Friday, 9 October 2020

न्याय


 


      *आणी त्याच नगरात एक विधवा होती,ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्या विरुद्ध न्याय करा*

      प्रियजनहो लुक १८:१-६

 वचना मधे आपण पाहतो की, एक विधवा स्री अशा न्यायाधिशाकडे न्याय मागते की जो, अन्यायी आहे, देवाला मानत नाही.परंतू तिच्या वारंवार त्याच्याकडे जान्याला कंटाळून तिला न्याय मिळतो.आपला स्वर्गीय पिता तर न्यायी आहे, दयाळू आहे तो आपली प्रार्थना ऐकनार नाही का?. जर आपन  त्याचे निवडलेले लोक आहोत तर तो निश्चीत आपल्याला आपल्या प्रार्थनेच उत्तर देईल 🔥 कारण *मत्तय  ११:२८* मधे वचन आम्हाला सांगत आहे की, *आहो कष्टी व भाराक्रान्त जनहो तुम्ही सर्व मझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल*

        प्रियजनहो संकटसमयी निश्चीत त्याचा धावा करा तो नक्की आपल्याला उत्तर देईल. कारन *स्तोत्र ४६:१* मधे वचन आम्हाला सांगते की, *देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे,तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो* .प्रियांनो आपन  वारंवार प्रार्थनेत  तत्पर असल पाहिजे. परमेश्वर *यशया ५८:९* मधे म्हणतो *तू हाक मारशील परमेश्वर ऐकेल,तू धावा करशील तेंव्हा तो म्हणेल, हा मी आहे*.

        प्रियजनहो परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो तो कधीही टाकणारा,संकटात सोडनारा परमेश्वर नाही.आपले माता-पिता जेव्हड आपल्यावर प्रेम करत नाही तेव्हड प्रेम परमेश्वर आपल्यावर करतो. म्हणून स्तोत्र कर्ता म्हणतो , *स्तोत्र २७:१० माझ्या आईबापानी जरी मला सोडल तरी परमेश्वर मला जवळ करील*. त्याने आपल्या एकुलत्याएक पुत्राला तुमच्या आणी माझ्यासाठी दिले, आणी त्या येशुख्रिस्ताच्या रक्ताने आपल्या पापांची क्षमा झाली.

       म्हणून प्रियजनहो समस्या,संकट कितिही मोठ असूद्या आपला स्वर्गीय पिता त्या सर्वातून आपल्याला सोडविल .आपन निरंतर , वारंवार प्रार्थनेत असल पाहिजे.

              *आमेन*



No comments:

Post a Comment