a Comment