Friday, 9 October 2020

येशू एका पक्षघाती मनुष्यास बरे करतो

 येशू एका पक्षघाती मनुष्यास बरे करतो

मत्त. 9:2-8; लूक 5:17-26_

1 काही दिवसानी येशू कफर्णहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. 2 तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता. *_3 मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते._* 4 परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली. 5 त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” 6 तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की, 7 “हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?” 8 आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता? 9 तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?” 10 परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला, *_11 “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.”_* 12 मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; *_यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते_*

मार्क 2:1-12_* 


_लागूकरण:-

4 लोकांनी 1 पक्षघाती मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन आले ते धर्मी-होते का विधर्मी होते का माहिती नाही.पण त्यांनी येशू विषयी ऐकले होते.म्हणून त्यांच्या विश्वासाने व पक्षघाती मनुष्याच्या विश्वासाने पक्षघाती मनुष्य बरा झाला._


*_आज संपूर्ण जगात पापाचे पक्षघाती ,वाईट व्यसनाचे पक्षघाती,व्याभिचाराचे पक्षघाती,अनेक पापाचे पक्षघाती मनुष्य आहेत. आपण येशू ख्रिस्ताविषयी ऐकले व अनुभव घेतला तर चला आपण प्रार्थना पूर्वक निर्णय घेऊ की, मी आज अशा प्रकारे पक्षघाती मनुष्याला येशूकडे घेऊन येणार_

No comments:

Post a Comment