*स्तोत्र १*
*स्तोत्र 1* मध्ये
एका धन्य पुरुषाचे वर्णन आहे. तो पापी मार्गाने न जाता देवाच्या वचनाचे मनन करितो.
केवळ दुष्ट मार्गाकडे न जाणे पुरे नाही. ज्या हृदयातून दुष्टता बाहेर काढण्यात आली आहे व जे शुद्ध करण्यात आले आहे त्यात देवाचे वचन भरले जावे. देवाच्या वचनाचे रात्रंदिवस मनन करणे म्हणजे वेळोवेळी वाचलेल्या वचनाचा विचार करणे जेणेकरून ते आपल्या अंतःकरणात रूजावे. खाल्लेले अन्न ज्याप्रकारे अनेक तासांमध्ये पचल्या जाते, त्याचे रक्त होते, त्याचे मास व हाडे होतात तशाप्रकारचे हे आहे.
जेवण खाण्याकरिता कमी वेळ लागतो. परंतु खाल्लेले जेवण पचण्याकरिता पुष्कळ त्रास लागतात. देवाचे वचन वाचण्याकरिता कमी वेळ लागतो परंतु, वाचलेल्या वचनाचे मनन करणे महत्वाचे आहे. जर आपण देवाच्या वचनाचे मनन केले तर आपण पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेल्या झाडासारखे व हंगामी फळ देणार्या झाडासारखे होतो आणि आपण हाती घेतलेले काम सिद्धीस जाते.
देवाचा आशीर्वाद आपल्या हातच्या कामावर व आपल्या मुखातील शब्दांवर असतो. अशाप्रकारचे जीवन जगावे अशी देवाची इच्छा आहे.
No comments:
Post a Comment