Tuesday, 6 October 2020

प्रार्थनेचे उत्तर

 


*तुझ्या प्रार्थनांस आरंभ होताच  आज्ञा झाली , ती तुला सांगण्यास मी आलो आहे; कारण तू परंमप्रिय आहेस; तर या गोष्टिंचा विचार कर*.

दानिएल ९:२३

         प्रियांनो वचनामधे आपण पाहतो की, दानिएलाशी देवदूत बोलत आहे. आणि देवदूत दानिएलाला सांगत आहे की, ज्या क्षणी तुझ्या प्रार्थनेला आरंभ झाला त्याच क्षणी तुझी प्रार्थना तर एकली आहे ,कारण  तू परमेश्वराचा परमप्रिय आहेस. ज्या वेळेस आपण प्रार्थना करण्यास सुरवात करतो त्यावेळी आपण देवाला परमप्रिय असे होतो. परमेश्वराचे आणि आमचे संबंध आगदी घट्ट होतात.

           प्रियांनो आपण परमेश्वराकडे अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करतो. बर्याचदा काही प्रार्थनेचे उत्तर मिळण्यास विलंब लागतो मात्र याचा अर्थ असा नाही की परमेश्वर आपली प्रार्थना उशिरा एकतो, ती त्याच वेळेस एकली जाते. परमेश्वर त्याच्या इच्छेनुसार, योजनेनुसार योग्य समयी त्याचे उत्तर देतो.

*तोच आपल्या प्रियजनांस लागेल ते झोपेतही देतो* स्तोत्र १२७:२

  

*मजवर तुमची प्रिती असली तर माझ्या आज्ञा पाळाल* योहान १४:१५

         प्रियांनो जसा परमेश्वर आपल्यावर प्रिती करतो तशीच प्रिती आपणही त्याच्यावर करण गरजेच आहे. याचा हेतू हा आहे की जेव्हा तुम्ही देवावर प्रीती करता तर तो देखील तुमच्यावर अधिक प्रीती करतो आणि त्यामुळे तुम्ही त्याचे प्रिय होता.

*आणि जो प्रिय असतो त्याला नेहमीच प्रथम प्राधान्य दिले जाते*

म्हणून देवासमोर प्रार्थना करण्यात नम्र व्हा.


*तो मला म्हणाला, “दानिएला, भिऊ नकोस; कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्‍चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे.*

दानीएल 10:12 



No comments:

Post a Comment